निसर्गरम्य समुद्रकिनारा, हिरव्याजर्द झाडीतून जाणारा वळणदार रस्ता, अधून-मधून
रस्त्याला फाटे फोडणारे लाल मातीचे रस्ते, ताडा-माडाच्या
झाडांमधून दिसणारी कौलारू घरं... असा हा कोकणातला नयनरम्य देखावा पाहत नागमोडी
रस्त्यावरून एस.टी.ची बस आपल्या वेगाने रस्ता कापत होती. एक झोकदार वळण घेत बस
थांबली. सैन्याचा ऐटबाज गणवेष घातलेला एक माणूस उतरला. रस्त्याच्या कडेला एक चहाची
टपरी होती. एखाद-दोन माणसं तिथे दिसत होती. गणवेषातला माणूस त्यांच्या दिशेला
गेला. रुबाबदार हिरवा गणवेष, हातात वळकटी, हे पाहून बाकावर बसलेला एकजण म्हणाला, "अरे
वाह, पाहुणे मिलिटरीत दिसतायत... कुठले हो म्हणायचे
तुम्ही..." वळकटी बाकाशेजारी ठेवत तो माणूस म्हणाला, "नमस्कार, मी अजिंक्य पेंडसे. सैन्यात मेजर आहे. बरीच
वर्ष गावाकडे फिरकलो नव्हतो म्हणून विचार केला..."
अजिंक्यला मध्येच तोडत टपरीतला माणूस म्हणाला, "काय हो, आमच्या नाटक्या पेंडशाचे नातलग काय
तुम्ही..." हे ऐकून बाकावरचा माणूस म्हणाला, "अहो
खुळे की काय तुम्ही जोशी... पाहुण्यांना नाटक्या पेंडसे काय ठाऊक... दिगंबर पेंडसे
असं म्हणा..." अजिंक्यने होकारार्थी मान हलवली. संवाद चालू असतानाच एक मुलगा
किटली आणि काचेचे छोटे ग्लास घेऊन टपरीत शिरला. तो मुलगा बऱ्यापैकी अस्वस्थ दिसत
होता. त्या मुलाला पाहताच जोशी म्हणाले, "काय रे गण्या,
काय झालं असं थरथरायला... आणि त्या पलिकडल्या आळीतल्या घरी चहा देऊन
आलास का..." गणू काहीच बोलत नव्हता. कसाबसा बाकापर्यंत पोहोचला. थरथरत्या
हाताने त्याने किटली व ग्लास खाली ठेवले आणि बाकावर बसून शून्यात हरवला. त्याची
अवस्था अजिंक्यच्या लक्षात आली. ते गणूजवळ गेले. त्याला धीर देत, शांत करत म्हणाले, "गणू, शांत
हो. मला सांग, तू काही असं पाहिलंस का ज्यामुळे तुला भिती
वाटली..." गणूने न बोलताच होकारार्थी मान हलवली...
गणूला शांत करत अजिंक्यने त्याने काय पाहिलं हे
सांगायला सांगितलं. गणूने बोलायला सुरुवात केली, "पलिकडच्या
आळीत हेगिष्टे वकिलांचं घर आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तिथे काही माणसं राहत
आहेत. आमच्याकडून त्यांना रोज सकाळ-संध्याकाळ चहा जातो. आत्ता मी चहा द्यायला गेलो
तेव्हा तिथे काही खोकी पडली होती. ही खोकी काल नव्हती. त्यात बंदुका, बाँबचे गोळे, पिस्तुलं असं सामान होतं. ते सर्व
पाहून मला खूप भिती वाटली. हे असं कधी आम्ही पाहिलंच नव्हतं. माझ्या तर पायाखालची
जमीनच सरकली. मी पटकन चहा देऊन तिथून निघालो. जाताना त्यातल्या एकाचा मी
मोबाईलमध्ये फोटो काढला. हा बघा..." अजिंक्यने फोटो पाहिला आणि अवाक झाला.
त्याने काही विचार केला व जोशींना म्हणाला, "ही बाब खूप
गंभीर आहे. फोटोतला हा माणूस अंतरराष्ट्रीय अतिरेकी आहे. याचं इथे शस्त्रसाठ्यासकट
असणं म्हणजे खूप मोठा धोका आहे…” जोशींनी ताबडतोब पोलीसांना फोन केला...
गावचा पोलीस इंस्पेक्टर आणि तीन हवालदार टपरीवर
पोहोचले. गणूने पाहिलेलं सर्व त्यांना सांगितल्यावर इंस्पेक्टर म्हणाला, “हे प्रकरण फार गंभीर दिसतंय. वाढीव कुमक मागवायला हवी. आपण तीन-चार जण
काय करू शकणार आहोत...” मेजर अजिंक्य शेजारीच उभे होते. ते पुढे होत म्हणाले, “प्रकरण नुसतं गंभीर नाही, तर घातकही असू शकतं
इंस्पेक्टर. हा चेहरा ज्या माणसाचा आहे, त्याचं नाव अब्बास अली बेग आहे. हा
अंतरराष्ट्रीय अतिरेकी आहे. अनेक देशांमध्ये याच्यावर गुन्हे दाखल आहेत. या अब्बास
अलीचं अशा शांत ठिकाणी शस्त्र-अस्त्रांसहीत असणं म्हणजे नक्कीच मोठ्या घातपाताचा
कट असावा. हे प्रकरण पोलिसांचं नाही, तर सेनेचं आहे...” इतकं
बोलून अजिंक्यने फोन लावला, “Hello, army
headquarters... Major Ajinkya Pendse here. Connect me to colonel Rathod please.
Its urgent… Good morning sir. Major Ajinkya here. सर, एक शॉकिंग बातमी आहे. मी आत्ता कोकणात आहे. अंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्बास
अली बेग इथे स्पॉट झाला आहे सर. येस. जास्त वेळ नाही सर आपल्याकडे. We need to take
immediate action.
येस सर. मी लोकेशन सेंड करतो...” फोन बंद करत मेजर अजिंक्य
पोलीसांकडे पाहत म्हणाले, “इंस्पेक्टर साहेब, मी सैन्याची तुकडी मागवली आहे. संध्याकाळी ते गावाबाहेरच्या
समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतील. तुमचं काम असेल आज संध्याकाळ पासून उद्या सकाळपर्यंत
या आणि आस-पासच्या गावाचं रक्षण करणं. बाकी आम्ही बघतो...”
साधारण रात्रीचे नऊ वाजत आले होते. आपली बंदूक
सांभाळत मेजर अजिंक्य किनाऱ्यावर पोहोचले. दुर्बीण डोळ्यांवर लावत त्यांनी
पाण्यावर नजर फिरवली. लांबून दोन काळे ठिपके पाण्यावर हलताना दिसले. मेजर
अजिंक्यांनी दुर्बीण ठेवली आणि टॉर्च सुरू करून पाण्याकडे पाहून आडवा हलवला. हळू
हळू ते ठिपके मोठे होत गेले. खरंतर ते ठिपके नसून बंदुकधारी जवानांनी भरलेल्या दोन
बोटी होत्या. बोटी किनाऱ्याला लागल्या. दहा-बारा जवान धडाधड उतरले आणि मेजर
अजिंक्यांना सेल्यूट करून एका ओळीत उभे राहिले. मेजर अजिंक्य सर्वांना एका
पाऊलवाटेने हेगिष्ट्यांच्या घराजवळ घेऊन गेले. एका ठिकाणी थांबून त्यांनी सर्वांना
रिंगण करून बसण्याचा इशारा केला. मेजर अजिंक्य बोलू लागले, “फ्रेंड्स, अब्बास अली बेग आणि त्याचे साथीदार त्या
घरात लपले आहेत. They
are armed.
या घराच्या मागे जंगल आहे. त्यांना तिथून पळायला सोप्पा मार्ग आहे. एक टीम या
झाडीतून जाऊन घराच्या मागे जा. एक टीम माझ्यासोबत समोरून चला. शक्यतो या अब्बासला
जिवंत पकडायचं आहे आपल्याला. मी इशाऱ्याची ग्रेनेड टाकेन. स्फोट होताच all guns will open
fire. त्या फायरिंगच्या आड, मी घरात जाईन आणि त्या अब्बासला पकडेन. क्लियर...”
सर्वांनी होकारार्थी मान हलवली. मेजर अजिंक्य म्हणाले, “लेट्स
मूव्ह...”
अर्धे जवान झाडीतून सावधपणे घराच्या मागे जाऊ
लागले. मेजर अजिंक्य आणि काही जवान तिथेच घरासमोरच्या झाडीत दबा धरून बसले होते.
काही क्षणांनी मेजर अजिंक्यांनी घरातल्या लोकांची दिशाभूल करायला घराच्या उजव्या
बाजूला ग्रेनेडचा स्फोट केला. आवाजाने दचकलेल्या घरात लपलेल्या सर्व अतिरेक्यांनी
स्फोट झाला त्या बाजूला खिडकीतून गोळीबार करायला सुरुवात केली. मेजर अजिंक्यांनी
“फायर...” अशी गर्जना करताच आपल्या जवानांनी बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली.
मेजर अजिंक्यांनी काही क्षण जाऊ दिले आणि म्हणाले, “I am going in, give
me cover fire...”
हा आदेश मिळताच एकाच लईत गोळीबार होत राहिला. गोळीबाराच्या आडून मार्ग काढत मेजर
अजिंक्य घराजवळ पोहोचले. आपले जवान एकेक करत अतिरेक्यांना संपवत होते. मेजरने
रिव्हॉल्वर हातात घेत एका लाथेत दार उघडलं. दार उघडताच आपल्या जवानांनी गोळीबार
बंद केला. समोर दोन अतिरेकी बंदुका सरसावून उभे होते. मेजरने दोन गोळ्यांमध्ये
दोघांना संपवलं. इतक्यात अब्बास बाहेर आला. मेजर अजिंक्य अब्बासकडे झेपावणार
इतक्यात एका अतिरेक्याने मेजर अजिंक्यला मागून पकडलं. अब्बासने खाली पडलेली रायफल
उचलली आणि मेजर अजिंक्यवर गोळ्या चालवणार इतक्यात मेजर अजिंक्यने कोलांटी उडी
मारली. मेजरला पकडलेला अतिरेकी अचानक समोर आला आणि अब्बासने चालवलेल्या सर्व
गोळ्या त्याला लागल्या. मेजरने त्याच क्षणी आपली उजवी लाथ अब्बासवर हाणली. तो
अतिरेकी आणि अब्बास एकाच वेळी खाली पडले. खाली पडताच तो अतिरेकी मरण पावला. मेजरने
आपली रिव्हॉल्वर जमिनीवर पडलेल्या अब्बासच्या कानाशेजारी लावली...
मेजर म्हणाले, “अब्बास अली बेग...
तुझे पकडने की तमन्ना बहुत देश कर रहे थे. आखिर आज तू हाथ लगा है... जमिनीवरून उभा
राहत असताना अब्बास त्या पडलेल्या अतिरेक्याकडे पाहत होता. मेजर अजिंक्यांनी फोन लावला, “Sir,
mission accomplished. Operation A is successful. अब्बास अली
बेग आपल्या तावडीत आहे. मी त्याला ताबडतोब head quartersला पाठवण्याची
व्यवस्था करतो. ओव्हर...” सर्वजण घराबाहेर पडतंच होते की अब्बास म्हणाला, “मेजर, तेरी वजह से मेरा बेटा युसूफ मारा गया...
हां... यह जो मरा पडा है, वह मेरा बेटा है... अभी तो यह जवान हुआ था और तेरी वजह
से... इसकी कीमत तुझेही नहीं बल्की पुरे हिंदुस्तान को चुकानी पडेगी. इंशाह
अल्लाह...” अब्बासकडे एकवार पाहून मेजर अजिंक्य आपल्या जवानांना म्हणाले, “Take
him away...”
मेजर अजिंक्यांनी तिथे जमलेल्या शास्त्रांकडे पाहिलं. म्हणाले, “इतकी आधुनिक शस्त्र. आणि तीही कोकणासारख्या शांत परिसरात... काहीतरी
मोठं कारस्थान शिजत होतं नक्की. हा अब्बास तर हाताला लागला. आता त्याच्या मदतीने
इतर अतिरेकी संघटनांचा माग काढता येईल...”
सकाळ झाली. गावात आणि इतरत्र ही बातमी वाऱ्यासारखी
पसरली. गावात सत्कार समारंभ आयोजित केला गेला. मेजर अजिंक्यांचा सर्वांनी गौरव
केला. पोलिसांनीही त्यांच्या तर्फे पुष्पगुच्छ दिला. मेजर अजिंक्यांच्या
प्रसंगावधानामुळे गावावरचं मोठं संकट टळलं होतं. सर्वजण त्यांची स्तुती करत होते.
मेजर अजिंक्य जितके धाडसी आणि शिस्तबद्ध होते तितकेच नम्रपण होते. म्हणाले, “अहो, माझा कशाला सत्कार... मी काहीही केलं नाही.
माझं कर्तव्य केलं इतकंच. आता असं पुष्पगुच्छ देऊन मला लाजवू नका हो. उगाच डोक्यात
हवा जायची माझ्या... खरा सत्कार करायचा तो या गणूचा. बिकट प्रसंग असूनही त्या
अतिरेक्याचा फोटो काढून या गणूने सैन्याची मदतच केली आहे. गणू, तुझ्या या कामगिरीबद्दल हे मेडल तुला बक्षीस...” गणूसोबत पेंडसेंच्या
घराण्याचं नाव चहू दिशांनी गाजायला लागलं. म्हणता म्हणता महिना सरला. मेजर अजिंक्य
सुट्टी संपवून परत निघाले. सर्व गाव त्यांना निरोप द्यायला बस थांब्यावर जमलं
होतं. इतकं प्रेम पाहून मेजर आधीच भारावून गेले होते. बस निघताना त्यांनी एकवार
सर्वांकडे पाहिलं. बस तिच्या मार्गाने निघून गेली.
तीन महिन्यानंतर...
दुपारचे चार वाजत आले होते. घाटातल्या नागमोडी
वाळणावरून निसर्ग ग्रूपची बस आपल्या वेगाने रस्ता कापत होती. बसमधले बरेच जण
अंताक्षरी खेळण्यात रममाण होते. काही खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होते, काही हेडफोन्सवर गाणी ऐकत होते तर काही गप्प राहून नुसतेच इकडे तिकडे पाहत
होते. तासभरचा गोलाकार चढणीचा रस्ता कापून बस एका ठिकाणी थांबली. तिथे वर जाणारा
मातीचा रस्ता होता. सर्वजण आपापले सामान घेऊन उतरले. निसर्ग ग्रूपची नारंगी टोपी
घातलेला एक माणूस सर्वांना म्हणाला, "मंडळी, इथून पुढे आपल्याला कुठलंही वाहन नाही मिळणार. या रस्त्याने वर गेल्यावर
पाचंच मिनिटांवर आपला कँप आहे. पुढील सूचना तिथे गेल्यावर मिळतील...
सर्वजण आपापल्या सामानासह रस्ता चढू लागले. दहा
मिनिटात एका कौलारू घराजवळ पोहोचले. पाचेक मिनिटं झाली असतील, तो नारंगी टोपी घातलेला माणूस उभा राहत म्हणाला, "Trekkers, welcome
to Nisarg Group Pindhari Expedition. मी संग्राम, या ग्रूपचा मॅनेजर. आपण जिथे उभे आहोत त्या जागेचं नाव लोहारखेत आहे. हाच
आपला मुख्य बेस कँप असेल. उद्यापासून आपलं ट्रेकिंग सुरू होईल. तुम्हा सर्वांची
सामानं वहायला खेचरांची व्यवस्था केली आहे. आपण सकाळी ६:३० पासून चढायला सुरुवात
करणार आहोत. प्रत्येक टप्पा सुमारे दहा ते अकरा किलोमीटरचा असेल. म्हणजे साधारण
दोन तास. दोन तासांनी विश्रांतीसाठी काही वेळ दिला जाईल. दर दहा-अकरा किलोमीटरवर
आपले कँप्स असतील. तिथे आमची ही चार माणसं, आपली नाश्ता,
जेवणाची व रात्रीच्या वस्तीची व्यवस्था पाहतील...
सकाळच्या सत्रात दोन टप्पे आणि दुपारच्या सत्रात
एक टप्पा असे साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर आपण चालणार आहोत. सगळं व्यवस्थित असेल
तर उद्यापासून चौथ्या दिवशी दुपार पर्यंत आपण पिंढारी ग्लेसियरच्या पायथ्याशी
पोहोचू. तुम्हा पन्नास जणांची जबाबदारी जितकी माझ्यावर आहे तितकीच ती तुमच्या स्वत:वर
पण आहे. जसजसे दिवस सरत जातील तसतसे चढण कठीण होत जाईल. त्यामुळे आम्ही दिलेल्या
सूचना नीट पाळा. पिंढारी ग्लेसियरला पाचव्या दिवशी सकाळी भेट देऊन आपण लगेच परतीचा
प्रवास सुरू करू. पुन्हा तसंच तीन टप्प्यात ट्रेकिंग करत आजपासून दहाव्या दिवशी
दुपारी आपण इथे पोहोचू. तुम्हाला दिलेल्या या निळ्या रंगाच्या टोप्या पुढचे दहा
दिवस तुमची खूण असतील. So
trekkers, take rest for the day and be ready by tomorrow morning 6:30 a.m..."
सर्वजण पांगले. काही लोहारखेतचं सौंदर्य न्याहाळत
होते. काही सकाळची तयारी करत होते. काही तिथल्या रहिवाश्यांशी गप्पा मारत होते.
म्हणता म्हणता दिवस संपला. रात्री निजानीज झाल्यावर सर्व व्यवस्थित आहे ना याची
पाहणी करण्यासाठी संग्राम टॉर्च घेऊन निघाला. घराच्या मागच्या झाडीत त्याला
काहीतरी हलल्यासारखं जाणवलं. संग्राम हळू हळू पुढे सरकला. एका झुडूपाआड गुडघ्यावर
बसून तो किलकिले डोळे करून पाहू लागला. “सब तैय्यार है. कल सुबह....... निकालेंगे
और चौथे रोज....... जहां उन्हे होना चाहिये... आप फिक्र ना करे. कोई गलती नहीं होगी...”
हे अस्पष्ट आणि हलक्या स्वरातलं संभाषण ऐकून संग्राम गोंधळात पडला. हा काय प्रकार
आहे ते पाहण्यासाठी संग्रामने टॉर्च पेटवला आणि झुडूपात गेला. काही क्षण गेले
नसतील, तोच संग्राम बाहेर आला. एकवार त्याने झुडूपाकडे पाहिलं आणि घराच्या
दिशेने निघून गेला. रात्र संपत आली. दिवस सुरू होत होता...
सकाळी सव्वा सहालाच सर्वजण तयार होऊन बसले होते.
संग्रामसुद्धा तयारी करून बाहेर आला. सर्वांकडे पाहत म्हणाला, “So
trekkers, all set to explore the nature… Keep your camera’s ready. But safety
comes first. During these days nobody will be eating anything else except the
food provided to you. The junk food or any other stuff may be harmful to your
body in higher altitude. From now on we will not be getting beds to sleep and
also any toilets. We will be completely going with the nature. We will have
tents for our relaxation and the nature will provide us places for our nature
calls. This small road will take us up. Let’s move…” सर्वजण एकामागून एक असे समोर दिसणाऱ्या लाल मातीच्या पाऊलवाटेने वरच्या
बाजूला चालू लागले...
ती पाऊलवाट मध्येच मोठी होत होती तर मध्येच गायब
होत होती. पण निसर्ग ग्रूपचं निशाण सर्वांना वाट दाखवत होतं. कधी गर्द झाडी तर कधी
एखाद्या वरून खाली येणाऱ्या ओढ्याचा किनारा. अशा नयनरम्य वातावरणातून सर्वजण हळू
हळू वर चढत जात होते. घामाच्या धारा नाहीत, घड्याळाच्या
काट्यावरची धावपळ नाही, शिवाय प्रसन्न आणि शीतल वातावरण,
यामुळे सर्वजण आनंदी होते. साधारण दोनेक तास चालल्यावर तंबू उभारलेले दिसू लागले.
संग्राम तिथे उभाच होता. हळू हळू सर्वजण येता येता नऊ वाजले. संग्राम म्हणाला, “Trekkers,
this is our first camp. Breakfast is ready. We will move ahead by 9:45 a.m. for
our next camp. Our lunch will be served there…” गरमागरम उपमा
आणि चहाचा आस्वाद घेत दहा मिनिटे गेली. सर्वजण पुढच्या प्रवासाला तयार झाले. आपण
निसर्गाच्या सानिध्यात आहोत त्यामुळे अशा वातावरणाचा अनुभव असलेल्या संग्रामचं
ऐकायचं असंच सर्वांनी ठरवलं होतं...
पुढे चालत जाताना सूर्य चांगलाच वर येत होता पण
गरमी अशी जाणवत नव्हती. थोडी नागमोडी, थोडी सरळ अशी ती लाल
मातीची पाऊलवाट म्हणजे या सर्वांची मैत्रीणच झाली होती. एकही जण भटकू नये म्हणून
सोबतीला निसर्ग ग्रूपचे निळे निशाण होतेच. समोर दिसणाऱ्या देखाव्यांचे फोटो काढत, गाणी गुणगुणत, गप्पा मारत ही पन्नास जणांची टोळी
पुढे सरकत होती. साधारण साडे बारा झाले होते. सूर्य आता डोक्यावर आला होता पण
घामाच्या धारांनी जणू सुट्टीच घेतली होती. एका ठिकाणी पुन्हा तंबू उभारलेले दिसले.
चालून चालून सर्वाना भुका लागल्या होत्या. चुलीवरच्या जेवणावर यथेच्च ताव मारत
असताना संग्राम म्हणाला, “Good afternoon
trekkers… It’s one o’ clock now. We will start our journey ahead by 3:00 p.m.
and that will be our last trek for the day. So enjoy your meal and get ready
for the trek ahead…”
जेवणं झाली. काही गाणी ऐकण्यात दंग होते तर काही
नुसतेच लवंडले होते. काही फोटो काढत होते तर काहीजण टिपण्या काढत होते. बरोब्बर तीन
वाजता सर्वजण तयारी करून सज्ज झाले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. उन्हं
उतरणीला लागली होती आणि पाऊलवाटेने आता चढण सुरू केली होती. वाटेत मिळणारे
वेगवेगळे दगड, पानं, काठ्या गोळा करत, फोटो
व सेल्फी काढत सर्वजण पुढे जात होते. दिवसभराच्या चालण्यानंतरही जराही थकवा जाणवत
नव्हता. हळू हळू प्रकाश कमी होत होता. पाचंच वाजले होते तरी सात वाजल्यासारखे वाटत
होते. एका ठिकाणी बरेच तंबू उभारलेले दिसत होते. यावेळी तंबूंची संख्या जरा जास्त
होती. सर्वजण तिथे जमले. एका तंबूमधून संग्राम बाहेर येत म्हणाला, “Good
evening trekkers… It’s been a long day right… But I must say, you all have done
a very fantastic job. Keep this good work going. We will be staying here tonight.
The tents with red flags are for ladies and the others are for gents. So relax
for the day…” संध्याकाळची जेवणं झाली. गप्पा झाल्या आणि साडे नऊ वाजताच सर्वजण झोपी
गेले...
दुसरा दिवस उजाडला. सर्व सामानानिशी चढण चढणे, फोटो काढणे, वेगवेगळे दगड काठ्या गोळा करणे असा
सर्वांचा प्रवास सुरू होता. एकेक दिवस संपत होता तसे सर्वजण अजून वरवर जात होते.
हवा अजून थंडगार होत होती. मजल दरमजल करत अखेर सर्वजण पिंढारी ग्लेसियरच्या
पायथ्याशी पोहोचले. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. चांगलीच थंडी पडली होती.
बोलतानाही तोंडावाटे वाफा निघत होत्या. संग्राम पुढे येत म्हणाला, “Trekkers…
This is it… Our last camp. We are at the Pindhari base. Tomorrow morning we
will be moving upwards from this road and within an hour of trek we will be at
one of the most spectacular beauties of nature. The Pindhari glacier… So relax
for the night…” रात्रीची जेवणं झाली. शेकोटी पेटवली गेली. गाणी,
नाच यांना ऊत आला होता. कोणीही झोपण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. कधी एकदा त्या
बर्फाने झाकलेल्या जागेत विहार करतोय असं सर्वांना झालं होतं...
सकाळ झाली तशी सर्वांनी लगोलग तयारी केली. आज तर
सर्वजण सहाच्या आधीच तयार झाले होते. इथून पुढे रस्ता थोडा कठीण होता. निसरडे दगड, मध्येच असलेलं चिखल यामुळे चालताना सर्वांना अडचण येत होती. पण काही
क्षणातच दिसणाऱ्या त्या मनोरम देखाव्याला आठवून सर्वजण अडचणी विसरून पुढे चालत
होते. पाऊलवाट वर जाऊन एका ठिकाणी गायब झाली होती. पुढे रस्ताच दिसत नव्हता.
सर्वात आधी तिथे पोहोचणारे पाऊलवाट गायब होते त्या ठिकाणी आले. समोरचं दृष्य पाहून
त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ती पाऊलवाट गायब नव्हती झाली, तर बर्फाने झाकली गेली होती. समोर बर्फाने भरलेले सुळके, मागून येणारी पाऊलवाट, डाव्या आणि उजव्या बाजूला
असलेली गर्द झाडी आणि झाडांच्या पानांवर पसरलेला बर्फ, असा स्वर्गसुंदर देखावा
पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. “Friends, we did it…
We did it… It’s the Pindhari glacier…” असं ओरडत ते सर्व
मागे येत होते. मागून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकून आपल्या चालण्याचा वेग वाढवला आणि
थोड्याच वेळात सर्व पिंढारी ग्लेसियरच्या तोंडाशी येऊन पोहोचले...
समोरचं अप्रतीम दृष्य पाहून आपल्या मेहनतीचं चीज
झाल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होतं. थंडगार हवा, वारा, बर्फाछादित सुळके, हे
सर्व पाहत असताना संग्राम सर्वांना म्हणाला, "Trekkers, we are at
the top. There is only one way to leave this place and that is at your back.
And now something you will never expect..." असं म्हणून
संग्रामने लपवलेली रायफल काढली आणि हवेत गोळ्या चालवल्या. त्याचबरोबर मागच्या
पाऊलवाटेने अनेक बंदुकधारी धावत आले आणि हवेत गोळ्या चालवत त्यांनी सर्वांना गराडा
घातला. काय घडतंय हे समजण्याआधीच सर्वजण घेरले गेले. त्यातला एक म्हणाला,
"संग्राम... तू... आणि हा असा..." आणि तो बोलू लागला, "हा...हा...हा... मैं संग्राम नहीं हूँ. तुम्हारा संग्राम तो लोहारखेत में
ही दफ़न हो गया. मेरी शक्ल उससे मिलती है. इसलिए मैंने उसकी जगह ले ली. मेरा नाम
फ़िरोज़ है... तुम सबको लगता होगा यह पिंढारी है... ग़लत. यह पिंढारी नहीं, बल्कि
वह जगह है जहाँ हमारे मनसूबों को अंजाम मिलेगा. हमारी तुम लोगोंसे कोई दुश्मनी
नहीं. तुम्हारे ज़रिए तुम्हारी सरकार तक हम एक पैग़ाम देना चाहते हैं... जुनैद,
लिंक अपलोड हो गई हो तो कॅमेरा शुरू करो..." जुनैदने
होकार्राथी मान हलवत आंगठा दाखवला. फ़िरोज़ कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागला...
"इस वक़्त हिंदुस्तान के हर घर में हर टि.व्ही. चॅनलपर हम ही दिखेंगे. चॅनल
बदलकर फायदा नहीं होगा. क्यौंकि हमने आपका ट्रांमिशन बंद कर रखा है... तो ध्यान से
सुनिये... भारत सरकार को यह पैग़ाम है... हमने पिंढारी ग्लेसियरपर आए पचास लोगोंको
बंदी बना रखा है. हमारी सिर्फ़ चार माँगें हैं... पहली, सेना
की क़ैद से अब्बास अली बेग़ की रिहाई... दूसरी, उन्हें
सहीसलामत हमारे पास पहुँचाने का इंतज़ाम... तीसरी, मेजर
अजिंक्य का उनके साथ होना... और चौथी... एक हेलिकॉप्टर, जो
हमें यहाँसे लेकर जाएगा... और हाँ, हमपर कोई हवाई हमला ना
करे. नहीं तो यह पचास लोग मुफ़्त में मारे जाएँगे. आपकी सरकार के पास चौबीस घंटे
हैं. अगर हमारी माँगें पूरी ना हुईं तो पच्चीसवे घंटेसे हर एक घंटेमें आपका एक
आदमी मारा जाएगा... जिसका सबूत यह रहा..." बोलत असतानाच फ़िरोज़ने इशारा
केला. दोन बंदुकधाऱ्यांनी एका माणसाला धरून आणलं आणि फ़िरोज़ने गोळ्या घालून
त्याला जागीच ठार केलं. सर्वांना प्रचंड धक्का बसला. टि.व्ही.वर हे बघणारा
प्रत्येकजण घाबरला होता. फ़िरोज़ म्हणाला, "अब सिर्फ़
उनंचास बचे हैं और इनकी सलामती की ज़िम्मेदारी अब भारत सरकार की है... आपका वक़्त
शुरू होता है... अब... जिहाद ज़िंदाबाद..." असं म्हणत फ़िरोज़सहीत इतर
बंदुकधाऱ्यांनीही हवेत गोळीबार केला आणि प्रसारण बंद झालं...
बातमी भारतभर पसरली. जनता हवालदिल झाली होती.
पिंढारी ग्लेसियरला गेलेल्यांच्या नातेवाइकांनी आपापल्या हद्दीतल्या पोलीस
स्टेशनला धाव घेतली होती. तासाभरातच राष्ट्रपतीभवनाबाहेर गर्दी जमा झाली.
प्रधानमंत्री रविंद्र सोदी यांनी तातडीची बैठक बोलावली. सोदीजी म्हणाले, "यह लोग अब हद से आगे बढ़ रहे हैं... हमारे भारतवासियों को इनसे हर वक्त
खतरा होता है... लेकिन उनका खात्मा करने में वहाँ फँसे हमारे नागरिकों की जान का
भी खतरा है... क्या करें..." थोडा वेळ थांबून आपल्या सेक्रेटरीकडे वळत
म्हणाले, "फिलहाल आप सारे चैनल के प्रसारण रोक दें और
मेजर अजिंक्य को तुरंत बुलावा भेजें... उनके यहाँ आने के बाद आगे के बारें में
सोचेंगे..." मध्ये बराच वेळ निघून गेला. सोदीजींच्या केबिनमध्ये बराच वेळ
चर्चा सुरू होती. काय करावं कोणालाही सुचत नव्हतं. अब्बासला सोडणं म्हणजे
आतंकवादाला रान मोकळं करून देणं आणि त्याला नाही सोडलं तर पिंढारीमध्ये अडकलेल्या
एकोणपन्नास निरपराध भारतियांच्या प्राणांशी गाठ... अशा द्विधा पेचात अडकलेले सोदीजी
म्हणाले, “क्या करें कुछ सूझ नहीं रहा... एक तरफ लागता है हमारे
जवानोंने अपनी जान पर खेलकर जिस आतंकवादी को पकडा है उसे ना छोडें पर दूसरी
तरफ...” “सर, अब्बास को छोड दिजिये...” सोदीजी बोलत असतानाच
दारातून हा आवाज आला...
सर्वांनी दाराकडे पाहिलं. दारात दोन माणसं उभी
होती. साहेबांचा सेक्रेटरी म्हणाला, “सर, मेजर अजिंक्य... आपने बुलावा भेजा था...” दोघंजण आत आले. एक म्हणाला, “Sir,
I am Colonel Rathod, and he is Major Ajinkya Pendse...” मेजर
पेंडसेंचं नाव ऐकताच साहेब उभे राहिले. हस्तांदोलन करत म्हणाले, “तो आप है जांबाज मेजर अजिंक्य, जिन्होने उस
आतंकवादी अब्बास को पकडा. We are proud of you major...
पर अब, उससे भी बडी समस्या हमारे सामने है...” खुर्चीत बसत मेजर अजिंक्य म्हणाले, “सर, मै जानता हूँ... इस वक्त हमें ध्यान देना होगा
उन उनंचास बेकसूर लोगोंकी तरफ जो पिंढारी में फंसे हुए है... एक बार उन्हे सही
सलामत हम बचा लें उसके बाद अब्बास को पकडने के लिए फिरसे कोशिश करेंगे... शायद यह
बर्फ के पहाड, जंगलसे भरी यह खाइया इसबार हमारा साथ दे
दे...” साहेबांनी एकदा मेजरकडे पाहिलं. ते हसले आणि म्हणाले,
“ठीक है मेजर, अब्बास को रिहा करने का ऑर्डर और आपको उसके
साथ हेलिकॉप्टर में भेजने का इंतजाम शाम तक हो जायेगा...”
मिटिंग संपवून कर्नल राठोड आणि मेजर अजिंक्य आर्मी
हेडक्वॉर्टर्सला पोहोचले. कर्नल राठोड म्हणाले, “मेजर, जेवढं मी तुम्हाला ओळखतो, नक्कीच काहीतरी शिजतंय
तुमच्या डोक्यात...” मेजर अजिंक्य हसत म्हणाले, “येस सर...
मला पंधरा जवान हवे आहेत...” कर्नल राठोड हसले आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली.
थोड्याच वेळात बंदुकांनी सज्ज असलेले पंधरा जवान मेजर अजिंक्यांसमोर उभे ठाकले.
मेजर अजिंक्य बोलू लागले, “Boys, I am Major
Ajinkya Pendse…
You all are here on
a mission… Operation Pindhari… जैसा के आप सब जानते है, अब्बास
के आदमियोंने हमारे उनंचास नागरिकोंको पिंढारी ग्लेसियर के करीब एक खुले मैदान मै
कैद कर रखा है. See
this map, they have done their home work very thoroughly. These are recent
satellite pictures. This place is indeed an open ground with only this entrance
where at a time only two persons can walk adjacent to each other. The east and
west sides have deep valleys with thick forest and the northern is filled with
snow covered mountains. Now here is the plan…
All
of you will be already seated inside the chopper securing them from visibility.
Myself and Abbaas will board the chopper. Before we approach Pindhari base, all
of you will jump out and wait. It’s possible that there might be invaders at
the Pindhari base. You will tackle them as we move up. But there should be no
gun shots as the people up there might harm the hostages. As we move you will get
divided in three teams. Two teams will start climbing the eastern and western
forest to reach at the top and one team will follow our chopper. Your all will
wait for my signal. My signal will be a loud cry saying, “Bharatmata Ki Jai…”
At 9:00 hours in the morning, I will give the signal and there will be a
surprise attack from the eastern, western and southern side. No civilian shall be
harmed. I repeat, no civilian shall be harmed. Is that clear…” मेजर अजिंक्यांच्या या ललकारीवर सर्वांनी एका सुरात प्रतिसाद दिला, “Yes
sir…”
थोड्याच
वेळात अब्बासला घेऊन काही जवान तिथे आले. विजयी मुद्रेत अब्बास हसत होता. मेजर
अजिंक्यला पाहून तो म्हणाला, “क्यों मेजर, हार गये... देखा हमारे लोगोंने कैसे
तुझे घुटने टेकनेपर मजबूर किया. हमारा एक मनसूबा नाकामयाब हुआ तो क्या. अब हम और
कहर बरसायेंगे तुम्हारे लोगोंपर. हम तुम्हें इस क़दर परेशान करेंगे, के हाथ जोडकर
तुम कश्मीर हमें दे दोगे. ईशाह अल्लाह...” मेजर काहीही न बोलता फक्त हसले आणि
अब्बासला ढकलत हेलिकॉप्टरकडे जाऊ लागले. ते एक मोठं कार्गो हेलिकॉप्टर होतं
ज्यातून सामानाची ने-आण केली जात असे. ते जिथे उभं होतं त्या खाली एक चर होता
ज्यात आपले जवान दबा धरून बसले होते. अब्बासने आत नीट पाहिलं आणि कोणीच नाही हे
समजताच पायावर पाय टाकून ऐटीत बसला. हेलिकॉप्टर सुरू होण्याच्या काही क्षण आधी
सर्व जवानांनी खालच्या बाजूने आत प्रवेश केला. वरच्या बाजूला बसलेल्या अब्बासला
याचा जराही गंध नव्हता. लगेचंच हेलिकॉप्टर आकाशात उडालं. मेजर अजिंक्यला खिजवायला
अब्बास म्हणाला, “मेजर, बहुत रोना आ
रहा होगा तुझे. जान पर खेलकर तूने मुझे पकडा और बस दो दिन में ही मुझे बाईज्जत
मेरे लोगोंके बींच पहुंचा रहे हो. ज्यादा अफसोस नहीं करना पडेगा तुझे. तेरा भी
वक्त अब पूरा होने वाला है. मेरे युसूफ का बदला तुझसे लेकर रहूँगा...” अब्बास
बोलतच होता की मेजरचा इशारा मिळताच पायलटने हेलिकॉप्टरला एक झटका दिला. अब्बास
गडबडला आणि त्याच्या खिशात पिस्तूल टाकण्याची मेजरला संधी मिळाली...
तिथे
फिरोजला त्याच्या वॉकीटॉकीवर अब्बास येत असल्याची खबर मिळाली. फिरोज जोरजोरात हसत सर्वांना
म्हणाला, “हा...हा...हा... एक बार फिरसे तुम्हारी भारत सरकार हमारे सामने हार गयी.
मेरे वालीद को छोड दिया उन्होंने. अब तुम लोग भी अल्लाह को प्यारे हो जाओगे थोडी दर
में. क्यों, हैरान हो गये. तुम सब ने हमारा चेहेरा देख लिया है. इसलिये तुम सब को
मरना होगा. लेकीन थोडा सब्र कर लो. मेरे अब्बाजान यहां सलामत आ जायें फिर तुम सब
की ही बारी है... हा...हा...हा...” भीतीच्या सावटाखाली असलेल्या आणि निर्दयी अशा
या दहशतवाद्यांच्या गराड्यात अडकलेल्या त्या एकोणपन्नास जणांचा धीर हळू हळू संपत
चालला होता. त्यात आता फिरोजच्या या वक्तव्याने तर सर्वजण हवालदिल झाले. कोणी रडू
लागलं, तर कोणी प्रार्थना करू लागलं,
कोणी डोक्याला हात लावून बसलं तर कोणी इतरांची हिम्मत वाढवू लागलं. इतक्यात
दक्षिणेकडून एक बंदुकधारी धावत आला. फिरोजजवळ येत म्हणाला,
“जनाब, हम क़ामयाब हो गये. एक हेलिकॉप्टर हमारी तरफ आ रहा
है...”
दक्षिणेकडून
एक हेलिकॉप्टर येत होतं. पिंढारी बेस दृष्टीपथात येताच मेजर अजिंक्यने अब्बासच्या
नकळत स्वत:च्या घड्याळावरची एक कळ दाबली. कार्गोमध्ये लपून बसलेले पंधरा जवान
याचीच वाट पाहत होते. दार उघडून पेराशूटच्या सहाय्याने सर्वांनी धडाधड उड्या
घेतल्या. झाडीत लपत-छपत सर्वजण पुढे जाऊ लागले. बेसवर काही बंदुकधारी फिरत होते.
कॅप्टन जसवंतने सर्वांना इशारा करताच सर्वांनी बेसला घेराव घालायला सुरुवात केली.
कॅप्टन जसवंतचा इशारा मिळताच सर्वांनी एकाच वेळी एकेका आतंकवाद्याची गचांडी आवळली.
एकही गोळी न सुटता बारा अतिरेकी ठार झाले. सर्व पंधरा जवान गोलाकार उभे राहिले.
कॅप्टन जसवंत हळू आवाजात म्हणाला, “Well done boys. Now
the big task. Split in three teams. Team Alpha led by Captain Javed will go
from the east. Team Charlie under Captain Sushant will take the west and team
Bravo along with me will cover the front. Everyone set your time. At the count
of three it will be exact 8:00 hours. Three… We all will reach the top in 30
mins. Come what may, the counter attack will start at exactly 9:00 hours. Is
that clear…” सर्वांनी
होकारार्थी माना हलवल्या आणि तीन दिशांना तीन गट पांगले...
अल्फा
आणि चार्ली गटांनी झाडीतून वरच्या बाजूला आवाज न करता मार्गक्रमण करायला सुरुवात
केली आणि ब्राव्हो गट समोरच्या बाजूने दबकत दबकत पावलं टाकत होती. आकाशातून
हेलिकॉप्टर पुढे जात नाहीसं झालं. हेलिकॉप्टर मैदानात उतरलं. मेजर अजिंक्यने
अब्बासला खेचत बाहेर आणलं. फिरोज आणि त्याची माणसं समोरच उभी होती. अब्बासकडे पाहत
फिरोज म्हणाला, “तस्लीम अब्बाजान...” अब्बासही हसत त्याला उत्तर देत म्हणाला, “वालेकूम सलाम... देखा मेजर... यह है हमारा बेटा फिरोज और वह है तुम्हारे
आदमी. अब मेरी हथकडियां खोल दो वरना...” मेजर अजिंक्यने बेड्या काढल्या. फिरोज
म्हणाला, “क़फ़िर मेजर, देखी हमारी ताक़त...
अब तुझे और तेरे इन आदमियोंको यहीं दफन कर देंगे हम. आ जाइये अब्बामियां...”
अब्बास पुढे जाणार इतक्यात मेजर अजिंक्यने त्याची गचांडी पकडली आणि त्याच्याच
खिशात लपवलेलं पिस्तूल काढून त्याच्या कानावर लावलं. फिरोजकडे पाहत म्हणाले, “फिरोज, इतनी जल्दी नहीं. तुझे मैं चाहिए, मैं तुम्हारे सामने हूँ. इन सबको जाने दो, मैं अब्बास को तेरे पास लाता हूँ...”
अब्बासच्या डोक्याला पिस्तूल लावलेलं पाहून फिरोज जरा घाबरला. त्याने सर्वांना
इशारा केला आणि ते सर्वजण हळू हळू मेजर अजिंक्यच्या दिशेने चालू लागले...
सर्वाना
आपल्या दिशेने येताना पाहून मेजर अजिंक्यने अब्बासला पुढे ढकललं आणि त्याच्यासोबत
फिरोजच्या दिशेने चालू लागला. आपले नागरिक आणि मेजर जवळ येताच मेजर हळुवार आवाजात
म्हणाले, “Don’t look back…
Just go ahead… You all will be safe… Just go…” मेजर अजिंक्य काय बोलले ते
कोणालाच समजलं नाही. पण सर्वांनी होकारार्थी मान हलवली. मेजर अजिंक्य अब्बासला
घेऊन फिरोज जवळ आले. मैदान ओलांडण्यापूर्वी सर्वांनी मागे वळून पाहिलं आणि मेजरला
सेल्यूट केलं. मेजर अजिंक्यने स्मित केलं आणि सर्वजण मैदान पार करून गेली. आपले
पाच जवान तिथे तयारच होते. त्यातल्या दोघांनी सर्वांना झटपट बेसकडे नेलं. तिथे अल्फा
गट झाडीतून वाट काढत मैदानाच्या तोंडाशी पोहोचला. कॅप्टन जावेदने वॉकी-टॉकीवरून
हळूवार आवाजात संपर्क साधला, “We are at the position… Confirm your status…” समोरून कॅप्टन सुशांतचा आवाज आला, “Charlie approaching target in 5 seconds…” कॅप्टन जसवंतनेही उत्तरं दिलं, “Bravo reached.
Target sighted and locked…” कॅप्टन जावेद म्हणाला, “Hold your positions…” तिथे मैदानात विकृत हसत फिरोज म्हणाला, “क्यों क़ाफ़िर
मेजर... जोश खत्म हो गया... हमारे साथ बहुत सारे मुल्क है, ताक़त है, हथियार है...
और तू... निहत्था, अकेला... हा...हा...हा...” फिरोजला आणि अब्बासला वाटलं मेजर
अजिंक्य चिडेल, ओरडेल पण तसं काहीच झालं नाही. एकदम थंडपणे
हसत मेजर अजिंक्यने घड्याळ पाहिलं आणि म्हणाले, “हथियार भले
ना हो, पर कौन कहता है मैं अकेला हूँ... मेरे साथ सारा भारत
देश है... सुननी है भारत की ललकार...”
तिथे
मैदानाच्या पूर्व व पश्चिमेला दबा धरून बसलेल्या आपल्या जवानांनी एकमेकांना इशारा
केला, “Boys be ready…
Three seconds to go…” मेजर अजिंक्यने बुलंद आवाजात ललकारी दिली,
“भारतमाता की जय...” त्याचबरोबर पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेकडून ग्रेनेडचे स्फोट
झाले आणि मेजर अजिंक्यांच्या ललकारीला प्रत्युत्तर देत,
“भारतमाता की जय...” हा नारा करत आपल्या तेरा जवानांनी गोळीबार करत मैदानात प्रवेश
केला. हेलिकॉप्टर लगेच उडालं आणि खालच्या बाजूला गेलं. तीनही बाजूंनी गोळीबार होत
असल्याने अतिरेक्यांना काय करावं तेच समजत नव्हतं. काही करण्यापूर्वीच एकेक
अतिरेकी मारला जात होता. अतिरेक्यांनीही बेछूट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण
आपल्या जवानांनी तुफान गोळीबाराने त्यांना प्रत्युत्तर दिलं. अखेर सर्व
अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यावर मैदानात आपल्या जवानांच्या गराड्यात मेजर अजिंक्य, अब्बास आणि फिरोज उभे होते. अब्बास आणि फिरोज पुरते घाबरले होते. मेजर
अजिंक्य म्हणाले, “क्यों अब्बास... यह है तेरा हारा हुआ दूसरा
बेटा फिरोज... और फिरोज, तुम यही सोचते होगे के तुम नाकामयाब
क्यों हुए... अब दोजख में बैठकर यही सोचते रहना और इंतजार करना अपने बाकी साथियों
का... क्योंकी अब, हम चूप नहीं रहेंगे... जय हिंद...” इतकं बोलून
हातातल्या पिस्तुलाने मेजर अजिंक्यने दोघांनाही संपवलं...
पिस्तूल
आत ठेवत मेजर अजिंक्यने वॉकी-टॉकीवरून संपर्क साधला, “Hello, Army Headquarters… Major Ajinkya here. Mission
accomplished. No casualties. I repeat… No casualties…” मेजर अजिंक्य, कॅप्टन जसवंत, कॅप्टन जावेद, कॅप्टन सुशांत आणि आपले दहा जवान परत येत असताना आपल्या
सर्व एकोणपन्नास नागरिकांनी आणि त्यांच्या रक्षणार्थ असलेल्या आपल्या दोन जवानांनी
टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. सर्वांना सेल्यूट करत मेजर अजिंक्यने
जोरदार ललकारी दिली, “भारतमाता की जय...”
@
अनिकेत परशुराम आपटे.