Monday, December 2, 2019

ड़र...


ड़र... दिल और दिमागपर कब्ज़ा करनेवाला होता है, ड़र... | ड़र सिर्फ राक्षस, आत्मा या भूत-प्रेत का नहीं होता | ड़र के और भी पहलू होते हैं | किसी अनहोनी घटना के होने का ड़र, खुद को खुद से खोने का ड़र... आवाज़ को चीरकर फैलते सन्नाटे का ड़र, रौशनी को झाँकते काले अँधेरे का ड़र... | ड़र इंसान के दिल और दिमाग़पर इस क़दर हावी हो जाता है, कि इंसान अपनी सोच-समझ खो बैठता है | ड़र में घिरा इंसान वही देखता है, जो ड़र उसे दिखाता है | कुछ ऐसा ही हादसा रवी के साथ हुआ |

"रवी... रवी..." पढ़ने में मग्न रवी इस आवाज़ से चौंक गया | आवाज़ घर के अंदर से आ रही थी | "घर में तो मैं अकेला हूँ, तो यह दूसरी आवाज़ किसकी है..." इस ख़याल से रवी का मन विचलीत हो उठा और वह आवाज़ की ओर चल पड़ा | अंधेरे में लड़खड़ाते हुए आवाज़ जिस कमरे से आई थी, उस कमरे रवी पहुँचा | रवी यहाँ-वहाँ देख ही रहा था कि, "रवी... आ गये तुम..." आवाज़ सुनते ही रवी चौंक गया और तुरंत आवाज़ की ओर मुड़ा |

रवी ने आवाज़ की ओर देखा | सामने आइना था और उसमें रवी को खुद रवी ही दिख रहा था | वह रवी का अक्स था | मोबाईल की धिमी रौशनी में वह अक्स रवी को कुछ अलग दिख रहा था | रवी शांत था, लेकिन वह अक्स हस रहा था | रवी तुछ बोले इससे पहले वह अक्स बोल पड़ा, "रवी... तुम्हें मैंने यहाँ क्यौं बुलाया जानते हो... कुछ ही देर में समझ जाओगे..." यकायक रवी के पीछे की दीवार फाड़कर दो हाथ बाहर निकले और उन्होंने रवी की गर्दन दबोच ली |

हड़बड़ाकर रवी बिस्तर पर उठ बैठा | पसीने से लथपथ रवीने घडी देखी | रात के बारह बज चुके थे | टि.वी. चल रहा था लेकिन स्क्रीन काली पड़ी थी | "इसका मतलब... टि.वी. देखते देखते मैं सो गया और सपने में यह सब देखा |" खुद से बड़बड़ाते हुए रवी ने सी.ड़ी. निकाली, टि.वी. बंद किया और वापस सोने चला गया |

बहुत देर तक रवी करवटें बदलता रहा लेकिन सपने कि वजह से या जो देखा उसके ड़र की वजह से रवी को नींद ही नहीं आ रही थी | तभी उसे पानी के टपकने की आवाज़ आई | रवी ने ध्यान से सुना | आवाज़ बाथरूम से आ रही थी | "मैंने तो सारे नल बंद किये थे... तो यह पानी कैसे टपक रहा है..." यह खयाल मन में आते ही रवी सहम गया | वह धीरे-धीरे बाथरूम की ओर बढ़ा | खुलते दरवाजे की आवाज़ से उसका मन और घबरा गया | रवी अंदर झाँका | नल का पानी नीचे रखी बालटी में टपक रहा था | रवी ने गहरी साँस ली | नल बंद कर वह मुड़ा |

रवी को आइने में एक छबी दिखाई दी | वह एक औरत की छबी लग रही थी | उसके उड़नेवाले खुले बाल तो दिख रहे थे लेकिन चेहेरा नज़र नहीं आ रहा था | निशब्द होकर रवी उस छबी की ओर देख रहा था | रवी ने सोचा, "आइने में दिख रही है, इसका मतलब यह जो भी है, मेरे पीछे...|" पसीने की एक बूँद कवी के कानों के पीछे से आने लगी | आइने से नज़र हटाकर रवी धीरे से पीछे मुड़ा | वहाँ कोई नहीं था | रवी ने झट से आइने की तरफ देखा तो वह छबी भी गायब हो चुकी थी | ड़र के मारे रवी पसीने में तरबतर हो गया था | बाथरूम का दरवाजा बंद कर वह झट से बिस्तर में घुस गया |

बाथरूम की ओर देखने की उसकी हिम्मत ही नहीं हो रही थी | हॉल की तरफ मुँह करके रली बिस्तर पर पड़ा रहा | उसने दरवाज़े को देखा | आधा खुला दरवाज़ा देख रवी के होश उड़ गये | "मैंने तो दरवाज़ा बंद किया था ! फिर यह कैसे खुल गया ! किसने खोला होगा !" यह खयाल मन में आते ही रवी के पेट में तितलियाँ उड़ने लगी | दिवार का सहारा लेते हुए रवी दरवाज़े के पास पहुँचा | उसने हॉल में झाँक कर देखा | बाहर अँधेरा ही अँधेरा था | घड़ी के टिक् टिक् की आवाज़ भी उस सन्नाटे में रवी को एक शोर की तरह लग रही थी | सब ठिक है यह सोच रवी बिस्तर की तरफ मुड़ा ही था और, "खळऽऽऽऽ..."

कांच के टूटने की आवाज़ से रवी जगह पर ही पुतला बन गया | आवाज़ किचन से आ रही थी | दिवार का सहारा लेते हुए थरथराते कदमों से रवी किचन की ओर बढ़ा | फैला हुआ अँधेरा, घड़ी की टिक् टिक्, सन्नाटा और कांच की आवाज़ इन सब की वजह से अब ड़र रवी के दिल और दिमाग़ पर हावी हो रहा था | रवी ने किचन के अँदर देखा तो कुछ नहीं था | "शायद मेरा वहम होगा |" यह सोचकर रवी पूछे मुड़ा बाथरूम में नज़र आनेवाली छबी अब उसके सामने खड़ी थी | उस छबी का ख़ून से सना एक हाथ रवी की ओर बढ़ रहा था | यह देख रवी पूरी तरह से ड़र गया | उसे चिल्लाना था पर मानों उसकी साँस अटक गयी थी | फटी आँख़ों से रवी देखता ही रह गया |

सुबह के पांच बज चुके थे | रवी की नींद खुली | रात की घटना अबतक उसके ज़हन में ताज़ी थी लेकिन सुबह होने की वजह से उसे थोड़ी हिम्मत आई | रवी बाहर आया | उसने देखा तो बाहर बहुत सारे लोग थे और ज़मीन पर एक कपड़ा फैला हुआ था | पुलीस भी वहाँ मौजूद थी | सामने कुर्सीपर रवी की पत्नी ज्योती बैठी रो रही थी | एक महिला काँस्टेबल रजिस्टर हाथ में लिए दूसरी कुर्सीपर बैठी थी | ज्योती बोल पड़ी, "क्या बताऊँ सर, मैं अपनी सहेलियों के साथ घूमने गयी थी | रात को बहुत लेट वापस आई | बेडरूम में आकर देखा तो टि.वी. आधा बंद था, सी.ड़ी. टेबलपर पड़ी थी और रवी बिस्तरपर लेटे करवँट बदल रहे थे | मैं बाथरूम होकर आई तो मेरे पीछे रवी भी आ गये | मुझे देख जब वह चौंक गये तो मैं तुरंत ही वहाँ से निकल पानी पीने किचन में आई | मेरे हाथ से कांच का ग्लास गिरकर टूट गया | कांच उठाते समय एक टुकड़ा हाथ को लगा और वह जख्मी हो गया | मेरे हाथ से निकलता ख़ून धोनेही वाली थी के पीछे से रवी अँदर आ गये | मैं उनके पास गयी आयऔर मुझे देख रली इतने ड़र गये के... मैंने इन्हें कितनी बार समझाया सर, के रात को भूत-वूत के मूवीज़ ना देखा करें | कल रात भी ऐसी ही मूवी देखी और..."

ज्योती सिसकसिककर रोनी लगी | लेडी काँस्टेबल उसे धीरज बँधाते हुए बोली, "ज्योतीजी, संभालिए खुद को | ड़र, इंसान की सोच का सबसे बड़ा दुश्मन होता है | आपके पती भी उसी ड़र की वजह से..." रली अभी अभी सामने खड़ा सोच रहा था, "रात के सारे वाक्ये ज्योती को कैसे मालूम... वह तो यहाँ..." रवी यह सोच ही रहा था के ज़मीन पर कपड़ा हवा से उड़ा मौत की नींद सोया रवी ही रवी को दिखाई दिया...

समाप्त |

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, October 18, 2019

प्रॉजेक्ट आयडेंटीटी...



रात्रीचा एक वाजत आला होता पण यंत्राचा घों-घों आवाज काही थांबत नव्हता. प्रयोगशाळेच्या बंद असलेल्या दारं-खिडक्यांमधून हिरव्या रंगाच्या लकेरी तेवढ्या दिसत होत्या. अचानक, विज चमकावी तितका मोठा प्रकाश प्रयोगशाळेभर पसरला आणि क्षणार्धात सर्व शांत झालं. सगळीकडे अंधार आणि नीरव शांतता पसरली. "धाड..." या आवाजासरशी प्रयोगशाळेचं दार उघडलं गेलं. "घोंऽऽऽऽ.... घोंऽऽऽऽ..." अशा आवाजापाठोपाठ धडपडत ठेचकाळत डॉ. विद्यानंद बाहेर आले आणि एका दिशेला धावू लागले. अतीव वेदनेमुळे पाय त्यांच्या शरीराला आणि शरीर त्यांच्या मनाला साथ देइनासे झाले आणि डॉ. विद्यानंद कोसळले. काही क्षणातच असमंत भेदणारा, "घोंऽऽऽ... घोंऽऽऽ..." असा आवाज जमिनीपासून वरवर जात जंगलाच्या दिशेने गेला...

दुतर्फा झाडी असलेल्या नागमोडी रस्त्यावरून पोलीस जीप चालली होती. इंस्पेक्टर आनंद गाडी चालवत होता आणि सोबत सब इंस्पेक्टर सचिनशी बोलत होता, "कधी हे जंगल संपणार देवजाणे..." त्याला तोडत सचिन म्हणाला, "आनंद सर, आपलं कामच तसं आहे त्याला आपण तरी काय करणार... सुहास माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे, म्हणून ही केस माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे. गेले चार दिवस तो घरी परतला नाही म्हणून काकूंनी मला बोलवून घेतलं. बरं झालं तुम्ही सोबत यायला तयार झालात..." सचिनला एका हाताने टाळी देत आनंद म्हणाला, "एनी टाईम ब्रो... बरं, आधी आपल्याला डॉ. विद्यानंदांची लॅब गाठायला हवी. सुहासच्या आईच्या सांगण्याप्रमाणे सुहास तिथेच गेला होता..." दोघं बोलतच होते की, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." असा आवाज येऊ लागला. दोघांनीही कान टवकारले. जीपचा वेग कमी झाला आणि अचानक जीपला कसलीतरी धडक बसली...

जीपचा कंट्रोल सुटत होता. आनंदने शिताफीने जीप झाडीकडे वळवली आणि कर्कचून ब्रेक मारला. कर्कश आवाज करत रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडापासून इंचभर आधी जीप थांबली. काही क्षण गेले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलंच होतं की शांतता भेदणारा, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." हा आवाज येऊ लागला. दोघं खाली उतरून सभोवार पाहू लागले. आनंद म्हणाला, "कसला आवाज हा... रातकिडा तर नसेल..." सचिन त्याला तोडत म्हणाला, "रातकिड्याचा इतका मोठा आवाज... आणि जीपला कोणी धडक दिली असावी..." जीपला वर धडक बसली असल्याने दोघांनी टपावर पाहिलं तर टपाला पडलेला पोचा त्यांना दिसला. दोघंही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते की पुन्हा, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." या आवाजाने त्यांचं लक्ष विचलीत झालं. रस्त्याच्या डावीकडच्या जंगलातून हा आवाज येत होता. दोघांनी आपापल्या बंदुका काढल्या आणि आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. एका फांदीला एक बोर्ड टांगला होता ज्यावर लिहिलं होतं, "डि.व्हीज लॅब..."

बोर्डाकडे पाहत सचिन म्हणाला, "डि.व्ही... डॉ. विद्यानंद... सर कदाचित इथून सुहासचा माग लागू शकेल..." सचिनकडून जंगलाकडे नजर वळवत आनंद म्हणाला, "यू आर राईट सचिन... लेट्स गो..." अंधार, किर्र झाडी आणि नुकताच आलेला आवाज यामुळे सचिन व आनंद टॉर्च आणि पिस्तूल सरसावत, सांभाळून पुढे जाऊ लागले. थोड्याच वेळात काळी पडलेली, दारं-खिडक्या बंद असलेली दोन मजली जुनाट इमारत त्यांना दिसली. दार सताड उघडं होतं आणि आतून अंधूक प्रकाश येत होता. दोघं आत शिरले. आत बरीच बाकडी दिसत होती आणि समोर अजून एक दार होतं. सचिन व आनंद सावकाशपणे आत गेले. तिथे एका बाजूला वॉशरूम होतं तर दुसरीकडे एक खाली जाणारा जिना होता. जिन्यावरून खाली उतरत दोघं मुख्य लॅबमध्ये पोहोचले. दाराशेजारीच एक माणूस उताणा पडला होता. सचिनने खाली वाकून त्याला सरळ केला आणि तो अवाक झाला...

पडलेला इसम सुहास होता. त्याच्या पोटावर मोठी जखम होती आणि त्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. "सुहास... अरे बोल माझ्याशी... काय झालं तुला... सुहास..." सुहासला हलवत सचिन म्हणाला. सुहासने डोळे किलकिले केले. सचिनकडे पाहत, "स...चिन... डॉ.... प्रयोग... आऽऽऽह..." इतकं कसंबसं बोलून त्याने प्राण सोडले. सचिनने सुहासचा देह खाली ठेवला व दुःखद चेहऱ्याने आनंदकडे पाहिलं. आनंदने त्याला धीर दिला व सीनियर इंस्पेक्टर प्रधानांना फोन लावत म्हणाला, "सर, आनंद बोलतोय. सचिनच्या मित्राला, सुहासला शोधण्यासाठी आम्ही आलो आहोत. सर, द न्यूज इज, सुहास इज डेड. आम्ही जिथे आहोत ती जंगलात असलेली प्रयोगशाळा वाटते आहे. कदाचित डॉ. विद्यानंदांची असावी. इट डज नॉट सीन टू बी नॉर्मल सर... तुम्ही लवकर या... मी तुम्हाला कोऑर्डिनेट्स पाठवतो..." फोन बंद झाला. सचिनला हलवत आनंद म्हणाला, "सचिन, तुझं दुःख समजतंय मला, पण आपल्याला आपलं काम करायलाच हवं. मी सरांना कळवलं आहे. ते येईपर्यंत आपण तपास सुरू करू. तू डाव्या बाजूला जा, मी उजवी बाजू चेक करतो..."

दोघंही त्या खोलीत शोधू लागले. सचिन म्हणाला, "आनंद सर, आपण इथे येऊन आता दहा मिनिटं झाली आहेत, पण डॉ. विद्यानंद कुठे दिसले नाहीत..." सचिनकडे पाहत आनंद म्हणाला, "यू र राईट सचिन. हे माझ्या लक्षातच आलं नाही. हिज लाईफ मे ऑलसो बी इन डेंजर... आपण त्यांना शोधायला हवं... पण, जरा जपून. कुठल्याही मशीनला किंवा वस्तूला पटकन हात लाऊ नकोस..." सचिनने मानेनेच होकार दिला. तळघरातल्या त्या लॅबमध्ये मिणमिणत्या बल्ब्सखेरीज दुसरा प्रकाशच नव्हता आणि दाराशिवाय त्या खोलीतून बाहेर पडण्याचा दुसरा मार्गही नव्हता. आनंद व सचिनने एकमेकांकडे पाहिलं. आनंद म्हणाला, "डॉ. विद्यानंद कुठेच दिसत नाहीत, आणि इथे लपायला दुसरी जागाही नाही... त्यांनीच तर सुहासला..." सचिनच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसू लागले. तो म्हणाला, "आय थिंक द सेम वे... ही मे बी द कल्प्रिट..." आनंद आणि सचिन बारकाईने तिथल्या सर्व गोष्टींचं निरिक्षण करत होते. प्रयोगांच्या मशीन्सशिवाय तिथे एका मोठं छिद्र पडलेलं काचेचं कपाट आणि एक लोखंडी कपाट होतं...

लोखंडी कपाटाच्या दाराला रक्त लागलं होतं. सुहासच्या पोटाला जखम कदाचित याचमुळे झाली असावी असं दोघांनाही वाटलं. दोघांनीही कपाट उघडलं. आत बऱ्याच काचेच्या बाटल्या, काचेचे डबे ठेवले होते. त्यात कोळी, माशा, डास असे कीटक वर-खाली वावरत होते. त्या कीटकांचा आकार बऱ्यापैकी मोठा होता. तो आकार पाहून आनंद आणि सचिनचे डोळे विस्फारले. कपाटाशेजारी असलेल्या टेबलवर एक तुटलेली रिकामी बाटली पडली होती. तपासणी करण्यात बराच वेळ गेला. दोघं पुन्हा सुहासच्या प्रेताजवळ आले. ते बाहेर पडणार इतक्यात, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." आवाज ऐकून दोघांनीही पिस्तुली सरसावल्या. तेवढ्यात कपाटात ठेवलेल्या बाटल्या हलू लागल्या. दोघांनी पाहिलं तर त्यातले कीटक अजून जोरात वर-खाली करत आहेत जणू काही ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावेत. "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." कमी झाली आणि गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. सिनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि डॉ. गोखले तिथे येऊन पोहोचले होते. दोघांनी पिस्तुली आत ठेवल्या आणि आनंदने प्रधान साहेबांना आत येण्याचा मार्ग सांगितला...

प्रधान आणि गोखले आत आले तेव्हा आनंद आणि सचिन दाराजवळच सुहासच्या प्रेताशेजारी उभे होते. आनंद म्हणाला, “सर, ही डॉ. विद्यानंदांची लॅब आहे. हा सुहास. सचिनचा मित्र. याच्याच शोधात आम्ही इथवर आलो. इथे येताना काही विचित्र गोष्टी आम्हाला जाणवल्या. म्हणजे नॉर्मल पातळीपेक्षा बराच मोठा असा घोंघावण्याचा आवाज, गाडीला धडक बसल्याने पडलेला पोचा आणि या लॅबमध्ये असलेली ही यंत्र व कीटकांनी भरलेल्या या बाटल्या. ही जमिनीवर पडलेली बाटली रिकामी आहे. कदाचित यातल्या किड्याचा वापर झाला असावा किंवा तो किडा निसटला असावा. डॉ. विद्यानंद इथे नाही सर. आमचा संशय आहे की कदाचित त्यांनीच सुहासला मारलं असावं...” राग अनावर होऊन सचिन म्हणाला, “आणि तसं असेल तर त्या विद्यानंदला मी सोडणार नाही. ब्लडी किलर...” दोन्ही हातांनी सचिनचे खांदे पकडत प्रधान म्हणाले, “कंट्रोल युअरसेल्फ सचिन. यू आर अ पुलीस ऑफीसर, नॉट अ सिव्हीलीयन...” सचिनला शांत करत सगळ्या गोष्टी नीट न्याहाळल्यावर प्रधान म्हणाले, “हम्म्म... इथे मृत्यू झालाय खरा, पण हा खून आहे की अपघात... इथे अजून काहीतरी नक्कीच घडलं आहे. आनंद, सचिन, आपण तिघं बाहेर जाऊन डॉ. विद्यानंदांना शोधू. डॉक, तुम्ही इथे थांबून काही समजतंय का बघा. लेट्स गो...”

सकाळचे आठ वाजले होते. जंगलापासून काही अंतरावर असलेल्या आणि शहरापासून जरा बाहेर असलेल्या एका बंगल्यात आशाताईंची नेहमीची धांदल सुरू होती. “प्रणव, अरे जाळं घेऊन काय करतो आहेस बागेत... शाळेत नाही का जायचं... लवकर आवर बघू... बस येईल आता... हे दोघे बाप-लेक एकाच माळेचे मणी... लेक हौस म्हणून किडे पकडतो तर हे त्यावर वेगवेगळे प्रयोग करत बसतात. माझी मात्र मधल्या मध्ये... अरे प्रणव चल की आता...” आशाताईंच्या बडबडीकडे प्रणवचं लक्षच नव्हतं. आपलं जाळं सरसावत तो बागेत काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने जाळ्यात काहीतरी पकडलं आणि लगेच ते काडेपेटीत भरून ठेवलं. चढलेल्या आवाजातली आईची हाक ऐकताच जाळं तिथेच टाकून प्रणव आत पळाला. “आई आई, आज मी काय पकडलं आहे बघ...” आवरता आवरता प्रणव म्हणाला, पण आशाताई ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्याच्या शर्टाची बटणं लावत म्हणाल्या, “आत्ता नाही प्रणव नंतर. तू आणि तुझे बाबा दोघंही सारखेच. बघ बस आलीच तुझी. चल लवकर आता...” गेटवर बसचा हॉर्न ऐकू आला तशा आशाताई प्रणवला खेचतच बसकडे नेऊ लागल्या. जाता जाता प्रणवने ती काडेपेटी दाराशेजारीच टेबलवर ठेवली. प्रणवला टाटा करून आत येताना आशाताई मनात म्हणत होत्या, “हे कुठे राहिले देव जाणे. आज तीन दिवस झालेत घरी आले नाहीत... त्यांना फोनच करते आता...” आशाताईंनी नंबर फिरवले पण एकही लागला नाही. फोन आपटत बोलत्या झाल्या, “कुठे राहिलेत कोण जाणे... निदान एक फोन तरी करायचा माणसाने... इथे माझ्या जिवाला घोर...” त्या मागे वळणार इतक्यात त्यांना ती काडेपेटी दिसली...

ती वर-खाली हलत होती. आशाताई विचार करू लागल्या, “इतक्या जोरात ही काडेपेटी हलते आहे म्हणजे यावेळी प्रणवने एखादा मोठा किडा पकडला की काय... प्रणव शाळेतून यायच्या आधीच याला सोडलेलं बरं. एका किड्याचा उच्छाद तरी कमी होईल...” विचार करत असतानाच त्यांनी ती हलणारी काडेपेटी उचलून उघडली आणि त्यांचे डोळे विस्फारले. काडेपेटी त्यांच्या हातून खाली पडली. त्यांना ओरडायचं होतं पण भितीने त्यांचा श्वासच अडकला होता. त्या मागे-मागे सरकत टेबलाजवळ आल्या आणि त्यांना भोवळ आली. टेबलाजवळच त्या बेशुद्ध पडल्या. काही क्षणात त्या शुद्धीवर आल्या. त्यांनी सभोवार पाहिलं आणि म्हणाल्या, “काय होतं ते... बहुतेक मला भास झाला असावा. नाहीतर असं कसं होईल...” बोलता बोलता त्या उठू लागल्या तर त्यांचा हात बाजूलाच पडलेल्या त्या काडेपेटीवर गेला. काडेपेटी उचलत त्या म्हणाल्या, “म्हणजे... तो भास नव्हता तर... मी खरंच ते पाहिलं का...” “हे खरं आहे आशा... तुला भास नाही झाला...” कानाशी येणारा हा एकदम बारीक आवाज ऐकून आशाताईंनी बाजूला पाहिलं तर एक मोठा डास त्यांच्या दृष्टीस पडला. त्याचं अर्ध शरीर डासाचं होतं आणि अर्ध माणसाचं. ते पाहून आशाताई पुन्हा घाबरल्या पण यावेळी हातांनी, दिसेल त्या वस्तूंनी त्या डासाला मारण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या. हल्ल्यांपासून बचाव करत तो डास कसाबसा उडत होता. जमिनीवर प्रणवचा खेळण्यातला लाऊड स्पीकर पडला होता. तो डास तिथे गेला आणि बोलता झाला, “आशा ऐक माझं... मी विद्यानंद आहे... नीट बघ माझ्याकडे...”

आशाताईंच्या कानी आवाज पडताच त्यांनी त्यांचे हात आवरते घेतले. कपाटातून भिंग काढत त्या जमिनीवर बसून भिंगातून डासाला पाहू लागल्या. नीट पाहिल्यावर त्यांना समजलं की त्या डासाचं अर्ध शरीर म्हणजे डॉ. विद्यानंद आहेत. त्या लगेच म्हणाल्या, “अहो तुम्ही... आणि हे काय होऊन बसलं तुम्हाला... तुम्ही असेच राहिलात तर कसं होणार आपलं... आणि प्रणव... प्रणवने तुम्हाला असं पाहिलं तर... काय करायचं हो आता...” त्यांना धीर देत डॉ. विद्यानंद म्हणाले, “शांत हो आशा. माझा प्रयोग फासल्याने हे असं झालं. पण माझा संपूर्ण मेंदू माझ्याकडे आहे. त्याच्याच शक्तीने मी हे पंख वापरून इथवर आलो आहे. पण डासांचे हे पाय आणि हे पंख हलवण्यासाठी मेंदूची खूप शक्ती खर्च होत आहे माझी. मला बोलतानाही त्रास होत आहे. आता तू एक काम कर, आज आपल्या नोकरांना सुट्टी दे. त्यांनी मला पाहून बाहेर सांगितलं तर शहरात गोंधळ माजेल आणि माझ्यासह कदाचित तुमचेही जीव धोक्यात येतील. तेव्हा नोकरांना सुट्टी दे आणि ताबडतोब पोलिसांना बोलावून घे. कारण तुझ्या एकटीने या पुढची कामं नाही होणार... पोलीस आले की माझ्यासोबत घडलेली हकीगत मी सर्वांना सांगेन... आणि पोलीसांना सांग, डॉ. विद्यानंदांनी बोलावलं आहे...” आशाताईंनी ताबडतोब पोलिसांना फोन लावला...

तिथे पोलीस चौकीत उमा तिच्या खुर्चीवर विचार करत बसली होती, “आनंद सर आणि सचिन काल संध्याकाळी जे गेले ते परतलेच नाहीत. आनंद सरांचा कॉल आला आणि प्रधान सर व डॉक्टरपण त्यांच्या मागावर गेले. मला का नाही नेलं सोबत. मीही काही करू शकले असते की...” फोनच्या रिंगने उमाची विचार मालिका भंगली. फोन घेत ती म्हणाली, “येस... एस.आय. उमा स्पिकिंग... कोण... हं, बोला... काय... आम्ही येतो लगेच...” फोन ठेवला आणि उमा म्हणाली, “डॉ. विद्यानंदानी त्यांच्या घरी बोलावलं आहे... काय भानगड असावी... त्यांच्या पत्नीचा आवाज घाबरल्यासारखा वाटत होता... काय प्रकार असेल... सरांना कळवणंच योग्य ठरेल...” विचार मनाशी पक्का करून तिने प्रधान साहेबांना फोन लावला, “सर आत्ता डॉ. विद्यानंदांच्या घरून फोन होता. हो डॉ. विद्यानंद... त्यांनी आपल्याला घरी बोलावलं आहे. नाही ते स्वत: बोलले नाहीत. त्यांच्या पत्नी होत्या फोनवर. सर आय थिंक प्रॉब्लेम इज सीरियस... ओके सर. मी निघते लगेच. आपण डॉ. विद्यानंदांच्या घरी भेटू...” फोन बंद झाला. तयारी करून उमा जीप घेऊन डॉ. विद्यानंदांकडे निघाली. चौकीपासून बरंच लांब त्या जंगलात...

प्रधान, आनंद आणि सचिन पिस्तुलं सरसावून वेगवेगळ्या दिशेला फिरत होते. झाडा-झुडुपातून वाट काढत असताना सचिन विचार करत होता, “जर या विद्यानंदने खरंच सुहासला मारलं असेल ना, तर ही विल पे फॉर इट...” दुसरीकडे आनंद म्हणत होता, “पूर्ण रात्र गेली आणि अजून डॉ. विद्यानंदाचाच काय, त्या आवाजाचाही पत्ता लागलेला नाही. जर डॉ. विद्यानंद सापडलेच तर त्यांना सचिनपासून लांब ठेवायला हवं. ही में लूज कंट्रोल...” तिथून जवळच प्रधानही फिरत असताना विचार करत होते, “काय प्रकार असावा हा... डॉ. विद्यानंद बेपत्ता आहेत. त्याच्या सहकाऱ्याचा त्यांच्याच लॅबमध्ये खून झाला आहे आणि आनंद व सचिनने ऐकलेला तो आवाज... काय गूढ असावं...” बोलत असतानाच वॉकीटॉकी बीब देऊ लागला. डॉ. गोखलेंनी तिघांनाही लॅबमध्ये परत बोलावलं होतं. तिघंही लॅबमध्ये परतल्यावर डॉ. गोखले म्हणाले, “प्रधान साहेब, या रिकाम्या बाटलीची चाचणी केली मी. यात एक डास होता. आकाराने मोठा असा हा डास या बाटलीतून कसा निसटला किंवा त्याचं काय झालं ते नाही सांगता येणार. आणि ही यंत्रणा...” डॉ. बोलत असतानाच प्रधानांचा फोन वाजला, “बोल उमा... काय... आर यू शुअर... ते स्वत: बोलत होते का... ओके, तू तिथे पोहोच आम्हीही येतोच...” फोन बंद झाला. सर्वांकडे वळत प्रधान म्हणाले, “डॉ. विद्यानंदांच्या घरून फोन होता. त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावलं आहे. डॉक. तुम्ही इथेच थांबा. काही लागलं तर आम्हाला कळवा. आनंद, सचिन, लेट्स गो...”

थोड्याच वेळात सीनियर इंस्पेक्टर प्रधानांची जीप डॉ. विद्यानंदांच्या बंगल्याच्या गेटजवळ आली. प्रधान, आनंद व सचिन उतरतच होते की समोरून उमा येताना त्यांना दिसली. सर्व जमल्यावर प्रधान म्हणाले, "बी केयरफूल एव्हरीवन. कीप युअर गन्स रेडी..." सर्वजण दारापर्यंत पोहोचले. प्रधानांनी बेल वाजवली. एका महिलेने दार किलकिलं केलं. आपलं आयडी कार्ड दाखवत प्रधान म्हणाले, "मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान आणि ही माझी टीम. आम्हाला फोन..." ते पुढे बोलणार इतक्यात त्या महिलेने दार उघडून सर्वांना आत घेतलं. "या प्रधान साहेब. तुमचीच वाट पाहत होतो. मला खात्री आहे तुम्ही मला यातून सोडवाल..." आत येत असताना अचानक हा आवाज आल्याने आणि समोर कोणी न दिसल्याने सर्वजण गोंधळले. इकडे-तिकडे पाहत असतानाच त्या महिलेने एका दिशेला बोट दाखवलं. सर्वांनी त्या दिशेला पाहिलं तर एका लाऊड स्पीकर जवळ एक किडा त्यांना दिसला. त्या महिलेने एक मॅग्निफाईंग ग्लास प्रधानांच्या हातात दिला. त्याच्या सहाय्याने प्रधानांनी पाहिलं आणि ते अवाक झाले...

त्यांनी इतरांना पहायला दिलं. सर्वांनाच धक्का बसला होता. लाऊड स्पीकरजवळचा तो किडा म्हणजे एक मोठा डास होता ज्याचा अर्धा भाग माणसाचा आणि अर्धा डासाचा. माणसाच्या अर्ध्या भागाचा चेहरा डॉ. विद्यानंदांसारखा दिसत होता. सर्वजण एकमेकांकडे पाहत असताना डॉ. विद्यानंद बोलते झाले, "बरं झालं सर तुम्ही आलात. मी तुम्हाला सर्व सांगतो... काही महिन्यांपूर्वी मनात विचार आला, की शरीरं बदलली की व्यक्तिमत्व बदलतात का... आणि प्रॉजेक्ट आयडेंटिटीचा जन्म झाला. शहरापासून दूर जंगलात असलेल्या प्रयोगशाळेत मी हा प्रॉजेक्ट करायचं ठरवलं. माझ्या अत्यंत विश्वासातल्या सुहासलाच हाताशी धरून मी काम सुरू केलं. या प्रॉजेक्टबद्दल मी माझ्या बायकोलाही काही सांगितलं नव्हतं. रोज सकाळी आम्ही तिथे जात असू आणि रात्री उशीरापर्यंत काम करत असू. कधीकधी तर दुसरा दिवस उजाडत असे आम्हाला निघायला. बरेच फॉर्म्यूले वापरून मी एक केमिकल तयार केलं. ते केमिकल वापरण्यासाठी एक शूटर गनही तयार केली. पहिला प्रयोग मी एका गुलाबाच्या कळीवर आणि एका सफरचंदावर केला...

दोन्ही गोष्टींवर मी गन चालवली आणि काही श्रणात मला समजलं की सफरचंदाची सालं गुलाबाच्या फुलाप्रमाणे उमलत आहेत आणि त्यातून गुलाबाचा सुगंधही येत आहे. दुसरीकडे गुलाबाची कळी एकदम कडक झाली होती. माझं प्रॉजेक्ट यशस्वी झालं होतं. आता वेळ होती सजीव, हलत्या प्राण्यांवर प्रयोग करण्याची. आम्ही दोघांनी ठरवलं, की तिथेच रहायचं आणि प्रॉजेक्ट यशस्वी करूनच बाहेर पडायचं. प्रयोगासाठी मी माझी निवड केली आणि दुसरं व्यक्तिमत्व कोण याचा विचार असताना आमची नजर कपाटाकडे गेली. माझ्या आधीच्या प्रयोगांसाठी आम्ही बरेच किटक जमा केले होते. त्यातल्याच एका माशीची मी निवड केली. माशीचा पिंजरा हातात घेऊन मी स्वतः मोठ्या पिंजऱ्यात बंदिस्त झालो. गन सुरू करणार इतक्यात, "सर... नको सर... हे बघा..." असं ओरडत सुहास माझ्याकडे धावत आला. कपाटाला त्याचा धक्का लागला आणि डासाचा पिंजरा खाली पडून उघडला. गन सुरू झाली आणि त्याच वेळी दार उघडून सुहास आत आला. या गोंधळात माशीचा पिंजरा माझ्या हातातच राहिला. हिरवी किरणं माझ्यावर आदळली आणि एक झटका लागला. पिंजरा हातून सुटला आणि गनवर आपटला. गनची दिशा बदलली आणि त्याच वेळी दुसऱ्या शॉटची किरणं त्यातून सुटली. माझ्या हाताचा धक्का सुहासला बसला आणि काच तोडून तोही कपाटावर आदळून खाली पडला. थरथरत्या हातांनी त्याने सफरचंदाकडे बोट दाखवलं...

मी तिथे पाहिलं तर अर्ध्याच सफरचंदात बदल झाला होता. अर्ध सफरचंद दिसत होतं तर अर्धा गुलाब दिसत होता. गुलाबाच्या बाबतीतही तसंच झालं होतं. मी तिकडे जाणार तोच माझ्या शरीराला अतीव वेदना जाणवू लागल्या. हळू हळू माझे पाय जड होऊन काळे पडू लागले. मदत मिळावी म्हणून मी कसाबसा बाहेर आलो आणि वेदनेमुळे माझी शुद्ध हरपली. काही वेळाने जाग आली तेव्हा मी पाहिलं तर माझं अर्ध शरीर एका डासासारखं दिसत होतं. त्याच वेळी एक सहा फुटी किडा उडताना मी पाहिला. कसाबसा उडणारा तो किडा म्हणजे एक मोठा डास होता आणि त्याचंही अर्ध शरीर बदललं होतं. मला समजलं, की माझा पूर्ण मेंदू या छोट्या शरीरात आला होता तर डासाचा मेंदू त्या मोठ्या शरीरात होता. आधीच डासांमुळे रोगराई पसरते. त्यातून जर डास इतका मोठा असेल तर किती हाहाकार माजेल या विचाराने माझा थरकाप उडाला. माझा मेंदू या शरीरात असल्याने मी स्वत:हून काही करण्यात असमर्थ आहे. मेंदूची शक्ती पणाला लावून मी हे पंख उडवले आणि कसातरी इथवर पोहोचलो आहे पण त्यामुळे माझ्या मेंदूवर प्रचंड ताण पडत आहे. प्रधान साहेब, आता तुम्ही थांबवू शकाल या संकटाला..."

डॉ. विद्यानंद बोलायचे थांबले. प्रधानांनी पाहिलं तर त्यांना धाप लागली होती आणि त्यांच्या नाकातून रक्त येत होतं. प्रधान बोलते झाले, "डॉक्टर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. एका फसलेल्या प्रयोगामुळे खूप मोठ्या संकटाला जन्म दिला आहे तुम्ही. तुमच्या उंचीचा तो डास ज्यात अर्ध शरीर तुमचं आहे, किती भयानक हानी पोहोचवू शकतो याची कल्पनाही करवत नाही. औषधांचा फवारा जर केला गेला तर डासासोबत तुमच्याही शरीराचं नुकसान होऊ शकतं. याला उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे तुमची शरीरं पूर्ववत करायची. पण कसं करायतं हे..." प्रधान विचार करतच होते की डॉ. विद्यानंद म्हणाले, "प्रधान साहेब, काहीतरी गडबड होऊ शकते याचा विचार मी आधीच केला होता. प्रयोगाचा परिणाम उलटवण्यासाठी मी दुसऱ्या एका केमिकलची निर्मिती केली होती. लॅबमधल्या कपाटात, एका काचेच्या बाटलीत ते निळं केमिकल ठेवलं आहे. प्रयोग फसल्यावर ते केमिकल वापरण्याची संधीच मला मिळाली नाही..." डॉ. विद्यानंद हे बोलतच होते, की प्रधानांचा फोन खणखणला...

"बोला डॉक... काय... एक सेकंद, मी स्पीकरवर टाकतो फोन... हं, बोला..." प्रधानांनी फोन स्पीकरवर टाकला आणि समोरून डॉ. गोखलेंचा आवाज आला, "प्रधान साहेब, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. डासासारखा दिसणारा एक प्रचंड मोठा किडा या लॅबमध्ये शिरला आहे. त्याचा अर्धा भाग माणसासारखा आहे. त्या किड्याने सगळ्या बाटल्या फोडून, इतर सर्व किड्यांना मोकळं करून लॅब काबीज केली आहे. मी पिस्तूल चालवणार होतो पण किड्यांच्या फौजेने तेही पाडलं माझ्या हातून. मी स्वत:ला कपाटात बंद करून घेतलं आहे. प्रधान साहेब तुम्ही लवकर या..." फोन हातात घेत प्रधान म्हणाले, "डॉक्टर, त्या किड्यात जो माणूस तुम्हाला दिसतोय ते डॉ. विद्यानंद आहेत. आम्ही ताबडतोब निघत आहेत. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा..." फोन कट करून आपल्या टीमकडे पाहत प्रधान म्हणाले, "लेट्स गो... आणि डॉ. विद्यानंदांनाही घ्या सोबत. बट केयरफूल... त्यांना काही इजा होता कामा नये..."

सर्वजण जंगलाकडे निघाले. एका छोट्या काचेच्या डबीत डॉ. विद्यानंद बसले होते. थोड्याच वेळात गाडी जंगलाच्या तोंडाजवळ पोहोचली. प्रधानांनी मागवलेली वाढीव कुमकही त्याचवेळी तिथे आली. प्रधानांनी डॉ. गोखलेंना मेसेज पाठवला, "वी आर हियर आँड विल बी कमिंग इनसाईड सून... होल्ड युअर पोझिशन..." मेसेज पाठवल्यावर सर्वांकडे पाहत कुजबुजत प्रधान म्हणाले, "फ्रेंड्स, यावेळी आपला शत्रू थोडा वेगळा आहे. कोणताही मनुष्यप्राणी नसून डास आणि इतर कीटकांची सेना आपल्यासमोर असेल. बी केयरफूल एव्हरीवन. या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा आणि वेगळा असा जो डास असेल त्याला जास्त इजा होणार नाही हे बघा, कारण त्यामुळे कदाचित डॉ. विद्यानंदांना प्रॉब्लेम होऊ शकतो. सचिन, तू एक तुकडी घेऊन या बाजूने जा. आनंद, एका तुकडीसोबत तू या बाजूने जा. मी समोरून आत शिरतो. उमा तू इथेच थांबून एग्झिट पॉईंट सांभाळ. हे दोघं तुझ्यासोबत असतील. अवर ओनली टास्क इज टू ब्रिंग द डेमॉन आँड डॉ. विद्यानंद टुगेदर इनसाईड द लॅब. लेट्स गो..."

डॉ. विद्यानंदांच्या प्रयोगांतून तयार झालेले ते किटक साध्या औषधांनी मरण्यासारखे नव्हते. त्यासाठी डॉ. विद्यानंदांनी तयार केलेलं केमिकलच वापरायला हवं होतं. त्यासाठी आधी लॅब घाठणं जास्त गरजेचं होतं. तीन दिशांनी तीन तुकड्या जंगलात शिरल्या. सगळे इतके आत गेले की रस्त्यावरचे लाईटही दिसेनासे झाले. प्रधान, आनंद, सचिन व उमा एकमेकांच्या संपर्कात होते. प्रधान म्हणाले, "व्ही आर मूव्हिंग स्विफ्टली. नो साईन ऑफ एक्सटर्नल मूव्हमेंट. कम इन आनंद... व्हॉट्स युअर पोझिशन..." आनंदचं उत्तर आलं, "मूव्हिंग अहेड. नो साईन ऑफ एनी ऑब्जेक्ट... कम इन सचिन..." सचिनने उत्तर दिलं, "देयर आर सम फ्लाईज, बट दे आर नॉर्मल... उमा व्हॉट अबाऊट यू..." उमा उत्तर देत म्हणाली, "ऑल क्लियर. एग्झिट पॉईंट इज कव्हर्ड. नो मूव्हमेंट सीन..." उमा बोलतच होती की "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." असा आवाज येऊ लागला. उमा म्हणाली, "वेट... समथिंग इज बिहाइंड द बुश..." उमाने वॉकी कमरेला लावला आणि पिस्तूल काढून झुडुपाकडे जाऊ लागली...

हवालदार उमासोबत होतेच. तिघंही झुडुपाजवळ पोहोचलेच होते की आवाज अजून तीव्र झाला. वॉकी चालू असल्याने प्रधान, आनंद आणि सचिनला काय चाललंय ते समजत होतं. अचानक सर्वांनी वर पाहण्यास सुरुवात केली. कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते. जवळ-जवळ सहा फुटी असलेला, अर्ध शरीर मानवाचं असलेला एक प्रचंड मोठा डास झुडुपामागून वर आला. त्याच्यासोबत इतर बरेच छोटे-मोठे किडे होते. त्या किड्यांनी तिघांवर हल्ला केला. बचावाखातर तिघांनी गोळीबार सुरू केला. पण विविध केमिकल प्राशन केलेल्या त्या किड्यांना काहीच फरक पडत नव्हता. किड्यांच्या त्या झुंडीने सर्वांना घेरलं आणि चाऊ लागले. विषारी किड्यांच्या डंखाने सर्वांच्या अंगावर जखमा झाल्या, फोड येऊन त्यांना वेदना होऊ लागल्या. हळू-हळू ते दोन्ही हवालदार बेशुद्ध पडले. उमा तिच्या परीने किड्यांना हटवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या मोठ्या किड्याने उमाच्या हातावर फटका मारला. तिचं पिस्तूल खाली पडलं. उमाने बाजूलाच पडलेला एक लाकडाचा ओंडका उचलला आणि त्या किड्याशी लढायला उभी राहिली. किड्याच्या चार पायांपुढे उमाचे दोन हात कमी पडले. किड्याने उमाला ढकललं. झाडावर आदळून उमाची शुद्ध हरपली. किड्याने आपल्या एका पायाच्या विळख्यात उमाला धरलं आणि वर उडून क्षणात जंगलात नाहीसा झाला...

तिथे जंगलात सर्वांनी गोळीबार आणि आरडा-ओरड ऐकली होती. प्रधान म्हणाले, “टीम काहीतरी गडबड आहे. कदाचित त्या मोठ्या किड्याने उमावर हल्ला केला असावा. व्ही मस्ट हेल्प हर...” इतकं म्हणण्याचा अवकाश, की चारी दिशांनी "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." असे आवाज येऊ लागले. एका बाजूने आनंद ओरडला, “दे आर कमिंग इन टंस...” सचिन दुसऱ्या बाजूने म्हणाला, “नो इफेक्ट ऑफ बुलेटस...” प्रधान आणि डॉ. विद्यानंद सर्व ऐकत होते. डॉ. विद्यानंदांच्या काचेच्या डबीजवळ एक माईक बसवला होता. ते म्हणाले, “प्रधानसाहेब. हे सर्व किडे माझ्या प्रयोगांमुळे विषारी बनले आहेत. त्यांना साध्या औषधांनी मारता येणार नाही. यांना पेसिफाय करायला मी आँटीडोट तयार करून ठेवला आहे. पण त्यासाठी आधी आपल्याला लॅब गाठायला हवी...” प्रधानांनी हे ऐकलं मात्र आणि सर्वांना सूचना देत ते म्हणाले, “एव्हरीवन मूव्ह फास्ट... व्ही नीड टू गेट टू द लॅब... आणि गोळ्या वाया घालवू नका. त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. लाकडाची फळकुटं, ओंडके यांचा उपयोग करा. मूव्ह... मूव्ह...” प्रधानांचे शब्द ऐकताच आनंद आणि सचिन आपापल्या तुकड्यांसह प्रयोगशाळेकडे धाव घेऊ लागले. प्रधानसुद्धा त्यांच्या तुकडीनिशी प्रयोगशाळा गाठण्यासाठी धडपडू लागले. सर्वांच्या मागून प्रचंड संख्येने लहान-मोठे कीटक उडत येताना दिसत होते. काही क्षणातच सर्वजण लॅबपर्यंत येऊन पोहोचले...

प्रयोगशाळेचं दार उघडंच होतं. सर्व तुकड्या दारातून आत शिरल्या आणि प्रधानांनी दार लावून घेतलं. आनंद, सचिन व इतर हवालदारांनी एकेक करून सर्व खिडक्याही बंद केल्या. थोडं स्थिरावल्यावर प्रधानांनी डॉ. गोखलेंना कॉल केला, "डॉक, आम्ही सर्व लॅबमध्ये आहोत. तुम्ही कुठे आहात..." पलिकडून डॉ. गोखलेंचा आवाज आला, "हॅलो प्रधानसाहेब, किड्यांनी प्रयोगशाळा काबीज केली आणि मी बेसमेंटमध्ये एका कपाटात स्वत:ला बंद करून घेतलं. कपाट आतून उघडता येत नाहीये. तुम्ही खाली येताना जरा जपून या. द इंसेक्ट्स आर एव्हरी व्हेयर..." फोन बंद झाला. प्रधानांसकट सर्वांनी सभोवार पाहिलं. वातावरण शांत होतं. सचिन म्हणाला, "येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता वाटते ही..." आनंद सर्वांकडे पाहत म्हणाला, "तुम्ही चौघं आमच्यासोबत खाली चला आणि बाकी इथेच थांबून नीट लक्ष ठेवा... लेट्स गो..." प्रधान, आनंद, सचिनसह इतर चार हवालदारांनी आपापल्या पिस्तुली तपासल्या आणि सर्व खाली जायला जिन्याजवळ आले. एकेक करून जिना उतरून सगळे खाली आले. प्रधानांनी खुणेनेच सर्वांना कोपऱ्यातल्या कपाटाचा इशारा केला. एकेक हवालदार मागे उभा राहत असताना सचिन, आनंदानी व प्रधान पुढे सरकले. प्रधानांच्या एका हातात ती काचेची डबी होती ज्यात डॉ. विद्यानंद होते. सचिनने हलकेच दार उघडलं आणि कोपऱ्यात खाली बसलेले डॉ. गोखले सर्वांना दिसले...

डॉ. गोखलेंनी सर्वांकडे पाहिलं. अंधुक प्रकाशात सी. इं. प्रधान त्यांना दिसले आणि त्यांच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. डॉ. गोखले बाहेर येत म्हणाले, “थँक गॉड, प्रधानसाहेब तुम्ही आलात. मला वाटलं आता इथून मी काही बाहेर पडणार नाही. त्या किड्यांनी प्रयोगशाळा काबीज केली आणि मी इथे लपून बसलो. पण प्रधानसाहेब, तुम्ही तिघंच... उमा कुठे आहे...” डॉ. गोखलेंच्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवत प्रधान म्हणाले, “तिच्याशी संपर्क तुटला. बहुतेक त्या राक्षसी डासाने तिच्या तुकडीवर हल्ला केला. ती सुखरूप असावी हीच आशा. पण डॉक, आपल्याला आता इथून निघायला हवं. आणि हो, डॉ. विद्यानंद, ते केमिकल कुठे आहे...” प्रधानांच्या हातात असलेली काचेची डबी डॉ. गोखलेंनी पाहिली आणि त्याही परिस्थितीत त्यांना अचंभा वाटला. डॉ. विद्यानंदानी त्यांचा हात कपाटाकडे नेला. डॉ. गोखले जिथे बसले होते तिथे बाजूलाच काचेच्या दोन बाटल्या ठेवल्या होत्या. डॉ. गोखलेंनी त्या बाटल्या उचलल्या. डॉ. विद्यानंद म्हणाले, “हे लाल केमिकल इतर सर्व किड्यांना मारण्याच्या कामी येईल आणि हे निळं केमिकल मला आणि त्या डासाला पूर्ववत करू शकेल...” डॉ. विद्यानंद बोलतच होते की, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." असे आवाज सर्वत्र घुमू लागले. पाठोपाठ वरच्या मजल्यावरून गन शॉट्स आणि उभ्या असलेल्या हवालदारांचे ही आवाज येऊ लागले. डॉ. गोखले म्हणाले, “हियर दे कम... मला वाटतं आपल्या कोंडीत पकडण्यासाठी या किड्यांनी तुम्हाला इथवर येऊ दिलं असावं. प्रधानसाहेब, हे लाल केमिकल या शॉव्हर गन्समध्ये भरा. हेच त्या किड्यांना संपवू शकतं...”

प्रधानांना तिथे असलेल्या तीन शॉव्हर गन्समध्ये ते लाल केमिकल भरलं. एक गन स्वत:कडे, एक आनंदकडे आणि एक सचिनकडे देत ते म्हणाले, “डॉक, तुम्ही डॉ. विद्यानंदांना सांभाळा. या निळ्या केमिकलची काळजी घ्या... टीम, आपण कोंडीत सापडलोच आहोत तर आता कोंडी फोडूनच टाकू. एव्हरीवन गेट रेडी...” प्रधान हे बोलतच होते की मोठ-मोठ्या किड्यांची झुंबड खोलीत शिरली. हवालदार गोळ्या झाडत होते पण काही उपयोग होत नव्हता. किडे ज्या हवालदाराला दंश करत होते तो तात्काळ खाली पडत होता. प्रधान, सचिन आणि आनंदने लगेच केमिकलचा फवारा केला. त्यासरशी काही किडे खाली पडले आणि राहिलेले किडे मागे हटले. हे पाहून या त्रिकुटाने फवारा करत एकेक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. किडे मागे हटत गेले. प्रधान, आनंद आणि सचिन वर आले. समोर निपचित पडलेले सर्व हवालदार पाहून तिघांनीही एकमेकांकडे पाहिलं. किडे मागे सरकत दाराबाहेर निघून गेले. प्रधान, आनंद आणि सचिनही त्यांच्या मागे धावत गेले. तिघंही प्रयोगशाळेबाहेर आले. प्रधान म्हणाले, “आनंद, सचिन. बी केयरफूल. डोंट फॉल अपार्ट. स्टे टुगेदर...” मग राहिलेल्या हवालदारांकडे पाहत ते म्हणाले, “आणि तुम्ही सर्वांनी ही नायलॉनची जाळी सांभाळा. आपल्याकडे कामिकल कमी आहे. त्या किड्यांना एकत्र करून मारलं तर जास्त फायद्याचं ठरेल. एव्हरीबडी क्लियर...” सर्वांनी होकारार्थी मान हलवली...

तिथे प्रयोगशाळेत डॉ. विद्यानंद डॉ. गोखलेंना म्हणाले, “डॉ. गोखले, हे सगळे परत येईपर्यंत आपण प्रयोगाची तयारी करू. आता मी सांगतो तसं करा. निळं केमिकल असलेली ती ट्यूब शूटर गनच्या त्या खाचेत बसवा आणि ते बटण दाबा. तसं केल्यावर ते केमिकल ट्यूबमधून निघून गनमध्ये उतरेल. एकदाच वापरल्या जाणाऱ्या या गनने फक्त दोनच शॉट्स फायर होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे फक्त एकच संधी आहे मला पूर्ववत करण्याची. आत्ता ही गन चालवली तरी दोन्ही शॉट्स वाया जातील, कारण बदलेली दोन्ही व्यक्तिमत्व समोर आली तरच त्याचा उपयोग होईल...” डॉ. गोखलेंनी डॉ. विद्यानंदांच्या सांगण्याप्रमाणे ती ट्यूब गनवर असलेल्या खाचेमध्ये बसवली. बटण दाबताच ते निळं केमिकल ट्यूबमधून सरकत खाली जाऊन दिसेनासं झालं. डॉ. गोखलेंनी, “द गन इज नाव लोडेड...” असं म्हणत डॉ. विद्यानंद बसले होते ती डबी उचलली. आतून डॉ. विद्यानंद म्हणाले, “इट इज रेडी टू फायर. आता सर्व प्रधानसाहेबांवर आहे. त्या डासाला इथे आणण्यात ते यशस्वी झाले तरच काहीतरी होऊ शकेल. तुम्ही त्यांना तसं कळवा डॉ. गोखले...” डॉ. गोखलेंनी होकारार्थी मान हलवली आणि प्रधानांना कॉल केला, “प्रधानसाहेब... आम्ही इथे शूटर गन तयार करून ठेवली आहे. तुम्ही त्या किड्याला इथे आणा. बेस्ट ऑफ लक...”

तिथे जंगलात आनंद, सचिन आणि प्रधान शॉव्हर गन्स घेऊन पुढे सरकत होते आणि नायलॉनची जाळी हातात घेऊन राहिलेले हवालदार त्यांच्या मागून जात होते. इतक्यात प्रधानांचा फोन व्हायब्रेट झाला, “बोला डॉक. ओके कॉपी...” फोन बंद करत प्रधान कुजबुजत म्हणाले, “डॉ. विद्यानंदांच्या सांगण्यानुसार डॉकने शूटर गन तयार केली आहे. तो किडा आपल्या हाती लागला की आपलं अर्धं काम झालं. बाकी डॉ. विद्यानंदांच्या केमिकल लोडेड शूटर गनवर आणि डॉकच्या निशाण्यावर...” प्रधान बोलतच होते, की, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." असा आवाज येऊ लागला. सर्वजण सज्ज झाले. आकाराने मोठ्या असलेल्या किड्यांची झुंड समोरून येताना दिसली. हवालदार चपळाई करून दोन झाडांच्या मागे लपले. झुंड हळूहळू पुढे सरकू लागली. प्रधान म्हणाले, “नोवन विल फायर. त्यांना अजून जवळ येऊ दे...” किड्यांची झुंड जवळ येताच प्रधानांनी आनंद आणि सचिनला इशारा केला. इशारा मिळताच आनंद आणि सचिन बाजूला सरकले. आता प्रधान, आनंद आणि सचिन तिघंही त्रिकोणात उभे राहिले. किडे टप्प्यात येताच, “फायर...” अशी ललकारी प्रधानांनी देताच तीनही बाजूंनी तिघांनी शॉव्हर गन्सने फायर केलं. टप्प्यात आले सर्व किडे एकामागून एक खाली पडत गेले. शेवटचा किडा पडला आणि आनंद म्हणाला, “नाव लेट्स हंट फॉर द डेमॉन...”

सर्वजण मोठ्या किड्याला शोधायला जाणार इतक्यात पुन्हा, "घोंऽऽऽऽ... घोंऽऽऽऽ..." असा आवाज येऊ लागला. सचिन इकडे-तिकडे पाहत म्हणाला, “आय थिंक दे आर कमिंग अगेन...” प्रधान थोडं पुढे जात म्हणाले, “पण हा आवाज बाकी आवाजांपेक्षा वेगळा आणि मोठा येत आहे...” सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. समोरच्या झाडामागे असलेल्या झुडुपातून हालचाल जाणवत होती. तिघंही पुढे सरकले. हवालदार नायलॉनची जाळी पकडून अजूनही झाडामागेच लपले होते. आवाज अचानक वाढला आणि झुडूपामागून तो सहा फुटी डास वर आला. तिघांनीही आपापल्या शॉव्हर गन्स उचलल्या खऱ्या पण दुसऱ्याच क्षणाला, “सर...” या हाकेने ते थांबले. त्यांनी पाहिलं तर त्या राक्षसी किड्याच्या एका पायाच्या विळख्यात उमा होती. किड्याच्या पायाला असलेल्या छोट्या-छोट्या काट्यांमुळे ती जखमी झाली होती. प्रधान म्हणाले, “नोबडी विल फायर... उमाला इजा होऊ शकते...” तिघांनीही आपापल्या गन्स खाली केल्या. तो प्रचंड डास कसाबसा उडत प्रयोगशाळेच्या विरुद्ध दिशेने पुढे जाऊ लागला...

डासाने सर्वांना ओलांडलं. पाठमोऱ्या जाणाऱ्या डासाला पाहून आनंद म्हणाला, “हा आपल्या आवाक्यात आहे. आता जर निसटला तर...” प्रधान त्याला उत्तर देत म्हणाले, “यू आर राईट आनंद, पण आत्ता उमाचा जीव धोक्यात आहे...” सचिन झाडामागून बाहेर आला आणि आपलं पिस्तूल काढून त्याने नेम धरला. प्रधानांनी त्याला इशाऱ्याने नकार देताच पिस्तूल आत ठेऊन मान खाली घालून सचिन उभा राहिला. काही क्षण गेले असतील, सचिनने पुन्हा मान वर केली. बुटात लपवलेल्या सुऱ्याला बाहेर काढून जराही उशीर न करता तो सुरा त्या किड्यावर भिरकावला. “सचिन नो...” या प्रधानांच्या ओरडण्याआधीच सचिनच्या हातून सुरा सुटला होता. किड्याकडे जाणाऱ्या सुऱ्याला सर्व पाहत होते. उमाला विळखा घातलेल्या किड्याच्या पायाचा सुऱ्याने अचूक वेध घेतला. एका झटक्यात किड्याचा तो पाय त्याच्या धडावेगळा झाला आणि उमा खाली कोसळली. खाली पडलेला पाय पाहिल्यावर त्या किड्याने सर्वांकडे पाहिलं. त्याच्या एका डोळ्यातले अंगार पाहून सर्वजण एक पाऊल मागे सरकले...

किडा पुन्हा उडायला लागल्याबरोबर प्रधान म्हणाले, “गुड वन सचिन... एव्हरीबडी सराउंड द इंसेक्ट... नायलॉनची जाळी टाका त्याच्यावर...” हे ऐकून सर्व हवालदार बाहेर आले आणि नायलॉनची जाळी त्या किड्यावर भिरकावली. जाळ्यात किडा अडकला आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा वेग मंदावल्याबरोबर प्रधान, आनंद आणि सचिनने जाळं पकडलं. आनंद हवालदारांकडे पाहत म्हणाला, “तुम्ही चौघं उमाला हॉस्पिटलला घेऊन जा. आम्ही याला बघतो. चारही हवालदार उमाकडे वळले. प्रधान, आनंद आणि सचिनने जाळं पकडलं आणि त्या तडफडणाऱ्या किड्याला खेचत प्रयोगशाळेकडे नेऊ लागले. प्रधानांनी डॉ. गोखलेंना कॉल लावला, “डॉक वी आर कमिंग इन. बी रेडी...” तिथे प्रयोगशाळेत डॉ. गोखेले सारखं घड्याळ पाहत येरझारा घालत होते. त्यांचा फोन खणखणला, “हां प्रधानसाहेब... ओके. वी आर रेडी...” फोन बंद करत ते डॉ. विद्यानंदांना म्हणाले, “तो किडा पकडला गेला आहे. तुम्ही तयार आहात ना...” डॉ. विद्यानंदांनी होकार दिला आणि दोघंही दाराकडे पाहू लागले...

थोड्याच वेळात दारातून प्रधान आत आले आणि पाठोपाठ जाळं हातात धरून आनंद आणि सचिनही शिरले. जाळ्यात तो किडा सारखा वळवळत होता. तिघांनी फरफटत जाळं काचेच्या पिंजऱ्याकडे नेलं. जाळं तिथेच ठेऊन तिघंही बाजूला झाले. बाजूलाच टेबलवर काचेच्या डबीशेजारी डॉ. विद्यानंद बसले होते. प्रधान, आनंद आणि सचिन काचेच्या पिंजऱ्याबाहेर पडताच आनंदने जाळ्यावर गोळी झाडली. जाळं तुटलं आणि किडा मोकळा सुटला. तो पुन्हा बाहेर पडणार इतक्यात प्रधान ओरडले, “डॉक, फायर नाव...” डॉ. गोखलेंनी गन चालवली. पहिला शॉट त्या किड्यावर बसला आणि दुसरा शॉट गनमधून निघणार इतक्यात डॉ. गोखलेंनी गन डॉ. विद्यानंदांकडे वळवली आणि निशाणा अचूक बसला. प्रखर असा निळा प्रकाश प्रयोगशाळेभर पसरला. काही क्षण सर्वांचे डोळे दिपले. थोड्या वेळाने सर्वांनी डोळे उघडले आणि एक डास उडत जाताना सर्वांना दिसला. आनंदने शॉव्हर गन त्यावर चालवली आणि तो डास खाली पडला. सगळ्यांनी काचेच्या पिंजऱ्याकडे पाहिलं, तर डॉ. विद्यानंद जमिनीवर पडले होते...

काही क्षणातच त्यांनी हालचाल केली. प्रधान आणि डॉ. गोखलेंनी धावत जाऊन त्यांना उठायला मदत केली. कसे-बसे उभे राहत डॉ. विद्यानंद म्हणाले, “धन्यवाद प्रधानसाहेब तुम्ही मोलाची मदत केलीत मला आणि डॉ. गोखले तुमचेही धन्यवाद. तुम्ही माझी मदत केलीत...” डॉ. विद्यानंदांच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, “डॉ. विद्यानंद, एका चुकीच्या प्रयोगाचा किती मोठा परिणाम झाला बघा... आता यापुढे प्रयोग करताना जरा सावध राहून करा...” प्रधानांशी हस्तांदोलन करत डॉ. विद्यानंद म्हणाले, “नक्कीच प्रधानसाहेब. आता करेन तो शेवटचा प्रयोग...” सर्वांच्या उंचावलेल्या भुवया पाहत डॉ. विद्यानंद म्हणाले, “माझं केमिकल प्राशन केलेल्या किड्यांनी ज्यांना ज्यांना दंश केला आहे त्यांच्यासाठी औषध नको का तयार करायला...” डॉ. विद्यानंदाच्या या वाक्यावर हास्याची छोटीशी फेरी झाली आणि सार्वजण प्रयोगशाळेबाहेर आले...

समाप्त.

Saturday, June 22, 2019

टिल्लू - भाग २...



मीनूच्या उत्तराने वरमलेला टिल्लू हलक्या आवाजात म्हणाला, "का गं मीनू, काय झालं. माझं काही चुकलं का... का मी दिसायला..." टिल्लूला मध्येच तोडत मीनू म्हणाली, "नाही टिल्लू, तसं नाही. तुझ्या दिसण्यामुळे नाही रे... खरंतर मीच लायक नाही तुझ्यासाठी. मी तुला फ........" मीनू बोलायची थांबली आणि मागे सरकत, "नाही टिल्लू, मी तुला सांगू शकत नाही. आता मला इथे राहता येणार नाही..." इतकं बोलून मीनूने पळायला सुरुवात केली. टिल्लूला मीनूचं हे वागणं खटकलं. तो तसाच तिला जाताना पाहू लागला. मीनूने नदी पार केली आणि पुढे जाऊ लागली. इतक्यात काही वटवागुळांनी तिच्यावर हल्ला केला आणि आपल्या तीक्ष्ण पंजात तिला पकून वरवर नेऊ लागले. मीनूच्या उत्तराने सुन्न झालेला टिल्लू, तिचा म्यावा ऐकून भानावर आला. त्याने वर पाहिलं तर चार वटवागुळं मीनूला पकडून हवेत उडत जात होती...

"मीनूऽऽऽऽऽ..." असं ओरडत टिल्लू त्या दिशेला धावू लागला. वटवागूळं झाडांच्या वर जाऊ लागली तसा टिल्लूही झाडावर चढला. एका फांदीवरून दुसरीवर उद्या मारत टिल्लू मिनूला वाचवण्यासाठी पळत होता. एक फांदी तुटली आणि टिल्लू झाडावरून खाली पडला तो थेट जमिनीवर. पुन्हा एकदा "मीनूऽऽऽऽऽ..." असा म्यावा टिल्लूने केला आणि ती वटवागूळं मीनुला घेऊन डोंगरापलिकडे दिसेनाशी झाली. टिल्लू कसाबसा गब्बू आजोबा राहत होते त्या झाडाखाली पोहोचला. दिवसभराचं काम उरकून सगळे तिथे गप्पा मारायला जमले होते. टिल्लूला उदास पाहून चिमणी आईने त्याला विचारलंच, “काय झालं रे टिल्लू, असा उदास का आहेस... आणि आपली मीनू कुठे आहे...” चिमणी आईच्या पंखाआड जाऊन टिल्लू रडू लागला. चिमणा बाबा त्याला थांबवणार तोच गब्बू आजोबा म्हणाले, “रडू दे त्याला. मन हलकं झालं की आपसूक थांबेल...” आणि तेच झालं. काही क्षण रडून झाल्यावर टिल्लूने त्याच्या पंजांनी डोळे पुसले आणि नदीकाठी घडलेली सर्व घटना सर्वांना सांगितली...

हे ऐकून सर्व सुन्न झाले. टिल्लू पुढे म्हणाला, “गब्बू आजोबा, मला मीनूला शोधायला जायचं आहे. आई, बाबा, मला मीनू खूप आवडते. माझ्यासमोर ती वटवागूळं मीनूला घेऊन गेली आणि मी काहीच करू शकलो नाही. आता ती संकटात असताना मी तिला वाचवायला जायला हवं. चिमणी आई चटकन म्हणाली, “नाही नाही. मी टिल्लूला कुठेच जाऊ द्यायची नाही. मीनूसुद्धा आपलीच आहे. तिच्याबद्दल मला वाईटच वाटतंय. पण तिला मदत करताना माझ्या टिल्लूला काही झालं तर... नाही नाही... मी नाही जाऊ देणार त्याला...” चिमणा तिला समजावत म्हणाला, “चिमणे, अगं आपला टिल्लू आता मोठा झाला आहे. स्वत:ला आणि मीनूला वाचवताना त्याने कशी हुशारी दाखवली ठाऊक आहे ना...” काही केल्या चिमणी आई ऐकत नव्हती. शेवटी टिल्लू म्हणाला, “आई, तुझी काळजी मला समजते. मी स्वत:ची काळजी घेईन. मला जाऊ दे...” शेवटी चिमणी आई तयार झाली. माकडी मावशी म्हणाली, “अरे पण टिल्लू, तू मीनूला शोधणार तरी कुठे...” “काऽऽऽऽऽव... काऽऽऽऽऽव...” या कर्कश आवाजाने सर्वांचं लक्ष त्या दिशेला गेलं...

झाडावर एक डोमकावळा बसला होता. सर्वांचं लक्ष आपल्याकडे आहे हे पाहून तो खाली आला. म्हणाला, “मी सांगतो तुम्हाला मीनू कुठे आहे ते... ती कालीपूरमध्ये आहे. महाराज कालीने तिला कैद करून ठेवलं आहे आणि उद्या तो तिला मारून टाकेल. कारण त्याला तिच्या कातड्याचा अंगरखा शिवायचा आहे...” हे ऐकून सर्वजण घाबरले. गब्बू आजोबा पुढे होत म्हणाले, “पण हे सगळं तुला कसं काय माहित...” तो डोमकावळा त्याची चोच खाली करत म्हणाला, “मीही कालीच्या सेनेत होतो...” हे ऐकताच टिल्लूचे सवंगडी लगेच म्हणाले, “याच्यावर विश्वास नका ठेऊ कोणी... कोणास ठाऊक हा खोटं बोलत असेल...” टिल्लू त्या डोमकावळ्याजवळ जात म्हणाला, “तू जर त्या कालीच्या सेनेत होतास तर आम्हाला मीनूबद्दल का कळवलंस... आणि मीनू इथे राहत होती हे तुला कसं माहित...” तो डोमकावळा म्हणाला, “बरोबर आहे तुम्हा सर्वांचं. मी कालीच्या सेनेत होतो. पण तो काली पक्का स्वार्थी निघाला. आपलं पोट भरण्यासाठी त्याने माझ्याच पिल्लांचा फडशा पाडला. माझी पिल्लं तर नाहीत, निदान मीनू तरी वाचावी असं मला वाटतं. आणि मीनूवर नजर ठेवण्याचं काम माझ्याकडेच होतं. या जंगलात तुमच्यासोबत राहताना मी तिला पाहिलं होतं. नदीकाठी मीनू एकटीच बसल्याची वार्ताही मीच कालीच्या वटवागुळांना दिली होती...”

तो डोमकावळा गप्प झाला. सर्वांना त्याच्याबद्दल संताप होता. पण त्याच्या पिल्लांबद्दल वाईटही वाटत होतं. टिल्लू, चिमणी आई आणि चिमणा बाबांकडे वळत म्हणाला, “आई, बाबा ऐकलंत ना... आपली मीनू संकटात आहे. मी लगेच निघतो तिला सोडवायला...” त्याच्या मागून येणाऱ्या त्याच्या सवंगड्यांना थांबवत टिल्लू म्हणाला, “आणि माझ्यासोबत कोणीही येणार नाही. नदीकाठी मीनूला मी वाचवू शकलो नाही. माझ्याचमुळे मीनू त्या वटवागुळांच्या तावडीत सापडली. आता मीच तिला सोडवून आणणार. कावळेदादा, मला तुझ्या पाठीवरून नेशील का कालीपुरात...” तो डोमकावळा लगेच तयार झाला. गब्बू आजोबा, माकडी मावशी, चिमणी आई आणि चिमणा बाबांचे आशीर्वाद घेऊन सर्वांना टाटा करत टिल्लू डोमकावळ्याच्या पाठीवर बसला. डोमकावळा आकाशात उडाला आणि काही क्षणातच नदीच्या दिशेने नाहीसा झाला. चिमणी आईने डोळे पुसले. माकडी मावशी तिला जवळ घेत म्हणाली, “काळजी करू नकोस चिमणे, आपला टिल्लू सुखरूप असेल हो...”

इकडे तो डोमकावळा जसा कालीपुराजवळ आला तसा त्याने उडण्याचा वेग कमी केला. हळू हळू खाली येत म्हणाला, “टिल्लू हे बघ कालीपूर. मीनूला नक्की कुठे कैद केलं आहे ते नाही माहित. मी तुला वेशीवर सोडतो. उगाच तुला कोणी माझ्यासोबत पाहिलं तय माझ्या कावळीचेही प्राण संकटात येतील...” टिल्लूने मानेनेच होकार दिला. कालीपूरच्या वेशीबाहेर त्या डोमकावळ्याने टिल्लूला उतरवलं. महालापर्यंत जाण्याचा मार्गही त्याला सांगितला आणि लगेच तिथून उडून गेला. सर्वांच्या नजरा चुकवत टिल्लू पुढे पुढे जाऊ लागला. ती घरं, ते रस्ते, यांबद्दल टिल्लूच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. तो विचार करू लागला, “हे सर्व ओळखीचं का वाटतंय... मी कधी इथे आलो होतो का... असं का वाटतंय की मी इथलाच आहे...” विचार करत करत टिल्लू चालत असताना अचानक कुठूनतरी काही वटवागुळं त्याच्यावर धाऊन आली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने टिल्लू गडबडला आणि वटवागुळांनी त्याला पकडलं. टिल्लू काही करण्याच्या आत वटवागुळं हवेत उडती झाली आणि महालाच्या दिशेने जाऊ लागली. काळे मनोरे, काळ्या खडकातून तयार झालेल्या भिंती, हे सर्व पाहून टिल्लू विचार करू लागला, “हे सगळं असंच होतं का... बहुतेक हे सगळंच वेगळं होतं. का मला सारखं वाटतंय, की मी इथलाच आहे...” वटवागुळांनी टिल्लूला जमिनीवर फेकलं आणि त्याची विचारमालिका खंडित झाली. टिल्लू महालात सर्वत्र नजर फिरवतच होता की, “हा...हा...हा... ये टिल्लू... आलास...” या आवाजाने तो चपापला...

टिल्लूने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तांबड्या डोळ्यांचा, काळा अंगरखा घातलेला, काळा मुकुट परिधान केलेला एक काळा-करडा बोका समोरून चालत येत होता. त्याला पाहताच टिल्लूने आपली नखं बाहेर काढली. वटवागुळं आणि इतर काळ्या बोक्यांनी लगेच टिल्लूला धरलं आणि पिंजऱ्यात डांबलं. पिंजऱ्याजवळ येत काली म्हणाला, “टिल्लू, तुला माहित आहे मी कोण ते... मी आहे काली. या कालीपूरचा राजा. आणि तू, माझ्या अनोख्या संग्रहालयातील एक वस्तू. अरे आकाराने इतका लहान तरीही इतका चपळ आणि हुशार बोका पाहिला नव्हता कोणी आजवर. माझ्या कावळ्यांनी नदीच्या पलिकडे तुला पाहिलं आणि लगेच मला वर्दी दिली. मी पाठवलेल्या बोक्यांना आणि वटवागुळांना तू पळवून लावलंस...” “पुढचं मी सांगू का महाराज...” कालीला मध्येच तोडत यवक्री म्हणाला. कालीची आज्ञा मिळताच तो पुढे बोलू लागला, “टिल्लू, मी यवक्री. महाराज कालीचा उजवा हात. महाराज तर सैन्य पाठवणार होते तुला आणायला. पण मीच म्हणालो त्यांना, की इतक्या लहान कामासाठी सैन्य कशाला... मोहिनीअस्त्राचा वापार करावा... आमचं मोहिनी अस्त्र पहायचं आहे तुला... ते बघ...”

यवक्रीने दाखवलेल्या दिशेला टिल्लूने पाहिलं तर बेड्यात जखडलेली मीनू त्याला दिसली. “मीनू...” असं ओरडत टिल्लू बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला पण पिंजरा चांगलाच मजबूत होता. काली पुढे म्हणाला, “या मीनूवर किती काळ डोळा होता माझा. हिला माझी राणी करून घेण्याचा विचार होता माझा. पण ही मस्तवाल मांजरी... मग तिच्या वडिलांना मी कैद केलं आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा मीनू लग्नाला तयार झाली. पण त्याआधीच तू पळवून लावलेले माझे बोके आणि वटवागुळं परत आली...” कालीला दुजोरा देत यवक्री म्हणाला, “आणि त्यानंतर याच मोहिनीअस्त्राचा वापर करायचं आम्ही ठरवलं. तुझ्यासमोर माझ्या काही वटवागुळांनी मीनूवर हल्ला केला. तू तिला वाचवलंस आणि तिच्या मायाजाळात अडकलास. काल नदीकाठी माझ्या वटवागुळांनी मीनूला पळवलं नाही, तर तुला इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि, तू इथे कसा आलास माहित आहे... ए कावळ्या... ये की आता बाहेर...” हे ऐकताच मगाचचा डोमकावळा बाहेर आला...

“काली महाराजांचा विजय असो...” हे शब्द ऐकताच टिल्लूने त्या दिशेला पाहिलं तर त्याला पाठीवरून इथवर घेऊन येणारा डोमकावळाच त्याच्यासमोर उभा होता. तो पुढे म्हणाला, “महाराज, तुम्ही आणि यवक्रीने सांगितलं तितका हा टिल्लू काही हुशार नाही... अहो मी मारलेल्या थापेवर चटकन विश्वास ठेवला की त्याने. अगदीच मूर्ख निघाला हो हा टिल्लू... हा...हा...हा...” सर्वजण हसू लागले. टिल्लूने मीनूकडे पाहिलं तशी मीनू म्हणाली, “टिल्लू, माफ कर रे मला. तुला दुखवायचा हेतू नव्हता पण या दुष्टाने माझ्या वडिलांना पकडून ठेवलं आणि मी... नदीकाठी तुला हे सांगावं की नाही याचाच विचार करत होते रे मी...” मीनूचा गळा आपल्या पंजांनी आवळत कालीने तिला गप्प केलं. टिल्लूकडे पाहून म्हणाला, “ मीनू, तुझा बाप वरच्या बुरुजावरून खाली पडून कधीच मेला. या टिल्लूला वाचवायला तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. टिल्लू, आता आजची रात्र आराम कर या पिंजऱ्यात. उद्या सकाळी लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज या इतर राज्यांच्या राजांसमोर आणि माझ्या मित्रांसमोर तुझ्यासह माझं अनोखं संग्रहालय पेश करेन आणि मग दिमाखात या मीनूशी विवाह करेन. आणि हो, उद्याच आम्ही सर्व मित्र मिळून सर्व जंगलं काबीज करण्यासाठी सैन्य पाठवू. मग ना तुझे ते सवंगडी राहतील आणि ना इतर कोणी प्राणी. सर्व जंगलांवर आमचंच राज्य असेल... हा...हा...हा... घेऊन जा रे याला आणि पिंजऱ्यासह कालकोठडीत डांबा...”

हे सर्व ऐकून टिल्लूचा राग मस्तकात जाऊ लागला. त्याच्या पंजांमधून धूर यायला लागला. तो पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची धडपड करू लागला. पण त्याला ते शक्य होत नव्हतं. पिंजरा कालकोठडीत ठेवला गेला. बाहेर पडण्यासाठी टिल्लूची धडपड सुरूच होती. “कोण... कोण आहे इथे... कालीचा नवा कैदी का...” या आवाजाने टिल्लूचं लक्ष विचलित झालं. त्याच्या पंजांमधून निघणारा धूर बंद झाला. टिल्लूने कान वळवले. आवाज आला त्या दिशेला टिल्लू जाऊ लागला. त्या कालकोठडीत अंधाराशिवाय दुसरं काहीच नव्हतं पण झारोख्यांमधून चंद्राच्या शीतल प्रकाशाचे छोटे छोटे कवडसे मात्र पडत होते. त्या प्रकाशात टिल्लूने पाहिलं, की एक म्हातारा बोका समोर साखळदंडांमध्ये जखडून उभा आहे आणि बाजूलाच तशाच साखळदंडांमध्ये जखडलेली एक म्हातारी मांजर बसली आहे. टिल्लूने स्वत:ची ओळख करून दिली आणि विचारलं, ”तुम्ही कोण आहात... आणि इथे या अवस्थेत कसे काय...” टिल्लू हा प्रश्न विचारात असतानाच त्या म्हाताऱ्या बोक्याचं लक्ष टिल्लूच्या कपाळाकडे गेलं. आपले मिचमिचे डोळे अजून उघडत त्याने टिल्लूच्या कपाळावरचं निशाण पाहिलं आनंदाने किंचाळलाच, “युवराज... आमचा युवराज... हे निशाण, हा आकार... मनीदेवी... मनीदेवी, उठा... पहा. आपला युवराज आला...”

हे ऐकून ती म्हातारी मांजरही उठून उभी राहिली. सळ्यांजवळ येत म्हणाली, “हो महाराज, आपला युवराजच... तेच निशाण, आणि विषामुळे लहान राहिलेला आकार...” टिल्लूला काहीच कळत नव्हतं. प्रश्नार्थक नजरेने समोर पाहत टिल्लूने विचारलं, “कोण युवराज... कोण मनीदेवी... काय बोलता आहात तुम्ही...” आपले साखळदंडातले पंजे कसेबसे टिल्लूच्या कपाळावर नेत तो म्हातारा बोका म्हणाला, “टिल्लू, मी बोकेश्वर आणि या मनीदेवी आणि तू आमचा युवराज. तुझ्या कपाळावर असलेलं हे चिन्ह त्याचा पुरावा आहे. तू खूपच लहान होतास जेव्हा मी तुला नदीत सोडून दिलं होतं...” मग बोकेश्वरांनी व मनीदेवीने सगळी हकीगत टिल्लूला सांगितली. टिल्लूच्या डोळ्यात पाणी तरारलं. सळ्यांजवळ येत तो म्हणाला, “म्हणजे... तुम्ही माझे आई-बाबा आहात...” दोघांनी मानेनेच होकार दिला. हळू हळू आनंदाची जागा क्रोधाने घेतली. टिल्लू म्हणाला, “आणि हा दुष्ट काली माझा मामा आहे तर... त्याच्याचमुळे आपल्यासर्वांची ही दशा झाली... सकाळी तो आणि त्याची मित्रराष्ट्र सर्व जंगलांवर हल्ला करण्याचा मनसूबा आखत आहेत... मी हे होऊ देणार नाही...”

टिल्लूच्या हातून पुन्हा धूर येऊ लागला. त्याचे डोळे लालेलाल झाले. कालीवरच्या रागाने त्याने पिंजऱ्याची लोखंडी सळई घट्ट पकडली. काही क्षणातच टिल्लूच्या पंजांनी आग पकडली आणि ती सळई वितळू लागली. टिल्लूने क्षणार्धात आपला पंजा मागे घेतला. त्याचं लक्ष विचलित झालं आणि पंजांवर असलेली आग व धूर नाहीसे झाले. टिल्लूला जळजळू लागलं आणि तो पंजे चाटू लागला. कालकोठडीच्या एका रक्षक बोक्याने सर्व ऐकलं. त्याला टिल्लू, बोकेश्वर आणि मनीदेवीच्या नात्याची कल्पना आली आणि तो लगेच कालीला ही खबर देण्यासाठी निघाला. काली त्याच्या कक्षात उभा राहून बाहेरचं जग पाहत असताना अचानक ढगांचा गडगडाट होऊन एक आवाज कालीच्या कानावर पडला, कालीने आकाशात पाहिलं तर ढगांमध्ये त्याला अस्वलेश्वर गुरुजींचा चेहरा दिसला. ते हसत म्हणाले, “तो दिवस आला आहे काली... तुझा कर्दनकाळ उद्या तुझा अंत करेल...” गडगडाट थांबला. अस्वलेश्वर गुरुजींचा चेहराही नाहीसा झाला आणि कालकोठडीचा रक्षक बोका समोर येत म्हणाला, “महाराजांचा विजय असो... महाराज, आपण संध्याकाळी पकडलेला तो छोटा बोका साधा नाही. त्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा पुत्र आणि राज्याचा युवराज आहे...”

काली हे ऐकतच होता की यवक्री दालनात येत म्हणाला, “महाराज, वाईट बातमी... त्या मीनूचा बाप मंगू, निसटला आपल्या तावडीतून...” काही क्षण शांततेत गेले आणि काली म्हणाला, “निसटला... जाऊ देत उद्याच्या आनंददायी सोहळ्यासाठी ही चूक आम्ही माफ करतो. तो मंगू अर्धमेलाच झालाय. जाऊन जाऊन जाईल कुठे... मरेलच थोड्या वेळात. त्याला मारण्याचे माझे कष्ट तरी वाचले. आणि यवक्री, तो टिल्लू म्हणजे युवराज आहे बरं का कधीकाळच्या मार्जारपूरचा... उद्या माझ्या सर्व शत्रूंना एकत्रच संपवतो. पुत्रासमोर त्याच्या माता-पित्याची हत्या आणि प्रजेसमोर त्यांच्या युवराजांची हत्या... काय दृश्य असेल ना... हा...हा...हा...” काली हसत असताना यवक्री म्हणाला, “महाराज, ते सर्व ठीक, पण बोकेश्वर, मनीदेवी आणि युवराजला पाहून प्रजेने विद्रोह केला तर... आपला डाव आपल्यावरच उलटायचा...” यवक्रीकडे शांत नजरेने पाहत काली म्हणाला, “तसं काही होणार नाही यवक्री. आणि झालंच तर... चाल माझ्यासोबत...” बोलता बोलता काली थांबला आणि यवक्रीला घेऊन तळघरात गेला. त्याने एक छोटं दार उघडलं आणि आत प्रवेश केला. यवक्री त्याच्या मागोमाग होताच. काली म्हणाला, “यवक्री, जर तू म्हणतोस तसं उद्या काही आपल्या विरोधात गेलंच तर हा आपली मदत करेल...” कालीने पंजा दाखवलेल्या दिशेला यवक्रीने पाहिलं आणि भीतीने त्याचे डोळे उघडेच राहिले...

समोर संपूर्ण दगडाचा आणि पर्वताएवढा मोठा किडा बसला होता. त्याचे डोळे बंद होते आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक खाच होती. त्या किड्याच्या बाजूलाच एक चमकणारा लाल मणी ठेवला होता. यवक्रीच्या खांद्यावर हात ठेवत काली म्हणाला, “यवक्री, उद्याच्या सोहळ्यात जर काही विघ्न आलंच, तर हा मणी त्या खाचेत घालून या राक्षसी किड्याला जागृत करू. मग हा किडा त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्वांचा चेंदामेंदा करेल. जोपर्यंत हा मणी त्याच्या कपाळावर असेल तोपर्यंत याला कोणी थांबवू शकणार नाही. तो मणी तुटताच हा किडा नष्ट होईल... तो एवढासा टिल्लू काय वाकडं करू शकणार आपलं... या राक्षसाच्या आणि माझ्या मित्रराष्ट्रांच्या मदतीने मी या जगावरच्या सगळ्या जंगलांवर राज्य करेन. हा...हा...हा...”

तिकडे कालीपूरपासून लांब, नदीपलिकडच्या जंगलात चिमणा-चिमणी, माकडी मावशी, गब्बू आजोबा आणि टिल्लूचे सवंगडी, असे सर्व टिल्लूच्या चिंतेत असतानाच, “म्या.... म्या....व.... म्या...” असा कहणण्याचा आवाज आला. सर्वजण आवाजाच्या दिशेला गेले तर एक जखमी बोका झाडाच्या खाली आला होता. सर्वांगाने रक्तबंबाळ झालेल्या त्या बोक्याला माकडी मावशीने झाडाला टेकवून बसवलं. गब्बू आजोबांनी जवळ जात त्याची विचारणा केली तेव्हा तो म्हणाला, “मी मंगू. त्या दुष्ट कालीला माझ्या मुलीशी, मीनूशी लग्न करायचं होतं. तिने नकार दिला. म्हणून त्याने मला कैद केलं आणि मीनूवर लग्नासाठी दबाव आणला. मीनूने त्याच्याशी लग्न करू नये म्हणून मी तिथून पळालो. त्या कालीचे काळे बोके आणि वटवागुळं माझ्या मागे लागली. मला चावलं, ओरबाडलं. पण मी तसाच पळत राहिलो आणि कसाबसा इथवर पोहोचलो. माझ्या... मी...नूला... वा...चवा हो...” बोलत असतानाच मंगूने डोळे मिटले. गब्बू आजोबांनी मंगूचा पंजा धरला आणि सर्वांकडे पाहत म्हणाले, “हा तर मेला. बहुतेक जखमा आणि थकव्यामुळे याने प्राण गमावले...” सर्वांनी मान खाली घातली. चिमणी म्हणाली, “म्हणजे, ती मीनू इथे आली ती... माझा टिल्लू... तरी मी सांगत होते सर्वांना... नका पाठवू टिल्लूला तिथे. पण कोणीच ऐकलं नाही माझं. आता मी नाही ऐकणार कोणाचं. मला जायचं आहे टिल्लूकडे आत्ताच्या आत्ता...” चिमणीला दुजोरा देत सर्वजण म्हणाले, “आम्हालाही टिल्लूची काळजी आहे. आम्हीही येणार तुझ्यासोबत. चला... सर्वजण लगेच निघू...”

सकाळ झाली. कालीच्या सांगण्यावरून संपूर्ण कालीपूर सजवलं गेलं होतं. महालाच्या टेकडीच्या खालीच असलेल्या पटांगणात सर्व प्रजेला बोलावलं गेलं होतं. महालातल्या सर्वांत ऊंच मनोऱ्यात काली त्याच्या जागेवर बसला होता. त्याच्याच बाजूला बेड्यांमध्ये अडकलेली मीनू खिन्न होऊन बसली होती. त्याचे सगळे मित्र, म्हणजे लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज त्यांच्या त्यांच्या स्थानांवर बसले होते. बोकेश्वर आणि मनीदेवीला बाजूच्याच मनोऱ्यात साखळदंडांमध्ये जखडून बसवलं होतं. सोहळा दिमाखात सुरू झाला. भाल्यांच्या टोकावर जमवलेल्या त्या प्रजेसमोर कालीने जमवलेले अदभूत प्राणी असलेले पिंजरे येत गेले आणि पुढे सरकत राहिले. शेवटचा पिंजरा टिल्लूचा होता. पिंजरा पटांगणात येताच आकाराने लहान असलेल्या त्या पांढऱ्या-नारंगी बोक्याला पाहून सर्वजण अवाक झाले. आवाजाच्या दिशेने कान हलवत टिल्लू पिंजऱ्यात तडफडत होता. टिल्लूचा पिंजरा पाहताच काली जागेवरून उठला आणि म्हणाला, “प्रजाजनहो, ही आहे माझ्या संग्रहालयातली सर्वात नवखी वस्तू. आणि बरं का, हा फक्त बोका नाही, तर तुमचा युवराज आहे. हो, तुमच्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा सुपुत्र...

हे ऐकताच सर्वजण उभे राहिले. एकमेकांकडे पाहत असतानाच मीनूला उठवत काली पुन्हा कडाडला, “ही तुमची भावी राणी आणि, हे बघा तुमचे बोकेश्वर आणि मनीदेवी...” कालीने पंजा डावीकडे नेला. पडदा बाजूला झाला आणि कालीच्या काळ्या बोक्यांच्या गराड्यात उभे असलेले बोकेश्वर आणि मनीदेवी सर्वांसमोर आले. त्यांना पाहून जनता खवळली. आपल्यामागे भाले घेऊन उभे असलेल्या कालीच्या बोक्यांना काहीजण मारू लागले तर काहीजण उड्या मारून मैदानात उतरले. हे सर्व पाहताच कालीने यवक्रीला इशारा केला. यवक्री लगेच तळघराकडे निघाला. प्रजेने विद्रोह केला होता. कालीचे काळे बोके आणि वटवागूळ सेना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. तिथे यवक्री तळघरात पोहोचला. त्याने मण्याला त्या किड्याच्या मस्तकावरच्या खाचेत बसवलं. प्रचंड गडगडाट झाला. त्या महाकाय किड्याने डोळे उघडले. किड्याने त्याचे दगडी पाय पसरले आणि तो उभा राहिला. पर्वतही लहान वाटेल इतका मोठा किडा आणि त्याचे जळत्या निखाऱ्यासारखे ते लालभडक डोळे पाहून यवक्री थोडा घाबरला. लगेच सावरत बाहेरच्या दिशेने पळाला. किड्याने यवक्रीला पाहिलं आणि वाटेतले दगड-धोंडे पायाखाली तुडवत तो यवक्रीच्या दिशेने जाऊ लागला...

यवक्री बाहेर आला. कालीच्या दिशेने पाहताच काली जोरात हसायला लागला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. “आणि आता या महासभेचं खास आकर्षण... माझा महाकाय अंगरक्षक...” असं म्हणत कालीने एका दिशेला पंजा केला. जमीन हादरू लागली आणि काही क्षणातच जमीन दुभंगली आणि सहा पाय असलेला, लालभडक डोळ्यांचा तो भीमकाय किडा सर्वांच्यासमोर आला. किड्याला पाहून सर्व घाबरले. किडा कालीच्या दिशेने येऊ लागला. आता तो कालीला पकडणार इतक्यात कालीने त्याच्या पंजावर असलेली एक कळ दाबली. त्यासरशी किडा थांबला. आपला पाय मागे घेत किडा वळला आणि बोकेश्वर व मनीदेवी ज्या मनोऱ्यात होते तिथे गेला. किड्याने मनोऱ्याला एक फटका मारला. मनोरा तुटू लागला. बोकेश्वर आणि मनीदेवी खाली पडत होते. कालीने पुन्हा पंजावरची कळ दाबली आणि किड्याने खाली पडणाऱ्या बोकेश्वर आणि मनीदेवीला त्याच्या एका पायात पडकलं. काली पिंजऱ्याकडे पाहत म्हणाला, “टिल्लू, हे बघ तुझे आई-बाबा... आता याच्याचकडून त्यांची माती-माती करवतो. कोण वाचवणार आता त्यांना. हा...हा...हा...”

काली बोलतच होता की अचानक अंधार झाला. गरुडावर बसलेले टिल्लूचे सवंगडी, माकडी मावशी, त्याच्यासोबत उडणारे अनेक पोपट, कबुतरं, चिमणे आणि चिमण्या यांच्या प्रचंड थव्यामुळे सूर्य झाकोळला गेला होता. गरुडांच्या पायात मोठे तर कबुतर आणि पोपटांच्या पायात लहान दगड होते. पटांगणावर येताच सर्वांनी दगड खाली सोडले. काळ्या बोक्यांवर आणि वटवागुळांवर ते दगड पडले. काही त्याचक्षणी गतप्राण झाले आणि काही मागे हटले. काही गरूड पुढे गेले आणि त्या राक्षसी किड्यावर त्यांनी दगड सोडले. अकस्मात हल्ला झाल्याने किडा गोंधळला. त्याने बोकेश्वर आणि मनीदेवीला जमिनीवर भिरकावलं. दोन गरूड लगेच खाली झेपावले आणि त्यांनी बोकेश्वर व मनीदेवीला झेलून सुखरूप जमिनीवर आणलं. हे पाहून काली आणि त्याचे मित्र म्हणजेच लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज मैदानात उतरले. सर्वजण गरूडसेनेवर तुटून पडले. भीषण युद्ध सुरू झालं...

गरुडाने काली बसला होता त्या मनोऱ्याकडे झेप घेतली. माकडी मावशी आणि टिल्लूच्या सवंगड्यांच्या एकत्रित ताकदीसमोर काळ्या बोक्याचं काहीच चाललं नाही. ते पळून गेले आणि मीनूला सोडवून सगळे लगेच खाली उतरले. मीनूला पटांगणाच्या एका बाजूला यवक्री दिसला. तिने आपल्या पंजांनी त्याला धरलं आणि त्याच्या मानेचा जोरदार चावा घेतला. मीनूच्या जबड्यात तडफडत यवक्रीने प्राण सोडले. यवक्रीची दशा पाहून काली खवळला. आपल्या मित्रांना घेऊन तो मीनूकडे झेपावला. दुसऱ्या बाजूला नागरिकांची पळापळ होत असताना चिमणा-चिमणी, पोपटराव आणि गरुडांनी पाहिलं तर मीनू आणि त्याच्या सवंगड्यांना काली आणि त्याच्या मित्रांनी घेराव घातला आहे. गरूड, पोपट, आणि कबुतरांनी लगेच तिथे धाव घेतली. लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज यांना गरूडसेनेने सळो की पळो करून सोडलं. काळ्या बोक्यांच्या सेनेला आणि वटवागुळांना कालीपूरच्या  प्रजेने, पोपटांनी आणि कबुतरांनी नामोहरम केलं. तो राक्षसमात्र काही केल्या थांबत नव्हता...

टिल्लू पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा आतोनात प्रयत्न करत असताना बोकेश्वर आणि मनीदेवी त्याच्याजवळ आले. बोकेश्वर म्हणाले, “युवराज, आपल्या क्रोधाला आपली शक्ती बनवा. बघा तो राक्षस सर्वांना किती त्रास देत आहे. आणि तो काली, ज्याच्यामुळे आपण दुरावलो. कालकोठडीतलं तुमचं ते रूप बाहेर येऊ द्या. मनोनिग्रह करा युवराज...” त्यांना दुजोरा देत मनीदेवी म्हणाल्या, “ऊठ टिल्लू, तुझ्यात अमोघ शक्ती आहे. त्याच्या जोरावर नष्ट कर त्या दुष्टांना...” टिल्लूने दोघांचे शब्द ऐकलेमात्र आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. क्रोधाचा लावा भडकला. टिल्लूच्या अंगातून धूर निघू लागला आणि क्षणार्धात त्याचं संपूर्ण शरीर आगीच्या ज्वाळांमध्ये घेरलं गेलं. टिल्लूने म्यावा केला पण बाकीच्यांना जणू सिंहगर्जनाच ऐकू आली. टिल्लूच्या शरीरातून निघणारी आग इतकी तीव्र होती की तो लोखंडी पिंजरा वितळून गेला. टिल्लू किड्याच्या दिशेने पळू लागला. त्याला जाणवलं की त्याचा आकार वाढतो आहे. किड्यापर्यंत पोहोचेपर्यंत टिल्लू त्या किड्याच्या आकाराइतकाच मोठा झाला होता. आपल्यासमोर आगीत घेरलेला हा प्रचंड प्राणी पाहून किड्याने इतर सर्वांना सोडून त्याच्याकडे आपले पाय वळवले. एका महा-द्वंद्वाला सुरुवात झाली...

किड्याचे सहा पाय तर टिल्लूचे दोन पंजे एकमेकांवर आदळत होते. किड्याच्या प्रत्येक वाराला टिल्लू परतवत होता. आपल्या एका पंजाने टिल्लू त्या किड्याचे पाय अडवत होता तर दुसऱ्याने त्याच्यावर वार करत होता. टिल्लूच्या अग्नीची झळ किड्याला लागत होती. किडा पूर्ण जोर लाऊन पुढे सरकला तशी टिल्लूने जमिनीवर घसरत त्याचे एकेक करत चार पाय तोडून टाकले. किडा कोलमडला आणि जमिनीवर आदळला. त्याने आपलं अजस्र तोंड उघडलं आणि त्यातूनसुद्धा आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. टिल्लूने त्याचे दोन्ही पंजे त्या किड्याच्या पोटात खुपसले खरे पण तरीही तो किडा अजून जिवंतच होता. मीनूला त्या किड्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक चकाकणारा खडा दिसला. मीनू लगेच ओरडली, “टिल्लू... तो खडा... त्या किड्याच्या मस्तकावर असलेला तो लाल खडा...” टिल्लूने ते ऐकलं. तो मणी टिल्लूला दिसला. टिल्लूने हवेत उडी घेतली आणि आपल्या पंजाच्या एकाच वाराने त्या किड्याच्या मस्तकावरचा मणी बाजूला केला. त्यासरशी त्या किड्याचे डोळे बंद झाले आणि किडा निपचित पडला. तो मणी जमिनीवर आदळून फुटला आणि त्याच क्षणी प्रचंड स्फोटानिशी तो किडा नष्ट झाला...

पटांगणात आता लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज, काळे बोके आणि वटवागूळ सेना, कोणी कोणी मागे नव्हते. गरूडराज, पोपटराव, कबुतर, बोकेश्वर, मनीदेवी, टिल्लूचे सवंगडी आणि मीनू यांच्या गराड्यात आता काली एकटाच राहिला होता. सभोवार नजर फिरवत असताना काली थोडा घाबरला होता पण लगेच उसने अवसान आणून म्हणाला, “मी एकटा राहिलो तरी माझे हे विषारी पंजे सर्वांना पुरून उरतील. या... करा वार... बघतोच एकेकाला...” हे ऐकून प्रचंड गर्जना करत टिल्लू म्हणाला, “नाही... या कालीला कोणीही हात लावणार नाही. हा माझा अपराधी आहे. याला मीच शिक्षा देणार...” हे बोलत असताना टिल्लूचा आकार परत लहान होत गेला. त्याच्या अंगातल्या ज्वाळा नाहीशा होत लुप्त झाल्या आणि टिल्लू पुन्हा पूर्ववत झाला. त्याला पाहून काली म्हणाला, “टिल्ल्या, तू आकाराने मोठा होतास तेव्हाच मला मारायला हवं होतंस. आता तुला क्षणार्धात मारून टाकतो बघ...”

काली टिल्लूवर धाऊन गेला. कालीच्या उजव्या विषारी पंजाला चुकवत टिल्लू त्याच्याशी लढत होता. कालीच्या पिळदार डाव्या पंजाचे वारही टिल्लूला चांगलेच लागत होते. त्याच्या अंगातून रक्त वाहू लागलं. कालीच्या प्रचंड ताकदीपुढे टिल्लूची ताकद कमी पडत होती. टिल्लूला थकवा जाणवू लागला. टिल्लूचं लक्ष विचलित झालेलं पाहून कालीने त्याच्यावर आपल्या उजव्या विषारी पंजाचा वार केला. टिल्लू घायाळ झाला आणि कोसळला. टिल्लू पडलेला पाहून चिमणी आणि मनीदेवी एकदम पुढे सरसावल्या. चिमणा म्हणाला, “थांबा, ही टिल्लूची लढाई आहे. त्याची त्यालाच लढायला हवी...” बोकेश्वर पुढे येत म्हणाले, “चिमणेराव म्हणत आहेत ते बरोबर आहे. युवराजांना लढू द्या स्वत:ची लढाई...” हळू हळू जमिनीवर पडलेल्या टिल्लूने डोळे किलकिले केले. त्याचं शरीर निळं पडत चाललं होतं. हे पाहून गरूडराज चटकन हवेत उडाले. तिथे टिल्लू उभा राहिला. विष पसरत चाललं होतं पण टिल्लू त्वेषाने पुढे झाला. कालीने पुन्हा वार केला. यावेळी टिल्लूने त्याच्या संपूर्ण ताकदीनिशी त्याचा उजवा पंजा रोखला आणि झाडाच्या दिशेने वळवला. पंजाची नखं झाडात रुतून तुटली. टिल्लूने त्याच्या अंगात असलेली शेवटची शक्ती पणाला लावली आणि आपल्या पंजांनी कालीवर वार केला. टिल्लूचा वार कालीच्या मानेवर बसला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कालीचा गळा कापला गेला आणि तो कोसळला. पटांगणातून सरपटत सिंहासनाकडे तो जाऊ लागला पण तिथे तो पोहोचू शकला नाही आणि वाटेतच गतप्राण झाला...

टिल्लूही जखमा सहन करू शकला नाही आणि तिथेच कोसळला. सर्वजण टिल्लूच्या भोवती जमा झाले. टिल्लूला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात गरूडराज एका सापाला घेऊन आला. मानेवर दहाचा आकडा असलेला फणा काढून तो नाग सर्वांकडे पाहत असताना गरूडराज म्हणाले, “नागराज... आमच्या टिल्लूला बरं करा हो...” नागराजांनी एकवार टिल्लूकडे पाहिलं आणि त्याच्या पावलावर चावा घेतला. थोड्याच वेळात नागराज बाजूला झाले. टिल्लूच्या शरीराचा निळा रंग उतरू लागला. हळू हळू टिल्लू शुद्धीवर आला. आपलं अंग झाडत तो उभा राहिला. मनीदेवी त्याला येऊन बिलगली. हमसून हमसून रडू लागली. बोकेश्वरांनीही टिल्लूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. टिल्लूसुद्धा दोघांच्या प्रेमाने भारावला होता. इतक्यात त्याची नजर चिमणा आणि चिमणीकडे गेली. त्याच्यासह गरूडराज, पोपटराव, कबुतर, सर्वांनी आपले पंख पसरवून टिल्लूला आशीर्वाद दिला आणि मागे वळले...

टिल्लू लगेच त्यांच्याजवळ जात म्हणाला, “हे काय आई-बाबा, तुम्ही कुठे निघालात... मला भेटलाही नाहीत तुम्ही...” माकडी मावशी त्याच्याजवळ येत म्हणाली, “आता तुम्ही युवराज आहात... खूप मोठे आहात... आता आम्ही तुमच्यासोबत नसलेलंच बरं नाही का...” टिल्लू माकडी मावशीच्या जवळ जात म्हणाला, “नाही मावशी, मी कितीही मोठा झालो तरी तुझा आणि तुम्हा सर्वांचा टिल्लूच आहे... नका ना जाऊ...” मनीदेवी सर्वांच्या जवळ येत म्हणाल्या, “बरोबर आहे टिल्लूचं. तो जितका आमचा आहे तितकाच तुमचाही आहे...” बोकेश्वर महाराजांनी त्याचक्षणी घोषणा केली, “आजपासून या कालीपूरचं नाव पुन्हा मार्जारपूर असेल आणि या प्रांतात असलेल्या सर्व जंगलांना आणि त्यातल्या प्राण्यांना आमच्याकडून अभय असेल...” हे ऐकून सर्वांना आनंद झाला. सर्व टाळ्या वाजवत असताना एका भिंतीआड लपलेली उदासवाणी मीनू चिमणीला दिसली...

तिला जवळ बोलवत चिमणीने तिचा पंजा टिल्लूच्या पंजावर ठेवला. त्यासरशी मीनू गोड लाजली. टिल्लूही हसला. मोठा सोहळा रंगला. मार्जारपूरचा युवराज म्हणून गब्बू आजोबांनी टिल्लूचा राज्याभिषेक तर केलाच शिवाय टिल्लू आणि मीनूचं थाटामाटात लग्नही लाऊन दिलं. सर्वत्र आनंदी आनंद पसरला आणि मार्जारपूर पुन्हा खुशाल झालं...

समाप्त.