नमस्कार मंडळी मी आहे खड्डा...
पावसात बरं का... जमतो आमचा अड्डा...
रस्त्यात आम्ही की आमच्यात रस्ता...
हाच प्रश्न सर्वांना पडतो...
आमच्यात पाय जाऊन पडता तुम्ही...
दोष मात्र आम्हाला मिळतो...
कुठे मोठे कुठे खोल...
कुठे उथळ कुठे छोटे...
आमची तऱ्हाच असते न्यारी...
पाणी साचलं नसेल ना आमच्यात...
तर दिसतो आम्ही लई भारी...
आमच्यात पाणी साचताच पहा...
आमचा मिस्टर इंडिया होतो...
अशा वेळी जो येतो तो...
आम्हालाच नावं ठेवतो...
आम्हाला बोल लाऊन काय उपयोग...
आम्ही स्वत:च थोडे येतो...
जिथे जमीनच असेल कमकुवत...
तिथे आम्हाला पर्यायच नसतो...
आत्ताशा कामं सुरू झालीत रस्त्यांची...
आमच्यात भर घालून आम्हाला बुजवण्याची..
अहो भराव घालून काय होणार...
पावसाचा जोर वाढताच...
आम्ही पुन्हा समोर येणार...
आम्ही पुन्हा समोर येणार...
@ अनिकेत परशुराम आपटे.
