Monday, January 25, 2021

Challenge -- दुसरा भाग...

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेत उल्लेख केलेल्या जागा आणि नावं जरी खरी असली तर त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही...

आधीच्या भागात आपण वाचलंत...

रसिकलाल त्याने घडवलेल्या हिऱ्याचं प्रदर्शन भरवतो. तिथे सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि त्यांची टिम आले असताना प्रधानांच्या जुन्या मित्राशी, मेजर विक्रम जोशींशी सर्वांची भेट होते. रसिकलाल त्यांचा हिरा सर्वांसमोर उघड करतात तेव्हा त्याच्या सुरक्षेविषयी प्रश्न उठवला जातो. रसिकलाल यांनी ठेवलेली आधुनिक पद्धतीची सुरक्षा व्यवस्था पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. दिवस संपल्यावर सुरक्षेबद्दल साशंक असलेले प्रधान आणि त्यांची टिम पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था नजरेखालून घालतात आणि खातरजमा झाल्यावर निघून जातात. दोन दिवसांनी अचानक प्रधानांना रसिकलालचा फोन येत, की त्यांचं घड्याळगायब आहे आणि त्यांच्या नोकाराचाही खून झाला आहे. सर्व तिथे पोहोचतात आणि रसिकलालसोबत आत जातात...
हॉलमध्ये सायरन वाजत असतात आणि हिरा चोरीला जाऊन तिथले पहारा देणारे सगळे रक्षक बेशुद्ध पडले असतात. रसिकलाल सायरन बंद करतो आणि हिरा चोरीला गेला या धक्क्याने तो बेशुद्ध पडतो. प्रधान त्याला हॉस्पिटलला पाठवतात आणि तपासादर्म्यान त्यांचा पहिला संशय रसिकलालच्या माणसावर, जॉनवर जातो. जॉनची चौकशी करत असताना तिथे मिळालेल्या एका वस्तूमुळे संशयाची सुई मेजर विक्रम जोशींवर जाते. प्रधान आणि त्यांची टिम मेजर जोशींच्या ठिकाणावर छापा मारायचं ठरवतात. आनंद आणि सचिन पुढे गेलेले असताना मेजर जोशी त्यांना अडकवतात त्यांचवेळी मेजर जोशींच्या हातावर फटका बसून त्यांची बंदूक खाली पडते आणि प्रधान समोर येतात...

दुसरा भाग...

प्रधान म्हणाले, "दॅट्स इट विक्रम, युअर प्लॅन फेल्स हियर... मला माहित होतं, तू माझ्या ऑफिसर्सना अडकवशील. म्हणून मी मागे राहिलो. मला तर विश्वासच बसत नाही. विकी, तुझ्यासारखा देशभक्त, जिगरबाज सैनिक आणि साध्या चोरीमध्ये गुंतावा... आय डिडनॉट एक्सपेक्ट धिस फ्रॉम यू... मी तुला काय समजत होतो आणि तू..." प्रधान पुढे काही बोलणार इतक्यात जोशी म्हणाले, "हो. मी चोरी केली. पण हे कृत्यही मी देशासाठीच केलं आहे. देशावर येणाऱ्या एका मोठ्या संकटाला थांबवण्यासाठी केलं आहे. हा हिरा नुसता खडा नसून एक ट्रिगर आहे न्यूट्रॉन बॉम्ब सुरू करण्याचा..." हे ऐकल्याबरोबर प्रधान आणि त्यांची टीम सुन्न झाले आणि मेजर जोशी पुढे बोलू लागले... "पायाला दुखापत झाल्यावर मला अॅक्टिव्ह फोर्समधून काढून आर्मी इंटेलिजन्समध्ये पोस्ट केलं गेलं. एक दिवस माझ्या हस्तकांकडून मला खबर मिळाली, की इस्तांबूलमध्ये एक श्रीमंत व्यापारी फरीद आला आहे. या फरीदचे फोटो जेव्हा मी पाहिले तेव्हाच या फरीदचं खरं रूप उघड झालं. हा फोटे बघा. कोण आहे हा ओळखता येतोय का..." सर्वांनी फोटो पाहिला आणि आनंद म्हणाला, "हा तर अंतरराष्ट्रीय दहशदवादी याकूब सईद आहे..." हे ऐकल्या ऐकल्या जोशी हसले आणि दुसरा फोटो दाखवत म्हणाले, "हा आहे इस्तांबूलचा व्यापारी फरीद..." फोटो पाहून सर्वजण विचारात पडले. फोटोकडे निरखून पाहत सचिन म्हणाला, "सर, या दोन्ही फोटोत डाव्या हाताकडे बघा... दोन्ही फोटोत डाव्या हाताला करंगळी नाहीये..." फोटोकडे पाहून सचिनकडे पाहत आनंद म्हणाला, "म्हणजे हा फरीदच..." "बुल्स आय सचिन अँड आनंद... बरोबर हेरलंत. हा फारीदच याकूब सईद आहे. हे समजल्यावर मी माझ्या हस्तकाला सईदवर पाळत ठेवायला सांगितली. माझा हस्तक सईदच्या घरात राहून त्याच्यावर नजर ठेवत होता. एक दिवस सईदचं हे संभाषण माझ्या हाती लागलं. तुम्ही सर्वजण ऐका..." जोशींनी टेप चालवली, "अब हिंदुस्तान रोएगा... इस बार मैं वह काम करूँगा, कि हिंदुस्तान के दिल की धड़कन बंद हो जाएगी | हज़ारों लोग अपने सरताज के साथ जहन्नुम में जाएँगे | हा...हा...हा..." टेप बंद करत जोशी म्हणाले, "हा माझ्या हस्तकाचा शेवटचा संदेश होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. माझ्या इतर हेरांकडून मला खबर मिळाली की सईदने एक न्यूट्रॉन बॉम्ब बनवला आहे आणि तो बॉम्ब भारतावर चालवण्याचा सईदचा मनसूबा आहे. न्यूट्रॉन बॉम्ब, हिंदुस्तान का सरताज, दिल की धड़कन आणि हज़ारों लोग, मला समजायला वेळ नाही लागला, की सईद नवी दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडविषयी बोलत होता... माझ्या माणसांनी सईदला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना वीरमरण आलं. सईदही तिथून गायब झाला. काही महिने शांततेत गेले. एक दिवस मला खबर मिळाली की न्यूट्रॉन बॉम्बला अॅक्टिव्हेट करणारी मायक्रो चिप एका हिऱ्यात बसवली आहे. त्या चिपची फ्रीक्वेंसीही माझ्या हाती लागली. त्यातच रसिकलालकडून त्याच्या नव्या हिऱ्याच्या प्रदर्शनाचं आमंत्रण मला मिळालं. रसिकलाल माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारलं. प्रदर्शनात आलो तर चिपची फ्रीक्वेंसी मॅच झाली. न्यूट्रॉन बॉम्बची चिप इथे कशी हा विचार करत असताना मला जाणवलं, की फ्रीक्वेंसी वेव्ह्स हिऱ्यातून येत आहेत. बॉम्बचा एक भाग या हिऱ्यात कसा आणि तो हिरा रसिकलालकडे कसा याचा विचार करत तुम्हा सर्वांशी बोलत होतो तेव्हाच तो वेटर मला धडकला. डाग साफ करताना त्याच्या डाव्या हाताला माझा स्पर्श झाला आणि माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला... तो वेटर दुसरा तिसरा कोणी नसून स्वत: याकूब सईद होता. सईदचं इथे असणं आणि चिपच्या ट्रांसमिशन वेव्ह्स इथे मिळणं यात नक्कीच कनेक्शन होतं. सईद हिरा चोरण्याच्या प्रयत्नात होता हे नक्की. तो हिरा सईदच्या हाती लागला असता तर दिल्लीवर न्यूट्रॉन बॉम्बचा हल्ला झाला असता. म्हणून मीच तो हिरा चोरण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी तिथले बारकावे जाणून घेणं गरजेचं होतं. तिथेच हॉलमध्ये मी छुपा कॅमेरा सेट केला आणि हॉलपासून जरा लांब माझ्या गाडीत बसून पाळत ठेऊ लागलो. हॉल रिकामा झाल्यावर तुम्ही सगळे परतलात. सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केलीत आणि निघून गेलात. तुमच्या पाहणीगणिक मी माझा प्लॅन बनवू लागलो. समोरून किंवा जमिनीखालून हिरा चोरणं शक्य नव्हतं. म्हणून छतावरून चोरी करायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी प्रदर्शन सुरू असतानाच मला हॉलमधून अजून काही आवाज आले... कॅमेऱ्यासमोर दोघं उभे होते. पहिला वेटर झालेला याकूब होता, दुसरा कदाचित त्याचा माणूस असेल. तो माणूस कुजबुजत म्हणाला, "जनाब, इस हिरे के लिए तो काफी इंतज़ामात हैं | हम इसे चुराएँगे कैसे..?" इकडे-तिकडे पाहत सईद म्हणाला, "इसकी नौबत ही नहीं आती अगर जहाज़ में तूने अपना बॅग ठीक से सँभाला होता. तूने हिरेवाला बॅग खो दिया और वही बॅग उस रसिकलाल के हाथ लग गया | मुझे लगा वह रसिकलाल बॅग और हिरा दोनों पुलीस को दे देगा और मेरा प्लॅन फेल हो जाएगा | लेकिन उस लालची ने हिरा अपने ही पास रख लिया और नुमाइश के लिये रखा | ठिक है रसिकलाल, कर ले अपनी तमन्ना पूरी | तीसरी रात को तेरे ही हाथों से हिरा छीनकर तुझे जहन्नूम भेज दूँगा..." तो माणूस नजर फिरवत पुन्हा म्हणाला, "और जनाब, उस प्रधान का क्या करें..! जिसने पिछले साल मुंबई की परेड़ के दौरान आपके भाईजान को..." त्याच्या खांद्यावर हात ठेवत सईद म्हणाला, "इंतक़ाम तो लेना ही है | उस प्रधान को देखकर मेरा भी ख़ून ख़ौल रहा था | लेकिन हमारा मक़सद ज़्यादा ज़रूरी है | सबको ख़बर कर दो | परसौं हम हिरा ले उड़ेंगे और २६ को हम वहाँ होंगे जहाँ अपने मक़सद को अंजाम देंगे |" त्याचवेळी हे सगळं तुम्हाला सांगावं असं मला वाटत होतं. पण सईदने किती माणसं कुठे पेरली आहेत याची काहीच कल्पना नव्हती. रसिकलालला कळवलं असतं तर त्याने प्रदर्शन बंद केलं असतं आणि सईद सावध झाला असता. हॉल गजबजलेल्या जागेत असल्याने कदाचित सामान्यांच्या जिवाशीही खेळ झाला असता. म्हणून मी शांत राहिलो. माझ्या तीन भरवशाच्या साथिदारांना हाताशी धरून हिरा चोरण्याचा प्लॅन बनवला. हॉलच्या एका बाजूला लायब्ररीची मारत तर दुसऱ्या बाजूला अर्धवट बांधकाम झालेली इमारत होती. दोन्ही इमारतींना तार बांधून मोटरच्या सहाय्याने त्यावरून सरकत मी आणि माझा साथिदार हॉलच्या छतावर उतरलो. काही कौलं बाजूला करून सिंमेंटच्या भिंतीला व्हॅक्यूम कप्स लावले. भिंतीला गोलाकार छिद्र पाडून व्हॅक्यूम कप्सना लावलेल्या तारांनी तो पूर्ण सिमेंटचा गोलाकार भाग खेचून वर काढला. बेशुद्ध करणारा वायू आत सोडून पहारेकऱ्यांना झोपवलं. मग माझा सहकारी सस्पेंशन कॉर्डच्या सहाय्याने छिद्रातून खाली उतरला... हिरा घेऊन पुन्हा त्याच कॉर्डच्या सहाय्याने वर आला. छतावर कॉर्डचा हुक काढताना तो खाली पडला. अलार्म सुरू झाले आणि लोखंडी खांब वर येऊ लागले. आम्ही थोडे गडबडलो पण लगेच सावरलो. सोबत आणलेलं गोल आकाराचं एक कव्हर तिथे बसवलं आणि कप्स काढून, मोटर सुरू करून तिथून निघून गेलो. ती चिप जोवर बॉम्बला लागत नाही तोवर बॉम्ब काही कामाचा नाही, हा विचार करून तो हिरा दुसऱ्या दिवशी तुमच्या स्वाधीन करायचा हा माझा विचार होता. पण आमच्यातल्याच एकाने हिऱ्यासाठी आमचा विश्वासघात केला आणि आमच्या हातून तो मारला गेला. आता पुढे काय करावं याचा विचार करत होतो की तुम्ही सगळे आलात..." जोशी बोलायचे थांबले. हे सर्व ऐकून सगळे सुन्न झाले होते. प्रधान म्हणाले, "विकी, आय अॅम विथ यू. ती चिप माझ्याकडे..." प्रधान बोलतच होते की त्यांचा आणि आनंद, दोघांचाही फोन वाजला... त्याचवेळी बंगल्याबाहेर हालचाल होत होती. झाडा-झुडुपातून, कुंपणावरून अनेक बंदुकधारी बंगल्याकडे येत होते. तिथे बंगल्यात प्रधान म्हणाले, "डॉ. गोखलेंचा फोन होता. गिरीचं पोस्ट मॉर्टेम करताना त्यांना समजलं की गिरीच्या चेहेऱ्यावर एक मुखवटा चढवला होता. मेलेला माणूस गिरी नसून खरा रसिकलाल होता..." हे ऐकत असतानाच आनंद म्हणाला, "सर, रसिकलाल हॉस्पिटलमधून पळाला..." सर्वजण विचारात पडले. जोशी म्हणाले, "गिरीचं खरा रसिकलाल असणं आणि होस्पिटलमधून रसिकलालचं निसटणं, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या वाटतात. पळून गेलेला रसिकलाल, खरा याकूब सईद तर नसेल..." "सही पहचाना तुम लोगों ने..." सर्वजण बोलत असताना आलेल्या या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. हातात मशीनगन घेतलेला आणि चेहेऱ्यावर मास्क घातलेला एक माणूस समोर उभा होता. प्रधानांच्या टिमने आणि जोशींच्या टिमने आपापल्या बंदुका समोर करताच दार-खिडक्या तोडून चेहेरे झाकलेल्या बंदुकधारी माणसांची फौजच आत शिरली. सर्वांना गराडा घातल्यावर आणि त्यांच्या हातातल्या बंदुका घेतल्यावर त्या माणसाने जोशींच्या हातून तो हिरा खेचून घेतला. आपल्या चेहेऱ्यावरचा मास्क दूर करत तो बोलू लागला, "तुम लोगों की अक़्ल की दाद देता हूँ | हां... मैं याक़ूब सईद हूँ | तुम्हारा दुश्मन, तुम्हारे हिंदुस्तान का दुश्मन | जानना नहीं चाहोगे मैं यहाँ कैसे पहुँचा... तुम बेवक़ूफ़ हिंदुस्तानी मुझे पकड़ने की फ़िराक़ में यह भूल गये कि मैं हमेशा तुमसे एक क़दम आगे था | प्रधान, हॉल के अंदर तुझे देखकर मुझे मेरे भाईजान की याद आई, लेकिन मेरा मक़सद ज्यादा ज़रूरी था | बम के हर पुर्ज़े को अलग अलग कर मैंने हिंदुस्तान भेज दिया | बम में लगनेवाली चिप हिरे में छुपाकर बड़े ऐतियात से मैंने मेरे आदमी के हाथ भेजा | लेकिन उस बेवक़ूफ़ ने पानी के जहाज़ से निकलते हुए हिरा रखा बॅग खो दिया | वही बॅग जहाज़ में सफर कर रहे रसिकलाल के हाथ लगा | मेरा हिरा हथियाने की सज़ा तो उस रसिकलालने अपनी जान देकर चुका दी | मैंने सोचा उसके क़त्ल के केस में तुम उलझे रहोगे और मैं हिरा लेकर निकल जाऊँगा | लेकिन यह मेजर मुझसे तेज़ निकला | हिरा गायब हुआ देख मेरे होश उड़ गये | प्रधान, तू हिरा ढूँढ़ लेगा इसका यक़ीन था मुझे | इसलिए मैने तुझपर मायक्रो ट्रांसमीटर लगा दिया | अब हिरा भी मेरे हाथ में है और तुझसे बदला लेने का मौक़ा भी | बाँध दो इन सब को और इनके चारों तरफ बम बिछा दो |" प्रधानांच्या टीमला आणि जोशींच्या टीमला तिथेच बांधून सर्व बंदुकधारी बाहेर पडले | याकूब सईद जोरजोरात हसत म्हणाला, "हा...हा...हा... प्रधान, अब सितारों में बैठकर दिल दहला देनेवाले नज़ारे देखना... ख़ुदा हाफ़ीज़..." बोलत असतानाच सईदने हातातल्या रिमोटचं बटण दाबलं आणि प्रचंड स्फोट झाले. संपूर्ण बंगल्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या... आज, दिनांक २६ राजपथ, नवी दिल्ली... प्रजासत्ताक दिनाची परेड सुरु झाली. राजपथवर अमर ज्योतीला मानवंदना देऊन पंतप्रधान स्थानापन्न झाले. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आणि पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा गौरव करण्यात आला. प्रेक्षकांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. तिरंगे फडकावले जात होते. बोचणाऱ्या थंडीतही प्रजासत्ताक दिनाची ती दैदिप्यमान परेड पाहण्यासाठी हजारो लोकांनी हजेरी लावली होती. त्याच परेडमध्ये काही चेहेरे संशयितरित्या वावरत होते. त्यातला एक होता सईद आणि बाकी त्याचे हस्तक होते. काही क्षणातच राजपथवर ती दिमाखदार परेड सुरु झाली. सईदसह सर्वांनी आपापली घड्याळं तपासली. सईदने एकाला इशारा केला आणि तो माणूस तिथून सटकत प्रेक्षकांपासून लांब झाला. इतक्यात एक गोळी येऊन त्या माणसाच्या छातीत बसली. तो माणूस खाली पडणार इतक्यात कोणीतरी त्याला धरून खुर्चीत बसवलं... सईदने त्या माणसाला पाहिलं आणि तो काहीच हालचाल न करता खुर्चीत बसला आहे हे पाहून सईदला आश्चर्य वाटलं. सईद त्याच्याजवळ गेला आणि त्याला धक्का बसला. तो माणूस मेला होता. सईदने सगळीकडे पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही. दुसऱ्या एका खांबाजवळ सईदचा अजून एक माणूस तसाच उभा होता. सईद त्याच्याजवळ पोहोचला तर त्यालाही गोळी लागली होती. सईदला अजूनही कोणीच दिसत नव्हतं. त्याने लगेच आपल्या सर्व माणसांना इशारा दिला. राजपथावरून येणाऱ्या प्रत्येक राज्याचं खास आकर्षण दाखवणाऱ्या ट्रक्समधून धडाधड बंदुकधारी अतिरेकी बाहेर पडले आणि बेछूट गोळीबार करू लागले. सर्वत्र पळापळ झाली. गोळीबार होत असतानाच प्रेक्षकांमधून मेजर विक्रम जोशी, त्यांचे दोन साथीदार, सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि त्यांची टीम बाहेर पडले आणि अतिरेक्यांवर प्रतिउत्तरादाखल गोळीबार करू लागले... जनतेच्या गोंधळामुळे आणि अतिरेकी ट्रक्समध्ये लपल्याने अतिरेक्यांना टिपणं प्रधान व जोशींना अवघड जात होतं. प्रधान म्हणाले, “विकी, कान्ट एम यार...” मेजर जोशी हसले आणि म्हणाले, “जस्ट अ सेक...” आणि आपलं घड्याळ तोंडाजवळ आणत म्हणाले, “ईगल्स, ओपन अप...” हे बोलताच आकाशाच्या दिशेने काहीतरी येऊन एका ट्रकवर आदळलं. मोठ्या स्फोटानिशी ट्रक हवेत उडून खाली कोसळला. त्यासरशी सर्व ट्रक जागीच थांबले आणि सर्वजण आकाशाकडे पाहू लागले. लढाऊ विमानांचा एक ताफा आकाशात घुटमळत होता. सर्व अतिरेकी आकाशाच्या दिशेने गोळीबार करू लागले. विमानांनी एकेका ट्रकचा वेध घ्यायला सुरुवात केली. काही क्षणातच सगळे ट्रक जाळून बेचिराख झाले. त्याचवेळी सईदने एका ट्रकवर उडी मारली आणि ट्रक घेऊन थेट पंतप्रधानांच्या दिशेने जाऊ लागला. आगीचे गोळे चुकवत तो ट्रक पुढे पुढे जात होता. प्रधान म्हणाले, “विकी, त्या ट्रकमध्ये न्यूट्रॉन बॉम्ब असू शकतो... होल्ड युअर ईगल्स...” मेजर जोशींनी लगेच आपल्या घड्याळाकडे पाहत आदेश दिले, “नो फायरिंग... मिशन अकमप्लीश्ड...” विमानं मागे वळली आणि मेजर जोशी व प्रधान ट्रकच्या मागे जाऊ लागले. ट्रकबाहेर येऊन सईद म्हणाला, “कुछ नहीं कर सकते तुम लोग... अब तुम भी तुम्हारे सरताज के साथ मारोगे... हा...हा...हा...” बोलता बोलता त्याने ट्रकवरचं कव्हर बाजूला केलं आणि आपल्या जवळची चिप तिथे असलेल्या खाचेत सरकवली. डोळे बंद करून सईद “जन्नत-ए-जिहाद...” ओरडला खरा, पण तेवढ्यात आनंदने ट्रकचा ताबा मिळवला आणि ट्रक थांबवला. पंतप्रधान ज्या व्यासपिठावर बसले होते तिथे पायथ्याशी येऊन ट्रक थांबला. सईदने डोळे उघडले तर बॉम्ब तसाच होता. सईदला काहीच समजत नव्हतं. तेव्हा प्रधान म्हणाले, “सईद... तुम्हारा खेल अब खत्म होता है... लेकीन पहले जान तो लो कि हम यहां कैसे... वहां बंगले में हम सब तो अंदर थे, लेकीन हमारी साथी उमा बाहर थी | तुम सबके बाहर जाते ही वह अंदर आई और उसने हम सबको छुडा लिया | तुम्हारे बटन दबाने से पहले हम खिडकी से कूद गये थे | हम तुझे वहीं खत्म कर सकते थे, लेकिन इस बम को हासिल करना भी जरूरी था | सो लो, हम सब तुम्हारे सामने है | बंगले के अंदर जब हमें ट्रांसमीटर का पता चला, तब कुछ ना बोलते हुए हमने हिरे से चिप निकाल ली और हमारे ट्रान्समीटर की चिप वहां लगा दी | जो चिप तूने बॉम्ब में लगाई वह हमारा ट्रान्समीटर था, जिसका पिछा करते हम तुझतक पहुंचे |” हे सर्व ऐकून सईदला राग अनावर झाला आणि त्याने मशीन गन काढली आणि म्हणाला, “मेरे भाईजान का मकसद भी तूने नाकाम किया था | अब मै तेरे साथ सबको मार डालूंगा |” हे म्हणत सईदने मशीन गन पंतप्रधानांवर रोखली. तेवढ्यात मेजर जोशी, त्यांचे साथीदार, प्रधान आणि त्यांच्या टिमने सईदवर गोळ्यांचा वर्षाव केला. सईद मारला गेला. पंतप्रधानांनी सर्वांना सेल्यूट करत तिरंगा फडकवला आणि तिथे उपस्थित सर्वांनीच तिरंग्याला मानवंदना दिली... जय हिंद... @ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, January 23, 2021

Challenge -- पहिला भाग...

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेत उल्लेख केलेल्या जागा आणि नावं जरी खरी असली तर त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही...

रात्रीचे दहा वाजले होते. पार्टी जोर धरत होती. हॉलच्या मधोमध एक चौथरा होता. चौथऱ्याच्या चारही बाजूंनी साखळ्यांचं कुंपण होतं आणि चौथऱ्याच्या मधोमध लाल कपड्याने झाकलेला एक छोटा खांब उभा होता. एका बाजूला हातात ग्लासेस घेऊन सीनियर इंस्पेक्टर प्रधान, डॉ. गोखले, इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर उमा आणि सब इंस्पेक्टर सचिन एकमेकात चर्चा करत होते. उमा म्हणाली, "रंगतदार पार्टी आहे ना..." सचिन प्लेटमधून स्टार्टर उचलत असताना त्याच्याकडे पाहत आनंद म्हणाला, "सचिन, सांभाळून हां... नॉनव्हेज असायचं ते..." सचिनने हात थांबवताच डॉ. गोखले म्हणाले, "सचिन, अरे तू काय ऐकतोस त्याचं, पनीर आहे ते..." पनीर उचलत सचिन म्हणाला, "काय आनंद सर, घाबरवलंत तुम्ही..."

सर्वांची मजा-मस्करी सुरू असताना, "अरे वाह, पोलीसांनासुद्धा बोलावणं आहे... आमच्या सुरक्षेसाठी वाटतं..." हा आवाज आला. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर सुटा-बुटातला एक माणूस समोर उभा होता. त्याला पाहताच प्रधान पुढे येत म्हणाले, "अरे विकी, तूही आहेस का इथे... तुला कशाला हवी सुरक्षा, जेव्हा संपूर्ण सीमेची सुरक्षा तुमच्यावर आहे... टीम, हे मेजर विक्रम जोशी. आता निवृत्त आहेत पण एकेकाळी सीमेवर दरारा असायचा यांचा. आणि विकी, ही माझी टीम..." सर्वांशी हस्तांदोलन झाल्यावर जोशी म्हणाले, "दरारा वगैरे काही नाही. मी माझं कर्तव्य केलं बस. त्यातच एका चकमकीत पायाला गोळ्या लागल्या. पाय तर गेलाच, शिवाय लवकर निवृत्त व्हावं लागलं ते वेगळंच. आता उरलाय तो फक्त रिटायर्ड मेजर विक्रम जोशी..."

मेजर विक्रम बोलतच होते की बाजूने जाणाऱ्या एका वेटरचा धक्का लागून ट्रेमध्ये ठेवलेला ग्लास कलंडला. त्यातील पेय जोशींच्या कोटावर सांडलं. तो वेटर गांगरला पण जोशींनी त्याला पाहिलं आणि हसतमुखाने जायला सांगून रुमालाने डाग पुसू लागले. तेवढ्यात प्रधानांची नजर, जोशींच्या कोटावर असलेल्या ब्रूचवर गेली. गर्जना करतानाचे हावभाव दाखवणारा सिंह असलेल्या त्या ब्रूचकडे पाहत प्रधान म्हणाले, "विकी, हे ब्रूच छान आहे रे... कुठून घेतलंस..." ब्रूचकडे पाहत जोशी म्हणाले, "अरे घेतलं नाही. मी निवृत्त झालो त्या दिवशी माझ्या बटॅलियनने दिलं..." सर्व बोलतच होते इतक्यात, "लेडीज अँड जेंटलमॅन..." हा आवाज आला...

सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक माणूस हातात माईक घेऊन चौथऱ्याशेजारी जरा लांब उभा होता. सर्वांचं लक्ष आपल्याकडे आहे, हे पाहिल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली, "मंडळी, मी रसिकलाल. आजवर मी अनेक दागिने घडवले. तुम्ही ते पसंतही केलेत. आज मी तुम्हाला माझी तीन वर्षांची मेहनत दाखवणार आहे. फ्रेंड्स, गिव्ह अ बिग हँड फॉर द सन ऑफ कोहिनूर..." टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लाल कपडा बाजूला सारला गेला. खांबावर ठेवलेल्या एका निळ्या उशीवर एक चमकदार हिरा ठेवला होता. तो हिरा पाहून सर्वांचेच डोळे दिपले. रसिकलाल म्हणाला, "मंडळी, हा हिरा माझ्या इतर सर्व मौल्यवान वस्तूंमध्ये मला सर्वात जास्त प्रिय आहे. पुढचे तीन दिवस हा हिरा इथे असेल. त्यानंतर या हिऱ्याची रवानगी अशा ठिकाणी होईल जिथून तो कोणालाच दिसणार नाही..." रसिकलाल माईक बंद करणार इतक्यात एक बाई म्हणाली, "अहो पण हा इतका मौल्यवान हिरा तुम्ही असा उघड्यावर ठेवणार... आणि तोही तीन दिवस..."

रसिकलाल हसत म्हणाला, "या मॅडमचं म्हणणं बरोबर आहे. हा हिरा जितका मौल्यवान आहे, याची सुरक्षाही तितकीच जबरदस्त असायला हवी... सो लेट मी शो यू द सिक्यूरिटी अरेंजमेंट्स..." त्याने त्याच्या हातात असलेल्या घड्याळावरील एक बटण दाबलं आणि चौथऱ्याच्या चारही बाजूला असलेल्या साखळ्या ज्या खांबांना अडकवल्या होत्या, त्या खांबांतून चार लाल किरणं निघून थेट छताला जाऊन पोहोचली. जणू लाल किरणांची चौकोनी भिंतच हिऱ्याभोवती उभी होती. रसिकलाल म्हणाला, "मंडळी, या इंफ्रारेड लेझर बीम्स आहेत. यांना हात लावताच भडका उडेल. या सतत ऑन असतील पण कोणालाही दिसणार नाहीत, हे बघा..." त्याने त्याच्या घड्याळावरील दुसरं बटण दाबलं आणि लेझर बीम्स गायब झाल्या. एक टिशुपेपर घेऊन त्याचा बोळा करून त्याने हिऱ्याच्या दिशेने फेकला. खांबाच्या वर पोहोचताच बोळ्याला आग लागली आणि तो काळाठिक्कर पडला...

सर्वजण श्वास रोखून पाहत होते तेव्हा रसिकलाल म्हणाला, "शिवाय, या साखळ्यांमध्ये सेंसर्स आहेत. एखादी साखळी काढली, तोडली किंवा कोणी यांवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला तर अलार्म्स वाजतील. सगळ्या दारं-खिडक्या आपोआप बंद होतील आणि चौथऱ्याच्या दुप्पट आकाराचा एक लोखंडी पिंजरा जमिनीतून वर येऊन थेट छतापर्यंत जाईल..." बोलता बोलता रसिकलालने दुसरा बोळा साखळीकडे फेकला. बोळा साखळीवरून पार झाला आणि त्याच वेळी अलार्म वाजू लागले. सगळ्या दारं-खिडक्या धडाधड बंद झाल्या आणि जमिनीखालून एक लोखंडी चौकोनी भिंत वर येत थेट छताला भिडली. चौथऱ्यासकट हिरा आणि लेझर बीम्सची भिंत, दोन्हीही त्या लोखंडी भिंतीच्या आत दडून गेले...

सर्वांनी हिऱ्याच्या सुरक्षा व्यवस्थेची स्तुती करत टाळ्या वाजवल्या. रसिकलालने पुन्हा त्याच्या घड्याळाचं एक बटण दाबलं आणि लोखंडी भिंत खाली येत जमिनीत सामावली. जमीन पूर्ववत झाली आणि दारं-खिडक्या उघडल्या. रसिकलाल पुढे म्हणाला, "याखेरीज, इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट अलार्म वाजेल आणि पाचव्या मिनिटाला पोलीस इथे हजर होतील. सो मंडळी, हा हिरा इथे पूर्ण सुरक्षित आहे. नाव, एंजॉय द पार्टी..." हे बोलून रसिकलाल निघून गेला. हिऱ्यावर कॅमेऱ्याचे फ्लॅश पडू लागले आणि संगीत सुरू होऊन पार्टी पुन्हा जोर धरू लागली...

प्रधान आपल्या टिमसोबत उभे होते. आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे समजल्यावर ते म्हणाले, "टिम, सुरक्षा व्यवस्था चोख आहे खरी, पण आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. खरंतर रसिकलालने याच गोष्टीसाठी आपल्याला बोलावलं आहे. ही इज व्हेरी मच कंसर्न्ड अबाऊट द फियर ऑफ थेफ्ट. सर्वांना जाऊ दे, आपण ही सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने पडताळून पाहू..." सर्वांनी माना हलवल्या आणि वाट पाहू लागले. थोड्या वेळाने मेजर विक्रम जोशी प्रधानांसोबत बाहेर पडले. हॉल सामसूम झाला. काही वेळातच प्रधान आणि टीम हॉलवर पुन्हा दाखल झाले...

रसिकलाललाही त्यांनी तिथे बोलवून घेतलं होतं. तो आल्यावर प्रधानांनी पुन्हा सुरक्षा व्यवस्था त्यांच्या डोळ्यांखालून घातली. सर्वकाही पडताळून पाहिल्यावर प्रधान म्हणाले, "रसिकलाल, व्यवस्था तर चांगली आहे, पण एक गोष्ट तुम्ही विसरलात... भुयारी मार्गाचा वापर करून जर कोणी हिरा चोरायला आलं तर..." रसिकलाल हसत म्हणाला, "सर, हा विचारही आम्ही करून ठेवला आहे. पार्टीत याबद्दल मी बोललो नाही, पण हिऱ्याभोवतीचे हे चार खांब जमिनीत पाच फूट खोलवर रुतवले आहेत. तिथेही असेच सेंसर्स आहेत... सो डोंट वरी सर..." सर्व गोष्टींची खातरजमा करून प्रधान त्यांच्या टीमसोबत निघून गेले. रसिकलालही त्याच्या वाटेने गेला...

दोन दिवस गेले...

रात्रीचे बारा वाजत आले होते. प्रधानांचा फोन वाजला, "सीनियर इंस्पेक्टर प्रधान हियर, बोला रसिकलाल... काय... कधी... आम्ही येतोच..." फोन कट करत प्रधानांनी आपल्या टीमला काँफरंस कॉल लावला, "टीम, रसिकलालचा फोन आला होता. सुरक्षा व्यवस्था सांभाळणारं त्याचं घड्याळ गायब झालं आहे आणि तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाही खून झाला आहे. टीम, रीच देयर इम्मिजियटली..." थोड्याच वेळात सर्वजण तिथे येऊन पोहोचले. घराबाहेर रसिकलाल त्यांची वाटच पाहत होता. सर्वजण आल्याबरोबर रसिकलालने दार उघडलं. प्रधान आणि बाकी ऑफिसर्स रसिकलालच्या मागे आत गेले...

हॉलच्या एका बाजूच्या खिडकीची काच तुटली होती आणि खिडकी शेजारीच एक जण आडवा पडला होता. रसिकलाल म्हणाला, "सर, हा गिरी. इथे कामाला होता. मी वरच्या बेडरूममध्ये झोपतो. माझं गॅजेट चोरताना चोराचा एका स्टुलाला धक्का लागला. त्यामुळे मला जाग आली. मी त्याचा पाठलाग केला. या जिन्यावर माझा तोल गेला आणि मी खाली येऊन बेशुद्ध पडलो. मला शुद्ध आली तेव्हा हा गिरी इथे मरून पडला होता. माझा दुसरा नोकर बाबू गायब आहे सर. तो माणूस आणि माझं गॅजेट..." रसिकलाल गप्प झाला. प्रधान लगेच सर्वांकडे वळत म्हणाले, "उमा आणि आनंद, तुम्ही इथला तपास सुरू ठेवा. मी आणि सचिन हिऱ्याची पाहणी करून येतो. चला रसिकलाल..."

रसिकलाल, प्रधान आणि सचिन, हॉलकडे जाऊ लागले आणि त्याचवेळी सायरन्स वाजायला लागले. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि धावतच हॉलपर्यंत आले. दाराला कुलूप होतं आणि दाराबाहेर एक माणूस दाराकडे पाहत उभा होता. जवळ जात रसिकलाल म्हणाले, "जॉन, तू इथे... आणि हा आवाज कसा काय..." जॉन काही बोलणार इतक्यात रसिकलालने चाव्या लाऊन कुलूप उघडलं. सर्वजण आत गेले आणि अचंभित करेल असं दृष्य सर्वांना दिसलं. हॉलच्या सर्व दारं-खिडक्यांवर लोखंडी झडपा पडल्या होत्या. हिरा ठेवलेल्या जागेला घेरून एक लोखंडी भिंत पार छतापर्यंत गेली होती. हॉलच्या आत असलेले सगळे रक्षक निमचित पडले होते आणि सायरन वाजत होते...

त्याचवेळी तिथे पोलिसांची एक कुमक येऊन पोहोचली आणि सर्वजण हॉलची दशा पाहू लागले. हे सगळं पाहून रसिकलाल सैरभैर झाला. एकाबाजूला असलेल्या दारामागे जाऊन रसिकलालने जमिनीजवळ असलेली एक कळ दाबली. अलार्म बंद झाले. लोखंडी झडपा उघडल्या गेल्या आणि हिऱ्याभोवतीची लोखंडी भिंत खाली येऊन लागली. लोखंडी भिंत अजून खाली आली आणि सर्वांना दिसलं की हिरा त्याच्या जागेवरून गायब झाला होता. "माझा हिरा..." हे दोनच शब्द उच्चारून रसिकलाल कोसळला. त्याला सांभाळण्यासाठी जॉन आणि सचिन एकत्रच पुढे आले. रसिकलालला सांभाळताना दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनी त्याला बाजूलाच असलेल्या एका सोफ्यावर आडवं ठेवलं. पोलिसांच्या तुकडीकडे पाहत प्रधान म्हणाले, "रसिकलालला ताबडतोब हॉस्पिटलला हलवण्याची व्यवस्था करा, तोवर आम्ही इथला तपास करतो..."

दोन हवालदारांना तिथेच थांबायला सांगून इंस्पेक्टर निघून गेले. प्रधानांनी सचिन आणि त्या दोन्ही हवालदारांना जागेची पाहणी करायला सांगितलं. तेवढ्यात प्रधानांचा फोन वाजला. "हां बोल आनंद... ओके. बॉडी पी.एम.साठी पाठवा आणि बंगला सील करून तुम्ही दोघं हॉलवर या. द स्टोन हॅज गॉन मिसिंग..." फोन ठेऊन तपास करणाऱ्या हवालदारांकडे वळत प्रधान म्हणाले, "तुम्ही दोघं रसिकलालच्या बंगल्यावर जा. बंगला सील केला आहे. तिथे कोणालाही फिरकू देऊ नका..." प्रधान हे बोलत असतानाच इंस्पेक्टर अँब्यूलंस घेऊन आला आणि आनंद व उमाही तिथे दाखल झाले. रसिकलालला घेऊन अँब्यूलंस निघून गेली आणि इंस्पेक्टरसह प्रधान पुन्हा आत आले. इंस्पेक्टरला हॉलवर आणि बंगल्यावर सक्त पहारा ठेवण्याच्या सूचना देऊन जॉनला एका बाजूला उभं रहायला सांगून ते आपल्या टीममध्ये सामिल झाले. तपास पुन्हा सुरू झाला...

आनंद आणि सचिन हॉलच्या वरच्या भागांची पाहणी करत होते. खाली उमा प्रधानांना म्हणाली, "सर, संपूर्ण बंगल्याची तपासणी केली. फक्त त्या खिडकी जवळ झटापट झाल्याचं दिसतंय. बंगल्यातून इतर कोणतीही वस्तू गायब झालेली नाही. याचा अर्थ ते गॅजेटच चोरण्याचा उद्देश होता. बंगल्यातली कुठलीही कडी किंवा कुलूप तुटलेलं नाही. म्हणजे ती जी कोणी व्यक्ती होती, तिला आत येण्याचा रस्ता माहित होता. शिवाय, रसिकलाल कुठल्या खोलीत झोपतो हेही माहित असणार. सर, रसिकलालवर पाळत ठेवली गेली असणार आणि हे काम त्याच्या जवळची व्यक्ती जास्त चांगल्या तर्हेने करू शकते. गिरी तर मेला, बाबू गायब आहे, आणि हा जॉन..." उमा आणि प्रधान दोघांनी जॉनकडे पाहिलं...

जॉनला दरडावत प्रधान म्हणाले, "जॉन, इथे जे घडलं ते सर्व तुला माहित आहे. आता सांग, अलार्म वाजले तेव्हा आम्ही इथे पोहोचण्याआधी तू इथे कसा पोहोचलास..." जॉन त...त...प...प... करू लागताच प्रधानांनी त्यांचा आवाज वाढवला, "बोल लवकर..." जॉन म्हणाला, "सर, मला यातलं काहीच माहित नाही. मी साहेबांसोबत त्याच बंगल्यात राहत होतो हे खरं आहे, पण संध्याकाळी मी काही वेळासाठी सुट्टी घेतली होती. माझं काम करून परतलो आणि अलार्म ऐकू आला. म्हणून मी तुमच्या आधी इथे पोहोचलो..." प्रधान अजून काही विचारणार इतक्यात, "सर..." हा आनंदचा आवाज ऐकून ते मागे वळले. आनंद जिन्यावरून खाली येत होता... 

जॉनला तिथे उभ्या असलेल्या हवालदाराच्या ताब्यात देत प्रधान व उमा जिन्याजवळ गेले. आनंद म्हणाला, "सर, संपूर्ण जागेची आम्ही पाहणी केली. कुठेही झटापट झाल्याच्या खुणा नाहीत पण तिथे आस-पास कसलातरी वास येत आहे. कदाचित क्लोरोफॉर्म किंवा अजून काहीतरी असावं ज्यामुळे हे पहारेकरी बेशुद्ध पडले. हिऱ्याभोवती ठेवलेल्या चार खांबांच्या आत हा हुक पडला होता. याचा वापर कशासाठी झाला असेल ते नाही सांगता येत. छताच्या वरच्या बाजूला काहीतरी गोलाकार दिसतंय. मी सचिनला छतावर पाहणी करायला पाठवलं आहे..." तेवढ्यात सचिन धावत आला. जवळ येत सचिन म्हणाला,  "सर, छताला ही गोलाकार वस्तू बसवली होती. छताचा गोलाकार भाग लेझरने कापण्यात आला आहे. तो भागही छतावर आहे. कदाचित चोरी तिथून झाली आणि मग ही गोलाकार वस्तू झाकण म्हणून वापरली गेली..." 

उमा व आनंद, ती गोलाकार वस्तू पाहत असताना प्रधान जॉनला म्हणाले, "जॉन, तू नक्की कुठे गेला होतास... खरं सांग..." जॉनचा चेहेरा घाबरा-घुबरा झाला. तो काही बोलणार इतक्यात सचिन म्हणाला, "सर, छतावर मला आणखी एक वस्तू सापडली आहे..." सचिनने ती वस्तू दाखवली आणि प्रधानांचे डोळे मोठे झाले. वस्तू ठेवलेली पिशवी हातात घेऊन प्रधान ती न्याहाळू लागले. प्रधानांनी सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, "हे तर मेजर विक्रम जोशी यांनी त्यांच्या कोटाला लावलेलं ब्रूच आहे... म्हणजे तेही या चोरीत सामील आहेत तर... विकी, युअर गेम इज अप..." जॉन व इतर हवालदारांकडे वळत प्रधान म्हणाले, "या जॉनला संशयित म्हणून ताब्यात घ्या. हा हॉल सील करा आणि कोणालाही इथे फिरकू देऊ नका. उमा, सचिन, आनंद, लेट्स गो गेट हिम..."

चौघंही जीपमध्ये बसले आणि जीप सुसाट वेगाने निघाली. उमा म्हणाली, "सर, मेजर जोशींच्या घरी अजून फोर्स बोलवायची का..." नकारात्मक मान हलवत प्रधान म्हणाले, "मी विक्रमला जितकं ओळखतो, तो स्वत:च्या घरी नक्कीच सापडणार नाही. वी हॅव टू सर्च समव्हेयर एल्स. मला एक जागा माहित आहे जिथे तो असू शकतो. एकेकाळी तो आमचा अड्डा असायचा. लेट्स गो देयर..." बराच वेळ गाडी चालून शहराबाहेर एका वळणावर येऊन थांबली. समोर एक मोठं आवार होतं आणि त्याच्या मधोमध एक जुनाट बंगला उभा होता. जीपचं इंजीन बंद झालं. प्रधानांनी इशारा करून सर्वांना त्यांच्या बंदुका तपासायला सांगितलं. चौघांच्या दिशा ठरल्या आणि चौघंही त्या त्या दिशेला बंगल्याकडे जाऊ लागले...


आनंद आणि सचिन त्यांच्या त्यांच्या वाटेने आत पोहोचले. कुबट वास येत होते, जेमतेम सामान दिसत होतं आणि अंधार पसरला होता. मनुष्याचा लवलेशही तिथे दिसत नव्हता. आनंद आणि सचिनने एकमेकांना इशारा केला आणि ते पुढे जायला लागले. इतक्यात बंगल्यातले लाईट लागले आणि चाहूल लागली म्हणून आनंद आणि सचिनने मागे वळून बंदुका रोखल्या. "होल्ड इट ऑफिसर्स... नाही तर आम्ही तर मरूच, पण तुम्हीही जिवाला मुकाल..." हे बोलत मेजर विक्रम जोशी त्यांच्याकडे बंदूक रोखून उभे होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन साथिदारही होते. मेजर जोशी अजून काही करणार इतक्यात त्यांच्या आणि त्यांच्या माणसांच्या हातांवर फटके पडले. त्यांच्या बंदुका खाली पडल्या आणि हातात पिस्तूल घेऊन प्रधान समोर आले...

पुढील भाग लवकरच...