Wednesday, October 13, 2021

चहा...

"येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील..." हे भावगीत सर्वांनाच ठाऊक आहे. याच गाण्याच्या चालीवर नवीन शब्द बसवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न...


चहा...

करशील करशील करशील...
राणी आल्याचा चहा तू करशील...
करशील करशील करशील...
राणी आल्याचा चहा तू करशील...
गाळण्याने गाळून कपात ओतून...
मला लवकर आणून देशील...
करशील करशील करशील...

आल्याची भुरभूर थोडीशी साखर...
गरम पाण्यात तू घालशील...
आल्याची भुरभूर थोडीशी साखर...
गरम पाण्यात तू घालशील...
बाजूच्या गॅसवर पातेली ठेऊन...
दूध उकळायला तू ठेवशील...
दोन्ही पातेल्यांवर नजर ठेवत...
तिथे तू उभीच राहशील...
करशील करशील करशील...
राणी आल्याचा चहा तू करशील...
गाळण्याने गाळून कपात ओतून...
मला लवकर आणून देशील...
करशील करशील करशील...

दूध तापेल थर तो साचेल...
सायीचा पातेल्यावर पहा...
दूध तापेल थर तो साचेल...
सायीचा पातेल्यावर पहा...
साय दूर हटवून गरम दूध ओतून...
झाला तयार हा चहा...
चहा व बिस्कीट घेऊन तू येशील अन्
माझ्यासोबत गप्पा मारशील...
करशील करशील करशील...
राणी आल्याचा चहा तू करशील...
करशील करशील करशील...
राणी आल्याचा चहा तू करशील...
गाळण्याने गाळून कपात ओतून...
मला लवकर आणून देशील...
देशील देशील देशील...

@ अनिकेत परशुराम आपटे.

त.टी.: तीन कडवी आहेत, पण मी दोनच वापरली आहेत...