Monday, January 25, 2021

Challenge -- दुसरा भाग...

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेत उल्लेख केलेल्या जागा आणि नावं जरी खरी असली तर त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही...

आधीच्या भागात आपण वाचलंत...

रसिकलाल त्याने घडवलेल्या हिऱ्याचं प्रदर्शन भरवतो. तिथे सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि त्यांची टिम आले असताना प्रधानांच्या जुन्या मित्राशी, मेजर विक्रम जोशींशी सर्वांची भेट होते. रसिकलाल त्यांचा हिरा सर्वांसमोर उघड करतात तेव्हा त्याच्या सुरक्षेविषयी प्रश्न उठवला जातो. रसिकलाल यांनी ठेवलेली आधुनिक पद्धतीची सुरक्षा व्यवस्था पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. दिवस संपल्यावर सुरक्षेबद्दल साशंक असलेले प्रधान आणि त्यांची टिम पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था नजरेखालून घालतात आणि खातरजमा झाल्यावर निघून जातात. दोन दिवसांनी अचानक प्रधानांना रसिकलालचा फोन येत, की त्यांचं घड्याळगायब आहे आणि त्यांच्या नोकाराचाही खून झाला आहे. सर्व तिथे पोहोचतात आणि रसिकलालसोबत आत जातात...
हॉलमध्ये सायरन वाजत असतात आणि हिरा चोरीला जाऊन तिथले पहारा देणारे सगळे रक्षक बेशुद्ध पडले असतात. रसिकलाल सायरन बंद करतो आणि हिरा चोरीला गेला या धक्क्याने तो बेशुद्ध पडतो. प्रधान त्याला हॉस्पिटलला पाठवतात आणि तपासादर्म्यान त्यांचा पहिला संशय रसिकलालच्या माणसावर, जॉनवर जातो. जॉनची चौकशी करत असताना तिथे मिळालेल्या एका वस्तूमुळे संशयाची सुई मेजर विक्रम जोशींवर जाते. प्रधान आणि त्यांची टिम मेजर जोशींच्या ठिकाणावर छापा मारायचं ठरवतात. आनंद आणि सचिन पुढे गेलेले असताना मेजर जोशी त्यांना अडकवतात त्यांचवेळी मेजर जोशींच्या हातावर फटका बसून त्यांची बंदूक खाली पडते आणि प्रधान समोर येतात...

दुसरा भाग...

प्रधान म्हणाले, "दॅट्स इट विक्रम, युअर प्लॅन फेल्स हियर... मला माहित होतं, तू माझ्या ऑफिसर्सना अडकवशील. म्हणून मी मागे राहिलो. मला तर विश्वासच बसत नाही. विकी, तुझ्यासारखा देशभक्त, जिगरबाज सैनिक आणि साध्या चोरीमध्ये गुंतावा... आय डिडनॉट एक्सपेक्ट धिस फ्रॉम यू... मी तुला काय समजत होतो आणि तू..." प्रधान पुढे काही बोलणार इतक्यात जोशी म्हणाले, "हो. मी चोरी केली. पण हे कृत्यही मी देशासाठीच केलं आहे. देशावर येणाऱ्या एका मोठ्या संकटाला थांबवण्यासाठी केलं आहे. हा हिरा नुसता खडा नसून एक ट्रिगर आहे न्यूट्रॉन बॉम्ब सुरू करण्याचा..." हे ऐकल्याबरोबर प्रधान आणि त्यांची टीम सुन्न झाले आणि मेजर जोशी पुढे बोलू लागले... "पायाला दुखापत झाल्यावर मला अॅक्टिव्ह फोर्समधून काढून आर्मी इंटेलिजन्समध्ये पोस्ट केलं गेलं. एक दिवस माझ्या हस्तकांकडून मला खबर मिळाली, की इस्तांबूलमध्ये एक श्रीमंत व्यापारी फरीद आला आहे. या फरीदचे फोटो जेव्हा मी पाहिले तेव्हाच या फरीदचं खरं रूप उघड झालं. हा फोटे बघा. कोण आहे हा ओळखता येतोय का..." सर्वांनी फोटो पाहिला आणि आनंद म्हणाला, "हा तर अंतरराष्ट्रीय दहशदवादी याकूब सईद आहे..." हे ऐकल्या ऐकल्या जोशी हसले आणि दुसरा फोटो दाखवत म्हणाले, "हा आहे इस्तांबूलचा व्यापारी फरीद..." फोटो पाहून सर्वजण विचारात पडले. फोटोकडे निरखून पाहत सचिन म्हणाला, "सर, या दोन्ही फोटोत डाव्या हाताकडे बघा... दोन्ही फोटोत डाव्या हाताला करंगळी नाहीये..." फोटोकडे पाहून सचिनकडे पाहत आनंद म्हणाला, "म्हणजे हा फरीदच..." "बुल्स आय सचिन अँड आनंद... बरोबर हेरलंत. हा फारीदच याकूब सईद आहे. हे समजल्यावर मी माझ्या हस्तकाला सईदवर पाळत ठेवायला सांगितली. माझा हस्तक सईदच्या घरात राहून त्याच्यावर नजर ठेवत होता. एक दिवस सईदचं हे संभाषण माझ्या हाती लागलं. तुम्ही सर्वजण ऐका..." जोशींनी टेप चालवली, "अब हिंदुस्तान रोएगा... इस बार मैं वह काम करूँगा, कि हिंदुस्तान के दिल की धड़कन बंद हो जाएगी | हज़ारों लोग अपने सरताज के साथ जहन्नुम में जाएँगे | हा...हा...हा..." टेप बंद करत जोशी म्हणाले, "हा माझ्या हस्तकाचा शेवटचा संदेश होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. माझ्या इतर हेरांकडून मला खबर मिळाली की सईदने एक न्यूट्रॉन बॉम्ब बनवला आहे आणि तो बॉम्ब भारतावर चालवण्याचा सईदचा मनसूबा आहे. न्यूट्रॉन बॉम्ब, हिंदुस्तान का सरताज, दिल की धड़कन आणि हज़ारों लोग, मला समजायला वेळ नाही लागला, की सईद नवी दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडविषयी बोलत होता... माझ्या माणसांनी सईदला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना वीरमरण आलं. सईदही तिथून गायब झाला. काही महिने शांततेत गेले. एक दिवस मला खबर मिळाली की न्यूट्रॉन बॉम्बला अॅक्टिव्हेट करणारी मायक्रो चिप एका हिऱ्यात बसवली आहे. त्या चिपची फ्रीक्वेंसीही माझ्या हाती लागली. त्यातच रसिकलालकडून त्याच्या नव्या हिऱ्याच्या प्रदर्शनाचं आमंत्रण मला मिळालं. रसिकलाल माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारलं. प्रदर्शनात आलो तर चिपची फ्रीक्वेंसी मॅच झाली. न्यूट्रॉन बॉम्बची चिप इथे कशी हा विचार करत असताना मला जाणवलं, की फ्रीक्वेंसी वेव्ह्स हिऱ्यातून येत आहेत. बॉम्बचा एक भाग या हिऱ्यात कसा आणि तो हिरा रसिकलालकडे कसा याचा विचार करत तुम्हा सर्वांशी बोलत होतो तेव्हाच तो वेटर मला धडकला. डाग साफ करताना त्याच्या डाव्या हाताला माझा स्पर्श झाला आणि माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला... तो वेटर दुसरा तिसरा कोणी नसून स्वत: याकूब सईद होता. सईदचं इथे असणं आणि चिपच्या ट्रांसमिशन वेव्ह्स इथे मिळणं यात नक्कीच कनेक्शन होतं. सईद हिरा चोरण्याच्या प्रयत्नात होता हे नक्की. तो हिरा सईदच्या हाती लागला असता तर दिल्लीवर न्यूट्रॉन बॉम्बचा हल्ला झाला असता. म्हणून मीच तो हिरा चोरण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी तिथले बारकावे जाणून घेणं गरजेचं होतं. तिथेच हॉलमध्ये मी छुपा कॅमेरा सेट केला आणि हॉलपासून जरा लांब माझ्या गाडीत बसून पाळत ठेऊ लागलो. हॉल रिकामा झाल्यावर तुम्ही सगळे परतलात. सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केलीत आणि निघून गेलात. तुमच्या पाहणीगणिक मी माझा प्लॅन बनवू लागलो. समोरून किंवा जमिनीखालून हिरा चोरणं शक्य नव्हतं. म्हणून छतावरून चोरी करायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी प्रदर्शन सुरू असतानाच मला हॉलमधून अजून काही आवाज आले... कॅमेऱ्यासमोर दोघं उभे होते. पहिला वेटर झालेला याकूब होता, दुसरा कदाचित त्याचा माणूस असेल. तो माणूस कुजबुजत म्हणाला, "जनाब, इस हिरे के लिए तो काफी इंतज़ामात हैं | हम इसे चुराएँगे कैसे..?" इकडे-तिकडे पाहत सईद म्हणाला, "इसकी नौबत ही नहीं आती अगर जहाज़ में तूने अपना बॅग ठीक से सँभाला होता. तूने हिरेवाला बॅग खो दिया और वही बॅग उस रसिकलाल के हाथ लग गया | मुझे लगा वह रसिकलाल बॅग और हिरा दोनों पुलीस को दे देगा और मेरा प्लॅन फेल हो जाएगा | लेकिन उस लालची ने हिरा अपने ही पास रख लिया और नुमाइश के लिये रखा | ठिक है रसिकलाल, कर ले अपनी तमन्ना पूरी | तीसरी रात को तेरे ही हाथों से हिरा छीनकर तुझे जहन्नूम भेज दूँगा..." तो माणूस नजर फिरवत पुन्हा म्हणाला, "और जनाब, उस प्रधान का क्या करें..! जिसने पिछले साल मुंबई की परेड़ के दौरान आपके भाईजान को..." त्याच्या खांद्यावर हात ठेवत सईद म्हणाला, "इंतक़ाम तो लेना ही है | उस प्रधान को देखकर मेरा भी ख़ून ख़ौल रहा था | लेकिन हमारा मक़सद ज़्यादा ज़रूरी है | सबको ख़बर कर दो | परसौं हम हिरा ले उड़ेंगे और २६ को हम वहाँ होंगे जहाँ अपने मक़सद को अंजाम देंगे |" त्याचवेळी हे सगळं तुम्हाला सांगावं असं मला वाटत होतं. पण सईदने किती माणसं कुठे पेरली आहेत याची काहीच कल्पना नव्हती. रसिकलालला कळवलं असतं तर त्याने प्रदर्शन बंद केलं असतं आणि सईद सावध झाला असता. हॉल गजबजलेल्या जागेत असल्याने कदाचित सामान्यांच्या जिवाशीही खेळ झाला असता. म्हणून मी शांत राहिलो. माझ्या तीन भरवशाच्या साथिदारांना हाताशी धरून हिरा चोरण्याचा प्लॅन बनवला. हॉलच्या एका बाजूला लायब्ररीची मारत तर दुसऱ्या बाजूला अर्धवट बांधकाम झालेली इमारत होती. दोन्ही इमारतींना तार बांधून मोटरच्या सहाय्याने त्यावरून सरकत मी आणि माझा साथिदार हॉलच्या छतावर उतरलो. काही कौलं बाजूला करून सिंमेंटच्या भिंतीला व्हॅक्यूम कप्स लावले. भिंतीला गोलाकार छिद्र पाडून व्हॅक्यूम कप्सना लावलेल्या तारांनी तो पूर्ण सिमेंटचा गोलाकार भाग खेचून वर काढला. बेशुद्ध करणारा वायू आत सोडून पहारेकऱ्यांना झोपवलं. मग माझा सहकारी सस्पेंशन कॉर्डच्या सहाय्याने छिद्रातून खाली उतरला... हिरा घेऊन पुन्हा त्याच कॉर्डच्या सहाय्याने वर आला. छतावर कॉर्डचा हुक काढताना तो खाली पडला. अलार्म सुरू झाले आणि लोखंडी खांब वर येऊ लागले. आम्ही थोडे गडबडलो पण लगेच सावरलो. सोबत आणलेलं गोल आकाराचं एक कव्हर तिथे बसवलं आणि कप्स काढून, मोटर सुरू करून तिथून निघून गेलो. ती चिप जोवर बॉम्बला लागत नाही तोवर बॉम्ब काही कामाचा नाही, हा विचार करून तो हिरा दुसऱ्या दिवशी तुमच्या स्वाधीन करायचा हा माझा विचार होता. पण आमच्यातल्याच एकाने हिऱ्यासाठी आमचा विश्वासघात केला आणि आमच्या हातून तो मारला गेला. आता पुढे काय करावं याचा विचार करत होतो की तुम्ही सगळे आलात..." जोशी बोलायचे थांबले. हे सर्व ऐकून सगळे सुन्न झाले होते. प्रधान म्हणाले, "विकी, आय अॅम विथ यू. ती चिप माझ्याकडे..." प्रधान बोलतच होते की त्यांचा आणि आनंद, दोघांचाही फोन वाजला... त्याचवेळी बंगल्याबाहेर हालचाल होत होती. झाडा-झुडुपातून, कुंपणावरून अनेक बंदुकधारी बंगल्याकडे येत होते. तिथे बंगल्यात प्रधान म्हणाले, "डॉ. गोखलेंचा फोन होता. गिरीचं पोस्ट मॉर्टेम करताना त्यांना समजलं की गिरीच्या चेहेऱ्यावर एक मुखवटा चढवला होता. मेलेला माणूस गिरी नसून खरा रसिकलाल होता..." हे ऐकत असतानाच आनंद म्हणाला, "सर, रसिकलाल हॉस्पिटलमधून पळाला..." सर्वजण विचारात पडले. जोशी म्हणाले, "गिरीचं खरा रसिकलाल असणं आणि होस्पिटलमधून रसिकलालचं निसटणं, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या वाटतात. पळून गेलेला रसिकलाल, खरा याकूब सईद तर नसेल..." "सही पहचाना तुम लोगों ने..." सर्वजण बोलत असताना आलेल्या या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. हातात मशीनगन घेतलेला आणि चेहेऱ्यावर मास्क घातलेला एक माणूस समोर उभा होता. प्रधानांच्या टिमने आणि जोशींच्या टिमने आपापल्या बंदुका समोर करताच दार-खिडक्या तोडून चेहेरे झाकलेल्या बंदुकधारी माणसांची फौजच आत शिरली. सर्वांना गराडा घातल्यावर आणि त्यांच्या हातातल्या बंदुका घेतल्यावर त्या माणसाने जोशींच्या हातून तो हिरा खेचून घेतला. आपल्या चेहेऱ्यावरचा मास्क दूर करत तो बोलू लागला, "तुम लोगों की अक़्ल की दाद देता हूँ | हां... मैं याक़ूब सईद हूँ | तुम्हारा दुश्मन, तुम्हारे हिंदुस्तान का दुश्मन | जानना नहीं चाहोगे मैं यहाँ कैसे पहुँचा... तुम बेवक़ूफ़ हिंदुस्तानी मुझे पकड़ने की फ़िराक़ में यह भूल गये कि मैं हमेशा तुमसे एक क़दम आगे था | प्रधान, हॉल के अंदर तुझे देखकर मुझे मेरे भाईजान की याद आई, लेकिन मेरा मक़सद ज्यादा ज़रूरी था | बम के हर पुर्ज़े को अलग अलग कर मैंने हिंदुस्तान भेज दिया | बम में लगनेवाली चिप हिरे में छुपाकर बड़े ऐतियात से मैंने मेरे आदमी के हाथ भेजा | लेकिन उस बेवक़ूफ़ ने पानी के जहाज़ से निकलते हुए हिरा रखा बॅग खो दिया | वही बॅग जहाज़ में सफर कर रहे रसिकलाल के हाथ लगा | मेरा हिरा हथियाने की सज़ा तो उस रसिकलालने अपनी जान देकर चुका दी | मैंने सोचा उसके क़त्ल के केस में तुम उलझे रहोगे और मैं हिरा लेकर निकल जाऊँगा | लेकिन यह मेजर मुझसे तेज़ निकला | हिरा गायब हुआ देख मेरे होश उड़ गये | प्रधान, तू हिरा ढूँढ़ लेगा इसका यक़ीन था मुझे | इसलिए मैने तुझपर मायक्रो ट्रांसमीटर लगा दिया | अब हिरा भी मेरे हाथ में है और तुझसे बदला लेने का मौक़ा भी | बाँध दो इन सब को और इनके चारों तरफ बम बिछा दो |" प्रधानांच्या टीमला आणि जोशींच्या टीमला तिथेच बांधून सर्व बंदुकधारी बाहेर पडले | याकूब सईद जोरजोरात हसत म्हणाला, "हा...हा...हा... प्रधान, अब सितारों में बैठकर दिल दहला देनेवाले नज़ारे देखना... ख़ुदा हाफ़ीज़..." बोलत असतानाच सईदने हातातल्या रिमोटचं बटण दाबलं आणि प्रचंड स्फोट झाले. संपूर्ण बंगल्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या... आज, दिनांक २६ राजपथ, नवी दिल्ली... प्रजासत्ताक दिनाची परेड सुरु झाली. राजपथवर अमर ज्योतीला मानवंदना देऊन पंतप्रधान स्थानापन्न झाले. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आणि पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा गौरव करण्यात आला. प्रेक्षकांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. तिरंगे फडकावले जात होते. बोचणाऱ्या थंडीतही प्रजासत्ताक दिनाची ती दैदिप्यमान परेड पाहण्यासाठी हजारो लोकांनी हजेरी लावली होती. त्याच परेडमध्ये काही चेहेरे संशयितरित्या वावरत होते. त्यातला एक होता सईद आणि बाकी त्याचे हस्तक होते. काही क्षणातच राजपथवर ती दिमाखदार परेड सुरु झाली. सईदसह सर्वांनी आपापली घड्याळं तपासली. सईदने एकाला इशारा केला आणि तो माणूस तिथून सटकत प्रेक्षकांपासून लांब झाला. इतक्यात एक गोळी येऊन त्या माणसाच्या छातीत बसली. तो माणूस खाली पडणार इतक्यात कोणीतरी त्याला धरून खुर्चीत बसवलं... सईदने त्या माणसाला पाहिलं आणि तो काहीच हालचाल न करता खुर्चीत बसला आहे हे पाहून सईदला आश्चर्य वाटलं. सईद त्याच्याजवळ गेला आणि त्याला धक्का बसला. तो माणूस मेला होता. सईदने सगळीकडे पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही. दुसऱ्या एका खांबाजवळ सईदचा अजून एक माणूस तसाच उभा होता. सईद त्याच्याजवळ पोहोचला तर त्यालाही गोळी लागली होती. सईदला अजूनही कोणीच दिसत नव्हतं. त्याने लगेच आपल्या सर्व माणसांना इशारा दिला. राजपथावरून येणाऱ्या प्रत्येक राज्याचं खास आकर्षण दाखवणाऱ्या ट्रक्समधून धडाधड बंदुकधारी अतिरेकी बाहेर पडले आणि बेछूट गोळीबार करू लागले. सर्वत्र पळापळ झाली. गोळीबार होत असतानाच प्रेक्षकांमधून मेजर विक्रम जोशी, त्यांचे दोन साथीदार, सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि त्यांची टीम बाहेर पडले आणि अतिरेक्यांवर प्रतिउत्तरादाखल गोळीबार करू लागले... जनतेच्या गोंधळामुळे आणि अतिरेकी ट्रक्समध्ये लपल्याने अतिरेक्यांना टिपणं प्रधान व जोशींना अवघड जात होतं. प्रधान म्हणाले, “विकी, कान्ट एम यार...” मेजर जोशी हसले आणि म्हणाले, “जस्ट अ सेक...” आणि आपलं घड्याळ तोंडाजवळ आणत म्हणाले, “ईगल्स, ओपन अप...” हे बोलताच आकाशाच्या दिशेने काहीतरी येऊन एका ट्रकवर आदळलं. मोठ्या स्फोटानिशी ट्रक हवेत उडून खाली कोसळला. त्यासरशी सर्व ट्रक जागीच थांबले आणि सर्वजण आकाशाकडे पाहू लागले. लढाऊ विमानांचा एक ताफा आकाशात घुटमळत होता. सर्व अतिरेकी आकाशाच्या दिशेने गोळीबार करू लागले. विमानांनी एकेका ट्रकचा वेध घ्यायला सुरुवात केली. काही क्षणातच सगळे ट्रक जाळून बेचिराख झाले. त्याचवेळी सईदने एका ट्रकवर उडी मारली आणि ट्रक घेऊन थेट पंतप्रधानांच्या दिशेने जाऊ लागला. आगीचे गोळे चुकवत तो ट्रक पुढे पुढे जात होता. प्रधान म्हणाले, “विकी, त्या ट्रकमध्ये न्यूट्रॉन बॉम्ब असू शकतो... होल्ड युअर ईगल्स...” मेजर जोशींनी लगेच आपल्या घड्याळाकडे पाहत आदेश दिले, “नो फायरिंग... मिशन अकमप्लीश्ड...” विमानं मागे वळली आणि मेजर जोशी व प्रधान ट्रकच्या मागे जाऊ लागले. ट्रकबाहेर येऊन सईद म्हणाला, “कुछ नहीं कर सकते तुम लोग... अब तुम भी तुम्हारे सरताज के साथ मारोगे... हा...हा...हा...” बोलता बोलता त्याने ट्रकवरचं कव्हर बाजूला केलं आणि आपल्या जवळची चिप तिथे असलेल्या खाचेत सरकवली. डोळे बंद करून सईद “जन्नत-ए-जिहाद...” ओरडला खरा, पण तेवढ्यात आनंदने ट्रकचा ताबा मिळवला आणि ट्रक थांबवला. पंतप्रधान ज्या व्यासपिठावर बसले होते तिथे पायथ्याशी येऊन ट्रक थांबला. सईदने डोळे उघडले तर बॉम्ब तसाच होता. सईदला काहीच समजत नव्हतं. तेव्हा प्रधान म्हणाले, “सईद... तुम्हारा खेल अब खत्म होता है... लेकीन पहले जान तो लो कि हम यहां कैसे... वहां बंगले में हम सब तो अंदर थे, लेकीन हमारी साथी उमा बाहर थी | तुम सबके बाहर जाते ही वह अंदर आई और उसने हम सबको छुडा लिया | तुम्हारे बटन दबाने से पहले हम खिडकी से कूद गये थे | हम तुझे वहीं खत्म कर सकते थे, लेकिन इस बम को हासिल करना भी जरूरी था | सो लो, हम सब तुम्हारे सामने है | बंगले के अंदर जब हमें ट्रांसमीटर का पता चला, तब कुछ ना बोलते हुए हमने हिरे से चिप निकाल ली और हमारे ट्रान्समीटर की चिप वहां लगा दी | जो चिप तूने बॉम्ब में लगाई वह हमारा ट्रान्समीटर था, जिसका पिछा करते हम तुझतक पहुंचे |” हे सर्व ऐकून सईदला राग अनावर झाला आणि त्याने मशीन गन काढली आणि म्हणाला, “मेरे भाईजान का मकसद भी तूने नाकाम किया था | अब मै तेरे साथ सबको मार डालूंगा |” हे म्हणत सईदने मशीन गन पंतप्रधानांवर रोखली. तेवढ्यात मेजर जोशी, त्यांचे साथीदार, प्रधान आणि त्यांच्या टिमने सईदवर गोळ्यांचा वर्षाव केला. सईद मारला गेला. पंतप्रधानांनी सर्वांना सेल्यूट करत तिरंगा फडकवला आणि तिथे उपस्थित सर्वांनीच तिरंग्याला मानवंदना दिली... जय हिंद... @ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment