नमस्कार.
अनुरा अनिकेत आपटे माझी मुलगी. "चिंगी..." या सदरात तिच्या काही गोड आठवणी मी जपून ठेवल्या आहेत. तुम्हालाही त्या नक्कीच आवडतील...
०६.०१.२०१५
अनुभवले जग नवे नवे...
सकाळचे १०:१५ वाजले असतील. माझे डोळे उघडत नव्हते पण बाहेर काहीतरी वेगळं वेगळं जाणवत होतं. नेहमी हाताला लागतं तसं काहीच नव्हतं. वेगवेगळे आवाजमात्र येत होते. मला खूप भूक लागली होती पण सांगणार कसं... इतक्यात मला कोणीतरी जवळ घेतलं. काहीतरी जिभेला लागलं. मला ते आवडलं पण जास्त पिऊ शकले नाही कारण पोटच भरून गेलं...
पाण्याचा एक थेंब माझ्या गालावर पडला. मला जास्त काही कळलं नाही. पण इतकंमात्र खरं होतं, की जी उबदार पिशवी मी आजवर अनुभवत होते तशीच ऊब मला आत्ताही मिळत होती आणि मला जवळ घेणारी व्यक्ति रडत होती. नकळतच माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं...
१२.०६.२०१५
पहिला पाऊस पहिली आठवण...
सकाळी माझे डोळे उघडले. जाणवलं की वातावरण काहीसं वेगळं होतं. आई-बाबा गरमीमुळे कटकट करत नव्हते. मलाही छान छान वाटत होतं. खिडकीबाहेर उन्हाचा लवलेशही नव्हता. पण कसलासा आवाज येत होता. मी बाबाकडे पाहिलं...
माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बाबाने वाचलं आणि मला कडेवर घेऊन खिडकीजवळ नेलं. बाहेर मस्त गारगार होतं. मोठ्ठं पाणी पडत होतं. मला आवडलं. बाबा म्हणाला, "चिंगू, हा बघ पाऊस... हा तुझा पहिला पावसाळा..." मी आनंदाने हात-पाय झाडले. खरंच... पाऊस कित्ती सुंदर असतो ना...
११.०९.२०१५
पैंजण वाजे छन छन छन...
सकाळ झाली होती. झोपेचं फुलपाखरू माझ्या डोळ्यांवरून उडून गेलं होतं. पण मी तशीच पडून राहिले. काही वेळाने कुशीवर वळले तर, "छन छन..." असा आवाज आला. मी डोळे उघडून नजर फिरवली. पण काहीच नव्हतं. पुन्हा कूस बदलली आणि, "छन छन..." अरेच्च्या..!! परत तोच आवाज... मी उठून बसले. वर पाहिलं तर काहीच नव्हतं. आजूबाजूलाही काही नव्हतं. माझ्या हातांकडे पाहिलं तर तिथेही काही नाही... मग हा आवाज कुठून आला...???
विचार करत असताना माझी नजर पायांकडे गेली. दोन्ही पावलांजवळ काहीतरी चमकणारं गोलगोल होतं. मी पाय झाडले आणि, "छन छन..." असा आवाज आला. मी हसले आणि त्या गोलगोलवर हात मारू लागले. आई-बाबा बहुतेक बाहेरून सर्व पाहत असावेत. ते आत आले. बाबाने मला कडेवर घेतलं. आई म्हणाली, "चिंगू, हे काय माहित आहे... हे आहेत तुझे पैंजण..." मी पुन्हा पाय झाडले. "छन छन..." आवाज ऐकून मजा वाटली. मी आनंदाने बाबाला मिठी मारली...
२०.०९.२०१५
बाप्पा माझा गोडुला...
सकाळ झाली होती. मी चुळबूळ करत उठले. मला काहीसं वेगळं वाटत होतं. आई आली आणि मला अंघोळीसाठी घेऊन गेली. यावेळी मी कधीच अंघोळ केली नव्हती. मला नवल वाटलं. आई म्हणाली, "चिंगू, पटकन तयार व्हायचं बरं का... आज पूजा आहे ना... बाप्पा आलेत घरी..." मी ऐकतच राहिले. आईने मला तयार केलं. तो नेहमीसारखा फ्रॉक नव्हता तर मोठ्ठा घेर असलेलं हिरव्या रंगाचं काहीतरी होतं. आईने मला कडेवर घेतलं. म्हणाली, "चिंगूराणी, हे तुझं परकर-पोलकं... छान आहे ना..."माझं ते रुपडं मला खूप आवडलं. मी टाळ्या वाजवू लागले. पण मनात शंका होतीच, "कोण बाप्पा... कसली पूजा..." आईला समजलं. ती मला बाहेर घेऊन आली...
बाहेर एका मोठ्या पांढऱ्या पक्षावर कोणीतरी बसलं होतं. मला नवल वाटलं. सगळे बसतात तेव्हा काहीतरी चौकोनी असतं खाली. मग हे काय... बाबाने मला पाहिलं. मला कडेवर घेऊन त्या पक्षाच्या जवळ घेऊन गेला. अरेच्च्या... हा पक्षावर बसलेला माणूस काहीसा वेगळा वाटत होता... पापण्या हलवत नाही की तोंड हलवत नाही... बरं... याला तोंडच नाही... आणि नाक, हे भलं मोठ्ठं लांबलचक... मला गम्मत वाटली. मी त्या माणसाकडे झेप घेणार तोच मला बाजूला उभा असलेला उंदीरमामा दिसला. मी त्याला हात लावला पण तो पाळलाच नाही. मी बाबाकडे पाहिलं. बाबा हसला. म्हणाला, "चिंगू, हा आपला गणपती बाप्पा आणि हा त्याचा मित्र उंदीरमामा... आता आपण या बाप्पाची पूजा करायची..." मी आनंदाने ओरडले आणि बाप्पाच्या पायाला हात लावला...
१२.१०.२०१५
मनीमाऊ कशी शोनुली...
रोज संध्याकाळी आई मला फिरायला घेऊन जाते. आज मला जरा जास्तच कंटू येत होता. म्हणून मग आई मला जरा लवकरच बाहेर घेऊन आली. बाहेर ऊन तर होतंच पण गारगार पण होतं. मी बागेत छान खेळले. जरा वेळाने आम्ही परत येऊ लागलो. एका झाडाखाली अंगाचं वेटोळं करून कोणीतरी झोपलं होतं. मी पाहिलेली सर्व माणसं दिसायला माझ्याचसारखी होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. त्याला छोटेसे कान होते आणि तेही त्याच्या डोक्यावर. छोटंसं नाक होतं आणि मिशा चेहऱ्याच्या बाहेर आल्या होत्या. तो जागा झाला आणि माझ्याकडे पाहू लागला...
त्याचे डोळे हिरवेगार होते आणि मी रांगताना जशी दिसते तसाच हा पण दिसत होता. त्याच्या मागे काहीतरी हलत होतं. मी माझ्या मागे पाहिलं तर काहीच नव्हतं. मला नवल वाटलं... मी आईकडे पाहिलं. आई हसली. म्हणाली, "चिंगू, ही कोण ठाऊक आहे... ही आहे मनीमाऊ आणि ही तिची शेपटी..." मी हसले. हातांनी खुणा करून मनीमाऊला बोलवू लागले. मनीमाऊनेही माझ्याकडे पाहून गोड आवाजात "म्याव..." केलं. मला खूप गंमत वाटली...
१०.११.२०१५
दिन दिन दिवाळी...
पहाटेची वेळ असेल. सूर्यकाका अजून झोपलाच होता. मी डोळे किलकिले केले. बाबा बाजूलाच बसला होता. आई कामात असणार कारण जवळ दिसत नव्हती. मी कूस बदलली आणि डोळे उघडले. मला पाहून बाबा हसला. मीही हसले आणि उठून बसले. बाबाच्या पाकिटाशी मला खेळायला खूप आवडतं. तेच घेऊन मी खेळत होते, इतक्यात, "धडाम..."
मोठ्ठ्या आवाजाने मी दचकले. काहीवेळ शांतता पसरली आणि लगेच, "धडाम... तडतडतडतड... धडाम..." असे जोरजोरात आवाज येऊ लागले. मी खूप घाबरले आणि बाबाला बिलगले. बाबानेही मला कुशीत घेतलं. ते आवाज बराच वेळ सुरू होते. प्रत्येक आवाजागणिक मी अजून दचकत होते आणि बाबा मला गच्च मिठीत घेत होता. हळूहळू आवाज कमी होत होत बंद झाले. मी बाबाकडे पाहिलं...
माझा रडवेला चेहरा पाहून बाबा म्हणाला, "चिंगू, आज दिवाळी आहे. आज आपण छान छान कपडे घालायचे, घरात दिवे लावायचे, गोडगोड पदार्थ खायचे. पण काही माणसांना बरं का, मोठ्ठा आवाज केल्याशिवाय चैनच पडत नाही. ते वेडपट असतात. आपण त्यांच्याकडे लक्षच, द्यायचं नाही. आपलं आपलं खेळायचं..." मला समजलं. मी हसले. बाबा मला घेऊन बाहेर आला. बाहेर खूप प्रकाश होता. घरातले दिवे तर होतेच पण लाल, हिरवे, निळे, पिवळे असे अजूनसुद्धा दिवे होते. रंगत रंगत मी घरभर फिरत होते आणि आनंदाने चित्कारत होते. खरंच... दिवाळी कित्ती छान असते ना... आनंदाची आणि प्रकाशमय...
११.११.२०१५
बाबाची झाली फटफजिती...
काल एक जम्माडी गंमत झाली... मी, आई आणि बाबा आत बसलो होतो. बाबा त्याचं काम करत होता, मी खेळत होते आणि आई मला दूधपोळी भरवत होती. एक घास माऊचा, एक घास चिऊचा... असं माझं जेवण चालू होतं. आईने पुढचा घास हातात घेतला आणि बेल वाजली. आईने दुसरा हात कानाला लावत हेलो केलं आणि त्याच वेळी मी आईच्या हातातला घास उचलून खाऊन टाकला. आई आणि बाबा दोघांनाही आनंद झाला. मग काय... आई छोटेछोटे घास ताटात ठेऊ लागली आणि मी माझ्या हातांनी उचलून ते गट्टम करू लागले...
माझं जेवण सुरू असताना मला वाटलं, एक घास आईला भरवला तर... मी पटकन घास उचलला आणि हात आईकडे नेला. आईला ते समजलं. तिने मोठ्ठा आ करून तो घास खाल्ला. आई आणि बाबाने टाळ्या वाजवल्या. मलाही बरं वाटलं. बाबा आपलं काम सोडून पुढे आला. "चिंगू... मलाही भरव ना घास..." असं म्हणून आ करून समोर बसला. माझ्या मनात आलं, बाबाची थोडी फजिती करावी. घास हातात घेऊन मी बाबाकडे नेला. तो घास खाणार इतक्यात मी हात मागे आणून स्वत:च घास खाऊन टाकला. बाबा माझ्याकडे पाहतच राहिला. त्याची फजिती झाली होती ना... आई हसू लागली, टाळ्या वाजवू लागली. मीही हसले आणि टाळ्या वाजवल्या...
२६.११.२०१५
उभी राहिली परीराणी...
काल एक नाव्लाजक गोष्ट घडली. मी आपली आई, बाबा आणि माझ्या दोन्ही आज्यांसोबत खेळत होते. सोफ्याला धरून धरून चालत होते. एका क्षणी वाटलं, हात सोडून द्यावेत. बघू तरी काय होतं... दोन्ही हात एकदम सोडून दिले. पाहिलं तर मी तशीच उभी होते. खाली नाही पडले. काहीतरी नवल घडलंय असं वाटलं कारण सगळेच टाळ्या वाजवत होते. मी पडू लागले तशी सोफ्याचा आधार घेत पुन्हा उभी राहिले...
मला हे नवल आवडलं. काही वेळाने मी पुन्हा तसंच केलं. सोफ्याला धरलेले दोन्ही हात सोडून दिले. यावेळीमात्र मागच्यापेक्षा जास्तवेळ उभी राहू शकले. मला जाम मज्जा वाटली. मी उभ्याउभ्याच टाळ्या वाजवल्या...
०६.१२.२०१५
आईची उडाली धांदल...
काल खूपच धम्माल आली. रविवार असल्याने बाबापण घरी होता. दिवसभर मी, आई आणि बाबा मस्त खेळलो. रात्र जवळ आली तशी आईने आम्हा दोघांना हटकलं, "चला, पुरे झाला खेळ... आवराआवर करा आणि जोजो करायला चला..." मला अजून खेळायचं होतं पण आईने आवरायला सुरुवातही केली होती. मी आपली बसून पाहू लागले...
आई पूर्ण खोली आवरून माझ्या खेळांच्या कपाटाकडे वळली. खाली पडलेली खेळणी एकेक करून आई कपाटात रचून ठेऊ लागली. मी भिंतीला धरून जवळ गेले. काही क्षण जाऊ दिले आणि माझा खेळ पुन्हा सुरू केला. आई एक खेळणं उचलून कपाटात ठेवी आणि मी तेच पुन्हा जमिनीवर पाडे. बाबा हे सर्व पाहत होता. आई आवरून आवरून दमली पण खेळणी संपेचना... काही वेळात जो पसारा आईने आवरला होता तो पुन्हा जमिनीवर दिसू लागला. बाबाला जोरात हसू फुटलं. मीही टाळ्या वाजवून हसू लागले. आम्हाला पाहून आईलाही हसू आवरता आलं नाही आणि तिने मला मिठीत घेतलं...
१८.१२.२०१५
पावले चालली पुढे पुढे...
काल खूप मज्जा आली. रात्र तर झाली होती पण झोपायची वेळमात्र झाली नव्हती. कारण आई आणि बाबा दोघंही आपापली कामं करत होते. मीही आईच्या शेजारी बसून खेळत होते. दिवसभराचा खेळ, त्यामुळे झालेली दमणूक आणि झोप... यामुळे मला कंटू येऊ लागला होता. थोडा खेळ, थोडी कुरकुर असा माझा कार्यक्रम सुरू असताना बाबाने माझं आवडतं गाणं लावलं, "नाच रे मोरा आंब्याच्या वनात..."
गाणं तर ऐकू येत होतं पण चित्र दिसत नव्हतं. मी जागेवर उभी राहिले तशी बाबा पुढे सरसावला पण पुन्हा जागेवर बसला. आपले दोन्ही हात पसरून मला बोलवू लागला, "चिंगू... ये इकडे ये... बघ मोर आला..." गाणं ऐकत, बाबाकडे बघत मी पुढे होऊ लागले. एक पाउल... दुसरं... तिसरं... करत करत मी बाबाकडे गेले. आई आणि बाबा दोघंही टाळ्या वाजवू लागले. मीपण खुश झाले आणि टाळ्या वाजवू लागले. बाबाने पटकन मला कडेवर घेतलं आणि आईने माझा पाप घेतला. मला कळेना... फक्त दोन-तीन पावलं तर चालले मी... मग त्यात या दोघांना इतका आनंद व्हावा की डोळ्यातून पाणी यावं...
०१.०१.२०१६
भिंगरी लागली पायाला...
काल की नाही, गम्मतंच झाली. संध्याकाळ सुरू झाली होती. माझी
झोपही झाली होती आणि आईने दूधपोळी भरवल्याने पोटही टम्म होतं, त्यामुळे मी मस्त खेळत होते. इतक्यात
बाबा आला. त्याला पाहताच मी जागेवर उठून उभी राहिले आणि बाबाला बोलवू लागले.
बाबाने दप्तर खाली ठेवलं व दोन्ही हात समोर करत म्हणाला,
"चिंगू, ये. जवळ ये..." मी हसले आणि चाली चाली करत
बाबाला बिलगले. मला नवलंच वाटलं. याआधी चाली चाली करताना फक्त दोन-तीनंच पावलं गेले होते आणि आज चक्क इतकी लांब चालले आणि तेही न
पडता...
सकाळ झाली. डोळ्यांवरून झोपेची परीताई उडून गेली आणि मी पुन्हा माझ्या खेळात रमले. या खोलीतून त्या खोलीत, आतून बाहेर, कधी दारात तर कधी कपाटाजवळ सारखी चाली चाली सुरू होती. हात सोडून चालण्याचा जणू मला नादच लागला होता. आई म्हणाली, "चिंगडे, भिंगरी लागली गं पायाला तुझ्या..." आई काय म्हणाली ते नाही समजलं पण मला आनंद झाला आणि मी हसू लागले व टाळ्याही वाजवू लागले...
०६.०१.२०१६
पहिला वाढदिवस...
कालचा
दिवस खूप मजेचा होता. माझी सकाळ झाली तशी आळोखे पिळोखे देत मी उठले. आई-बाबा जवळंच
होते. मी उठले तशी ते दोघंही जवळ आले. माझे लाड करू लागले. माझा पापा घेऊ लागले.
मलाही छान वाटत होतं. माझी अंघोळ झाल्यावर आईने मला नवीन फ्रॉक घातला आणि खुर्चीत
बसवलं. मी खाली पाहिलं तर काहीतरी नक्षीदार पांढ-या रंगाचं होतं. मी त्याला हात
लावायला खाली वाकणार इतक्यात आई आली. तिच्या हातात एक गोल वस्तू होती आणि त्यात एक दिवा पण लावलेला होता. मला वाटलं की बाबा सकाळी
दिवा लावून नमो-नमो करतो तसंच असेल... सवयीप्रमाणे मीही नमो-नमो केलं. आई हसली आणि
ती वस्तू माझ्यासमोर गोल गोल फिरवू लागली. मीही माझा चेहरा तसाच फिरवू लागले. मग
आईने मला गोड काहीतरी भरवलं, म्हणाली, "चिंगू, आज तुझा पहिला वाढदिवस. आज माझी चिंगूराणी वर्षाची झाली. आता तिला औक्षण
केलं आणि तिच्या आवडीचा रव्याचा लाडू भरवला..." आई काय म्हणाली ते नाही समजलं
पण छान वाटलं...
संध्याकळ सरत आली तशी मी खेळून घरी आले. पाहते तो बाबा आधीच आला होता. घरात काहीतरी चमकदार लावलं होतं, फुगेसुद्धा लावले होते आणि माझे ताई-दादापण आले होते. बाबाने काहीतरी पांढरं-पांढरं समोर ठेवलं, सगळे ताई-दादा टाळ्या वाजवू लागले आणि मला खेळणी देऊ लागले. मग आईने जेव्हा ते पांढरं-पांढरं मला भरवलं तेव्हा परत टाळ्या वाजल्या. सर्वांनी छान गाणी म्हटली, माझ्यासोबत खूप खेळले सर्व. मला खूप छान वाटलं. नेमकं असं काय खास होतं आज ते नाही कळलं पण दिवस वेगळा होता हे नक्की...

२१.०१.२०१६
घोडा चाले तबडक तबडक...
तुम्हाला माहित आहे, घोडा म्हणजे काय...??? अहो घोडा म्हणजे माझा बाबा... आता तुम्ही म्हणाल, "चिंगे, अगं बाबा घोडा कसा असेल..??" सांगते
सांगते... तर, आज संध्याकाळचीच गोष्ट...
मी बाहेर खेळत होते. गारगार वारा वाढल्यामुळे आई मला आत घेऊन आली. पाहते तर बाबा आधीच आलेला होता. बेडवर बसून काहीतरी लिहीत होता. बाबा कसा दिसत होता सांगू... आपला बोका ऊभा राहिल्यावर कसा दिसेल... अगदी तसा... आम्ही आल्याचं बाबाला कळलं नसावं. कारण तो वळला नाही. मी आणि आईने एकमेकींकडे पाहिलं. आम्ही एक गम्मत करायचं ठरवलं...
आम्ही हळुच मागून गेलो आणि आईने मला बाबाच्या पाठीवर बसवलं. बाबाला कळलं. त्याने वळून पाहिलं तशी मी हसले. मग काय, आईने मला धरलं आणि बाबा मला पाठीवर घेऊन बेडभर रांगत होता. तोंडाने, "तबडक तबडक" असा आवाजही काढत होता. मला मज्जा वाटत होती म्हणून मीही आनंदाने टाळ्या वाजवत होते. काही वेेळाने बाबा म्हणाला, "चिंगू, उतरा आता. घोडा थकला..." आईने मला खाली उतरवलं. आता मला समजलं घोडा म्हणजे काय... तुम्हालाही समजलं ना...

०७.०२.२०१६
चम्मक लाडू...
कालची संध्याकाळ खूपंच मजेची होती. झोप झाली तशी
मी उठून बसले. पाहते तर आई आणि आबी धावपळ करत होत्या. तयार होत होत्या. मला पाहून
आई जवळ आली. म्हणाली, "मनी, चला, पटापट आवरा. आज एका मुलीचं बोरनहाण आहे
आणि हो, चम्मक
लाडूसुद्धा बरं का..." आई काय म्हणते मला कळेना. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न
आईला कळला असावा. ती म्हणाली, "कळेल हो. लवकरंच कळेल..."
आईने मला नवीन फ्रॉक घातला. काळा रंग आणि सोनेरी ठिपके असलेला हा फ्रॉक मला खूप आवडला. आबीने कपाळाला काहीतरी लावलं. मला मज्जा वाटली. मग काय, बांगड्या, कानातले, गळ्यातलं सर्व घालून घेतलं मी. माझं नटणं सुरू असताना ताई, दादा, काकू, मावशा या सर्वजणी माझ्याभोवती गोळा झाल्या. आईने मला खाली बसवलं आणि आबीने डोक्यावरून काहीतरी ओतलं. पण ते पाणी नव्हतं, उलट हिरवी-हिरवी फळं आणि पांढ-या लाह्या होत्या. मी आईकडे पाहिलं. आई म्हणाली, "मनी हे आहे तुझं बोरनहाण. उचल पाहू ती बोरं..." मी हसले आणि उठून उभी राहिले...

पडलेली बोरं उचलणार इतक्यात अपर्णा आत्त्या समोर आली आणि तिने माझ्या पायांवर छोटे-छोटे लाडू ओतले. ते घरंगळत जाणारे लाडू पाहून मला गम्मत वाटली. आई म्हणाली, "चिंगू, हे काय होतं माहित आहे..." मी हसले आणि टाळ्या वाजवल्या. कारण मला समजलं होतं. तुम्हालाही समजलं ना... बरोब्बर... चम्मक लाडू...
१५.०२.२०१६
उंदीरमामा गोडुला...
परवा की नाही गंमतच झाली. मी माझ्या छोट्याशा दादाच्या बारशाला गेले होते. एकटी नाही बरं का... आई, बाबा आणि आजीही होतेच की सोबत. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा माझी झोप झाली होती. ताजीतवानी होऊन मी खेळायला तयारच होते. समोर एक माणूस नाचत होता. मोठ्ठे मोठ्ठे काळे कान, गोल गोल नाक आणि एक छोटी शेपटी. तो माणूस चक्क आपल्या उंदीरमामासारखा दिसत होता. एवढा मोठ्ठा उंदीरमामा... मी घाबरून बाबाकडे पाहिलं...
बाबाने मला कडेवर घेतलं आणि त्या माणसाजवळ घेऊन गेला. म्हणाला, "चिंगू, हा कोण माहित आहे...??? हा आहे मिकी माऊस... हा लहान मुलांसोबत खेळतो, नाचतो... पण कोणालाच त्रास देत नाही. बघ हात लाऊन..." मी त्याला हळूच हात लावला. पण त्याने मला काहीच केलं नाही. उलट प्रेमाने मला कुरवाळलं. मला तो मिकी आवडला. पण त्याहून आवडलं ते त्याचं गोलगोल नाकडू. मग काय विचारता... त्या मिकीचे नाक ओढणे... ढूश्शा देणे... डोक्यावर डोकं आपटणे... असे माझे खेळ सुरू झाले. माझ्याहूनही ऊंच असा हा उंदीरमामा मला फार आवडला...
०४.०३.२०१६
तो माझा शब्द पहिला...
काल काय गंमत झाली सांगू... बाबा घरी आला. नेहमी जेव्हा तो येतो तेव्हा मला कडेवर घेतो. माझा पापा घेतो आणि मग जाऊन कपडे बदलतो. नमोनमो करतो आणि बाहेर येऊन माझ्याशी खेळतो. बाबाने आजही तसंच केलं. तो आला आणि माझा पापा घेऊन आत पळाला. बाबा आत आवरत होता आणि मी बाहेरून पाहत होते. बाबा माझ्याकडे पाहून हसला. मीही हसले आणि...
"बाबा..." अशी हाक मारली. बाबाने वळून पाहिलं. तो हसला. म्हणाला, "मनी, परत म्हण ना बाबा..." बाबा काय म्हणाला ते नाही समजलं पण मी पटकन बोलून गेले, "बाबा..." बाबा हसला. खाली बसला. दोन्ही हात लांब करून मला बोलवू लागला. मीही, "बाबा... बाबा..." असं म्हणत त्याला जाऊन बिलगले. बाबाने मला उचलून माझा पापा घेतला. मी पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी त्याच्या डोळ्याला हात लावला तर त्याने मला अजून घट्ट मिठीत घेतलं...
२०.०३.२०१६
पेटली आनंदाची होळी...
कालची संध्याकाळ खूपखूप वेगळी होती. मी नेहमीसारखी उठले. पाहते तर मावशी आधीच आल्या होत्या. आईने मला तयार केलं आणि मी पळाले बाहेर खेळायला मावशींसोबत... वाटेत खूपजण झाडाची मोठ्ठी पाने, लाकडाच्या फळ्या घेऊन जाताना दिसले पण मी काही तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. घरी परत येताना मला एक डोंगर दिसला. तो डोंगर त्याच पानांचा आणि फाल्यांचा होता जी मी मघाशी पाहिली होती. मला नवल वाटलं...
घरी आल्या आल्या मी बाबाकडे धाव घेतली. बाबाला इशाऱ्याने त्या डोंगराजवळ नेलं. तो डोंगर दाखवून मी बाबाकडे पाहिलं. बाबा हसला. म्हणाला, "मनी, ही आहे होलिका मावशीची प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एक दुष्ट राजा होता. त्या राजाला एक गोंडस मुलगा होता. त्याचं नाव प्रल्हाद दादा बरं का... तर, प्रल्हाद दादाला बाऊ करायचा म्हणून त्याने होलिका मावशीला पाठवले. होलिका मावशी प्रल्हाद दादाला घेऊन आगीत बसली. तिला वाटलं प्रल्हाद दादाला बाऊ होईल. पण झालं उलटंच... प्रल्हाद दादा सुखरूप बाहेर आला आणि देवाने होलिका मावशीलाच शिक्षा केली. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण ही होळी पेटवतो. त्या होलिकेच्या रूपात सारं वाईट जाळून जातं आणि मागे राहतात प्रल्हादरूपी चांगले विचार." मी समजले. हळूच हसले. होळी पेटली आणि तिच्याकडे पाहून मी टाळ्या वाजवू लागले...
गवतावर माझ्यापुढे कोणीतरी झोपलं होतं. रंग पूर्ण काळा होता त्यामुळे कोण आहे ते कळत नव्हतं. पण ती छोटी मुलगी असावी, कारण फ्रॉक घातलाय असं वाटत होतं. मी तिला पकडायला खाली वाकले तोच ती हलली आणि एकदम छोटी झाली. मी उठून उभी राहिले तर ती मुलगी आधीसारखी दिसू लागली...
मी ठरवलं की हिच्याशीच खेळायचं. तिला पकडायला मी पुढे जायचे तेव्हा तीही पळायची. मी जसे हातवारे करत होते तसेच करत मला माझी नक्कल करून दाखवायची. रागावून मी तिच्याकडे पाठ फिरवली तर ती गायब व्हायची. मी बाबाकडे पाहिलं. तो सगळं पाहत होता. त्याने मला कडेवर घेतलं. खाली पाहते तर ती काळी मुलगी नव्हती उलट एक लांब माणूस दिसला. मी हात हलवला...
बाबा समजला. म्हणाला, "चिंगू, ही सावली आहे. ती नेहमी उन्हातच दिसते. सावली सूर्याला खूप घाबरते. म्हणून तर जेव्हा आपली पाठ सूर्याकडे असते तेव्हा ती आपल्याला समोर दिसते आणि आपण सूर्याकडे वळलो की सावली आपल्या मागे लपते. पण ती आपली खूप चांगली मैत्रिण असते. आपण जे करतो तेच ती करते." मला समजलं. मी टाळ्या वाजवल्या. खाली पाहते तर ती सावलीही टाळ्या वाजवत होती...
२०.०४.२०१६
नकल्या मारुती...
"नकल्या मारुती" म्हणजे काय, ठाऊक आहे...??? नाही... सांगते सांगते... नकल्या मारुती म्हणजे मी... कसं... हे असं...
कालची संध्याकाळ तशी नेहमीचीच होती. बाबा कामावरून आला आणि आवरून बसला टी.व्ही. बघायला. मी ठरवलं, आज बाबासोबत खेळायचं आणि त्याच्याजवळ बसण्याचा हट्ट केला. बाबाने मला उचलून त्याच्या बाजूला बसवलं आणि पुन्हा टी.व्ही.मध्ये बुडाला... मी बाबाला न्याहाळत होते. तो काय करतोय... कसा बसतोय... याकडे लक्ष देत होते...
बाबाने पाय पसरले, मग मीही पसरले. त्याने केसातून हात फिरवला मी मीही माझ्या केसांना हात लावला. आईने आणून दिलेल्या भांड्यातून बाबा फुंकर मारून पिऊ लागला आणि मीही माझ्याजवळ असलेल्या पेल्याला फुंकर मारू लागले. आई हे सर्व पाहत होती. तिच्या आणि बाबाच्या खाणाखुणा झाल्या. बाबाने माझ्याकडे पाहिलं आणि आमचा खेळ सुरू झाला...
बाबा जीभ बाहेर काढी, मीही काढी. त्याने डोक्याला हात लावला तेव्हा मीही लावला. त्याने टाळ्या वाजवल्या तर मीही टाळ्या वाजवू लागले. बाबा हसला तशी मीही हसू लागले. बाबाने मला उचललं आणि माझा पापा घेतला. म्हणाला, "चिंगू, नकल्या मारुती आहेस हो अगदी..."
०३.०५.२०१६
बाहुला खरा की...
काल संध्याकाळी तर मज्जाच झाली. झोप संपवून मी उठले. पाहते तर आई आणि बाबा दोघंही तयार होऊन बसलेले... मला नवल वाटलं. आई म्हणाली, "चल मनी... आवर पटकन... आपल्याला बाहेर जायचंय ना..." बाहेर हा शब्द ऐकला आणि मी लगेच उठले. बाबाने मला फ्रॉक घातला, पावडर लावली, बूट घातले. मी सर्व हसत हसत करवून घेतले. मला वाटलं बागेत जायचं... काऊ, चिऊ पहायचे पण असं नव्हतंच मुळी...
तयार होऊन आम्ही निघालो. बागेत जाण्याऐवजी गाडीत बसलो. प्रवास लांबचा होता त्यामुळे हळू हळू मला कंटू येऊ लागला होता. आम्ही एका घरात गेलो. मी आईच्या कडेवरच होते. त्या घरात एक काका-काकू होते. त्या काकूच्या हातात एक बाहुला होता. मोठ्ठे मोठ्ठे डोळे, छोट्टसं नाक, छोटेसे हात... मला तो बाहुला खूप आवडला. मी त्याच्या गालाला हात लावला तशी त्याने डोळे मिचकावले. मी हात मागे घेतला आणि त्या बाहुल्यानेच माझ्या गालाला हात लावला...
आजवर मी ज्या बाहुल्यांशी खेळले, ते सर्व शांत बसलेले असायचे आणि इथे हा बाहुला... मी दचकले आणि बाबाकडे झेप घेतली. आई म्हणाली, "मनी, हा बाहुला नाही बरं का... हा कोण माहित आहे... हा आहे तनिश. गोडू आहे ना..." मला तर तो आधीच आवडला होता. आमची गट्टी जमली. मी त्याला खुळखुळा खेळायला दिला. त्याच्यासोबत खेळलेसुद्धा. घरी जाताना मी ठरवलं, आई-बाबाच्या मागे लागायचं म्हणजे ते पुन्हा मला तनिशसोबत खेळण्यासाठी इथे आणतील...
काल आम्ही सगळे आबीकडे गेलो होतो. बाबा, आई आणि मी. सगळी मोठी माणसं काही-बाही बोलत होती आणि मी आपली माझी-माझी खेळत होते. आबांनी गाद्या घातल्या हे मी पाहिलं आणि आईला आत जाण्याचा इशारा केला. सगळे आत आलो आणि मी गादीवर धुडगूस घालू लागले. चादरी उचलणे, उशा टाकणे, गादीवर हात मारणे असे नेहमीचे माझे खेळ सुरू झाले. काही वेळाने मी शांत झाले आणि सर्वांकडे पाहू लागले. बाबाने माझं मन ओॆळखलं. तो हसला...
बाबाने सर्वांना काहीतरी सांगितले तसे सगळे माझ्याकडे पाहू लागले. बाबा म्हणाला, "मनी, आता दाखव बरं..." मी हसले. एकदम खाली वाकले आणि डोक्यावरून धप्पकन् पाठीवर पडले. सगळे मोठ्ठे डोळे करून पाहू लागले. आबा म्हणाले, "मन्या, या वयात कोलांटी उडी... वाह वाह..." मी टाळ्या वाजवल्या. बाबाने शिकवलेल्या या गोष्टीला कोलांटी उडी म्हणतात हे मला काल समजलं होतं ना...
बाबाला माझ्या चेह-यावरची शंका समजली. तो म्हणाला, "मनी, आज खूप छान दिवस आहे. आज ही गोडुली परी दीड वर्षांची झाली, मोठ्ठी-मोठ्ठी झाली. म्हणूनच हा तुझ्या आवडीचा खाऊ आणलाय. मनात शंकेची माऊ पुन्हा म्याव-म्याव करू लागली, "कोण परी...? कुठे आहे परी...?
बाबाला हल्ली माझा चेहरा वाचता येतो बरं का. त्याने पटकन ओळखलं आणि मला आरशासमोर घेऊन गेला. आरशात पाहून म्हणाला, "मनी, ही बघ ती गोडुली परी." आरशातलं ते माझं रुपडं पाहून मी हसले आणि बाबाने कडेवर घेताच तो खाऊ त्याला भरवला...
बाबा म्हणाला, "मनी, बघ कसा मस्त पाऊस पडतोय... ये जवळ ये..." मी बाबाकडे झेप घेत खिडकीजवळ गेले. पावसाचं पाणी थेंब थेंब करत चेहे-यावर पडलं. मस्त थंड-थंड वाटलं. मी आनंदले. आईने माझा हात पडत्या पाण्याखाली धरला. पावसाचं गार-गार पाणी मी हातावर झेलत होते. आई व बाबा काही-बाही बोलत होते आणि...
हातावर पडणारं पाणी मी आईवर उडवलं. मला मज्जा वाटली. मग मी तसंच बाबावर पाणी उडवलं. मला अजून गम्मत वाटली. मी हसले. मग काय विचारता... कधी आईवर तर कधी बाबावर मी पाणी उडवत राहिले. हा मजेचा खेळ मला खूप आवडला आणि मी टाळ्या वाजवल्या...
मी खेळणी काढून फेकू लागले आणि इशा-याने बाहेरचा रस्ता दाखवू लागले. त्यातलं एक खेळणं पडलं आणि दोन तुकडे झाले त्याचे. बाबाने परत डोळे मोठे केले पण यावेळी आवाजही चढवला. म्हणाला, "मनी, असा हट्टीपणा नाही करायचा. बघ काय झालं त्यामुळे... आता मी बोलणारंच नाही तुझ्याशी". बाबा आत निघून गेला. मला रडूच आलं. मी आईजवळ गेले. आई म्हणाली, "मनी, असा हट्टीपणा करू नये. बघ बाबा रागावला ना. जा त्याच्याकडे...
मला समजलं. मी बाबाजवळ गेले. कडेवर घेण्यासाठी त्याला सांगू लागले. बाबाने मला उचलले. पाहते तर बाबाच्या डोळ्यात पाणी होतं. मी मनात म्हणाले, "बाबा, मी परत असं नाही करणार. केलंच तर चांगला धम्मक लाडू दे मला. पण रागवू नकोस..." बाबा समजून गेला. त्याने मला घट्ट मिठी मारली...
संध्याकाळी मी जरा लवकरंच उठले. पाहते तर बाबा माझ्या जवळ बसला होता. यावेळी बाबा कधी घरी नसतो. पण आज तो होता. त्यामुळे मी खुश होते. बाबाला पाहताच मी त्याच्याकडे धाव घेतली. जरा वेळ आम्ही खेळलो. मग मला कंटू येऊ लागला. आई तिच्या कामात अडकली होती. कंटू कंटू करत मला रडू येऊ लागलं. मी भोकाड पसरणार तोच बाबाने काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली. तो मधेच उड्या मारू लागला. तोंड वेंगाडू लागला, जिभली बाहेर काढून वेडावून दाखवू लागला. त्याला बघताना माझा कंटू कुठल्या कुठे पळून गेला...
धडाम्... फटफटफटफट.... तडतडतडतड.... तडतडतड... मी दचकून डोळे उघडले. आवाजाकडे बोट दाखवत मी बाबाकडे पाहिलं. बाबाला समजलं मी काय विचारलं, तो म्हणाला, "मनी, आज अनंत चतुर्दशी आहे. आज आपण बाप्पाचं विसर्जन करतो. म्हणजे तू जशी मावशीकडून घरी परत येतेस ना, तसाच बाप्पासुद्धा त्याच्या घरी जातो. हे सगळे बाप्पाला निरोप देण्यासाठी फटाके वाजवत आहेत..."
मला समजलं. मी हसले. मनात अजूनही शंका होतीच. मी मावशीकडे जाते तेव्हा तिला आनंद होतो आणि तिच्याकडून घरी येते तेव्हा मावशीला दु:ख होतं. तसंच बाप्पा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि जातो तेव्हा दु:ख होतं. बाप्पा जाताना आपण त्याला असे आवाज करत निरोप देतो मग बाप्पा घरी येतो तेव्हा आपण त्याला वाजत-गाजत का नाही आणत...
तर काल संध्याकाळची गोष्ट बरं का. मी नुकतीच दुपारची झोप संपवून उठले होते. आई मला भरवून काही-बाही आणायला बाहेर गेली होती. मी आणि बाबा आतल्या खोलीत खेळत होतो. बाहेर मावशी कपडे दोरीवर घालून निघून गेल्या. काही वेळ निघून गेला आणि बेल वाजली... बाबा दार उघडायला म्हणून बाहेर जाऊ लागला. आई असेल असं वाटून मी मागून पाहत होते. इतक्यात 'फुसूक...'
कपड्यांतून खाली पडलेल्या पाण्यावरून बाबा सर्रक्कन घसरला. मला मज्जा वाटली. मी टाळ्या वाजवू लागले. बाबाला समजले. दारावरचं काम झालं आणि बाबा परत फिरला. मी तशीच उभी होते. येताना बाबा पुन्हा तसाच घसरला. अगदी घसरगुंडीवरून मी जाते तसा. मला अजून गम्मत वाटली आणि मी अजून जोरात टाळ्या वाजवल्या. आता कळलं ना तुम्हाला. घसरगुंडी म्हणजे बाबा कसा ते...
माझ्या डोळ्यांसमोरून काहीतरी गेलं. पाहिलं तर एक छोटासा पक्षी एका फुलावर बसला होता. त्याचा रंग माझ्या बाबाच्या डोळ्यांसारखा होता आणि त्यावर पिवळे पिवळे ठिपके होते. तो पक्षी काऊकाका पण नव्हता आणि कबूमामा पण नव्हता. मला प्रश्न पडला, कोण असेल हा? मी बाबाला तो पक्षी दाखवला...
बाबा हसला. मला कडेवर घेत म्हणाला, "चिंगू, हे आहे फुलपाखरू. हे खूप छान दिसतं, फुलांवर बसतं, झाडांशी खेळतं." मी हसले. फुलपाखरू पकडायला पुढे सरसावले तर बाबाने मला मागे ओढलं. म्हणाला, "मनी, फुलपाखराला असं पकडायचं नाही बाळा. तू खेळताना तुला पकडलं तर चालेल..? नाही ना, तसंच आहे फुलपाखराचं." मला समजलं. मी टाळ्या वाजवू लागले. ते फुलपाखरू माझ्या कानाशेजारून गेलं. मला गुदगुल्या झाल्या. त्या फुलपाखराला मी टाटा केलं आणि फा दिला...
मला समजलं. मी बाबाला जरा थांबायला सांगून आईकडे पळाले. आईने मला माझा ब्रश दिला. आधी मी दातू घासले मग आईने परत घासले. मी लगेच बाबाकडे आले. बाबाने मला बिस्किट दिलं. पण मला ते कपात बुडवायचं होतं. बाबाने कप मागे घेतला. म्हणाला, "चिंंगू, हे अत्ता नाही बरं प्यायचं... आई आम्हाला आमच्या कपात थोडं दूध दे बघू..." आईला समजलं असावं...
आईने लगेच माझ्या छोट्या कपात मला दूध आणून दिलं. बाबाने दिलेलं बिस्किट मी त्या कपात बुडवून खाल्लं. मला खूप आवडलं. मी हसले आणि हाताने छान आहे असं दाखवलं. मग काय... बाबा एक बिस्किट त्याच्या कपात बुडवून खायचा आणि एक बिस्किट मी माझ्या. असं करत ताटलीमध्ये ठेवलेली सगळी बिस्किटं आम्ही गट्टम केली...
इतका वेळ पाण्यात खेळल्यामुळे मला जोजो येऊ लागली. आईने मला पटकन भरवलं आणि हळू हळू जोजोगाई जवळ आली. नेहमीच्या वेळी मला जाग आली. पाहते तर आई-बाबा दोघं तयार झाली होती. बाबा म्हणाला, "मनी, चला लवकर. समुद्रावर जायचंय..." आता समुद्र म्हणजे काय..? पुन्हा शंका आली मनात. बाबाला समजलं. तो म्हणाला, "मने आपण तिथे गेलो की समजेल बरं का तुला..." थोड्याच वेळात आम्ही रिक्षातून उतरलो. समोर मोठ्ठं मैदान होतं. पण त्यात ताई-दादा नव्हते. उलट पाणीच पाणी होतं. इतकं पाणी मी कधीच पाहिलं नव्हतं. मला नवल वाटलं. बाबाने मला खाली ठेवलं. ते पाणी जवळ आलं आणि पायाला गुदगुल्या करत जमीन लांब पळू लागली. मी घाबरले. बाबाला बिलगले. बाबा मला जवळ घेत म्हणाला, "चिंगू, याला समुद्र म्हणतात. आणि या आहेत लाटा. या जवळ येतात आणि मग पळून जातात. तुला खेळायचंय लाटांशी..." मी नाही म्हणाले. मला तर भितीच वाटत होती. त्या लाटा मला घेऊन गेल्या तर...
आता समजलं असेलंच तुम्हाला कसं वेगवेगळं पाणी पाहिलं ते...
काही वेळाने मम् घेऊन आई आली. मी तोंड फिरवलं. बाबाला समजलं मी उगाच नाही म्हणते आहे. तो माझ्या आवडीचं पुस्तक घेऊन आला. म्हणाला, "मनी, यात ससुल्या कुठे आहे...?" मी लगेच लांब कानांचा ससुल्या दाखवला. आईने पटकन मला घास भरवला. बाबा हसला. म्हणाला, "आता, माऊ कुठे सांग...?" मी त्या पुस्तकात पाहिलं आणि निळ्या डोळ्याच्या छोटुशा माऊवर बोट ठेवलं आणि आईने दुसरा घास भरवला...
माझी मम् सुरू असताना पुस्तक संपलं. बाबाने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, "मनी, बाबा कुठे...?" मी बाबाकडे बोट दाखवलं आणि आईने घास भरवला. लगेच आई म्हणालीच, "मना, अनिकेत कुठे...?" मी परत बाबाकडे बोट दाखवत असताना आईने घास भरवला. आईला समजलं. मग काय, निक्या, अनिबाबा, निकीमुन्ना आशा नावांची आईने यादीच सुरू केली आणि प्रत्येक नावासोबत एकेक घास आत जाऊ लागला. अशाच नावानावात माझी मम् पण झाली...
मला वाटलं मावशीकडे जायचं पण त्या बाजूला आम्ही वळलोच नाही. मग विचार आला, कदाचित आबीकडे जायचं असेल. पण त्याही बाजूला न जाता आई मला दुसरीकडेच घेऊन आली. आम्ही एका घरात शिरलो. तिथे रंगिबेरंगी भिंतींवर कसली कसली चित्र काढली होती. शिवाय बॉल, विमान, चांदोमामा, सूर्यकाका, चिऊताई, कबूमामा या सर्वांना दोर बांधून हवेत सोडलं होतं. आजू-बाजूला पाहिलं तर मला तीन मावशा दिसल्या आणि माझ्यासोबत खूप ताई-दादा होते. आई म्हणाली, "मनी, ही आहे तुझी शाळा. इथे नीट रहायचं, खेळायचं..."
शाळा कशी असते ते समजलं. मला मज्जा वाटली. एका मावशीने मला नेऊन त्या ताई-दादांमध्ये बसवलं. आई, बाबा, आबी कुणीच नाहीत पाहिल्यावर आधी मला थोडी भीती वाटली. पण हळूहळू मला ते सगळं आवडू लागलं. त्या मावशा आमच्यासोबत गाणी म्हणत होत्या, आम्हाला वेगवेगळी चित्र दाखवून गोष्टीही सांगत होत्या. दुपार झाली तशी त्या मावशांनी आमच्याकडून हात धूऊन घेतले. इतक्या बॅगांमधून मी माझी बॅग बरोब्बर ओळखली आणि त्या मावशींकडे दिली. बाकी सर्व ताई-दादा न खाण्याचा हट्ट करत होते पण मी गुड गर्ल आहे ना, माझा डबा स्वत:च निपटी-शिपटी केला...
काही वेळात आई आली आणि आम्ही आबीकडे निघालो. आबीने विचारलं, "छकुले, कशी वाटली शाळा...?" मी हसले, टाळ्या वाजवू लागले आणि आनंदाने नाचूही लागले...
बाबा हसला. त्याला समजलं मला काय विचारायचं होतं. म्हणाला, "मने, याला सरकता जिना म्हणतात. याच्यावर नुसतं उभं रहायचं म्हणजे आपण न चालताच वर आणि खाली जाऊ शकतो." मला समजलं. मी टाळ्या वाजवल्या. बाबाला तिथे घेऊन जाण्याचा हट्ट केला. बाबाने मला जिन्यावर ठेवलं. खरंच की... मी काही न करता वर जात होते. थोडी भिती वाटली पण बाबाने हात धरला होता म्हणून बरं वाटलं. लगेच दुस-या जिन्याने आम्ही खाली पण आलो. मला हा सरकता जिना खूपच आवडला. मग काय विचारता...
बाबाला घेऊन आधी वर मग खाली, सारखी भटकंती करू लागले. बाजूने चाललेल्या सरकत्या पट्ट्याला धरायला गेले तर बाबाने मला परत मधे घेतलं. अस्सा राग आला ना... पण विचार केला, हा पट्टा तर खूप ऊंच आहे, शिवाय धरायला गेले आणि पडले असते तर... नको रे बाबा. कडेला नकोच. आपण आपलं मधोमध उभं राहिलेलंच बरं. जिन्यावर मनसोक्त खेळून झालं आणि आम्ही परत जाऊ लागलो. मागे वळून तो जिना पाहिला आणि त्याला टाटा करत फा पण दिला...
मी, आई, आबी, आबा आणि माझ्या काकूआजी असे सगळे मोठ्ठ्या गाडीतून निघालो. वाटेत दंगामस्ती करत मी झोपून गेले. मला जाग आली तेव्हा एका मोठ्ठ्या हॉलमध्ये होते. पाहते तर बाबा आमच्या आधीच आलेला. बाबाला पाहताच मी त्याच्याकडे धावले. मला कडेवर घेत बाबा म्हणाला, "अरे वा... मनी आली का... चला आता तयार व्हयचं छान-छान... आजी येणार आहे ना..." मी लगेच आईकडे पळाले. आईने मला भरवलं आणि छान नवा फ्रॉक घालून बाहेर आणलं...
बाहेर खूप काका, काकू, ताई, दादा होते. आजी एका मोठ्ठ्या खुर्चीवर बसली होती. एक आजी हातात कसलीशी काठी धरून काही-बाही बोलत होती. मग बाबा मला आजीजवळ घेऊन गेला. माझ्या हातात एक पाकीट दिलं आणि म्हणाला, "मनी, हे पाकीट उघड बघू..." मी पटापट ते पाकीट उघडू लागले. आतून एक पुस्तक बाहेर आलं. ते पुस्तक सर्वांना दाखवत होते तर सर्वजण टाळ्या वाजवू लागले. त्यांना पाहून मीही टाळ्या वाजवल्या. बाबा म्हणाला, "आमच्या मनीच्या हातून हे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे, आता दुसरी गम्मत..." पुस्तक प्रकाशन म्हणजे काय ते समजलं पण दुसरी गम्मत... काय बरं असावी... हा विचार करत होते इतक्यात बाबाने तसंच दुसरं पुस्तक बाजूला आणून ठेवलं...
बाबा म्हणाला, "मने, आज आजीचा वाढदिवस आहे ना... आता आजी हा केक कापणार..." मी पाहिलं तर मला केक कुठे दिसेच ना... पण बाजू-बाजूला दोन पुस्तकं दिसली. मी विचारात पडले. बाबा हसला. म्हणाला, "मने, हा डावीकडे आहे ना तो केक आहे आणि उजवीकडचं पुस्तक आहे..." मी परत पाहिलं. केक कुठला आणि पुस्तक कुठलं तेच समजत नव्हतं. वाटलं बाबा माझी टिंगल करतोय. पण लगेच आजीने तो केक कापला तेव्हा कुठे मला कळलं की हे पुस्तक नाही हा केक आहे...
आजीने मला केक भरवला. बाबा म्हणाला, "मने, हा केक काकूने बनवलाय... कसा आहे..." मी हाताने खूण करत केकला तर छान म्हटलंच वर हवेत फा दिला. आई-बाबाला नाही समजलं पण काकू तुला कळलं ना हा फा कोणासाठी ते...
आम्ही बाहेर आलो. आईने पटकन माझे फोटो काढले पण तेही मला नाही दाखवले त्यामुळे रागोबा अजून मोठे झाले. आईला समजलं. ती म्हणाली, "मनी, आता शाळेत गेल्यावर तुला आपोआपंच कळेल हो". मी विचारात पडले. कळेल... काय कळेल... काय आहे आज शाळेत... आणि त्यासाठी मला लवकर का उठवलं... बरं शाळा तर सकाळची असते... मग आजंच संध्याकाळी का... ढग भरपूर पण पाऊस नाही असंच काहीसं झालं. म्हणजे प्रश्न भरपूर आणि उत्तरं नाहीत अशा कोंडीत मी सापडले...
शाळेत पोहोचले तेव्हा वेगळंच चित्र दिसलं. सगळी शाळा झालरींनी, पताकांनी, वेगवेगळ्या चांदण्यांनी सजवली होती. कोप-यात एक छोटंसं झाड होतं. वेगळंच होतं पण छान होतं. त्या झाडालाही तसंच सजवलं होतं वर कापसाचा फेस करून पसरवला होता. हे काय मला कळेना... आई म्हणाली, "मनी आज नाताळ आहे. आज अशीच सजावट करायची. छान-छान फ्रॉक घालायचे". मला समजलं. मी झाडाकडे पाहतंच होते की समोरून मावशी आल्या. म्हणाल्या, "आय्या, परीताई... कित्ती गोंडस गोडुली दिसते. थांब तुला आरसा दाखवते." मावशींनी भला मोठा आरसा समोर ठेवला. मी पाहिलं तर डोक्यावर एक मुकूट होता. त्याला दोन चांदण्या होत्या. हातात आईने दिलेली चांदणी लावलेली काठी होती आणि पाठीला... अरेच्चा... हे तर पंख... मला, "परीताई ए परीताई... खाऊ मी देईन तुला..." हे गाणं आठवलं. मी हसले आणि टाळ्या वाजवू लागले...
काल रात्री मी आणि बाबा आवारात फिरत होतो. मी माऊशी खेळत होते, काऊ काकाला पकडायला जात होते. इतक्यात एक काऊ काका आकाशात उडाला. त्याला बघतंच होते की आकाशात मला काहीतरी चमचमणारं दिसलं. मी बाबाकडे धावले. त्याने कडेवर घेताच परत त्या चमकणा-या गोष्टीकडे पाहू लागले. मनात प्रश्न पडू लागले, अरेच्चा! पांढरा आहे पण हा चांदोमामा नाही कारण चांदोमामा तर गोलगोल असतो... बरं याला चांदणी म्हणावं तर ती सारखी लुकलुकत असते... आणि हा तर घरातल्या दिव्यासारखा एकसंध प्रकाश देतोय...! मी बाबाकडे पाहिलं...
बाबा हसला. म्हणाला, "मनी हा कोण आहे सांगू... हा आहे ध्रूव तारा. खूप आधी ध्रूव नावाचा एक गोड मुलगा होता. त्याचे बाबा म्हणजेच राजा उत्तानपाद त्याच्यावर जिवापाड प्रेम करायचे. पण त्याच्या आईला म्हणजे राणी सुनितीला हे नाही आवडायचं. एकदा ध्रूवबाळ वडिलांच्या खांद्यावर खेळत होता. हे पाहून आई त्याला खूप ओरडली आणि त्याला खाली उतरायला सांगितले. ध्रूवबाळ रागावला. जंगलात निघून गेला. त्याला माहीत होतं की बाप्पाला नमो नमो केलं की बाप्पा बक्षीस देतो. त्याने मनापासून नमो नमो केलं. बाप्पा प्रसन्न झाले. म्हणाले, "बाळा, काय हवं तुला..?" ध्रूव बाळ लगेच म्हणाला, "जिथून मला कोणीही उठवणार नाही अशी जागा मला दे..." बाप्पा तथास्तू म्हणाले...
ध्रूव बाळ घरी परतला. अनेक वर्ष राज्य करून मग त्याने एका ता-याचे रूप घेतले. तोच हा ध्रूव तारा. चांदण्याच काय तर चांदोमामाही त्याच्या भोवती फेर धरतो. पण ध्रूव तारा आपली जागा कधीच सोडत नाही." मी हसले. मला समजलं. परत जाताना मी त्या ध्रूव ता-याला टाटा केलं...
माझी रंगपंचमी तर खूप छान झाली. पण काही ताई, दादा, काका, काकू डोक्यात रंग घालतात, पाणी घालतात. शिवाय ते रंगही काळा, सोनेरी, चंदेरी असे वाईट असतात. ते रंग नंतर निघतंच नाहीत आणि रंग डोळ्यात जाऊन
डोळेही खराब होतात. असं काही करू नका बरं... उलट हा दिवस छान छान मजेत घालवा...
कराल ना तसं...
आता समजलं
तुम्हाला, मी बडबडी माऊ कशी ते...
०७.१२.२०१७
०४.०३.२०१६
तो माझा शब्द पहिला...
काल काय गंमत झाली सांगू... बाबा घरी आला. नेहमी जेव्हा तो येतो तेव्हा मला कडेवर घेतो. माझा पापा घेतो आणि मग जाऊन कपडे बदलतो. नमोनमो करतो आणि बाहेर येऊन माझ्याशी खेळतो. बाबाने आजही तसंच केलं. तो आला आणि माझा पापा घेऊन आत पळाला. बाबा आत आवरत होता आणि मी बाहेरून पाहत होते. बाबा माझ्याकडे पाहून हसला. मीही हसले आणि...
"बाबा..." अशी हाक मारली. बाबाने वळून पाहिलं. तो हसला. म्हणाला, "मनी, परत म्हण ना बाबा..." बाबा काय म्हणाला ते नाही समजलं पण मी पटकन बोलून गेले, "बाबा..." बाबा हसला. खाली बसला. दोन्ही हात लांब करून मला बोलवू लागला. मीही, "बाबा... बाबा..." असं म्हणत त्याला जाऊन बिलगले. बाबाने मला उचलून माझा पापा घेतला. मी पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी त्याच्या डोळ्याला हात लावला तर त्याने मला अजून घट्ट मिठीत घेतलं...
२०.०३.२०१६
पेटली आनंदाची होळी...
कालची संध्याकाळ खूपखूप वेगळी होती. मी नेहमीसारखी उठले. पाहते तर मावशी आधीच आल्या होत्या. आईने मला तयार केलं आणि मी पळाले बाहेर खेळायला मावशींसोबत... वाटेत खूपजण झाडाची मोठ्ठी पाने, लाकडाच्या फळ्या घेऊन जाताना दिसले पण मी काही तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. घरी परत येताना मला एक डोंगर दिसला. तो डोंगर त्याच पानांचा आणि फाल्यांचा होता जी मी मघाशी पाहिली होती. मला नवल वाटलं...
घरी आल्या आल्या मी बाबाकडे धाव घेतली. बाबाला इशाऱ्याने त्या डोंगराजवळ नेलं. तो डोंगर दाखवून मी बाबाकडे पाहिलं. बाबा हसला. म्हणाला, "मनी, ही आहे होलिका मावशीची प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एक दुष्ट राजा होता. त्या राजाला एक गोंडस मुलगा होता. त्याचं नाव प्रल्हाद दादा बरं का... तर, प्रल्हाद दादाला बाऊ करायचा म्हणून त्याने होलिका मावशीला पाठवले. होलिका मावशी प्रल्हाद दादाला घेऊन आगीत बसली. तिला वाटलं प्रल्हाद दादाला बाऊ होईल. पण झालं उलटंच... प्रल्हाद दादा सुखरूप बाहेर आला आणि देवाने होलिका मावशीलाच शिक्षा केली. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण ही होळी पेटवतो. त्या होलिकेच्या रूपात सारं वाईट जाळून जातं आणि मागे राहतात प्रल्हादरूपी चांगले विचार." मी समजले. हळूच हसले. होळी पेटली आणि तिच्याकडे पाहून मी टाळ्या वाजवू लागले...
१०.०४.२०१६
सावली माझी सखी...
काल की नाही गम्मतंच झाली. मी बाबासोबत बागेत
खेळायला गेले होते. आम्ही दोघं छान खेळत होतो. काऊ काका आणि चिऊताईच्या मागे धावणे, फुलपाखरू पाहणे. बॉल पकडणे, हे सर्व चालू असतानाच माझी नजर खाली
गेली...
गवतावर माझ्यापुढे कोणीतरी झोपलं होतं. रंग पूर्ण काळा होता त्यामुळे कोण आहे ते कळत नव्हतं. पण ती छोटी मुलगी असावी, कारण फ्रॉक घातलाय असं वाटत होतं. मी तिला पकडायला खाली वाकले तोच ती हलली आणि एकदम छोटी झाली. मी उठून उभी राहिले तर ती मुलगी आधीसारखी दिसू लागली...
मी ठरवलं की हिच्याशीच खेळायचं. तिला पकडायला मी पुढे जायचे तेव्हा तीही पळायची. मी जसे हातवारे करत होते तसेच करत मला माझी नक्कल करून दाखवायची. रागावून मी तिच्याकडे पाठ फिरवली तर ती गायब व्हायची. मी बाबाकडे पाहिलं. तो सगळं पाहत होता. त्याने मला कडेवर घेतलं. खाली पाहते तर ती काळी मुलगी नव्हती उलट एक लांब माणूस दिसला. मी हात हलवला...
बाबा समजला. म्हणाला, "चिंगू, ही सावली आहे. ती नेहमी उन्हातच दिसते. सावली सूर्याला खूप घाबरते. म्हणून तर जेव्हा आपली पाठ सूर्याकडे असते तेव्हा ती आपल्याला समोर दिसते आणि आपण सूर्याकडे वळलो की सावली आपल्या मागे लपते. पण ती आपली खूप चांगली मैत्रिण असते. आपण जे करतो तेच ती करते." मला समजलं. मी टाळ्या वाजवल्या. खाली पाहते तर ती सावलीही टाळ्या वाजवत होती...
२०.०४.२०१६
नकल्या मारुती...
"नकल्या मारुती" म्हणजे काय, ठाऊक आहे...??? नाही... सांगते सांगते... नकल्या मारुती म्हणजे मी... कसं... हे असं...
कालची संध्याकाळ तशी नेहमीचीच होती. बाबा कामावरून आला आणि आवरून बसला टी.व्ही. बघायला. मी ठरवलं, आज बाबासोबत खेळायचं आणि त्याच्याजवळ बसण्याचा हट्ट केला. बाबाने मला उचलून त्याच्या बाजूला बसवलं आणि पुन्हा टी.व्ही.मध्ये बुडाला... मी बाबाला न्याहाळत होते. तो काय करतोय... कसा बसतोय... याकडे लक्ष देत होते...
बाबाने पाय पसरले, मग मीही पसरले. त्याने केसातून हात फिरवला मी मीही माझ्या केसांना हात लावला. आईने आणून दिलेल्या भांड्यातून बाबा फुंकर मारून पिऊ लागला आणि मीही माझ्याजवळ असलेल्या पेल्याला फुंकर मारू लागले. आई हे सर्व पाहत होती. तिच्या आणि बाबाच्या खाणाखुणा झाल्या. बाबाने माझ्याकडे पाहिलं आणि आमचा खेळ सुरू झाला...
बाबा जीभ बाहेर काढी, मीही काढी. त्याने डोक्याला हात लावला तेव्हा मीही लावला. त्याने टाळ्या वाजवल्या तर मीही टाळ्या वाजवू लागले. बाबा हसला तशी मीही हसू लागले. बाबाने मला उचललं आणि माझा पापा घेतला. म्हणाला, "चिंगू, नकल्या मारुती आहेस हो अगदी..."
०३.०५.२०१६
बाहुला खरा की...
काल संध्याकाळी तर मज्जाच झाली. झोप संपवून मी उठले. पाहते तर आई आणि बाबा दोघंही तयार होऊन बसलेले... मला नवल वाटलं. आई म्हणाली, "चल मनी... आवर पटकन... आपल्याला बाहेर जायचंय ना..." बाहेर हा शब्द ऐकला आणि मी लगेच उठले. बाबाने मला फ्रॉक घातला, पावडर लावली, बूट घातले. मी सर्व हसत हसत करवून घेतले. मला वाटलं बागेत जायचं... काऊ, चिऊ पहायचे पण असं नव्हतंच मुळी...
तयार होऊन आम्ही निघालो. बागेत जाण्याऐवजी गाडीत बसलो. प्रवास लांबचा होता त्यामुळे हळू हळू मला कंटू येऊ लागला होता. आम्ही एका घरात गेलो. मी आईच्या कडेवरच होते. त्या घरात एक काका-काकू होते. त्या काकूच्या हातात एक बाहुला होता. मोठ्ठे मोठ्ठे डोळे, छोट्टसं नाक, छोटेसे हात... मला तो बाहुला खूप आवडला. मी त्याच्या गालाला हात लावला तशी त्याने डोळे मिचकावले. मी हात मागे घेतला आणि त्या बाहुल्यानेच माझ्या गालाला हात लावला...
आजवर मी ज्या बाहुल्यांशी खेळले, ते सर्व शांत बसलेले असायचे आणि इथे हा बाहुला... मी दचकले आणि बाबाकडे झेप घेतली. आई म्हणाली, "मनी, हा बाहुला नाही बरं का... हा कोण माहित आहे... हा आहे तनिश. गोडू आहे ना..." मला तर तो आधीच आवडला होता. आमची गट्टी जमली. मी त्याला खुळखुळा खेळायला दिला. त्याच्यासोबत खेळलेसुद्धा. घरी जाताना मी ठरवलं, आई-बाबाच्या मागे लागायचं म्हणजे ते पुन्हा मला तनिशसोबत खेळण्यासाठी इथे आणतील...
१९.०६.२०१६
कोलांटी उडी...
काल की नाही, मी आईच्या काळजाचा ठोकाच चुकवला. कसा...!!!! ती
तर एक गम्मतंच आहे... सांगू...
काल आम्ही सगळे आबीकडे गेलो होतो. बाबा, आई आणि मी. सगळी मोठी माणसं काही-बाही बोलत होती आणि मी आपली माझी-माझी खेळत होते. आबांनी गाद्या घातल्या हे मी पाहिलं आणि आईला आत जाण्याचा इशारा केला. सगळे आत आलो आणि मी गादीवर धुडगूस घालू लागले. चादरी उचलणे, उशा टाकणे, गादीवर हात मारणे असे नेहमीचे माझे खेळ सुरू झाले. काही वेळाने मी शांत झाले आणि सर्वांकडे पाहू लागले. बाबाने माझं मन ओॆळखलं. तो हसला...
बाबाने सर्वांना काहीतरी सांगितले तसे सगळे माझ्याकडे पाहू लागले. बाबा म्हणाला, "मनी, आता दाखव बरं..." मी हसले. एकदम खाली वाकले आणि डोक्यावरून धप्पकन् पाठीवर पडले. सगळे मोठ्ठे डोळे करून पाहू लागले. आबा म्हणाले, "मन्या, या वयात कोलांटी उडी... वाह वाह..." मी टाळ्या वाजवल्या. बाबाने शिकवलेल्या या गोष्टीला कोलांटी उडी म्हणतात हे मला काल समजलं होतं ना...
०६.०७.२०१६
परीचे दीड वर्ष...
"मनी... हा बघ खाऊ..." मी शंभो करून बाहेर आले तेव्हा बाबा म्हणाला.
त्याच्या हातात माझा आवडता जांभळ्या रंगाचा पुडा होता. आज इतक्या दिवसांनी मला तो
गोड-गोड खाऊ मिळणार याचा मला जास्त आनंद झाला होता. पण मनात विचार होता, "आज का खाऊ..? काय आहे आज..?"बाबाला माझ्या चेह-यावरची शंका समजली. तो म्हणाला, "मनी, आज खूप छान दिवस आहे. आज ही गोडुली परी दीड वर्षांची झाली, मोठ्ठी-मोठ्ठी झाली. म्हणूनच हा तुझ्या आवडीचा खाऊ आणलाय. मनात शंकेची माऊ पुन्हा म्याव-म्याव करू लागली, "कोण परी...? कुठे आहे परी...?
बाबाला हल्ली माझा चेहरा वाचता येतो बरं का. त्याने पटकन ओळखलं आणि मला आरशासमोर घेऊन गेला. आरशात पाहून म्हणाला, "मनी, ही बघ ती गोडुली परी." आरशातलं ते माझं रुपडं पाहून मी हसले आणि बाबाने कडेवर घेताच तो खाऊ त्याला भरवला...
२३.०७.२०१६
पावसाचे तुषार...
आज तर गम्मतच झाली. सकाळी नेहमीप्रमाणे
आळोखे-पिळोखे देत मी उठले. पाहते तर सगळीकडे काळोख-काळोख होता आणि पावसाचा आवाज
येत होता. आई शेजारी बसली होती आणि बाबा खिडकीबाहेर पाहत होता. पावसाचा आवाज ऐकला
आणि माझी कळी खुलली. आईने मला कडेवर घेऊन बाबाजवळ नेलं...
बाबा म्हणाला, "मनी, बघ कसा मस्त पाऊस पडतोय... ये जवळ ये..." मी बाबाकडे झेप घेत खिडकीजवळ गेले. पावसाचं पाणी थेंब थेंब करत चेहे-यावर पडलं. मस्त थंड-थंड वाटलं. मी आनंदले. आईने माझा हात पडत्या पाण्याखाली धरला. पावसाचं गार-गार पाणी मी हातावर झेलत होते. आई व बाबा काही-बाही बोलत होते आणि...
हातावर पडणारं पाणी मी आईवर उडवलं. मला मज्जा वाटली. मग मी तसंच बाबावर पाणी उडवलं. मला अजून गम्मत वाटली. मी हसले. मग काय विचारता... कधी आईवर तर कधी बाबावर मी पाणी उडवत राहिले. हा मजेचा खेळ मला खूप आवडला आणि मी टाळ्या वाजवल्या...
०२.०८.२०१६
बाबा रागावला...
काल बाबा माझ्यावर रागावला. खोटं वाटतं ना... अहो
खरंच बाबा माझ्यावर रागावला. काय झालं सांगू...
मस्त पाऊस पडत होता. दुपारची झोप संपवून मी नुकतीच उठले होते. पावसाचा आवाज आला आणि मी आईला बाहेर न्यायला सांगितलं. आता पावसाचं पाणी अंगावर उडवायला मला किती आवडतं हे तुम्हाला माहीतंच आहे. तोच खेळ सुरू असताना बाबा आला. मी जवळ जवळ त्याच्याकडे उडीच मारली...
बाबा आणि मी पाणी उडवा-उडवीचा खेळ खेळत होतो. जरा वेळाने बाबा म्हणाला, "चिंगे, बस झाला खेळ. चला आता घरात. नाहीतर आपल्याला 'आक्छी' होते की नाही..!" असं म्हणून बाबा मला आत घेऊन आला. मला तर अजून खेळायचं होतं पाण्यात..! मी हट्ट करू लागले. बाबाने डोळे मोठे केले, म्हणाला, "मनी सारखं सारखं बाहेर नाही जायचं. पाऊस पडतोय ना. चला आता घरात खेळा", बाबाने माझं खेळांचं कपाट उघडून दिलं...
मस्त पाऊस पडत होता. दुपारची झोप संपवून मी नुकतीच उठले होते. पावसाचा आवाज आला आणि मी आईला बाहेर न्यायला सांगितलं. आता पावसाचं पाणी अंगावर उडवायला मला किती आवडतं हे तुम्हाला माहीतंच आहे. तोच खेळ सुरू असताना बाबा आला. मी जवळ जवळ त्याच्याकडे उडीच मारली...
बाबा आणि मी पाणी उडवा-उडवीचा खेळ खेळत होतो. जरा वेळाने बाबा म्हणाला, "चिंगे, बस झाला खेळ. चला आता घरात. नाहीतर आपल्याला 'आक्छी' होते की नाही..!" असं म्हणून बाबा मला आत घेऊन आला. मला तर अजून खेळायचं होतं पाण्यात..! मी हट्ट करू लागले. बाबाने डोळे मोठे केले, म्हणाला, "मनी सारखं सारखं बाहेर नाही जायचं. पाऊस पडतोय ना. चला आता घरात खेळा", बाबाने माझं खेळांचं कपाट उघडून दिलं...
मी खेळणी काढून फेकू लागले आणि इशा-याने बाहेरचा रस्ता दाखवू लागले. त्यातलं एक खेळणं पडलं आणि दोन तुकडे झाले त्याचे. बाबाने परत डोळे मोठे केले पण यावेळी आवाजही चढवला. म्हणाला, "मनी, असा हट्टीपणा नाही करायचा. बघ काय झालं त्यामुळे... आता मी बोलणारंच नाही तुझ्याशी". बाबा आत निघून गेला. मला रडूच आलं. मी आईजवळ गेले. आई म्हणाली, "मनी, असा हट्टीपणा करू नये. बघ बाबा रागावला ना. जा त्याच्याकडे...
मला समजलं. मी बाबाजवळ गेले. कडेवर घेण्यासाठी त्याला सांगू लागले. बाबाने मला उचलले. पाहते तर बाबाच्या डोळ्यात पाणी होतं. मी मनात म्हणाले, "बाबा, मी परत असं नाही करणार. केलंच तर चांगला धम्मक लाडू दे मला. पण रागवू नकोस..." बाबा समजून गेला. त्याने मला घट्ट मिठी मारली...
२४.०८.२०१६
कार्टून...
तुम्हाला माहित आहे कार्टून म्हणजे काय..? कार्टून म्हणजे... थांबा, मी सांगतेच काय झालं ते...
संध्याकाळी मी जरा लवकरंच उठले. पाहते तर बाबा माझ्या जवळ बसला होता. यावेळी बाबा कधी घरी नसतो. पण आज तो होता. त्यामुळे मी खुश होते. बाबाला पाहताच मी त्याच्याकडे धाव घेतली. जरा वेळ आम्ही खेळलो. मग मला कंटू येऊ लागला. आई तिच्या कामात अडकली होती. कंटू कंटू करत मला रडू येऊ लागलं. मी भोकाड पसरणार तोच बाबाने काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली. तो मधेच उड्या मारू लागला. तोंड वेंगाडू लागला, जिभली बाहेर काढून वेडावून दाखवू लागला. त्याला बघताना माझा कंटू कुठल्या कुठे पळून गेला...
मी हसू लागले. टाळ्या वाजवू लागले.
काही वेळात आईपण आमच्यासोबत खेळायला आली. तिने मला कडेवर घेतलं. म्हणाली, "मनी, आपल्या घरात हा कार्टून कोण आहे...?" तशी जराही वेळ न घालवता मी पटकन
बाबाकडे बोट दाखवलं...
आता तुम्हाला कळलं असेलंच... कार्टून म्हणजे कोण ते...
१६.०९.२०१६
बाप्पाला निरोप...
रात्रीची वेळ होती. मी, आई आणि बाबा आतल्या खोलीत खेळत होतो. काही वेळाने
आई म्हणाली, "मनी, रात्र
झाली. चला जोजो करा..." मला खेळायचं तर होतं पण झोपसुद्धा आली होती. विचार
केला,"जाऊ देत, आईला खुश
करते..." असं मनात म्हणत मी आईच्या कुशीत शिरले. मला झोप लागणार इतक्यात...
धडाम्... फटफटफटफट.... तडतडतडतड.... तडतडतड... मी दचकून डोळे उघडले. आवाजाकडे बोट दाखवत मी बाबाकडे पाहिलं. बाबाला समजलं मी काय विचारलं, तो म्हणाला, "मनी, आज अनंत चतुर्दशी आहे. आज आपण बाप्पाचं विसर्जन करतो. म्हणजे तू जशी मावशीकडून घरी परत येतेस ना, तसाच बाप्पासुद्धा त्याच्या घरी जातो. हे सगळे बाप्पाला निरोप देण्यासाठी फटाके वाजवत आहेत..."
मला समजलं. मी हसले. मनात अजूनही शंका होतीच. मी मावशीकडे जाते तेव्हा तिला आनंद होतो आणि तिच्याकडून घरी येते तेव्हा मावशीला दु:ख होतं. तसंच बाप्पा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि जातो तेव्हा दु:ख होतं. बाप्पा जाताना आपण त्याला असे आवाज करत निरोप देतो मग बाप्पा घरी येतो तेव्हा आपण त्याला वाजत-गाजत का नाही आणत...
२५.०९.२०१६
घसरगुंडी...
तुम्हाला घसरगुंडी म्हणजे काय माहीत आहे...??? घसरगुंडी म्हणजे बाबा. आता तुम्ही म्हणाल, घसरगुंडी म्हणजे एक मोठ्ठी वस्तू असते जिला एक शिडी असते आणि घसरायला एक लांबसडक फळी असते, मग घसरगुंडी बाबा कसा असेल...!!! सांगते, सगळं सांगते...
तुम्हाला घसरगुंडी म्हणजे काय माहीत आहे...??? घसरगुंडी म्हणजे बाबा. आता तुम्ही म्हणाल, घसरगुंडी म्हणजे एक मोठ्ठी वस्तू असते जिला एक शिडी असते आणि घसरायला एक लांबसडक फळी असते, मग घसरगुंडी बाबा कसा असेल...!!! सांगते, सगळं सांगते...
तर काल संध्याकाळची गोष्ट बरं का. मी नुकतीच दुपारची झोप संपवून उठले होते. आई मला भरवून काही-बाही आणायला बाहेर गेली होती. मी आणि बाबा आतल्या खोलीत खेळत होतो. बाहेर मावशी कपडे दोरीवर घालून निघून गेल्या. काही वेळ निघून गेला आणि बेल वाजली... बाबा दार उघडायला म्हणून बाहेर जाऊ लागला. आई असेल असं वाटून मी मागून पाहत होते. इतक्यात 'फुसूक...'
कपड्यांतून खाली पडलेल्या पाण्यावरून बाबा सर्रक्कन घसरला. मला मज्जा वाटली. मी टाळ्या वाजवू लागले. बाबाला समजले. दारावरचं काम झालं आणि बाबा परत फिरला. मी तशीच उभी होते. येताना बाबा पुन्हा तसाच घसरला. अगदी घसरगुंडीवरून मी जाते तसा. मला अजून गम्मत वाटली आणि मी अजून जोरात टाळ्या वाजवल्या. आता कळलं ना तुम्हाला. घसरगुंडी म्हणजे बाबा कसा ते...
१०.१०.२०१६
फुलपाखरू छान किती दिसते...
दुपार संपत आली होती. मी जागी झाले.
खिडकीबाहेर पाहिलं आणि खूप छान वाटलं. पाऊसही नव्हता आणि ऊनही कमी झालं होतं. मी
बाबाला बाहेर नेण्याचा हट्ट केला. बागेतल्या मस्त हिरव्या मऊशार गवतावर मी खेळू
लागले. झाडांवर हात फिरवणे, पक्षी
बघणे अशी माझी छान मजा चालू होती आणि...
माझ्या डोळ्यांसमोरून काहीतरी गेलं. पाहिलं तर एक छोटासा पक्षी एका फुलावर बसला होता. त्याचा रंग माझ्या बाबाच्या डोळ्यांसारखा होता आणि त्यावर पिवळे पिवळे ठिपके होते. तो पक्षी काऊकाका पण नव्हता आणि कबूमामा पण नव्हता. मला प्रश्न पडला, कोण असेल हा? मी बाबाला तो पक्षी दाखवला...
बाबा हसला. मला कडेवर घेत म्हणाला, "चिंगू, हे आहे फुलपाखरू. हे खूप छान दिसतं, फुलांवर बसतं, झाडांशी खेळतं." मी हसले. फुलपाखरू पकडायला पुढे सरसावले तर बाबाने मला मागे ओढलं. म्हणाला, "मनी, फुलपाखराला असं पकडायचं नाही बाळा. तू खेळताना तुला पकडलं तर चालेल..? नाही ना, तसंच आहे फुलपाखराचं." मला समजलं. मी टाळ्या वाजवू लागले. ते फुलपाखरू माझ्या कानाशेजारून गेलं. मला गुदगुल्या झाल्या. त्या फुलपाखराला मी टाटा केलं आणि फा दिला...
१७.१०.२०१६
दूध-बिस्किट...
सकाळ झाली होती. मी हळू हळू डोळे उघडले. बाबा शेजारी बसला होता. त्याच्या समोर त्याच्या आवडीचा कप होता. बाजूला एका ताटलीमध्ये काही बिस्किटं ठेवली होती. बाबा त्यातलं एकेक बिस्किट कपात बुडवत होता आणि खात होता. मला खूप गम्मत वाटली. या आधी मी असं पाहिलंच नव्हतं ना... मी बाबाजवळ गेले आणि बिस्किट मागू लागले. बाबा म्हणाला, "मने, आधी दातू घासायचे मग बिस्किट देईन हं..."
सकाळ झाली होती. मी हळू हळू डोळे उघडले. बाबा शेजारी बसला होता. त्याच्या समोर त्याच्या आवडीचा कप होता. बाजूला एका ताटलीमध्ये काही बिस्किटं ठेवली होती. बाबा त्यातलं एकेक बिस्किट कपात बुडवत होता आणि खात होता. मला खूप गम्मत वाटली. या आधी मी असं पाहिलंच नव्हतं ना... मी बाबाजवळ गेले आणि बिस्किट मागू लागले. बाबा म्हणाला, "मने, आधी दातू घासायचे मग बिस्किट देईन हं..."
मला समजलं. मी बाबाला जरा थांबायला सांगून आईकडे पळाले. आईने मला माझा ब्रश दिला. आधी मी दातू घासले मग आईने परत घासले. मी लगेच बाबाकडे आले. बाबाने मला बिस्किट दिलं. पण मला ते कपात बुडवायचं होतं. बाबाने कप मागे घेतला. म्हणाला, "चिंंगू, हे अत्ता नाही बरं प्यायचं... आई आम्हाला आमच्या कपात थोडं दूध दे बघू..." आईला समजलं असावं...
आईने लगेच माझ्या छोट्या कपात मला दूध आणून दिलं. बाबाने दिलेलं बिस्किट मी त्या कपात बुडवून खाल्लं. मला खूप आवडलं. मी हसले आणि हाताने छान आहे असं दाखवलं. मग काय... बाबा एक बिस्किट त्याच्या कपात बुडवून खायचा आणि एक बिस्किट मी माझ्या. असं करत ताटलीमध्ये ठेवलेली सगळी बिस्किटं आम्ही गट्टम केली...
२३.१०.२०१६
वासूदेव काका...
"वासूदेव आला हो वासूदेव आला... वासूदेव आला हो वासूदेव
आला..." मी सकाळी उठले तर हे शब्द कानी पडले. खिडकीबाहेर पाहिले तर एक माणूस
दिसला. पांढरेशुभ्र कपडे घालून बाप्पाच्या आरतीच्या वेळी सगळे नाचतात तसा झांजा
वाजवत नाचत होता. सगळ्यात गम्मतशीर होती त्याच्या डोक्यावरची टोपी... टोपीला
सगळीकडून मोरपिसं लावली होती त्यामुळे तो एक मोरंच असावा असं वाटत होतं पण तो वळला
तेव्हा समजलं की तो मोर नाही तर माणूसंच होता. मी
बाबाकडे पाहिलं...
बाबा हसला. म्हणाला, "मने, हे कोण माहीत आहे...? हे आहेत वासूदेव काका. हे सकाळी सकाळी येतात. छान छान श्लोक म्हणतात, गाणी म्हणतात, लहानांना आशीर्वाद देतात. चल, आपण त्यांना काहीतरी देऊन येऊ..." मी हसले आणि बाबाकडे झेप घेतली. बाबा मला कडेवर घेऊन बाहेर आला. बाहेर ते काका उभेच होते. बाबाने दिलेले तांदूळ मी त्या काकांच्या झोळीत टाकले आणि नमो नमो केलं. ते काका हसले. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीबाही बोलले...
ते काहीतरी छान बोलत असावेत. कारण बाबा सारखा मला मिठी मारत होता आणि माझा पापाही घेत होता. वासूदेवकाकांचं बोलणं संपलं आणि पुन्हा माझ्या डोक्यावर हात ठेऊन ते झांजा वाजवत निघून गेले. मी त्यांना पुन्हा नमो नमो केलं. मनातमात्र एक शंका होती. दररोज सकाळी त्या देवळातला माणूस जोरात ओरडतो आणि मला जाग येते. मग हे वासूदेवकाका रोज का येत नाहीत...

०३.११.२०१६
खेळ पाण्यांचे...
तुम्हाला माहीत आहे मी एकाच दिवशी तीन
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचं पाणी बघितलं. आहो खरंच... काय म्हणता, नाही पटत... थांबा, तुम्हाला सांगतेच सगळं. मग समजेल...
तर हे घडलं आम्ही फिरायला गेलो होतो तिथे. मी सकाळी उठले तर बाबा बाजूलाच बसला होता. त्याने वेगळेच कपडे घातले होते. म्हणाला, "मनी, चला लवकर लवकर दातू घासा. आपल्याला पोहायला जायचंय ना..." पोहायला... मला काही कळेना. आई बाजूलाच होती. तिला लगेच समजलं. म्हणाली, "कळेल कळेल, अत्ताच कळेल बरं..." आम्ही बाहेर आलो. बाहेर एक भलं मोठं भांडं होतं आणि त्यात खूपसारं निळंनिळं पाणी होतं. बाबाने मला आईकडे दिलं आणि माऊ कपाटावरून खाली उडी मारते तशीच उडी मारून बाबा पाण्यात गेला. मला खूप गम्मत वाटली. बाबाकडे पाण्यात जायचा मी हट्ट धरला. आईने मला बाबाजवळ दिलं. आधी पाणी खूप थंड लागलं. मी कापू लागले तसं बाबाने मला जवळ धरलं. म्हणाला, "चिंगू, याला म्हणतात स्विमिंग पूल. यात पोहायचं. छान मजा करायची..." मला समजलं. थंडी हळूहळू कमी होत गेली. मग त्या पाण्यात मी जाम खेळले...
मला बाहेर यायचंच नव्हतं पण आईने बळेबळेच बाहेर काढलं आणि खोलीत घेऊन गेली. आत पाहिलं तर एक पांढ-या रंगाचं भांडं होतं. ते भांडं स्विमिंग पूलपेक्षा खूप लहान होतं. त्यात मस्त गरम गरम पाणी भरलं होतं. आईने मला पाण्यात ठेवलं. मला खूप मज्जा वाटली. आई म्हणाली, "मनी, हा बाथटब आहे बरं का... यात आपण छान शंभो करायची." त्या पाण्यात बसून मी हात-पाय मारू लागले. फतक् फतक् करू लागले. थोडा वेळ गेला असेल, आई पुन्हा म्हणाली, "चला मना, आता बाहेर या. बस झालं पाण्यात खेळणं. आता उद्या खेळायचं हं..." पाण्यात तर खेळायचं होतं मला. पण मी आबीची गुड गर्ल आहे ना. म्हणून बाहेर आले...
तर हे घडलं आम्ही फिरायला गेलो होतो तिथे. मी सकाळी उठले तर बाबा बाजूलाच बसला होता. त्याने वेगळेच कपडे घातले होते. म्हणाला, "मनी, चला लवकर लवकर दातू घासा. आपल्याला पोहायला जायचंय ना..." पोहायला... मला काही कळेना. आई बाजूलाच होती. तिला लगेच समजलं. म्हणाली, "कळेल कळेल, अत्ताच कळेल बरं..." आम्ही बाहेर आलो. बाहेर एक भलं मोठं भांडं होतं आणि त्यात खूपसारं निळंनिळं पाणी होतं. बाबाने मला आईकडे दिलं आणि माऊ कपाटावरून खाली उडी मारते तशीच उडी मारून बाबा पाण्यात गेला. मला खूप गम्मत वाटली. बाबाकडे पाण्यात जायचा मी हट्ट धरला. आईने मला बाबाजवळ दिलं. आधी पाणी खूप थंड लागलं. मी कापू लागले तसं बाबाने मला जवळ धरलं. म्हणाला, "चिंगू, याला म्हणतात स्विमिंग पूल. यात पोहायचं. छान मजा करायची..." मला समजलं. थंडी हळूहळू कमी होत गेली. मग त्या पाण्यात मी जाम खेळले...
मला बाहेर यायचंच नव्हतं पण आईने बळेबळेच बाहेर काढलं आणि खोलीत घेऊन गेली. आत पाहिलं तर एक पांढ-या रंगाचं भांडं होतं. ते भांडं स्विमिंग पूलपेक्षा खूप लहान होतं. त्यात मस्त गरम गरम पाणी भरलं होतं. आईने मला पाण्यात ठेवलं. मला खूप मज्जा वाटली. आई म्हणाली, "मनी, हा बाथटब आहे बरं का... यात आपण छान शंभो करायची." त्या पाण्यात बसून मी हात-पाय मारू लागले. फतक् फतक् करू लागले. थोडा वेळ गेला असेल, आई पुन्हा म्हणाली, "चला मना, आता बाहेर या. बस झालं पाण्यात खेळणं. आता उद्या खेळायचं हं..." पाण्यात तर खेळायचं होतं मला. पण मी आबीची गुड गर्ल आहे ना. म्हणून बाहेर आले...
इतका वेळ पाण्यात खेळल्यामुळे मला जोजो येऊ लागली. आईने मला पटकन भरवलं आणि हळू हळू जोजोगाई जवळ आली. नेहमीच्या वेळी मला जाग आली. पाहते तर आई-बाबा दोघं तयार झाली होती. बाबा म्हणाला, "मनी, चला लवकर. समुद्रावर जायचंय..." आता समुद्र म्हणजे काय..? पुन्हा शंका आली मनात. बाबाला समजलं. तो म्हणाला, "मने आपण तिथे गेलो की समजेल बरं का तुला..." थोड्याच वेळात आम्ही रिक्षातून उतरलो. समोर मोठ्ठं मैदान होतं. पण त्यात ताई-दादा नव्हते. उलट पाणीच पाणी होतं. इतकं पाणी मी कधीच पाहिलं नव्हतं. मला नवल वाटलं. बाबाने मला खाली ठेवलं. ते पाणी जवळ आलं आणि पायाला गुदगुल्या करत जमीन लांब पळू लागली. मी घाबरले. बाबाला बिलगले. बाबा मला जवळ घेत म्हणाला, "चिंगू, याला समुद्र म्हणतात. आणि या आहेत लाटा. या जवळ येतात आणि मग पळून जातात. तुला खेळायचंय लाटांशी..." मी नाही म्हणाले. मला तर भितीच वाटत होती. त्या लाटा मला घेऊन गेल्या तर...
आता समजलं असेलंच तुम्हाला कसं वेगवेगळं पाणी पाहिलं ते...
११.११.२०१६
नाव कुणाचे...
संध्याकाळ संपत आली. मी, आई आणि बाबा बागेतून घरी आलो. मला अजून
खेळायचं होतं पण काळोख झाला होता ना... घरी आलो आणि मी माझे खेळ घेऊन खेळायला
लागले. बाबा त्याचं काम करू लागला आणि आई माझी मम् बनवू लागली...
काही वेळाने मम् घेऊन आई आली. मी तोंड फिरवलं. बाबाला समजलं मी उगाच नाही म्हणते आहे. तो माझ्या आवडीचं पुस्तक घेऊन आला. म्हणाला, "मनी, यात ससुल्या कुठे आहे...?" मी लगेच लांब कानांचा ससुल्या दाखवला. आईने पटकन मला घास भरवला. बाबा हसला. म्हणाला, "आता, माऊ कुठे सांग...?" मी त्या पुस्तकात पाहिलं आणि निळ्या डोळ्याच्या छोटुशा माऊवर बोट ठेवलं आणि आईने दुसरा घास भरवला...
माझी मम् सुरू असताना पुस्तक संपलं. बाबाने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, "मनी, बाबा कुठे...?" मी बाबाकडे बोट दाखवलं आणि आईने घास भरवला. लगेच आई म्हणालीच, "मना, अनिकेत कुठे...?" मी परत बाबाकडे बोट दाखवत असताना आईने घास भरवला. आईला समजलं. मग काय, निक्या, अनिबाबा, निकीमुन्ना आशा नावांची आईने यादीच सुरू केली आणि प्रत्येक नावासोबत एकेक घास आत जाऊ लागला. अशाच नावानावात माझी मम् पण झाली...
१५.११.२०१६
शाळा शाळा माझी शाळा...
आजचा दिवस खूप मजेचा होता.
आळोखे-पिळोखे देत मी नेहमीप्रमाणे सकाळी उठले. पाहते तर आई तयार होऊन बसलेली. मला
पाहताच ती म्हणाली, "चला मना, पटापट
शंभो शंभो करायची. आज शाळेचा पहिला दिवस आहे ना.." शाळेचा पहिला दिवस म्हणजे
काय...? मला काही
कळेना. आईने माझ्या चेह-यावरचा प्रश्न वाचला. ती हसली. म्हणाली, "कळेल हो, थोड्याच वेळात कळेल..." मी बापडी करते काय, निमूटपणे बूट घालून आईसोबत निघाले...
मला वाटलं मावशीकडे जायचं पण त्या बाजूला आम्ही वळलोच नाही. मग विचार आला, कदाचित आबीकडे जायचं असेल. पण त्याही बाजूला न जाता आई मला दुसरीकडेच घेऊन आली. आम्ही एका घरात शिरलो. तिथे रंगिबेरंगी भिंतींवर कसली कसली चित्र काढली होती. शिवाय बॉल, विमान, चांदोमामा, सूर्यकाका, चिऊताई, कबूमामा या सर्वांना दोर बांधून हवेत सोडलं होतं. आजू-बाजूला पाहिलं तर मला तीन मावशा दिसल्या आणि माझ्यासोबत खूप ताई-दादा होते. आई म्हणाली, "मनी, ही आहे तुझी शाळा. इथे नीट रहायचं, खेळायचं..."
शाळा कशी असते ते समजलं. मला मज्जा वाटली. एका मावशीने मला नेऊन त्या ताई-दादांमध्ये बसवलं. आई, बाबा, आबी कुणीच नाहीत पाहिल्यावर आधी मला थोडी भीती वाटली. पण हळूहळू मला ते सगळं आवडू लागलं. त्या मावशा आमच्यासोबत गाणी म्हणत होत्या, आम्हाला वेगवेगळी चित्र दाखवून गोष्टीही सांगत होत्या. दुपार झाली तशी त्या मावशांनी आमच्याकडून हात धूऊन घेतले. इतक्या बॅगांमधून मी माझी बॅग बरोब्बर ओळखली आणि त्या मावशींकडे दिली. बाकी सर्व ताई-दादा न खाण्याचा हट्ट करत होते पण मी गुड गर्ल आहे ना, माझा डबा स्वत:च निपटी-शिपटी केला...
काही वेळात आई आली आणि आम्ही आबीकडे निघालो. आबीने विचारलं, "छकुले, कशी वाटली शाळा...?" मी हसले, टाळ्या वाजवू लागले आणि आनंदाने नाचूही लागले...
१२.१२.२०१६
वर आणि खाली...
काल तर गम्मतंच झाली. मी, आई नी बाबा माझ्यासाठी छानछान फ्रॉक
घ्यायला गेलो होतो. माझ्या पसंतीचे फ्रॉक घेऊन झाले आणि आम्ही फेरफटका मारू लागलो.
एका ठिकाणी भले मोठे दोन जिने होते, एक वर जायला नी दुसरा खाली यायला. मी पाहिलं तर
त्यावर कोणीच चालत नव्हतं. सगळे ताई, दादा, काका, काकू नुसते उभे होते आणि आपोआपच वर जात होते व
खाली येत होते. मला नवल वाटलं. आबीकडे जाताना तर मीच जिना चढत जाते, मग हे काय...!!! मी बाबाकडे पाहिलं...
बाबा हसला. त्याला समजलं मला काय विचारायचं होतं. म्हणाला, "मने, याला सरकता जिना म्हणतात. याच्यावर नुसतं उभं रहायचं म्हणजे आपण न चालताच वर आणि खाली जाऊ शकतो." मला समजलं. मी टाळ्या वाजवल्या. बाबाला तिथे घेऊन जाण्याचा हट्ट केला. बाबाने मला जिन्यावर ठेवलं. खरंच की... मी काही न करता वर जात होते. थोडी भिती वाटली पण बाबाने हात धरला होता म्हणून बरं वाटलं. लगेच दुस-या जिन्याने आम्ही खाली पण आलो. मला हा सरकता जिना खूपच आवडला. मग काय विचारता...
बाबाला घेऊन आधी वर मग खाली, सारखी भटकंती करू लागले. बाजूने चाललेल्या सरकत्या पट्ट्याला धरायला गेले तर बाबाने मला परत मधे घेतलं. अस्सा राग आला ना... पण विचार केला, हा पट्टा तर खूप ऊंच आहे, शिवाय धरायला गेले आणि पडले असते तर... नको रे बाबा. कडेला नकोच. आपण आपलं मधोमध उभं राहिलेलंच बरं. जिन्यावर मनसोक्त खेळून झालं आणि आम्ही परत जाऊ लागलो. मागे वळून तो जिना पाहिला आणि त्याला टाटा करत फा पण दिला...
१९.१२.२०१६
हा खरा की तो...
काल तर धम्मालंच आली. मी आबीकडे खेळत
होते. काही वेळ गेला आणि आई दारात दिसली. तिने छान छान कपडे घातले होते. मला
पाहताच म्हणाली, "चला मना, पटकन
तयार होऊया... आजीच्या पुस्तक प्रकाशनाला जायचंय ना... आणि हो... आज की नाही आजीचा
वाढदिवस पण आहे..." मला पुस्तक आणि वाढदिवस माहीत होतं पण प्रकाशन म्हणजे
काय...!!! मला प्रश्न पडला. आईला समजलं, "ती लगेच म्हणाली,
"कळेल कळेल हो..."
मी, आई, आबी, आबा आणि माझ्या काकूआजी असे सगळे मोठ्ठ्या गाडीतून निघालो. वाटेत दंगामस्ती करत मी झोपून गेले. मला जाग आली तेव्हा एका मोठ्ठ्या हॉलमध्ये होते. पाहते तर बाबा आमच्या आधीच आलेला. बाबाला पाहताच मी त्याच्याकडे धावले. मला कडेवर घेत बाबा म्हणाला, "अरे वा... मनी आली का... चला आता तयार व्हयचं छान-छान... आजी येणार आहे ना..." मी लगेच आईकडे पळाले. आईने मला भरवलं आणि छान नवा फ्रॉक घालून बाहेर आणलं...
बाहेर खूप काका, काकू, ताई, दादा होते. आजी एका मोठ्ठ्या खुर्चीवर बसली होती. एक आजी हातात कसलीशी काठी धरून काही-बाही बोलत होती. मग बाबा मला आजीजवळ घेऊन गेला. माझ्या हातात एक पाकीट दिलं आणि म्हणाला, "मनी, हे पाकीट उघड बघू..." मी पटापट ते पाकीट उघडू लागले. आतून एक पुस्तक बाहेर आलं. ते पुस्तक सर्वांना दाखवत होते तर सर्वजण टाळ्या वाजवू लागले. त्यांना पाहून मीही टाळ्या वाजवल्या. बाबा म्हणाला, "आमच्या मनीच्या हातून हे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे, आता दुसरी गम्मत..." पुस्तक प्रकाशन म्हणजे काय ते समजलं पण दुसरी गम्मत... काय बरं असावी... हा विचार करत होते इतक्यात बाबाने तसंच दुसरं पुस्तक बाजूला आणून ठेवलं...
बाबा म्हणाला, "मने, आज आजीचा वाढदिवस आहे ना... आता आजी हा केक कापणार..." मी पाहिलं तर मला केक कुठे दिसेच ना... पण बाजू-बाजूला दोन पुस्तकं दिसली. मी विचारात पडले. बाबा हसला. म्हणाला, "मने, हा डावीकडे आहे ना तो केक आहे आणि उजवीकडचं पुस्तक आहे..." मी परत पाहिलं. केक कुठला आणि पुस्तक कुठलं तेच समजत नव्हतं. वाटलं बाबा माझी टिंगल करतोय. पण लगेच आजीने तो केक कापला तेव्हा कुठे मला कळलं की हे पुस्तक नाही हा केक आहे...
आजीने मला केक भरवला. बाबा म्हणाला, "मने, हा केक काकूने बनवलाय... कसा आहे..." मी हाताने खूण करत केकला तर छान म्हटलंच वर हवेत फा दिला. आई-बाबाला नाही समजलं पण काकू तुला कळलं ना हा फा कोणासाठी ते...
२५.१२.२०१६
परीताई...
माझी एक सवय आहे. बाहेर जायचं असलं की आई किंवा बाबा मला छान-छान कपडे घालून, केस विंचरून, पावडर लावून तयार करतात. मग बाहेर पडण्याआधी एकदातरी मी माझं रुपडं आरशात बघतेच. कालसुद्धा तसंच काहीसं झालं. संध्याकाळी आईने मला जरा वेळेआधीच उठवलं. मी थोडी कुरकूर केली पण करते काय... उठले बापडी. आईने मला भरवलं आणि पटापट तयार केलं. रोजच्या सवयीप्रमाणे मी आरशाकडे जाऊ लागले तर आईने मला थांबवलं. म्हणाली, "मनी, अत्ता नाही हं बघायचं आरशात... आज माझं बाळ खूप गोंडस दिसतंय." आई मला न्याहाळत होती पण मी मलाच पाहू शकत नव्हता त्यामुळे रागावले आणि फुगून बसले...
माझी एक सवय आहे. बाहेर जायचं असलं की आई किंवा बाबा मला छान-छान कपडे घालून, केस विंचरून, पावडर लावून तयार करतात. मग बाहेर पडण्याआधी एकदातरी मी माझं रुपडं आरशात बघतेच. कालसुद्धा तसंच काहीसं झालं. संध्याकाळी आईने मला जरा वेळेआधीच उठवलं. मी थोडी कुरकूर केली पण करते काय... उठले बापडी. आईने मला भरवलं आणि पटापट तयार केलं. रोजच्या सवयीप्रमाणे मी आरशाकडे जाऊ लागले तर आईने मला थांबवलं. म्हणाली, "मनी, अत्ता नाही हं बघायचं आरशात... आज माझं बाळ खूप गोंडस दिसतंय." आई मला न्याहाळत होती पण मी मलाच पाहू शकत नव्हता त्यामुळे रागावले आणि फुगून बसले...
आम्ही बाहेर आलो. आईने पटकन माझे फोटो काढले पण तेही मला नाही दाखवले त्यामुळे रागोबा अजून मोठे झाले. आईला समजलं. ती म्हणाली, "मनी, आता शाळेत गेल्यावर तुला आपोआपंच कळेल हो". मी विचारात पडले. कळेल... काय कळेल... काय आहे आज शाळेत... आणि त्यासाठी मला लवकर का उठवलं... बरं शाळा तर सकाळची असते... मग आजंच संध्याकाळी का... ढग भरपूर पण पाऊस नाही असंच काहीसं झालं. म्हणजे प्रश्न भरपूर आणि उत्तरं नाहीत अशा कोंडीत मी सापडले...
शाळेत पोहोचले तेव्हा वेगळंच चित्र दिसलं. सगळी शाळा झालरींनी, पताकांनी, वेगवेगळ्या चांदण्यांनी सजवली होती. कोप-यात एक छोटंसं झाड होतं. वेगळंच होतं पण छान होतं. त्या झाडालाही तसंच सजवलं होतं वर कापसाचा फेस करून पसरवला होता. हे काय मला कळेना... आई म्हणाली, "मनी आज नाताळ आहे. आज अशीच सजावट करायची. छान-छान फ्रॉक घालायचे". मला समजलं. मी झाडाकडे पाहतंच होते की समोरून मावशी आल्या. म्हणाल्या, "आय्या, परीताई... कित्ती गोंडस गोडुली दिसते. थांब तुला आरसा दाखवते." मावशींनी भला मोठा आरसा समोर ठेवला. मी पाहिलं तर डोक्यावर एक मुकूट होता. त्याला दोन चांदण्या होत्या. हातात आईने दिलेली चांदणी लावलेली काठी होती आणि पाठीला... अरेच्चा... हे तर पंख... मला, "परीताई ए परीताई... खाऊ मी देईन तुला..." हे गाणं आठवलं. मी हसले आणि टाळ्या वाजवू लागले...
१६.०१.२०१७
ध्रूव तारा...
तुम्हाला ध्रूव तारा काय आहे माहीत
आहे... नाही... मग पहा काल काय झालं...
काल रात्री मी आणि बाबा आवारात फिरत होतो. मी माऊशी खेळत होते, काऊ काकाला पकडायला जात होते. इतक्यात एक काऊ काका आकाशात उडाला. त्याला बघतंच होते की आकाशात मला काहीतरी चमचमणारं दिसलं. मी बाबाकडे धावले. त्याने कडेवर घेताच परत त्या चमकणा-या गोष्टीकडे पाहू लागले. मनात प्रश्न पडू लागले, अरेच्चा! पांढरा आहे पण हा चांदोमामा नाही कारण चांदोमामा तर गोलगोल असतो... बरं याला चांदणी म्हणावं तर ती सारखी लुकलुकत असते... आणि हा तर घरातल्या दिव्यासारखा एकसंध प्रकाश देतोय...! मी बाबाकडे पाहिलं...
बाबा हसला. म्हणाला, "मनी हा कोण आहे सांगू... हा आहे ध्रूव तारा. खूप आधी ध्रूव नावाचा एक गोड मुलगा होता. त्याचे बाबा म्हणजेच राजा उत्तानपाद त्याच्यावर जिवापाड प्रेम करायचे. पण त्याच्या आईला म्हणजे राणी सुनितीला हे नाही आवडायचं. एकदा ध्रूवबाळ वडिलांच्या खांद्यावर खेळत होता. हे पाहून आई त्याला खूप ओरडली आणि त्याला खाली उतरायला सांगितले. ध्रूवबाळ रागावला. जंगलात निघून गेला. त्याला माहीत होतं की बाप्पाला नमो नमो केलं की बाप्पा बक्षीस देतो. त्याने मनापासून नमो नमो केलं. बाप्पा प्रसन्न झाले. म्हणाले, "बाळा, काय हवं तुला..?" ध्रूव बाळ लगेच म्हणाला, "जिथून मला कोणीही उठवणार नाही अशी जागा मला दे..." बाप्पा तथास्तू म्हणाले...
ध्रूव बाळ घरी परतला. अनेक वर्ष राज्य करून मग त्याने एका ता-याचे रूप घेतले. तोच हा ध्रूव तारा. चांदण्याच काय तर चांदोमामाही त्याच्या भोवती फेर धरतो. पण ध्रूव तारा आपली जागा कधीच सोडत नाही." मी हसले. मला समजलं. परत जाताना मी त्या ध्रूव ता-याला टाटा केलं...
१३.०३.२०१७
खेळ रंगांचा...
आज तर खूप म्हणजे खूप मज्जा आली. मी
सकाळी उठले. पाहते तर बाबा शेजारीच बसला होता. "हे काय बाबा... अजून तयार
नाही झालास... कामावर नाही जायचं का..."असं मी विचारणार इतक्यात बाबा म्हणाला, "मने, चला... उठी उठी करा... आज छान गम्मत
करायची..." मला कळेना... कसली गम्मत करायची... पण काही न बोलता मी आईकडे
वळले. आईने माझे दातू घासून दिले आणि मी बाबाकडे पळाले...
बाबा पाण्याची बारीक धार करत काही वस्तू भरत होता. मी पाहिलं तर पाणी भरताना ती वस्तू मोठी
मोठी होत होती. खाली पाहिलं तर बादलीत वेगवेगळ्या रंगांच्या अनेक वस्तू होत्या.
बाबा म्हणाला,
"मनी, याला फुगा म्हणतात. यात पाणी भरल्यावर हा असा मोठा होतो. मग हा
फुगा पायांवर मारायचा..." बाबा बोलत असताना तो भरत असलेला फुगा फाट्कन फुटला
आणि सगळी पाणी माझ्यावर पडलं. मला खूप गम्मत वाटली...
मी, आई आणि बाबा बाहेर आलो. मी पाहते तर वेगळंच
वातावरण होतं. सगळे ताई व दादा वेगवेगळ्या रंगात रंगले होते. लाल, पिवळा, हिरवा, निळा असे अनेक रंग चेह-यावर, डोक्यावर आणि हातात घेऊन ते सगळे ताई व दादा खेळत
होते. मला पाहताच सगळे माझ्याजवळ आले आणि मला हळू हळू रंग लावू लागले. त्या
रंगांमुळे कोण कुठला तेच समजत नव्हतं पण त्या रंगांची मज्जा येत होती. सगळे ताई व
दादा खूप चांगले होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून पाणी टाकलं नाही की केसांनाही
रंग लावला नाही. उलट माझ्याशी छान रंग खेळले...
०३.०४.२०१७
बाबाची ट्यूशन...
काल की नाही गम्मतच
झाली. सर्व आवरून झोपायची तयारी करून मी आणि बाबा आत बसलो होतो. मी माझी माझी खेळत
होते आणि बाबा त्याच्या मोबूवर काहीतरी लिहीत बसला होता. मला वाटलं शाळेत शिकवलेल्या
पोएम्स बाबासोबत म्हणाव्यात म्हणून मी बाबाकडे वळले...
म्हणाले, "डॅडी फिंगर डॅडी फिंगर व्हेर
आर यू..." बाबा काहीच बोलला नाही. मी पुन्हा तेच म्हणाले तर बाबा म्हणाला, "माऊडे, मी इथेच तर बसलोय... आणि डॅडी
काय गं..." मी मोठ्ठ्यांदा ओरडले,
"ना ना... बरं... रोलीपोली रोलीपोली..." आणि हवेत हात गोल
गोल फिरवले. बाबाने माझ्याकडे पाहिलं आणि, "रोलीपोली रोलीपोली..."
असं म्हणत माझ्यासारखे हात गोल गोल फिरवले. मी दोन्ही हातांनी माझे डोळे बंद केले...
थोड्या वेळाने म्हणाले, "बाबा बाबा, आर यू स्लीपिंग..." बाबा
म्हणाला, "नाही गं बाळा, मी तर गोष्ट लिहीतो आहे..."
मला समजलं... बाबाला पोएम्स येतच नाहीत. मी आईला बोलवलं. तिने बाबाला तीनही पोएम्स
करून दाखवल्या. मग मी, आई व बाबा त्या पोएम्स
परत परत म्हणू लागलो...
मी ना आता ठरवलं आहे.
शाळेत गेल्यावर टीचरला सांगायचं, की बाबालाही माझ्यासोबत
शाळेत येऊ दे आणि माझ्यासारख्या पोएम्स शिकू दे... तुम्हाला काय वाटतं... चालेल ना...
२२.०५.२०१७
लाटांवर होऊन स्वार...
काल मी खुप खुप मज्जा
केली. अहो सांगते काय झालं ते. हा तर काल बाबाला सुट्टी होती. मी ठरवलं आज बाबासोबत
खुप खेळायचं. पण आईचं आपलं काहीतरीच. तिने मला पटापट मम् भरवलं आणि जोजो करायला घेऊन
गेली. "कशाला रोज रोज आईला त्रास द्यायचा, झोपून जाऊ त्यापेक्षा. उठल्यावर
बाबा आहेच की." असा विचार करून गुडुप झोपले...
काही वेळात मला जाग
आली. पाहते तर आई-बाबा दोघं तयार होऊन बसलेले. मला समजलं, बाहेर जायचं आहे. मी पटकन उठले
आणि आईकडून तयार होऊन घेतलं. बाबाच्या गाडीवर बसून निघालो आम्ही. काही वेळातच गारगार
वारा अंगावर येऊ लागला. समोर लांबंच लांब पसरलेला समुद्र दिसला. मनात धस्स झालं. मागच्या
वेळी समुद्रावर आले होते त्यावेळी खूप घाबरले होते लाटांना. आजही तसंच तर नाही ना होणार...
ही भीती होती. पण आजचा दिवसंच वेगळा होता...
बाबाने मला खाली ठेवलं.
म्हणाला, "मने, मी आहे हो. घाबरू नकोस..."
मी बाबाचा हात घट्ट धरला. समोरून छोट्टीशी लाट आली. पायाखालून गेली. मला छान वाटलं.
लाट परत जाताना वाळू पायाला गुदगुल्या करून गेली. मला हसुच फुटलं. पुन्हा एक लाट आली.
लाट मोठी होती. मी सावध झाले. बाबाचा हात धरलाच होता. लाट जवळ आली तशी पटकन उडी मारली.
मला गम्मत वाटली. मी पाण्यात फतकल मारून बसले. लाटा यायच्या आणि मी त्यांच्यासोबत पुढे
सरकायचे. जामंच धमाल. शिवाय आई-बाबावर पाणी उडवणे, पाण्यात फतक फतक करणे हे सर्व
चालूच होतं...
सूर्य काका पाण्यात
बुडी मारायला निघाला तसा बाबा मला पाण्याबाहेर घेऊन आला. त्या जात्या-येत्या लाटांकडे
पाहत मी हसले. "परत येईन बरं का तुमच्याशी खेळायला." असं मनात म्हटलं आणि
लाटांना टाटा केलं...
०९.०८.२०१७
छान छान गोष्टी...
काल रात्री गम्मतंच
झाली. माझी मम् झाली. जोजो करायला अजून वेळ होता. मला खूप कंटू आला होता. खेळ झाले, ताई दादापण घरी गेले. मला काय
करावं समजत नव्हतं. मी हळू हळू रडूरडू करायला सुरुवात केली...
बाबा जवळंच होता.
त्याने लगेच डोक्यावरून हात फिरवला. म्हणाला, "मनी, तुला गोष्ट सांगू..." बाबा
काय म्हणाला ते फारसं समजलं नाही पण विचार केला काहीतरी छानंच असणार. मी मांडी घालून
बाबाच्या समोर बसले...
बाबाने गोष्टी सांगायला
सुरुवात केली. काऊची गोष्ट, चिऊची गोष्ट, माऊची गोष्ट, मस्त मस्त गोष्टी सांगितल्या
बाबाने. चिऊताई आकाशात उडत गेली हे सांगताना तर बाबा दोन्ही हात पसरून खोलीभर फिरला.
थोड्याच वेळात आई आली आणि आम्ही तिघांनी गाई केली...
बाबा गोष्ट सांगताना
मला खूप मज्जा आली. माझा कंटू कुठल्या कुठे पळून गेला. मी आता बाबाला सांगणार आहे.
रोज मला गोष्ट सांगायची. काय... तुम्हालासुद्धा ऐकायची गोष्ट... मग या इथे. आपण सगळे
ऐकू बाबाच्या छान छान गोष्टी...
२७.०८.२०१७
ओठ माझे असे रंगले...
काल मी आणि बाबाने
गम्माडी जम्मत केली. काय झालं सांगू... सांगते सांगते...
तर मी नेहमीसारखी
संध्याकाळी उठले. बाबा बाजूलाच बसला होता. आईमात्र बाहेर काम करत होती. बाप्पाला भेटायला
पाहूणे येत होते ना. बाबा म्हणाला,
"मनी, आता बाप्पाला भेटायला
येतील की नाही सगळे. चल आपण पटकन तयार होऊया..." आई पटकन आली. तिने मला नवीन नवीन
पिंक पिंक फ्रॉक घातला. खेळता खेळता चुकून आईचं कपाट उघडलं गेलं आणि काही सामान खाली
पडलं. मला वाटलं आता आई रागावणार, पण बाबाने पटकन सामान
उचलायला सुरुवात केली. मीपण बाबाला मदत करू लागले...
सामानात काळ्या रंगाची
एक वस्तू मला मिळाली. मी ती खेचली तर ती उघडली. आत लाललाल रंगाचं काहीतरी होतं मला
वाटलं मी पेनाने पुस्तकावर लिहिते ना, त्यातलंच हे पेन असावं.
मी बाजूला पडलेल्या कागदावर लिहायला गेले आणि बाबाने पाहिलं. मला थांबवत बाबा म्हणाला, "मने, हे पेन नाही बरं. ही लिपस्टिक
आहे. ही ओठांना लावायची. मग ओठ छान छान गुलाबासारखे दिसतात. तुला लावायची का लिपस्टिक..."
मी हो म्हणताच बाबाने माझ्या ओठांना ते लाललाल लावलं...
मी आरशात पाहिलं तर
माझे ओठ खरंच गुलाबासारखे लालेलाल दिसत होते. मला खूप आवडलं. मी बाबाकडे अजून मागू
लागले तर बाबा म्हणाला,
"माऊ, याच्याशी खेळायचं
नाही बरं, फक्त ओठांना लावायची.
आणि हो, याला जीभ नाही हा
लावायची... चल, आपण आईला दाखवू..."
मी आणि बाबा बाहेर आलो. मी आईला हाक मारली. आईने माझ्याकडे पाहिलं आणि, "अरे वाह, परीराणीने लिपस्टिक लावली...
गोडुली दिसते हो अगदी..." असं म्हणून माझा पापा घेतला. मीही आनंदाने टाळ्या वाजवू
लागले...
०२.११.२०१७
बडबडी माऊ...
बडबडी माऊ म्हणजे कोण ठाऊक आहे तुम्हाला... अहो, बडबडी माऊ म्हणजे मीच की... काय म्हणताय, माऊ फक्त म्याव म्याव करते... एकदम बरोब्बर पण बडबडी माऊ हे नाव मला आई आणि बाबाने
दिलंय. का... सांगते हो, थांबा जरा...
तर परवाचीच गोष्ट, मी खेळत होते. आई तिचं काम करत होती. म्हणाली, "मनी, संध्याकाळी बागेत जायचं ना समोरच्या..." मी लगेच म्हणाले, "ना... समोरच्या बागेत जायचं नाईये... त्या बागेत जायचंय..." आई मला फ्रॉक
घालू लागली तर मी म्हणाले,
"हा फ्रॉक नको. पिंक हवा..."
अहो हे तर काहीच नाही. परवाचीच गोष्ट, बाबा मला मम् भरवत होता. मी म्हणाले, "तू भरवू नको, मी हाताने खाते..." मी मम् करू लागले. थोड्या वेळाने बाबाकडे वळून म्हणाले, "बाबा, मला लाडू दे ना..." बाबा म्हणाला, "अनुरा, मम् संपली की देईन बरं लाडू..." मी पटकन म्हणाले, "ओक्के, नो पॉबेम..."
इतकंच कशाला परवाचीच गोष्ट, मी, आई नी बाबा खोलीत बसलो होतो. मी म्हणाले, "मला झोपाचं आहे. बाबा आला नाही तेव्हा आईकडे वळत म्हणाले, "सांग ना... बाबा माझं ऐकत नाईये..." आई-बाबा हसले. आई माझे पापे घेत म्हणाली, "आमच्या मनीला छान छान शब्द फुटले हो... बडबड कांदा आहे नुसता..." बाबा म्हणाला, "कांदा नको... माऊ... बडबडी माऊ..."
आयस्क्रीम...
काल तर गम्मतच झाली. अहो सांगते सांगते, जरा थांबा... तर, काल संध्याकाळी बाबा त्याचं काम करत बसला होता. मी खेळून परत आले आणि बाबासोबत खेळावंसं वाटलं म्हणून त्याच्याजवळ गेले. त्याला म्हणाले, "बाबा, फोन बंद कर ना पीऽऽऽज... आपण खेळुया..." बाबा हसला. त्याने फोन बाजूला ठेऊन दिला. मला मांडीवर घेत म्हणाला, "बरं... काय खेळायचं..." मी लग्गेच म्हणाले, "दुकान... आयकीमचं... आधी तू..."
बाबा बनला आयस्क्रीमवाला आणि मी ते घ्यायला आलेली मुलगी...
बाबा: कौनसा आयस्क्रीम चाहिए तुम्हें...
मी: ये वाला. टू टू आयकीम...
बाबा: ये दस रुपए का एक है. बीस रुपए दे दो मुझे...
मी: ये लो दस रुपए...
बाबाने एकच आयस्क्रीम दिल्यासारखं केलं...
मी: दो आयकीम दे दो ना पीऽऽऽज...
दुसरं आयस्क्रीम हातात मिळालं. मी हसले. म्हणाले, "बाबा, तू गुड बॉय... थँक्यू... आता मी..."

आता मी आयस्क्रीमवाली झाले आणि बाबा ते मागायला आला...
मी: कौनसा आयकीम चाहिए...
बाबा: ये वाला टू टू...
मी: टू टू नई... सर्दी होगी... ओनली वन...
बाबा: ये लो दस रुपए. येवाला आयस्क्रीम दे दो...
मी बाबाला एक आयस्क्रीम दिल्यासारखं केलं तर...
बाबा: मुझे एक और दे दो ना प्लीज...
मी: दुकान बंद हो गया. बबाऽऽऽय...

बाबाने मला कडेवर घेत पटापट माझे पापे घेतले...
२२.१२.२०१७
हृदयात वाजे समथिंग...
काल मी आणि बाबाने जाम धम्माल केली. काल बाबाने मला नवा खेळ आणला. त्यात, माझी आत्त्या कानात घालते ती नळी होती, एक सुई लावलेली काठी होती, एक ताप बघायची काठी होती. बाबाने खेळ दिल्या दिल्या मी तो उघडला व बाबाला म्हणाले, "ए बाबा, चल आपण खेळू..." बाबा आवरून लगेच खेळायला आला...
मी झाले डॉक्टर आणि बाबा आला माझ्याकडे. मी विचारलं, "तुला बरं वाटतं का..." बाबा म्हणाला, "नाही... मला पोटात बाऊ झाला..." मी, "ओक्के... मी तपासते..." असं म्हणून नळी कानाला लावली व बाबाला तपासू लागले.
बाबाला तपासलं, मग ताप पाहिला आणि सुई पण टोचली. बाबा म्हणाला, "मला डेक्यावरपण बाऊ झाला..." मी म्हणाले, "हो... मी तपासते थांब..." आणि पुन्हा नळी कानाला लावून बाबाला तपासू लागले...
मी बाबाच्या पोटावर बसले होते. माझा हात त्याच्या छातीवर पडला तशी आतून कोणीतरी
ठकठक करंतय असं वाटलं. मी बाबाला लगेच विचारलं, "असं काय झालं..." बाबा हसला. म्हणाला, "अनुरा, हे काय माहित आहे... याला म्हणतात हृदय. हे सतत वाजत राहतं... कारण ते घाण रक्त
आत घेऊन चांगलं रक्त बाहेर सोडतं. त्यामुळे आपल्याला कमी बाऊ होतो. हृदय सगळ्यांकडेच
असतं. बघ बरं हात लावून तुझ्या छातीला..."
बाबाने माझ्या पोटाच्या वर दाखवलेल्या जागी मी हात लावला तेव्हा तिथेही अशीच ठकठक
ऐकू आली. मी हसले आणि टाळ्या वाजवू लागले. तुम्हालाही माहित असेल ना हृदयात काय वाजतं
ते... नाही... मग बघा की हात लावून...
०७.०१.२०१८
Surprise...
कालचा दिवस तर खूपच छान होता. काल ना माझा happy
birthday होता... Three happy birthday... One...
Two... Three happy birthday... सकाळपासूनच मला छान-छान वाटत होतं. आई, आजी आणि आबीने मला ओवाळलं. मला गोड-गोड पेढा भरवला. मला टिळा पण लावला. मी पण good
girlसारखी वागले. आईने भरवलेली मम् पटकन
गट्टम केली. समिहा ताई, मनूताईशी छान खेळले. दिवसभर खूप मज्जा केली. पण माझा birthday रात्रीच सुरू झाला होता...
नेहमी मी लवकर गुडूप होऊन जाते. पण परवा रात्री मला झोपच येत नव्हती. बाबाने काऊच्या, चिऊच्या, माऊच्या खूप गोष्टी सांगितल्या. तरीही गाई येईना. मग बाबा म्हणला, "अनुरा, बारा वाजले... चल तुला एक गम्मत दाखवतो..." मी, आई, बाबा बाहेर आलो. टेबलवर काहीतरी ठेवलं होतं. बाबाने लाईट लावला तर केक... मी लगेच
टाळ्या वाजवल्या. बाबाने "Happy
birthday to you..."
गाणं म्हटलं. मी आईच्या मांडीत बसून
केक कापला. आई-बाबाला भरवला. त्यांनीही मला भरवलं. बाबा म्हणाला, "आता अनूचं सर्प्राईज..." बाबाने आतून काहीतरी बाहेर आणलं... ती माझी नवी पिंक
सायकल होती. माझी न्यू न्यू पिंक सायकल मला खूप आवडली. सकाळी सायकल चालवायची या विचारात
कधी झोपले ते कळलंच नाही...
खरंतर मला तुमच्याकडूनही सर्प्राईज मिळालं... तुम्ही सर्वांनी मला wish केलंत. मला फुलं, केक, मिनी माऊस, असं काहीकाही पाठवलंत... मला खूप आवडलं... Thank
you ताई, दादा, आत्त्या, मामी, मावशी, काकू, काका आणि मामा...
०६.०२.२०१८
राजा झाला गुलाम...
काल तर जामच धम्माल आली. बाबा ऑफीसमधून घरी आला तेव्हा मी झोपून उठले होते. डोळे
चोळत चोळत बाहेर आले तर बाबा टि.व्ही बघत होता. मी, "बाबा..." असं म्हणत त्याच्याकडे झेपावले. बाबाने मला मांडीवर बसवलं. मी म्हणाले, "तू टि.व्ही. बंद कर... आपण खेळू..." बाबाने लग्गेच टि.व्ही. बंद केला. म्हणाला, "काय खेळुया आपण..."
मी लगेच म्हणाले,
"बाबा, जॉनी जॉनी..." बाबा तयार झाला. मी जॉनी जॉनी म्हणत गेले आणि बाबा येस पापा
नो पापा म्हणत गेला. अहो खेळताना त्याचा फोनसुद्धा त्याने बाजूला ठेवला होता. जॉनी
जॉनी झाल्यावर मी बाबाला म्हणाले,
"चल, फिरून येऊ... बाईक ने जायचं... मी पुढे उभी राहणार..." बाबा त्यालाही तयार
झाला. आम्ही मस्त फिरून आलो...
आई आमची वाट पाहतच होती. बाबा समोर आला तशी म्हणाली, "हमऽऽऽ... मी सांगते टि.व्ही. बंद कर, मोबाईल बाजूला ठेव, बाईक काढ तेव्हा लगेच नाही ऐकत... आणि आता अनुरा म्हणाली तर पटकन ऐकलंस... राजा
झाला गुलाम राणी आल्यावरी..." आई काय म्हणत होती काय माहित पण माझं नाव आणि गाणं
ऐकून मला मज्जा वाटत होती...
२२.०५.२०१८
अलबत्या गलबत्या...
आज की नाही जामच धम्माल आली. आज आई-बाबा मला नाटकाला घेऊन गेले. नाटक म्हणजे एक
मोठ्ठा पडदा असतो. त्यामागे एक जागा असते. त्या जागेवर खूप ताई, दादा, काका, काकू फिरत असतात. काहीबाही बोलत असतात...
तर आम्ही आत जाऊन बसलो. पडदा उघडला. समोर आला अलबत्या गलबत्या दादा. तो दादा नाचत
होता. एक उंदीरमामा आला तिथे. त्या अलबूगलबू दादाने त्या उंदीर मामाला खायला दिलं आणि
गुडूप जोजो केली. मग ना तिथे एक विच आली. ती जोरजोरात हसू लागली तशी मी खूप घाबरले.
बाबाला बिलगले. त्या विच बरोबर एक बोका आणि एक माऊ पण होती. तो उंदीरमामा आहे ना तो
सारखा त्या तिघांना त्रास देत होता. त्या विचने त्या अलबूगलबू दादाला एका गुहेत पाठवलं...
त्या गुहेत तीन मोठ्ठे भूभू होते. अलबूगलबू दादा त्या भूभूंशी छान खेळला. त्या
भूभूंनाही हा दादा खूप आवडला. त्यांनी अलबूगलबू दादाला काहीतरी दिलं आणि दादा बाहेर
आला. तिथे ती विच उभीच होती. पण दादाने तिची खाशी गम्मतच केली आणि धुम्म पळून गेला.
ती विच रागावली आणि हवेत उडू लागली. मग तिथे एक राक्षस आला... बापरे कित्ती मोठा होता
तो... मला तर जाम भिती वाटली...
त्या विचला मिळाली का हवी असलेली गोष्ट... त्या भूभूंनी त्या अलबूगलबू दादाला काय
अशी वस्तू दिली... माहित आहे... नाही... मग बघा की...
अलबत्या गलबत्या चला करू खलबत्या... झुप झॅप झ्वँग...
०६.०७.२०१८
Sharing
Sharing…
तुम्हाला sharing म्हणजे काय माहित आहे का... नाही... Sharing म्हणजे
आपली वस्तू आपल्या माणसाला द्यायची आणि त्याचीही वस्तू आपण घ्यायची...
तर... काल रात्री आम्ही तिघं जेवत होतो. मी, आई
आणि बाबा. आम्ही पोळी-भाजी खात होतो. मी अर्ध्यापेक्षा जास्त पोळी-भाजी खाल्ली. मग
बाबाला "ए अनिबाबा,
sharing करुया ना..."
असं म्हणत माझ्या ताटातली पोळी त्याच्या ताटात ठेवली. त्यावर बाबा म्हणाला, "अनुराराणी, लबाड
आहेस हो पक्की..." मला कळेना. बाबा असं का म्हणाला...
मम् झाल्यावर आम्ही बाहेर गेलो फिरायला. Icecream दिसताच
मी बाबाकडे हट्ट केला. बाबा हसला. मला हवं असलेलं pink icecream त्याने
मला दिलं आणि आई-बाबा chocolate
icecream खाऊ लागले. मी माझं
pink icecream गट्टम केलं आणि,
"ए अनिबाबा,
sharing करायचं ना..."
असं म्हणत मी बाबाच्या कपमधलं icecream
माझ्या कपमध्ये काढून घेतलं. बाबा म्हणाला, "अनुरा, भारीच
लबाड आहेस हो तू..."
मला तर काहीच कळेना... मी तर good
girl आहे... मग मी कशी काय लबाड झाले...
२४.०७.२०१८
घरातलं भूत...
तुम्ही कोणी संध्याकाळी भूत पाहिलं आहे का... नाही... मी पाहिलं, मी पाहिलं... आणि ते पण घरात. खरं नाही वाटत... थांबा, तुम्हाला सांगतेच काय झालं ते...
तर काल दुपारची झोप संपवून मी जागी झाले. पाहते तर बाबा माझ्या समोर बसलेला...
आता, मी उशीरा उठले का बाबा लवकर आला... बहुतेक बाबाच लवकर आला... मी बाबाकडे झेपावले.
म्हणाले, "बाबा, गार्डनमध्ये जाऊया ना..." बाबा लगेच तयार झाला. छान आवरून मी आई आणि बाबासोबत
गार्डनमध्ये गेले...
ब्लॅक ब्लॅक झालं, वर मामा दिसू लागला तेव्हा आम्ही घरी आलो. बाबाने चावी काढली तेव्हा मी विचारलं, "आजी घरात आहे का..." बाबाने हसून होकार दिला. आम्ही आत गेलो. मी पाणी प्यायला
किचनमध्ये गेले तेव्हा ओट्यावर मोठ्ठी चादर पसरून कोणीतरी उभं होतं. मी थोडा वेळ तशीच
उभी राहिले. ती चादर हलली आणि,
"भूत भूत... आजी, भूत आलं..." असं ओरडत मी आत पळाले...
आत आले तर आजी खोलीत नव्हती. मी पुन्हा बाहेर आले तेव्हा आई आणि बाबा हसत होते.
मी आईला विचारलं,
"तू का हसली..." त्यावर तिने फक्त
माझी पापी घेतली. मग मी बाबाला विचारलं,
"बाबा, तू का हसतो..." बाबा अजून हसत म्हणाला, "अनुरा, तुला भूत बघायचं आहे का... चल दाखवतो भूत..." बाबाने मला कडेवर घेतलं आणि
किचनमध्ये नेलं. जाताना मी सारखी,
"आजी कुठे गेली..." हेच विचारत
होते...
किचनमध्ये तीच मोठ्ठी चादर पांघरून कोणीतरी उभं होतं. बाबा म्हणाला, "आता भूत चादर बाजूला करेल बरं का अनुरा..." चादर बाजूला झाली आणि समोर आली...
आजी... मी टाळ्या वाजवू लागले. म्हणाले,
"ए... आई... ए... बाबा... ते भूत नाही...
ती आजी आहे..." आजी जवळ आली. मला जवळ घेत म्हणाली, "अनुरा बाळा, आपल्या घरात भूत कसं येईल... इथे गणपती बाप्पा आहे ना. मला खोकला झाला आहे ना, म्हणून मी वाफारा घेत होते... तुला घ्यायचा का... ये..."
आजीने सांगितला तसा चादर ओढून मी वाफारा घेतला. छान गरम गरम लागलं. आता मला खोकला
झाला की मीपण वाफारा घेणार. पण मला भूत नका हं म्हणू...
२७.०७.२०१८
बाबाची टीचर...
तुम्हाला माहित आहे, काल मी बाबाची टीचर झाले... अहो डोळे काय मोठे करताय... खरंच... थांबा, तुम्हाला सांगतेच काय झालं ते...
काल आबी आली होती. तिने माझ्यासाठी फ्रूट कटिंगचा गेम आणला होता. त्यात ना छान
छान फ्रूट असतात. एक सुरी पण असते. सगळं खोटं खोटं बरं का. तर, त्या गेममध्ये ना फ्रूट हाफ कट करायचं असतं. मी खेळत असतानाच बाबा आला आणि माझ्यासोबत
खेळू लागला...
मी बाबाला एक येल्लो फ्रूट दाखवत विचारलं, "हे काय आहे अनिबाबा..." तर डोकं खाजवत बाबा म्हणाला, "मम्म... हा... बनाना..." मी डोक्याला हात लावत म्हणाले, "अरे अनिबाबा, हा बनाना नाही... हा मँगो आहे. आता हे काय आहे सांग बघू..." माझ्या हातात
असलेलं ऑरेंज फ्रूट पाहून बाबा म्हणाला,
"हे तर अॅप्पल..." मी परत डोक्याला
हात लावत म्हणाले,
"काय रे अनिबाबा... तुला माहितच नाही..."
बाबा रडवेला चेहरा करत म्हणाला,
"सॉरी टीचर. नाही माहित मला. तुम्हीच
सांगा ना..."
मी म्हणाले, "ओक्के. मी सांगते... हे ऑरेंज कलर फ्रूट म्हणजे ऑरेंज, हा बनाना, हे अॅप्पल, हा मँगो, हे ग्रेप्स..." सगळी फ्रूट्स सांगून झाल्यावर मी परत एकेक फ्रूटवर बोट ठेवत, "व्हॉट इज थीस..." असं विचारलं तर बाबाने सगळे फ्रूट्स बरोब्बर ओळखले. मी हसू
लागले, टाळ्या वाजवत म्हणाले,
"व्हेरी गुड अनिबाबा. तू सगळे फ्रूट्स
बरोब्बर सांगितलेस. गुड बॉय. आता तुला चॉकलेट... ओक्के..."
०८.०८.२०१८
लहान की मोठी...
मला ना कधी कधी कळतच नाही मी नेमकी काय आहे ते... म्हणजे, कधी मी लहान होते तर कधी मोठी. पटत नाही ना तुम्हाला... आता परवाचीच गोष्ट घ्या...
सकाळी मी आईसोबत शाळेत जात होते. रस्त्यात मला माऊ दिसली. मी माऊ पकडायला धावले
तर माझा हात धरत आई म्हणाली,
"मनी, असं रस्त्यात धावायचं नाही. तू लहान आहेस ना अजून..." म्हणजे अजून मी लहानच
आहे तर... शाळा सुटल्यावर मी आईसोबत परत येत होते तेव्हा तिने मला कडेवर घ्यावं म्हणून
समोर उभी राहिले. आई म्हणाली,
"मनी, मोठी झालीस ना तू... आता सुट्टं चालायचं, कडेवर नाही बरं..." हे काय... आता मी मोठी झाले...
दुपारी ना मी आजीबरोबर जेवत होते. एका हाताने पोळी खात होते तर दुसऱ्या हाताने
दही खात होते. आजी म्हणाली,
"अनुरा, तू मोठी झालीस की नाही... असं दोन्ही हातांनी खाऊ नये..." चला म्हणजे मी मोठी
आहे तर... आम्ही जेवत होतो इतक्यात बाबा आला. मी आजीला विचारलं, "ए आजी, बाबा कुठून आला..." बाबाकडे बघत आजी म्हणाली, "बाबा ऑफीसमधून आला. तू मोठी झाल्यावर तूही जाणार ऑफीसला..." अरे, म्हणजे आता मी परत लहान आहे का...
संध्याकाळी बाबासोबत गच्चीत खेळायला गेले. तिथे ना एक मोठी शिडी होती. मला शिडीवर
चढायचं होतं पण बाबा म्हणाला,
"माऊ, तिथे जाऊ नको बरं... लहान आहेस ना तू... मोठी झाल्यावर जा हो..." चला, म्हणजे मी लहान आहे हो अजून. परत येताना मी बाबाकडे चॉकलेटचा हट्ट धरला तर बाबा
म्हणतो कसा, "अनुरा, आता मोठी झालीस की नाही तू... असा सारखा सारखा हट्ट करायचा का..." आत्ता मी
लहान होते ना... आणि पटकन मोठी पण झाले...
१६.०८.२०१८
झेंड्याला केलं सेल्यूट...
काल ना मी पोलीसकाकांकडे असलेला झेंडा पहायला गेले होते. पोलीसकाकांकडे म्हणजे
ते ज्या ऑफीसमध्ये बसतात ना तिथे उभारलेला झेंडा...
मी आणि बाबा तिकडे पोहोचलो तर तिथे खूप पोलीस होते. काही काकांच्या डोक्यावर ब्राऊन
टोपी होती तर काही काकांच्या डोक्यावर टोपीच नव्हती. काही काकांच्या हातात बंदुका होत्या
तर काहींनी तलवारी धरल्या होत्या. ते सगळं पाहून मी घाबरले आणि बाबाला कडेवर घ्यायला
सांगितलं. बाबा मला कडेवर घेऊन उभा होता इतक्यात एक मावशी जवळ आली...
माझा गालगुच्चा घेत म्हणाली,
"हाय बेटा, तू झेंडावंदनाला आलीस ना..." मी आपली तिच्या कमरेला असलेल्या बंदुकीकडे पाहत
होते. तिला ते कळलं असावं. ती हसत म्हणाली, "बेटा, ही बंदूक अशीच आहे. मी काही करणार नाही हो तुला. सांग..." मी मानेनेच होकार
दिला. ती पोलीस मावशी मला कडेवर घेत अजून आत जाऊ लागली. मी मागे पाहिलं तर बाबा मागेच
होता. ती मावशी मला एका मोठ्ठ्या खांबाजवळ घेऊन आली. मी विचारलं, "झेंडा कुठे..." तशी ती हसली आणि मला बाबाकडे देऊन निघून गेली...
इतक्यात कोणीतरी जोरात ओरडलं,
"सावधान..." तसे सगळे पोलीसकाका, पोलीसमावशा पाय आपटून सरळ उभे राहिले. बाबा मला खाली ठेवत म्हणाला, "माऊ, आता सरळ उभं रहायचं हं... आता झेंडा दिसणार आपल्याला..." मी इकडे तिकडे पाहत
असतानाच, "जनं गणं मनं..." म्हणू लागले सगळे. अरेच्चा... हे गाणं मला शाळेत शिकवलं होतं...
गाणं संपलं की सेल्यूट करायचं. सेल्यूट म्हणजे पाय जमिनीवर आपटायचा आणि राईट हँड डोक्याच्या
बाजूला लावायचा... गाणं संपलं. एका पोलीसकाकाने खांबाची दोरी ओढली आणि झेंडा वरवर गेला.
तो मोठ्ठा झेंडा हवेवर हलू लागला...
मी हसले. का माहीत आहे... झेंडा दिसला की आपण काय करतो... बरोब्बर... आपण करतो
सेल्यूट... मी केलं... तुम्ही पण केलं ना सेल्यूट...
३१.०८.२०१८
ढम् ढम् ढोल बाजे...
काल रात्री की नाही, मी ढोल वाजवला... अहो खरंच...
नाही पटत तुम्हाला... थांबा, मी सांगतेच काय झालं ते...
संध्याकाळी मी गाई करून उठले. बाबा बाजूलाच
बसला होता. मी म्हणाले, "बाबा, बाहेर जाऊया का..." बाबा
लगेच तयार झाला. मीसुद्धा चूळ भरून, दूध पिऊन निघाले बाबासोबत. आम्ही फिरत होतो
ना तेव्हा तिथे काही दादा व ताया उभे होते. त्यांच्या हातात एक काठी होती आणि खांद्यापासून
पोटापर्यंत एक मोठ्ठी गोल वस्तू दिसत होती. ते ताई व दादा त्या काठीने वस्तूला मारत
होते आणि "ढम् ढम्..." असा आवाज येत होता. मी बाबाला विचारलं, "बाबा, ते काय आहे सांग..." बाबा
हसला. मला कडेवर घेत म्हणाला, "अनुरा, हा ढोल आहे बरं का. त्या काठीने
त्या ढोलावर मारलं की "ढम् ढम्..." असा छान आवाज येतो..."
मी काही वेळ तो ढोल वाजताना पाहत होते. मग
बाबाला म्हणाले, "ए बाबा, मला पण तो ढोल वाजवायचाय..."
बाबा मला समजावत होता पण मी ऐकतच नव्हते. शेवटी बाबाने मला ढोल वाजवायला द्यायचं कबूल
केलं तेव्हा मी बाबासोबत घरी परत आले. रात्री ममम् झाली, गाद्या घातल्या, मी व बाबा बेडवर बसून दुकान-दुकान
खेळत होतो. त्यावेळी मी बाबाला ढोल वाजवण्याची आठवण केली. बाबा डोकं खाजवू लागला. मग
म्हणाला, "चल माऊ, तुला ढोल देतो वाजवायला..."
हे म्हणत असतानाच बाबा पाठीवर झोपला आणि मला आपल्या पोटावर बसवलं. आपलं पोट फुगवत म्हणाला, "हां... आता वाजव..."
मग काय... मी दोन्ही हातांनी बाबाच्या पोटावर
मारू लागले. तसाच आवाज येऊ लागला. "ए आई... ए आजी... हे बघ मी काय करते..."
असं मोठ्याने म्हणत मी आई आणि आजीला बोलवलं. आई हसून टाळ्या वाजवू लागली. आजी म्हणाली, "अरे वाह अनुरा... छान वाजतोय
हो ढोल..." आता समजलं, मी रात्री ढोल कसा वाजवला ते...
तुम्हालापण वाजवायचा आहे का... मग वाजवा की... पण बाबाने दिलेला हा ढोल मी नाही बरं
देणार तुम्हाला...
२७.०९.२०१८
क्वीज मास्टर...
काल की नाही, मी क्वीज मास्टर झाले. काय हे, तुम्हाला क्वीज मास्टर माहीत नाही... आहो, क्वीज
मास्टर म्हणजे जो पझलला बरोब्बर उत्तर देतो तो. थांबा, मी
सांगतेच काय झालं ते...
काल रात्री मी, आई आणि बाबा बेडवर बसलो होतो. आई व बाबा काहीबाही
वाचत होते आणि मी आपली ड्रॉईंग करत होते. थोड्या वेळात मला कंटू आला. मी बाबाला
म्हणाले, "बाबा, दुसरं काहीतरी
करुया ना..." बाबा लगेच म्हणाला, "ठिक आहे. मी
तुला एक कोडं घालतो..." आता कोडं म्हणजे काय ते मला कळेना. मी बाबाला विचारलच,
"ए बाबा, कोडं म्हणजे काय...?"
आई म्हणाली, "बाबू, कोडं म्हणजे
पझल. बाबा एक प्रश्न विचारेल आणि तू उत्तर द्यायचंस..." बाबा डोकं खाजवत
म्हणाला, "हं, आता हे सांग बघू...
अशी कोणती गोष्ट, जी आकाशात दिसते, हळू
हळू लहान होते, हळू हळू मोठी होते..." मी पटकन खिडकीजवळ
गेले आणि आकाशाकडे बोट दाखवत म्हणाले, "ती गोष्ट म्हणजे
मामा..." आई व बाबा दोघांनी टाळ्या वाजवल्या...
बाबा म्हणाला, "आता अजून एक बरं का..." काऊकाका,
चिऊताई, शाळा, गणपतीबाप्पा,
सनकाका अशी खूप खूप कोडी बाबा व आईने घातली. मी पटापट उत्तर देत
होते. मग मीच म्हणाले, "आता मी आता मी... अशी कोणती
गोष्ट जी सकाळी शाळेत जाते, तिला माऊ खूप आवडते, ती रात्री बाबाकडून गोष्टी ऐकते..." बाबा आणि आई एकदम म्हणाले,
"ती आहे, आमची छोटीशी अनुरा..."
२६.१०.२०१८
सौदागर...
काल की नाही मला
नवीन नाव मिळालं. कोणतं माहीत आहे... सौदागर... हो... बाबाच म्हणाला मला सौदागर...
काय झालं, रात्री मी ड्रॉईंग करत बसले होते. आई-बाबा काही-बाही बोलत होते. मी आपली थोड्या
थोड्या वेळात, "आई, हे बघ काय...",
"बाबा हा कुठला कलर आहे..." असं सारखं विचारत होते. बाबा म्हणाला,
"अनुरा, आई-बाबाला बोलू दे की गं जरा..."
बाबाचं ऐकून मी परत ड्रॉईंग करू लागले आणि बाबा आईशी बोलू लागला...
काही वेळाने मी पुन्हा
म्हणाले, "ए बाबा, हा बघ मामा ड्रॉ
केला...", "आई, मला राक्षस ड्रॉ
करून दे ना..." आई लगेच माझ्याकडे वळत म्हणाली, "मनी,
तू गप्प बसायला काय घेशील..." मी पटकन सांगून टाकलं,
"मला आयस्क्रीम हवं..." आणि पुन्हा कलर करू लागले. आई,
"बरं उद्या देते हं..." असं म्हणाली आणि बाबाशी पुन्हा बोलू
लागली...
आई-बाबा बोलत असताना
मी काही वेळाने त्यांच्यामध्ये जाऊन बसले. कागद दोघांना दाखवत म्हणाले, "ए आई, ए बाबा... हे बघा मी काय ड्रॉ केलं..." आई-बाबा
बोलणं थांबवून कागद बघू लागले. आई म्हणाली, "छान चित्र काढलंस
गं... पण काय गं मने, तू जरा वेळ गप्प का बसत नाहीस..."
मी जराही वेळ न घालवता म्हणाले, "तू आयस्क्रीम कुठे दिलंस
अजून..."
आई-बाबा एकमेकांकडे
पाहू लागले आणि काही वेळातच हसू लागले. मीही त्यांच्या हसण्यात सामील झाले. बाबा म्हणाला, "माऊ, पक्की सौदागर आहेस बरं का..." आता तुम्हीच
सांगा, गप्प बसायला आयस्क्रीम. मग ते नाही मिळालं तर मी गप्प
कशी बसणार...
०२.११.२०१८
Statue and Over...
काल ना, बाबा मला डँबीस माऊ म्हणाला... हो, खरंच म्हणाला... पण मी तर फक्त... असं नको. मी सांगतेच काय झालं
ते...
काल बाबा घरी आला तेव्हा आई आणि आजी झोपल्या होत्या. मी आपली छान कलरिंग करत होते.
बाबाही माझ्यासोबत बसला कलर करायला. थोडा वेळ कलर केल्यावर मी म्हणाले, "ए बाबा, कंटू आला. दुसरं काहीतरी करुया ना..." बाबा
लगेच उठला. म्हणाला, "कंटू आला, ओक्के... आपण आता स्टॅचू-ओव्हरचा खेळ खेळू..." मला कळलं नाही हे बाबाला समजलं.
तो म्हणाला, "म्हणजे, स्टॅचू म्हटलं की आपण आहे त्या जागी पुतळा व्हायचं
आणि ओव्हर म्हटलं की परत हलायचं..."
मला खेळ आवडला. मी आणि बाबा खेळायला लागलो. बाबा डांस करत असताना मी स्टॅचू म्हणायचे
आणि बाबाचा पुतळा व्हायचा. मला तर जाम मज्जा येत होती. जरा वेळाने बाबा म्हणाला, "माऊ, आता बाबाला दम लागला बाळा. आपण थोडा वेळ बसू आणि
मी आणलेला लाडू खाऊ. चालेल..." मी, "हं..." म्हणताच बाबाने त्याच्या दप्तरातून
चार लाडू काढले. एक आजीचा, एक आईचा, एक बाबाचा आणि एक माझा. आजी आणि आईचे लाडू त्याने डब्यात ठेवले आणि आमचे लाडू ताटलीत
घेऊन आला. मी लाडू खाऊ लागले आणि बाबाला फोन आला...
लाडू संपवून मी बाबाकडे पाहिलं तर त्याने ताटलीतला लाडू उचलला होता. मी हसले. बाबाने
विचारलं, "काय गं मने, हसतेस का अशी..." बाबाला कुठे माहीत होती माझी गम्मत... बाबा लाडू खाणार इतक्यात
मी म्हणाले, "ए बाबा स्टॅचू..." बाबाचा पुतळा झाला आणि
मी पटकन त्याचा लाडू गट्टम केला. लाडू संपला आणि मी ओव्हर असं ओरडले. बाबा त्याच्या
हाताकडे पाहत म्हणाला, "आईंग, लाडू कुठे गेला... आत्ता तर होता..." मग
त्याने माझ्याकडे पाहिलं. मी तशी हसत होते हे बघून बाबा म्हणाला, "हम्म... म्हणजे इथे गेला तर लाडू... माऊ, पक्की डँबीस आहेस बरं का तू..."
आता तुम्हीच सांगा... बाबाला स्टॅचू करून त्याच्या हातातला लाडूच तर मटकावला फक्त...
त्यात मी डँबीस कशी हो झाले...
१३.१२.२०१८
लाईट गेले पळून...
काल ना गम्मतच झाली.
मी शाळेतून आले आणि गुड गर्लसारखी जेवायला बसले. एक पोळी-भाजीचा घास मी स्वत: खात होते
आणि एक आई भरवत होती. टि.व्ही.वर मस्त मोटू-पतलूचं कार्टून लागलं होतं. ते बघत-बघत
माझी मम् चालू होती. एकदम टि.व्ही. बंदच झाला. मी आणि आईने एकमेकींकडे पाहिलं...
"आरे... हे
काय झालं..." मी असं विचारताच आईने वर पाहिलं. मीही आईप्रमाणेच वर पाहू लागले.
पंखा कमी होत बंद झाला. आई म्हणाली, "बबडी, अगं लाईट गेलेत बाबू.
ते आले की चालू होईल बरं टि.व्ही..." मी आपली, "लाईट
कुठे गेले... पळून गेले का... एकटेच कसे गेले... आई, बाबा,
आजी जाताना एकमेकांना सांगून जातात मग लाईटने कोणालाच कसं नाही सांगितलं..."
हे विचार करत माझी मम् निपटी-शिपटी केली. मग आई तिचं काम करू लागली आणि मी माझी-माझी
खेळू लागले...
थोड्याच वेळात एस.व्ही.सी.
शाळेतून बाबा आला. लाईट तेव्हाही आले नव्हते. बाबा त्याचा मोबाईल पाहत म्हणाला, "लाईट गेलेत वाटतं... आता ते येईपर्यंत मोबाईल बाजूला... ए आई, (बाबा ना माझ्या आईला आई म्हणतो आणि आजीला पण आईच म्हणतो त्यामुळे कधी-कधी त्याच्या
हाकेला ओ देताना दोघींची गडबड होते...) तूही तुझा मोबाईल वापरू नकोस बरं लाईट येईपर्यंत..."
आई-बाबा दोघांनीही मोबाईल बाजूला ठेवले. लाईट नाहीत त्यामुळे टि.व्ही. नाही आणि लॅपटॉप
पण नाही...
मग काय, पकडा-पकडी, लपा-छुपी, चेटकीण-राक्षस-परीताईची
गोष्ट, भोपळ्यातली म्हातारी-लांडगा-वाघोबाची गोष्ट, चेटकीण-रपंझेल-राजकुमाराची गोष्ट, असे आम्ही तिघं छान
खेळलो. संध्याकाळी आम्ही तिघं गच्चीवर गेलो. मी मस्त सायकल चालवली. मग फायरब्रिगेड,
चोर-पोलीस असे खेळ खेळलो. सनकाका जसा लपला तसं ब्लॅक-ब्लॅक होऊ लागलं.
आम्ही घरी आलो पण लाईट अजून आलेच नव्हते. मला तर अजून खेळायचं होतं...
आई गेली किचनमध्ये
आणि मी बाबासोबत, ससा-कासव, लायन-उंदीरमामा,
कबुमामा-मुंगी या गोष्टी आणि डॉक्टर-पेशंट हा खेळ खेळलो. थोड्याच वेळात
लाईट आले. पण दुपारपासून लाईट पळून गेल्याने माझी दुपार आणि संध्याकाळ खूप मजेत गेली.
बाकी दिवशीही आई-बाबा माझ्यासोबत खेळतात पण काल मोबाईल, लॅपटॉप,
टि.व्ही. हे चालू नसल्याने मला खेळात जास्त मजा आली.
१०.०५.२०१९
कलर कलर व्हिच कलर...
काल की नाही गंमतच
झाली. काल बाबा माझ्यासारखा लहान झाला. हो खरंच... तुम्हाला खरं नाही का वाटत... थांबा, मी सांगतेच काय झालं ते... काल ना आजीने माझ्यासाठी कलरबुक आणलं होतं. त्यात
ना बॉल होता, भू-भू होता, जिराफ होता,
फिश होता, माऊ पण होती. त्या सगळ्यांना ना कलर
करायचं होतं. मग काय, मी स्टूडंट आणि बाबा टीचर...
आधी मी बॉल कलर केला.
मग मी काईटपण कलर केला. बाबाला माझं कलरिंग खूप आवडलं. मी पान उलटलं. एका पानावर फिश
होता आणि एका पानावर होती मनिमाऊ. त्या माऊला पाहताच बाबा म्हणतो कसा, "ही माऊ मी कलर करणार. मी करणार. ए अनुरा प्लीज प्लीज, ही माऊ मी कलर करतो ना..." मी बाबाकडे पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर
हात ठेवत म्हणाले, "बरं बाबा, तूच
कर कलर. हां, आपण रेस लाउया... मी फिश कलर करते आणि तू माऊला
कलर कर. ओक्के..."
बाबाने अंगठा दाखवला
आणि आम्ही दोघं लागलो कलर करायला. मी पटापट कलर करत होते. बाबामात्र हळू हळू कलरिंग
करत होता. थोड्यावेळाने आमच्या दोघांचं कलरिंग एकाच वेळी झालं. बाबातर नाचायलाच लागला.
म्हणत होता, ये.......... मी माऊ कलर केली. मी माऊ कलर केली..."
मी ती माऊ पाहिली. बाबाने माऊ काय मस्त कलर केली होती... मला तर खूप आवडली. मी बाबाला
विचारलं, "ए बाबा, या माऊचं नाव काय
ठेवायचं..." बाबा लग्गेच म्हणाला, "या माऊचं नाव टिल्लू..."
आमच्या दोघांकडे
पाहत आई हसत म्हणाली, "काय रे, तुमच्या दोघांपैकी
नक्की लहान कोण आहे..." आणि आम्ही दोघं एकाच वेळी ओरडलो, "बाबा..."
१३.०६.२०१९
पहिला दिवस...
आज की नाही जामच धम्माल आली. आज ना माझ्या शाळेचा पहिला दिवस होता.
मी स्वत:च लवकर उठले. आई-बाबा तयारच होते. मी पटकन ब्रश केलं (स्वत:च बरं का...), बाबाकडून अंघोळ करवून घेतली. (आज पाण्यात खेळण्याचा हट्ट नाही बरं केला...)
School uniform घालून मस्त तयार झाले. आरशात पाहिलं. कित्ती गोडुली
दिसत होते मी...
मग मी, आई नी बाबा शाळेत निघालो. नवीन शाळा कशी असेल... टीचर
कशा असतील... मला ओरडतील का... हे विचार करत मी गप्प गप्प होते. गेट उघडलं आणि टीचर
मला आत घेऊन गेली. मी मागे पाहिलं तर बाबाचा चेहरा चांगलाच रडवेला झाला होता. मला
कळेना... आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे की बाबाच्या... कारण एवढंसं तोंड करून बाबा
मला टाटा करत होता...
माझ्या क्लास रूमच्या बाहेर एक टीचर बोर्ड घेऊन उभी होती. मला शाळेत
नेणाऱ्या टीचरने मला त्या टीचरच्या हातात सोपवलं. आधी थोडी उदास झाले खरी, पण माझी क्लासरूम पाहून, माझ्याइतकीच लहान मुलं पाहून
मी खुश झाले. क्लासरूम छान सजवली होती. कुठे
माऊचा फोटो होता, कुठे चिऊताई होती... कुठे खारुताई होती तर कुठे
पोपटकाका दिसत होता. टीचरने मग आम्हाला छान खेळणी दिली, कलरिंगसाठी
पुस्तकं दिली. आम्ही मस्त मजा केली. थोड्या वेळाने टीचर काहीतरी इंग्लीशमध्ये म्हणाली.
ती काही म्हणाली ते नाही समजलं पण घरी जायचं हे समजलं...
०३.०९.२०१९
बाप्पा गेले घरी...
काल ना, मी संध्याकाळी झोपेतून उठले ना तेव्हा बाबा, अमीत काका, आशीष काका, सपना काकू, अनू काकू सगळेच घाई-घाई करत होते. मला नवल वाटलं. मी आईला विचारलं तर ती म्हणाली, "मने, आज आपल्या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ना... म्हणून आम्ही आरतीची तयारी करतोय. तू पण ये की मदतीला..."
मला कळेना, विसर्जन म्हणजे काय करायचं... मी बाबाला विचारलं. बाबा म्हणाला, "अनुरा, आपल्या बाप्पाला वाहत्या पाण्यात रस्ता करून द्यायचा म्हणजे तो त्याच्या घरी परत जाईल..." "बापरे... पाण्यातून रस्ता करायचा... मग बाप्पा ओला होईल ना... त्याला सर्दी झाली तर..." असे विचार चालू होते माझे आणि एकदम पाऊस सुरू झाला. पाऊस पाहून बाबाने बाप्पाला रेनकोट घातला आणि आम्ही सगळे निघालो...
बाप्पाच्या आरत्या, गाणी म्हणत, झांजा वाजवत आम्ही सगळे तलावावर पोहोचलो. बाप्पा सतत बाबाच्या मांडीवर बसला होता. आधी मला त्याचा राग आला होता कारण मला बसायचं होतं ना बाबाच्या मांडीवर... पण नंतर राग गेला माझा. तलावाजवळ बाप्पाला एका ठिकाणी ठेऊन आम्ही मस्तपैकी आरती केली. मग एक काका बाप्पाला घेऊन तलावात उतरला...
"गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...गणपती गेले गावाला... चैन पडे ना आम्हाला..." असं सगळे ओरडत होते तेव्हा त्या काकाने पाण्यात बाप्पाला तीन वेळा वर-खाली केलं आणि रिकाम्या पाटावर थोडी माती ठेऊन तो पाट बाबाकडे दिला. मला दिसावं म्हणून आईने मला कडेवर घेतलं होतं. मी पाहिलं तर तिसऱ्यांदा बाप्पा पाण्याखाली गेला तो वर आलाच नाही. मी आईला बिलगले. आईने मला पाहिलं तर मी रडत होते. माझा पापा घेत आईने का रडतेस विचारलं तर मी म्हणाले, "आपला परत वर नाही आला..."
माझ्या डोळ्यात पाणी पाहून आईने मला अजून जवळ घेतलं आणि म्हणाली, "मनी, काळजी करू नकोस हं. बाप्पा पुन्हा येईल आपल्याकडे..." मला जरा बरं वाटलं. घरी परत जाताना मी तलावाकडे पाहिलं. मनात विचार होतेच, "बाप्पा नीट पोहोचेल ना घरी... मगर किंवा साप त्याला त्रास नाही ना देणार... घरी पोहोचल्यावर आई-बाबा करतात तसा बाप्पा फोन करून सांगेल ना..." तुम्हीही सांगा हं बाप्पाला फोन करायला...