हसतमुख चेहेऱ्याने प्रधानांशी हस्तांदोलन करत डॉ. विद्यानंद म्हणाले, "सर्व एकदम ठिक आहे सर. आणि प्रयोगांचं म्हणाल तर..." बोलता बोलता डॉ. विद्यानंद यांनी आजू-बाजूला पाहिलं. कोणीही त्यांचं बोलणं ऐकत नाही हे लक्षात आल्यावर प्रधानांच्या शेजारच्या खुर्चीत बसत डॉ. विद्यानंद कुजबुजत म्हणाले, "एका नव्या प्रॉजेक्टवर सध्या काम चालू आहे. लेट्स होप इट गोज वेल..." तितक्याच हलक्या आवाजात उमा म्हणाली, "नवा प्रयोग... अरे बापरे... मागच्या वेळी माशी होती. आता काय असेल..." छोटासा हशा पिकला. डॉ. विद्यानंद म्हणाले, "नॉट टू वरी उमा मॅडम, या वेळी असं काही नाही. इथे बोलणं सेफ नाही. इं. प्रधान, तुम्ही उद्या माझ्या घरी या. तिथेच माझी लॅब आहे. तुम्ही याल तेव्हा सविस्तर बोलू..."
दुसरा दिवस
उजाडला. सी.इं. प्रधान आणि त्यांची टीम डॉ. विद्यानंद यांच्या घरी पोहोचले. डॉ.
विद्यानंद यांनी स्वत: दार उघडलं आणि सर्वांना घराच्या आतच असलेल्या लिफ्टने दोन
मजले खाली घेऊन गेले. लिफ्ट सुरू असताना डॉ. विद्यानंद म्हणाले, "इं.
प्रधान, मुख्य बंगल्याच्या खाली असलेली ही लॅब, सर्व प्रकारच्या
रेडियेशन्सपासून तर फ्री आहेच; पण न्यूक्लीयर अटॅकपासूनही सुरक्षित
आहे..." बोलता बोलता लिफ्ट थांबली. सर्वजण एका प्रशस्त हॉलमध्ये पोहोचले.
तिथे अनेक उपकरणं, वेगवेगळे केमिकल्स ठेवले होते. हॉलच्या मधोमध एका स्टँडवर एका मोठ्या
खांबासारखा एक बार बसवला होता. बारच्या बरोब्बर समोर एक मोठा पुतळा होता आणि
त्याच्या दोन्हीही बाजूंना दोन चौकोन काढले होते. त्या बारच्या बाजूला उभे राहत
डॉ. विद्यानंद म्हणाले, "इं. प्रधान, मी या प्रॉजेक्टबद्दल बोलत होतो...
माझा मागचा
प्रयोग व्यक्तिमत्वात बदल घडवण्याविषयी होता. पण या वेळी कुठल्याही वस्तूच्या
आकारमानात घट करण्याच्या प्रॉजेक्टवर मी काम केलं आहे. या लेझर गनमधून कुठल्या ही
वस्तूवर किरणं सोडल्यास ती वस्तू मुंगीपेक्षाही लहान होईल. मी प्रत्यक्षातच
दाखवतो. पण त्या आधी तुम्ही सर्वांनी हे ग्लासेस लावा. लेझर बीम्समुळे डोळ्यांना
इजा होऊ शकते. आता या समोरच्या पुतळ्याकडे बघा. जवळ जवळ सहा फूट ऊंची असेल याची.
खुणेसाठी त्याच्या भोवती मी पांढरा चौकोन काढला आहे. आता पहा काय होतं..."
डॉ. विद्यानंदांनी बटण दाबलं. "चरररर..." असा आवाज करत लेझर गन सुरू
झाली. गनमधून पांढरी किरण निघून समोरच्या पुतळ्यावर आदळली आणि पुतळा गायब झाला.
फक्त पांढरा चौकोन तिथे दिसत होता...
डॉ.
विद्यानंदांनी एक भिंग घेतलं आणि सर्वांना घेऊन पांढऱ्या चौकोनाजवळ गेले. त्यांनी
आधी पाहिलं, मग एकेक करून सर्वांना तो छोटा झालेला पुतळा दाखवला. मुंगी इतक्या
लहान झालेल्या त्या पुतळ्याकडे पाहत प्रधान म्हणाले, "डॉ. विद्यानंद,
धिस
इज अमेझिंग..." प्रधानांकडे पाहत डॉ. विद्यानंद म्हणाले, "बरोबर
आहे तुमचं इं. प्रधान. पण अजून हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी नाही झालेला..."
एकमेकांकडे पाहून मग सचिन आणि आनंद दोघांनीही एकदम विचारलं, "म्हणजे..."
बाजूच्या दोन चौकोनांकडे बोट दाखवत डॉ. विद्यानंद म्हणाले, "आत्ता
मी ही गन सातव्यांदा चालवली. लेझर गन वापरल्याच्या दोन तासांच्या आत जर पुन्हा
त्या वस्तूवर गन नाही चालवली तर त्या वस्तूचा स्फोट होतो. तुम्ही सगळे येण्याआधी
या दोन चौकोनातल्या पुतळ्यांवर मी लेझर गन चालवली आहे...
दोन तास पूर्ण व्हायला
आता दोन मिनिटं उरली आहेत. आता मी उजव्या बाजूच्या चौकोनातल्या वस्तूवर पुन्हा गन
चालवतो..." डॉ. विद्यानंदांनी गनचं तोंड उजव्या बाजूच्या चौकोनाकडे केलं आणि बटण
दाबलं. किरणं निघून चौकोनात पडली आणि बघता बघता तिथे एक पुतळा दिसला. आता डॉ.
विद्यानंद घड्याळ पाहू लागले. घड्याळातून 'बिप बिप' असा आवाज येऊ
लागला. आवाजाच्या काही सेकंदांच्या आतच डाव्या चौकोनात एक पुतळा दिसू लागला. सगळे
त्या पुतळ्याकडे पाहतच होते, की त्या पुतळ्याचा स्फोट झाला. पहिला
पुतळा ज्यावर पुन्हा गन चालवली गेली होती, तो जसाच्या तसा होता. डॉ. विद्यानंद
म्हणाले, "हाच या प्रयोगाचा निगेटिव्ह पॉईंट आहे. दोन तासांच्या आत प्रयोग
झालेल्या वस्तूवर पुन्हा गन फायर केली तर ती पूर्वपदावर येते. वस्तूवर गनचा वापर
नाही झाला तरी ती आपोआप पूर्वपदावर येते, पण काही सेकंदातच ती नष्ट होते..."
बोलत असताना डॉ. विद्यानंदांचा चेहेरा पडला. हे पाहून जवळच उभे असलेले डॉ. गोखले म्हणाले,
"डोंट वरी डॉक्टर. यू विल क्रॅक धिस डाऊन..." बोलणं चालू होतं
तेव्हा प्रधानांचा फोन वाजला...
"सीनियर
इंस्पेक्टर प्रधान हियर..." फोन घेत प्रधान हे बोललेच होते, की
पलिकडून आवाज आला, "आज भी वैसीही अकड़ और रौब... लेकिन
तेरी यह अकड़ ज़्यादा देर चलनेवाली नहीं सूपर कॉप प्रधान | २६ जनवरी की
परेड में ऐन मौके पर घुसकर तूने हमारा प्लॅन नाक़ामयाब किया था ना, लेकिन
अब ऐसा नहीं होगा | हर साल अक्टूबर-नवंबर में तुम लोग दिवाली मनाते हो, पटाखें
जलाते हो | इस साल कल ही दिवाली मनेगी | पूरी मुंबई पटाखों की तरह जलेगी और दुनिया
देखती रह जाएगी | हाफिज़ सैयद याद है प्रधान... वह मेरे बड़े भाईजान थे, जिन्हें तू और
तेरी टीम ने मुंबई की परेड के वक्त मारा था | मेरे भाईजान पर
तुझे रहम नहीं आया | लेकिन मैं बड़ा दिलदार हूँ, इसीलिए तुझे आगाह कर रहा हूँ | अब
मेरे कहर से बचना है तो अपनी टीम को लेकर भाग जा मुंबई से..."
बोलणं ऐकून फोन
स्पीकरवर टाकत प्रधान म्हणाले, "हम हिंदुस्तानी हैं समझे | मुश्किलों
से डरकर भागते नहीं, उनका सामना करते हैं..." प्रधानांचं बोलणं ऐकून फोन वरील
व्यक्ती म्हणाली, "इतना घमंड़ है अपनी अक़्लपर... तो चल, तुझे मैं मेरे
प्लॅन का एक हिस्सा बता देता हूँ... चौबीस आदमियों को मैंने पूरी मुंबई में फैला
रखा है | यह मेरे चौबीस स्लीपर सेल्स कुछ नहीं करेंगे, पर हर घंटे तुझे
याद दिलाएँगे, कि मुंबई पर कहर बरसनेवाला है | तेरा पहला शिकार,
मलाड़
के नटराज मार्केट में है | मैं हर घंटे तुझे तेरे अगले शिकार के
बारे में बताता जाऊँगा | तू जबतक मेरे चौबीसवे आदमी तक पहुँचेगा,
तबतक
बहुत देर हो चुकी होगी | मेरा आखरी स्लीपर सेल पूरी मुंबई को
खत्म कर देगा | हा...हा...हा... चौबीस घंटे... क़यामत के लिए..."
कॉल कट झाला.
प्रधानांनी लगेच दुसरा फोन लावला, "हॅलो, सी.इं. प्रधान
बोलतोय. काही माणसं साध्या वेषात मालाडच्या नटराज मार्केटजवळ पाठवा. मी पोहोचतोच
तिथे..." फोन खिशात ठेवत आपल्या ऑफिसर्सकडे पाहत प्रधान म्हणाले,
"लेट्स गो..." जीप थोड्याच वेळात मार्केटच्या तोंडाजवळ पोहोचली.
एक जीप तिथे आधीच पोहोचली होती आणि चार जण जीपला घेरून उभे होते. जीपमधून उतरत
असताना गर्दीकडे पाहत उमा म्हणाली, "सर, इथे इतकी गर्दी
आहे... यात त्या एका व्यक्तीला कसं शोधाणार आपण..." उमाला दुजोरा देत आनंद
म्हणाला, "आणि गर्दीला हटवू पण शकणार नाही आपण..." प्रधान सर्वांकडे पाहत
म्हणाले, "आपण सगळे मार्केटमध्ये पसरून अशी एखादी व्यक्ती शोधू, जिचं
वागणं-बोलणं निराळं असेल. सर्वांनी आपापले हेडफोन्स आणि माईक चेक करा...
मूव्ह..."
सर्वजण नटराज
मार्केटमध्ये पसरले. बारकाईने गर्दी न्याहाळू लागले. एकमेकांच्या संपर्कात राहून
सर्वजण आपापली लोकेशन एकमेकांना कळवत होते. सचिनने माईकवरूनच सर्वांना मार्केटच्या
मागे स्टेशनजवळ बोलावलं. सर्वजण तिथे पोहोचलेच होते की छोट्या स्फोटासारखा आवाज
झाला. सर्वजण आवाजाच्या जागी पोहोचले. एका दुकानाजवळ, फुटपाथवर थोडा आणि रस्त्यावर
थोडा असा एक माणूस पडला होता आणि सचिन त्याच्या बाजूला गुडघ्यावर बसून बॉडी चाचपडत
होता. बाजूलाच एक सायकल उभी होती. सायकलवर आणि रस्त्यावर रक्त पडलं होतं. सर्वजण
आल्यावर सचिन म्हणाला, "सर, मी इथे पोहोचलो
तेव्हा हा माणूस या सायकलवर पिना, क्लिपा आणि कानातले विकत होता. सगळं
नॉर्मलच होतं पण दोन मिनिटांपूर्वी हा कोणाशीतरी हिंदीत बोलू लागला. मला संशय आला
म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं. हा माणूस तोवर बोलत बोलत पुढे आला.
मिनीटभरापूर्वी याच्या हृदयाजवळ स्फोट झाला आणि हा जागीच गेला...
मी याचे खिसे
तपासले. त्यात वॉलेट आहे ज्यात याचं आधार कार्ड आहे. याचं नाव गोबिंदराम आहे. आणि
सर ही चिठ्ठीही सापडली खिशात. यावर तुमचं नाव लिहिलं आहे..." प्रधानांनी तो
दुमडलेला कागद हातात घेतला. त्यावर,
"आपका दूसरा शिकार..." असं लिहिलं होतं. प्रधानांनी तो कागद
उलगडला. त्यावर मजकूर लिहिला होता... "प्रधान, कैसा लगा यह
खेल... तेरा अगला शिकार गोरेगाँव के हब मॉल के पास है | जल्दी जाओ वहाँ,
वरना
एक घंटा पूरा होते ही..." चिठ्ठी वाचून तो कागद त्यांनी खिशात ठेवला. मग
साध्या वेषातल्या ऑफिसर्सकडे पाहत म्हणाले, "तुम्ही दोघं,
ही
बॉडी आणि ही सायकल घेऊन डॉ. गोखलेंच्या लॅबला जा. तुम्ही दोघं आमच्या बरोबर चला.
आपल्याला गोरेगावला जायचं आहे... कम ऑन..." सर्वजण पांगले. जीप सुरू झाली.
सचिन म्हणाला, "एक माणूस, जो काही क्षणांपूर्वी ठणठणीत होता, तो अचानक
मेला... उमा म्हणाली, "सर, काय प्रकार
असावा हा..." प्रधान विचार करत होते. आनंद म्हणाला, "सर,
बॉडी
आत्तापर्यंत लॅबमध्ये पोहोचली असेल..." थोड्याच वेळात प्रधानांचा फोन
वाजला...
फोन घेत प्रधान
म्हणाले, "हां बोला डॉक..." पलिकडून डॉक्टर गोखले बोलत होते,
"प्रधानसाहेब, सायकल तर साधीच आहे. सायकलवरच्या
रक्ताचे थेंबही याच माणसाचे आहे. गडबड या माणसाच्या शरीरात आहे. याच्या हृदयाजवळ
मला काही मेटलचे तुकडे सापडले आहेत, आणि यांच्या मेंदूत एक चिप पण मिऴाली.
प्रधानसाहेब, त्यापैकी एका तुकड्याला एक तार आणि एक टायमर जोडला होता. ती तार
हृदयाच्या आत गेली आहे. ती तार पूर्ण काळी पडली आहे. मला वाटतं चिपने टायमर सुरू
केला आणि मेटलला लागलेल्या तारेतून डायरेक्ट हृदयाला शॉक दिला गेला. हृदय बंद पडलं
आणि हा बॉम्ब असावा जो ट्रिगर झाला. हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय..."
प्रधानांनी फोन ठेवला आणि सर्वांना चलण्याचा इशारा केला. प्रधान गंभीरपणे विचार
करत जीपमध्ये शांत बसले होते...
थोड्याच वेळात
जीप्स हब मॉलच्या आवारात पोहोचल्या. सर्वजण जीप्समधून उतरले. तिथे लोकांची धावपळ
सुरू होती. एकाची वाट अडवून सचिनने धावपळीचं कारण विचारलं तर तो म्हणाला,
"एका माणसाने तिसऱ्या मजल्यावर उडी मारली. आणि खाली येता येता त्यांच्या
हृदयात स्फोट झाला..." हे ऐकून प्रधान आणि सगळी टीम घटनास्थळी धावली. ग्राऊंड
लेव्हलच्या रेलिंगला चिकटून माणसं खालच्या दिशेने पाहत होती. प्रधानांची टीम तिथे
पोहोचली. सर्वांनी खाली डोकावलं. खाली रक्ताच्या थारोळ्यात एक माणूस निपचित पडला
होता. प्रधानांनी आनंद आणि सचिनला इशारा करताच दोघं खाली गेले. प्रधान बघ्यांकडे
तोंड करत म्हणाले, "कोणी मला सांगेल का इथे काय
घडलं..." एक माणूस पुढे येत बोलू लागला, "सर, मी
सांगतो काय झालं. मी संतोष. तो माणूस जो खाली पडला आहे, त्याचं नाव
विनय. आम्ही दोघं इथेच कामाला आहोत. मी थियेटरमध्ये जाणाऱ्या लोकांची तिकीटं गोळा
करतो आणि विनय बुकिंग ऑफिसमध्ये बसतो...
आता थोड्या
वेळापूर्वी हा विनय वर येताना दिसला. मी खाली पाहिलं तर तिकिटांसाठी लाईन लागली
होती. ती रांग सोडून हा वर का येतोय हे विचारायला मी विनयला हटकलं तर मला थांबत
म्हणाला, की तो फोनवर बोलतोय. पण त्याचे हातही मोकळे होते आणि कानही. आणि बोलत
काय होता तर मैं ऊपर जा रहा हूँ... अब क्या करू... बोलता बोलताच विनयने उडी मारली.
हवेतच स्फोट झाला आणि..." संतोष बोलायचा थांबला. उमाकडे पाहत प्रधान म्हणाले,
"सेम एम.ओ. ऍज द फर्स्ट..." उमानेही होकारार्थी मान हलवून
प्रधानांना दुजोरा दिला. तेवढ्यात आनंद आणि सचिन वर आले. सचिन म्हणाला,
"सर हा पण तसाच मेला आहे. हृदयाजवळ स्फोट आणि डेथ..."
प्रधानांसमोर एक दुमडलेला कागद धरत आनंद म्हणाला, "सर, हा
कागद त्याच्या पॅंटच्या खिशात होता..." प्रधानांनी तो कागद उलगडून वाचला,
"प्रधान... अब तीसरे शिकार की बारी... अंधेरी मार्केट पहुंच... जल्दी
जा..."
प्रधानांनी तो
कागद दुमडून खिशात ठेवला. काही क्षण बॉडीकडे पाहत ते म्हणाले, "उमा,
तू
ही बॉडी घेऊन डॉककडे जा. आम्ही सगळे अंधेरी मार्केटला जातोय. द मॅटर सीम्स व्हेरी
सीरियस. लेट्स मूव्ह फास्ट..." उमा बॉडीला घेऊन डॉ. गोखलेंच्या लॅबकडे रवाना
झाली आणि बाकी सगळे जीप्समधून अंधेरीला निघाले. प्रधान अजूनही गप्पच होते. सचिन
म्हणाला, "सर काय प्रकार असेल हा... तासाभरात एकाच प्रकारचे दोन मृत्यू,
आणि
तेही आपल्या समोर..." सचिनला दुजोरा देत आनंद म्हणाला, "पहिल्या
मृत्यूनंतर बरोब्बर एका तासाने दुसरा मृत्यू झालाय. आता तिसरी व्यक्ती अंधेरीला
आहे. गजबजलेल्या ठिकाणी एखाद्या अनोळखी व्यक्तीला शोधणार कसं..." आनंद आणि
सचिनकडे पाहत प्रधान म्हणाले, "आपण कदाचित या तिसऱ्या व्यक्तीला वाचवू
शकणार नाही. ही ह्यूमन बॉम्ब्सची चेन वाटते. दोन्ही वेळेला स्फोट होण्यापूर्वी
विक्टिम कोणाशीतरी बोलत होते. डॉक म्हणाले विक्टिमच्या मेंदूजवळ एक चिप होती. त्या
चिपमधून तर... कम ऑन डॉक... गिव्ह मी सम गुड न्यूज..."
प्रधान बोलतच
होते, की त्यांचा फोन वाजला. डॉ. गोखले कॉल करत आहेत हे पाहून प्रधानांनी
फोन स्पीकरवर टाकला आणि म्हणाले, "बोला डॉक..." पलिकडून डॉ. गोखले
म्हणाले, "प्रधानसाहेब, दोन्ही मृत्यू एकाच प्रकारे झालेत.
याही वेळेला तशीच चिप आणि कॉपरचे ट्रेसेस सापडलेत, जसे पहिल्यावेळी सापडले होते.
मृख्य म्हणजे या दोन्हीही चिप्सची फ्रीक्वेंसी मॅच होते. याच चिप्समधून मेसेज पास
होत असावेत. वर्स्ट स्टिल, या फ्रीक्वेंसीचे सिग्नल्स, मुंबईतल्या
बावीस वेगवेगळ्या जागांवरून येत आहेत. म्हणजे असे बावीस जण अजून आहेत. उमा ते सर्व
co-ordinates
तुम्हाला पाठवते आहे. प्रधानसाहेब, सर्वांना जिवंत पकडा. त्यांच्या मेंदूजवळ
लावलेली चिप self-destructive
आहे, जी हृदयाच्या
ठोक्यांशी जोडलेली आहे. Use tranquilizers to gain control. All the
best..." कॉल कट झाला. त्याच वेळी प्रधानांना पिक्चर मेसेजेस आले...
सर्वांकडे पाहत
प्रधानांनी फोन केला, "हॅलो, कंट्रोल रूम...
मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय. कोण जाधव का... हां... मी काय सांगतोय ते नीट
ऐका. एक मोठं मिशन आपल्याला पार पाडायचं आहे.
मी आता काही co-ordinates
आणि एक फ्रीक्वेंसी पाठवतो आहे. आपल्या साध्या वेशातल्या माणसांचे तीन किंवा चारचे
गट बनवून त्या त्या co-ordinatesवर
पाठवा. ट्रांसमीटर्सवर असलेल्या फ्रीक्वेंसीशी मॅच होणारी फ्रीक्वेंसी मी दिलेल्या
co-ordinatesवर
एखाद्या व्यक्तीत असेल. त्या व्यक्तीला tranquilizersने neutralize
करून डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये घेऊन जा... त्या सगळ्या व्यक्ती गजबजलेल्या ठिकाणी
असू शकतील. पब्लिकला काही समजणार नाही अशा पद्धतीने हे ऑपरेशन पूर्ण व्हायला हवं.
आत्ताच्या आत्ता कामाला लागा. मी पुन्हा सांगतोय, Use only tranquilizers.
No bullets. Nobody, I repeat, nobody should die... Get going at once... Over
and out..."
फोन ठेवत मेसेजमध्ये
आलेल्या नकाशाकडे पाहत प्रधानांनी घड्याळ पाहिलं आणि म्हणाले, "आपल्याकडे
पुरेसा वेळ आहे. लेट्स मूव्ह टू फाऊंटन... या co-ordinatesनुसार शेवटची फ्रीक्वेंसी फाऊंटनला आहे. होप आपली इतर माणसं बॉम्ब
असलेल्या बाकी व्यक्तींना जिवंत पकडून डॉककडे नेतील..." इतकं बोलून प्रधान
गप्प झाले. गाडी वेगाने फाऊंटनच्या दिशेने जाऊ लागली. वायरलेसवर फ्रीक्वेंसी
चिपधारक एकेक व्यक्ती पकडल्या गेल्याचं आणि त्या व्यक्तीला डॉ. गोखलेंकडे नेलं जात
असल्याचं रिपोर्टिंग होत होतं. याच दर्म्यान प्रधान व त्यांची टीम फाऊंटनजवळ
पोहोचली. तिघंही खाली उतरले. प्रधानांनी ट्रांस्मीटर ऑनच ठेवला होता.
फ्रीक्वेंसीचा लाल दिवा मॉनिटरवर एका दिशेला दिसत होता. प्रधानांनी आनंद आणि
सचिनला समोरच्या बिल्डिंगकडे बोट दाखवत आधी पाच, मग तीन असे
इशारा करून हात गोल फिरवला. आनंद डावीकडे वळला तर सचिन उजवीकडून निघाला आणि
प्रधानांनी समोरून जाण्याचा निर्णय घेतला...
ती एक दुमजली
जुनाट इमारत होती. दाराजवळ पोहोचताच प्रधानांनी घड्याळ पाहिलं. फाऊंटनपासून
इथपर्यंत यायला बरोब्बर पाच मिनिटं लागली होती. दाराशेजारी उभे राहत प्रधानांनी
एकेक सेकंदाच्या फरकाने तीन बोटं मोजली आणि दाराला लाथ मारली. तिथे आनंद आणि
सचिननेही तीन बोटं मोजून आपापल्या बाजूने वर जायला सुरुवात केली. काही क्षणातच
प्रधान छतावर पोहोचले. दार आतून बंद होतं. प्रधानांनी लाथ हाणून दार उघडलं. समोर
एक माणूस पाठमोरा उभा होता. त्याचवेळी प्रधानांच्या डावीकडचं दार ढकलून आनंद आणि
त्या माणसाच्या उजविकडची खिडकी तोडून सचिन आत आले. तिघांच्याही हातात बंदुका
होत्या. तो माणूस वळला आणि प्रधानांना सलाम करत म्हणाला, "सलाम
प्रधान साहब... मुझे तो लगा था मुझतक पहुँचने में आपको वक़्त लगेगा, लेकिन
जितना सोचा था, उससे बहुत ज़्यादा अक़्लमंद निकले आप..." तो माणूस बोलतच होता
की प्रधानांचा फोन वाजला. गन त्या माणसावर रोखतच प्रधानांनी फोन घेतला. पलिकडून
डॉ. गोखले बोलत होते, "प्रधानसाहेब, इथे आणलेल्या
तेवीस बॉडीजपैकी फक्त पहिल्या चार बॉडीजमध्ये बॉम्ब होता. त्यातले दोन तर आधीच
फुटले आणि एकचा वेळेआभावी इथे लॅबमध्ये स्फोट झाला. पण चवथा बॉम्ब निकामी करण्यात
यश आलं आहे मला. प्रधानसाहेब, हे साधे टाईम बॉम्ब होते, पण
त्या चिप्स हाय फ्रीक्वेंसीच्या होत्या..."
फोन बंद झाला.
फोन खिशात ठेवत दोन्ही हात बंदुकीवर स्थिरावून प्रधान त्या माणसाला म्हणाले,
"यह सब क्या है... कौन हो तुम... क्या चाहते हो..." तो माणूस हसू
लागला आणि हसता हसताच म्हणाला, "हा...
हा... यह खेल है प्रधान... इसमें तुम सब मोहरे हो, और तुम्हें यूँ
नचानेवाला मैं... इद्रीस... अब तक जो कुछ हुआ, वह सब मैंने
करवाया... मुझे लगा था, मुझे ढुँढने में तुझे देर लगेगी | पर मेरी उम्मीद
से ज़्यादा तेज़ निकले तुम लोग | अब तुम जिस मुक़ाम पर खड़े हो, वह
इस खेल का सबसे दिलचस्प और आख़री पड़ाव है | मैंने कहा था ना,
मेरा
चौबीसवाँ स्लीपरसेल सारी मुंबई को तबाह कर देगा... मेरा वह आख़री स्लीपरसेल,
ख़ुद
मैं हूँ | यह मेरे हाथ में जो ट्रान्समीटर है, उससे मैं सबको
कंट्रोल कर रहा था | तुम लोग मुझे ढूँढ़ रहे हो, इसका पता भी चल रहा था मुझे | पर
मैंने तुम्हें यहाँ तक आने दिया | अब, इस खेल का सबसे
दिलचस्प पड़ाव...
मेरे दिल के पास
भी एक टाईम बॉम्ब लगा हुआ है | यह कोई आम बॉम्ब नहीं, बल्कि
एक केमिकल बॉम्ब है | इसमें पहलेसे ही टाईमर चल रहा है | तुम्हारे यहां पाहुचते ही मैने वक्त बदल दिया | अब ठिक
तीन घंटों बाद या बम फट जाएगा और साथ में लगा हुआ केमिकल हवा में घुलकर हज़ार गुना
बढ़ जाएगा | लोग साँस लेंगे ज़िंदा रहने के लिए | लेकिन वह केमिकल
उनके सारे जिस्म को अंदर से जला देगा और कुछ ही पलों में तड़प तड़पकर मरेंगे लोग |
इस
बॉम्ब को डिफ्यूज करना नामुमकिन है | यह इतना छोटा है, कि
वहां तक इंसानी हाथ नहीं पहुँच सकता | अगर बॉम्ब को बंद भी किया, तो
भी यह अपना काम कर देगा | इसके टाईमर में ऐसा सेटिंग है, जिससे
बॉम्ब बंद होने से पहले जहरीला केमिकल वहां से आज़ाद हो जाएगा... अब तुम सोच रहे
होगे, कि मैंने तुम्हें यह सब क्यौं बताया... मेरे भाईजान की मौत तुम लोगों
ने अपनी आँखों से देखी थी ना, अब तुम्हारी मुंबई की तबाही का मंज़र
भी देख लो... तुम जीतकर भी हार गए प्रधान | अब, अगर
जीना चाहते हो, तो भाग जाओ यहां से... तीन घंटे है तुम्हारे पास... हा...हा...हा..."
इद्रीस हसत
होता. प्रधान, आनंद आणि सचिन आपापल्या बंदुकांवरची पकड घट्ट करत एकमेकांकडे पाहत
होते. हसता हसता इद्रीस म्हणाला, "क्या सोच रहे हो प्रधान... क्या करोगे
अब... मारोगे मुझे... तो मारो | चला दो गोली, और तीन घंटों के
बाद शुरू होनेवाले कहर की शुरुवात अभी से कर दो... हा...हा...हा..." इद्रीस
पुन्हा हसू लागला. प्रधानांनी सचिन आणि आनंदकडे पाहिलं. तिघांची नजरा-नजर झाली. आनंदने
इद्रीसच्या हातावर गोळी झाडली. त्याबरोबर त्याच्या हातातला ट्रांस्मीटर हवेत
उडाला. सचिनने तो व्यवस्थित झेलला. दुसऱ्याच क्षणी प्रधानांनी इद्रीसच्या मानेवर
नेम धरला आणि चाप ओढला. क्रूर हसणारा इद्रीस बेशुद्ध होऊन क्षणार्धात जमिनीवर
कोसळला. बंदुका होस्टरमध्ये ठेवत तिघंही इद्रीसजवळ पोहोचले. तिघांनी त्याला उचललं
आणि खाली आणून अलगद जीपमध्ये ठेवलं. जीप डॉ. गोखलेंच्या लॅबच्या दिशेने निघाली.
आनंद आणि प्रधान पुढे बसले. सचिन इद्रीसजवळ होता. त्याची नजर इद्रीसच्या
हातावरच्या घड्याळावर गेली. दोघांकडे पाहत सचिन म्हणाला, "सर,
हे
घड्याळ नाही. हा टायमर आहे. यात २:५०ची वेळ आहे आणि सेकंद मागे मागे जात
आहेत..." डोळे रस्त्यावर ठेवत आनंद म्हणाला, "२:५०... म्हणजे
दोन तास आणि पन्नास मिनीटं. इद्रीसचा तो टायमर... आता..." इद्रीसकडून आनंदकडे
नजर घेत प्रधान म्हणाले, "आनंद, जीप डॉककडे नको.
डॉ. विद्यानंदांच्या घराकडे घेऊन चल... मेक इट फास्ट..."
प्रधानांनी फोन
काढून उमाचा नंबर लावला, "हॅलो उमा, या इद्रीसला
घेऊन आम्ही डॉ. विद्यानंदांकडे जात आहोत. द मॅटर में बी सीरियस. आय विल कीप यू
पोस्टेड..." कॉल कट झाला. डॉ. गोखलेंकडे पाहत उमा म्हणाली, "सरांचा
कॉल होता. इद्रीसला घेऊन सर्वजण डॉ. विद्यानंदांकडे जात आहेत. सर म्हणाले, की
काहीतरी सीरियस आहे. बरं मी तिथे पोहोचायचं की नाही याबद्दल ते काहीच बोलले नाहीत.
काय अर्थ असू शकतो याचा..." विचार करत डॉ. गोखले म्हणाले, "डॉ.
विद्यानंद... पण कशासाठी... बंकरमध्ये असलेली डॉ. विद्यानंदांची प्रयोगशाळा... कम
ऑन उमा. वी मस्ट ऑल्सो गो देयर..." तिथे प्रधानांनी डॉ. विद्यानंदांना कॉल
केला, "हॅलो. डॉ. विद्यानंद... मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय. आम्ही
तुमच्या घरी येत आहोत. वी नीड युअर हेल्प..." कॉल कट झाला. प्रधानांच्या
डोक्यात काय चाललंय ते सचिन आणि आनंद, दोघांनाही समजलं होतं. दोघांनी
एकमेकांकडे पाहून स्मित केलं आणि सचिनने गाडीचा स्पीड वाढवला...
डेड लाईन २ तास
३५ मिनीटं...
गाडी गेटजवळ
पोहोचली. डॉ. विद्यानंद दारातच उभे होते. प्रधानांना पाहून ते पुढे आले. दोघांनी
हस्तांदोलन केलं आणि प्रधान म्हणाले, "डॉ. विद्यानंद,
आधी
तुमच्या लॅबमध्ये चला. वी हॅव व्हेरी लेस टाईम..." इद्रीसला घेऊन तिघंही आत
जाणार इतक्यात एक जीप तिथे आली आणि त्यातून उमा आणि डॉ. गोखले उतरले. त्या दोघांना
पाहून प्रधानांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले, "उमा, डॉक,
तुम्ही
इथे..." डॉ. गोखले म्हणाले, "तुम्ही काय करणार आहात याचा अंदाज आला
आम्हाला. म्हणून आम्ही दोघं आलो इथे..." डॉ. गोखलेंना दुजोरा देत उमा म्हणाली,
"येस सर. आपण एक टीम आहोत. सगळी आव्हानं एकत्र झेलू..." हे ऐकताच
प्रधान, आनंद आणि सचिनने स्मित केलं. गोंधळलेले डॉ. विद्यानंद म्हणाले,
"काय चाललंय मला कोणी सांगेल का... इं. प्रधान, तुम्ही इथे
कसे... आणि हा माणूस कोण आहे..." डॉ. विद्यानंदांकडे पाहत प्रधान म्हणाले,
"सगळं सांगतो डॉक्टर. पण इथे नको. तुमच्या लॅबमध्ये पोहोचू आधी. बिईंग
हियर इज टू डेंजरस..." डॉ. विद्यानंदांना प्रधानांचं म्हणणं पटलं आणि सर्वजण
आत गेले...
डेड लाईन २ तास
२० मिनीटं...
जमिनीच्या दोन
मजले खाली असलेल्या डॉ. विद्यानंदांच्या प्रयोगशाळेत सर्वजण पोहोचले. इद्रीसला एका
बेडवर अलगद ठेवण्यात आलं. डॉ. गोखले इद्रीसच्या छातीचं स्कॅन करू लागले. सर्वांकडे
पाहत डॉ. विद्यानंद म्हणाले, "इं प्रधान आता तरी सांगा हा काय प्रकार
आहे... कोणा आहे हा माणूस..." इद्रीसकडून डॉ. विद्यानंदांकडे पाहत सी. इं.
प्रधान सर्व हकीगत सांगत म्हणाले, "म्हणून आम्ही इद्रीसला इथे घेऊन आलो.
गॅस लीक झालाच तर तो तुमच्या लॅबमधून बाहेर नाही पडू शकणार याची खात्री आहे
आम्हाला..." डॉ. विद्यानंद थोडे हसले पण लगेच म्हणाले, "पण
इं. प्रधान, तो बॉम्ब फुटला आणि त्या विस्फोटाने भिंतींना थोडीशी जरी चीर पडली तर
तो गॅस बाहेर जाऊ शकतो..." डॉ. विद्यानंदांना दुजोरा देत डॉ. गोखले म्हणाले,
"ही इज राईट प्रधान साहेब. याच्या शरीरात बसवलेला बॉम्ब साधा नाही.
इट्स अ न्यूट्रॉन बॉम्ब. तो जर फुटला तर काय होऊ शकतं याची कल्पनाही करवत
नाही..."
डॉ. गोखलेंच्या
विधानाने सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सी.इं. प्रधान म्हणाले, "मग
एकमेव उपाय राहिला. डॉ. विद्यानंद, तुमच्या प्रयोगाची ह्यूमन टेस्टिंग...
तुम्ही हा प्रयोग आमच्यावर करा. याच्या शरीरात जाऊन आम्हाला हा कहर थांबवावा
लागेल..." हे ऐकून डॉ. विद्यानंद चाट पडले. ते म्हणाले, "पण
इं प्रधान, प्रयोग अजून अर्धवट आहे. काही विपरीत घडलं तर... 'प्रॉजेक्ट
आयडेंटिटी'च्या वेळी उमा मृत्यूच्या दाढेतून परत आली, आठवतंय
ना..." डॉ. विद्यानंदांकडे पाहत प्रधान म्हणाले, "मला सगळं आठवतंय
डॉक्टर. बट वी हॅव टू टेक धिस चान्स. देयर इज नो ऑप्शन... सचिन आणि आनंद, तुम्ही
दोघं माझ्या बरोबर असणार आहात. डॉक, तुम्ही इथून आम्हाला गाईड करा. उमा,
जर
काही विपरीत घडलंच, तर डॉ. विद्यानंद आणि डॉ. गोखलेंना सुरक्षित जागी नेण्याची जबाबदारी
तुझी..." सर्वांनी अंगठे दाखवून सहमती दर्शवली. डॉ. गोखले म्हणाले,
"पण प्रधान साहेब, या इद्रीसच्या हृदयापर्यंत तुम्ही
पोहोचणार कसे... याचं बी.पी. नॉर्मल आहे, पण तरी ओपन हार्ट सर्जरी जरा ऱ्हिस्की
आहे. छातीच्या पिंजऱ्यातून खाली गेलात तर डायरेक्ट पंपिंग हार्टमध्ये जावं लागेल.
आणि तुम्हाला तर हार्टच्या बाहेर, खालच्या बाजूला जायचं आहे..."
डॉ. गोखलेंचं
म्हणणं ऐकून डॉ. विद्यानंद म्हणाले, "यावर माझ्याकडे उपाय आहे. मी हा प्रयोग
करत होतो ते मानवी शरीरातल्या कॉम्प्लेक्स सर्जरीजना सुकर करण्यासाठी, जेणेकरून
डॉक्टर्स शरीरातल्या सूक्ष्म जागी पोहोचू शकतील. हे जाणून मी एक डिव्हाईस तयार
केलं आहे. हे डिव्हाईस त्याच स्टेंटसारखं आहे, जे Angioplastyसाठी वापरतात.
हे स्टेंट याच्या शरीरात घालून त्याचं बलूनिंग करत ते स्टेंट हृदयापर्यंत जाऊ
शकतं. त्याच स्टेंटमध्ये बसून तुम्ही या इद्रीसच्या हृदयापर्यंत जाऊ शकाल..."
डॉ. विद्यानंदांचं म्हणणं नीट ऐकून घेत आनंद, सचिन आणि प्रधान
यांनी तयारी केली. प्रधानांनी इद्रीसच्या घड्याळात पाहिलं आणि सर्वांना म्हणाले,
"लेट्स मूव्ह. आपल्याकडे वेळ फार कमी आहे..." प्रधानांना दुजोरा
देत डॉ. विद्यानंद म्हणाले, "येस. खरंच वेळ कमी आहे. स्टेंटचा
बलूनिंग इफेक्ट तेवढाच वेळ राहिल जेवढा वेळ या लेझर गनचा इफेक्ट असेल. म्हणजेच एक
तास पंचावन्न मिनिटं... आता तुम्ही तिघं या चौकोनात उभे रहा..." सर्वांना
अंगठे दाखवत प्रधान, आनंद आणि सचिन चौकोनात उभे राहिले. लेझर गन सुरू झाली आणि क्षणार्धात
तिघंही दिसेनासे झाले...
डेड लाईन दोन तास एक मिनिट...
डेड लाईन दोन तास एक मिनिट...
स्वत: डॉ.
विद्यानंद, उमा आणि डॉ. गोखले या सर्वांनी डॉ. विद्यानंदांनी बनवलेले
मायक्रोस्कोपिक ग्लासेस डोळ्यांना लावले. त्या ग्लासेसने एखादी गोष्ट दसपट मोठी
दिसू शकत होती. तिघंही चौकोनाजवळ पोहोचले. डॉ. विद्यानंदांच्या हातात छोट्या
स्ट्रॉसारखं ते डिव्हाईस होतं. त्या डिव्हाईसची मागची बाजू एका लांब तारेने एका
सर्किट बॉक्सला जोडली होती. डिव्हाईसच्या पुढच्या बाजूला एक डबी होती जिचा पुढचा
भाग निमुळता आणि मागचा चौकोनी होता. चौकोनात प्रधान, सचिन आणि आनंद
अंगठे दाखवताना दिसत होते. ते निमुळतं डिव्हाईस चौकोनाच्या तोंडाशी ठेऊन डॉ.
विद्यानंद कानाला हात लावत म्हणाले, "इं. प्रधान, तुम्हाला
दिलेल्या हियरिंग एडवरच यापुढे आपण सगळे संपर्कात राहू. आता तुम्ही तिघं या
स्टेंटमध्ये जा. इंजेक्शनद्वारे हे स्टेंट आम्ही इद्रीसच्या जांघेतून आत घालू. या
सर्किटच्या सहाय्याने स्टेंटमध्ये करंट पास करून त्याचं बलूनिंग केलं जाईल
जेणेकरून पुढचा प्रवास सोपा होईल. एक गोष्ट लक्षात असू द्या इं. प्रधान...
स्टेंटचा बलूनिंग इफेक्ट तेवढाच वेळ राहिल जेवढा वेळ या लेझर गनचा इफेक्ट
असेल..." प्रधान, आनंद आणि सचिनने पुन्हा अंगठे दाखवले आणि तिघांनी डिव्हाईसमध्ये
प्रवेश केला...
डेड लाईन एक तास
पंचावन्न मिनिटं...
डॉ.
विद्यानंदांनी ते सिरिंजसारखं डिव्हाईस अलगद उचललं आणि इद्रीसच्या शरीरापर्यंत
नेलं. डॉ. गोखलेंनी सर्जरीची पूर्ण तयारी करून ठेवली होती. इद्रीसच्या जांघेत
त्यांनी ती आर्टरी शोधली, जी थेट हृदयापर्यंत जाते. जांघेच्या
त्या भागात डॉ. गोखलेंनी कापसाने केमिकल लावलं आणि एक इंसीशन म्हणजेच छोटा कट
दिला. रक्ताची छोटी चिळकांडी उडाली. डॉ. गोखलेंनी ती जागा साफ केली आणि डॉ.
विद्यानंदांनी पाच डिग्रीचा कोन पकडून डिव्हाईसला कटच्या तोंडावर ठेवलं. सर्किट
सुरू होताच डिव्हाईसने एखाद्या बाणासारखा इद्रीसच्या शरीरात शिरकाव केला. मॉनिटरवर
हे दृष्य बरंच मोठं आणि स्पष्ट दिसत होतं. डॉ. विद्यानंदांनी सर्किटचं दुसरं बटण
दाबलं तसं डिव्हाईस पुढे सरकत हळू-हळू फुगायला लागलं. मॉनिटरवर ते डिव्हाईस पुढे सरकाताना पाहत उमा
म्हणाली, "डॉ. विद्यानंद, तुम्ही आत्तापर्यंत ज्या वस्तूंवर
प्रयोग केलात, त्या सर्व दोन तासात पूर्ववत झाल्या. पण हे डिव्हाईस..." उमाकडे
पाहून हसत डॉ. विद्यानंद म्हणाले, "गुड observation उमा...
हे डिव्हाईस या
प्रयोगाच्या पहिल्या स्टेजचं प्रतीक आहे. पहिल्या स्टेजमध्ये गोष्टी अतिसूक्ष्म
कशा होतील यावरच मी भर दिला. नॉर्मल साईजमध्ये बनवून मग या डिव्हाईसवर मी पहिल्या
स्टेजमध्ये लेझर गन
चालवली. त्यामुळे हे डिव्हाईस लहानच राहिलं. पहिली स्टेज पूर्ण झाल्यावर मी
प्रयोगाच्या दुसऱ्या स्टेजकडे वळलो. या स्टेजमध्ये मी रिव्हर्स टेक्निक विकसित
केली. लेझर गनमध्ये
बदल केले. पण ही दुसरी स्टेज अजून पूर्ण नाही झाली. मॉडिफाईड लेझर गनने वस्तूंवर
प्रयोग केल्यावर त्या लहान तर झाल्या, पण काही वेळानंतर त्या आपोआप पूर्ववत
होऊन लगेच फुटू लागल्या. मी गनमध्ये अजून बदल केले. यावेळी मात्र मी वस्तू पूर्ववत
होण्याच्या वेळेवर आणि त्या फुटण्यावर काही अंशी कंट्रोल मिळवला. पण अजूनही हा
प्रयोग फूलप्रूफ नाही..." डॉ. विद्यानंद बोलत असताना उमाने स्क्रीनकडे
पाहिलं. स्टेंट बऱ्यापैकी आत गेलं होतं. डॉ. गोखले घड्याळ पाहून स्क्रीकडे नजर
वळवून म्हणाले, "कम ऑन ऑफिसर्स..."
डेड लाईन एक तास
पंचेचाळीस मिनिटं...
इद्रीसच्या
शरीरात ते डिव्हाईस हळूहळू पुढे जात होतं. छोट्या केबिनमध्ये बसलेले प्रधान,
आनंद
आणि सचिन केबिनला लावलेल्या काचेच्या आवरणातून बाहेर बघण्याचा प्रयत्न करत होते.
काहीतरी पुंजक्यांमध्ये मागे मागे जात असल्यासारखं वाटत होतं. तो द्रव पदार्थ
असावा असा अंदाज ते तिघं बांधत होते. सचिनच्या चेहेऱ्यावर स्मित उमटलं. प्रधानांनी
कारण विचारलं, तर सचिन म्हणाला, "सर, ट्रेनिंगमध्ये
आम्हाला सांगितलं जातं, गुन्हा थांबवायचा असेल तर गुन्हेगाराच्या बुटात पाय घालून विचार
करावा... आणि आज तर गुन्हा थांबवण्यासाठी आपण चक्क गुन्हेगाराच्या शरीरात प्रवेश
केलाय..." प्रधान आणि आनंद, दोघांनीही स्मित केलं आणि आनंद म्हणाला,
"ट्रू दॅट... विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत झालंय..."
डिव्हाईसच्या आत लावलेल्या कॅमेऱ्याकडे पाहून सेल्यूट करत प्रधान म्हणाले,
"हॅट्स ऑफ डॉ. विद्यानंद. तुमच्यामुळे मानवी शरीरातली ही दुनिया
आम्हाला काही अंशी का होईना पण बघायला मिळाली..." बोलणं सुरू असतानाच
डिव्हाईस एक झटका देऊन थांबलं...
कोणीतरी घण
मारावेत इतपत मोठा आवाज येत होता. हा आवाज कसला या विचारात तिघं असताना स्पीकरवर
डॉ. विद्यानंद बोलू लागले, “इं. प्रधान, डिव्हाईस
हार्टच्या खालच्या बाजूला येऊन पोहोचलं आहे. तुम्ही बसलात ती कॅप्सूल तुम्हाला
डिव्हाईसच्या तोंडाशी घेऊन जाईल. बलूनमध्ये व्हॅक्यूम तयार होईल आणि कॅप्सूलचं दार
उघडेल. तुम्ही घातलेले बूट कुठल्याही प्रकारच्या जमिनीवर तग धरू शकणारे आहेत.
तुम्ही तुमचे मास्क घाला आणि ऑक्सीजन सप्लाय सुरू करा..." तिघांनीही ऑक्सीजन
मास्क परिधान केले आणि कॅमेऱ्याकडे पाहून अंगठे दाखवले. तिघंही तयार आहेत हे
पाहताच डॉ. विद्यानंद म्हणाले, "त्या चौकानापासून हार्टपर्यंत
पोहोचायला तुम्हाला पसतीस मिनिटं लागली आहेत. याचा अर्थ, ही कामगिरी पार
पाडून पुन्हा डिव्हाईसमध्ये यायला आता फक्त एक तास आहे. सो ऑल द बेस्ट..."
इतकं बोलून डॉ. विद्यानंदांनी सर्किटचं एक बटण दाबलं. तिघं बसलेली काचेची कॅप्सूल
थोडी वर उचलली गेली आणि डिव्हाईसच्या तोंडाच्या दिशेने जाऊ लागली. समोर एक पोकळी
तयार होऊ लागली. त्या गोलाकार आकाराच्या पोकळीत कॅप्सूल अलगद येऊन बसली आणि
कॅप्सूलचं काचेचं आवरण बाजूला सरकलं. समोरचं दृष्य पाहून तिघंही थक्क झाले...
डेड लाईन
अठ्ठावन्न मिनिटं...
गडद गुलाबी छटा
असलेला, लाल रंगाचा एक मोठा डोंगर समोर होता. ते इद्रीसचं हृदय होतं. ते एका
लयीत वर-खाली होत होतं. तिघांनी सभोवताली नजर फिरवली. व्हेन्स आणि आर्टरीजचं जाळं
पसरलं होतं. वातावरण अंधारं होतं. तिघांनी आपापल्या कॉस्ट्यूमच्या वरच्या बाजूला
लावलेले दिवे सुरू केले. सगळीकडे काळसर लाल रंग पसरला होता. हार्ट जिथे सुरू होतं, तिथे आर्टरीजना
अडकवून एक बॉक्स होता. आनंदने तिथे बोट दाखवलं. तिघंही बॉक्सजवळ गेले. तोच होता तो
केमिकल बॉम्ब. बॉम्बच्या बाहेरच्या बाजूने दोन वायर्स वरच्या दिशेने गेल्या
होत्या. वायर्सकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "डॉक लूक... या
बॉम्बमधून दोन वायर्स दोन दिशांकडे निघून हार्टच्या वरच्या बाजूला जात आहेत.
बॉक्सच्या वरचं आवरण पारदर्शक आहे. आत तीन कन्टेनर्स आहेत. बाजूच्या
कन्टेनर्समध्ये हिरव्या रंगाचे सिलेंडर्स आहेत आणि मधल्या कन्टेनरमध्ये काळा
सिलेंडर आहे ज्यावर टामयर सुरू आहे..." डॉ. गोखलेंनी तिघांनाही त्या बॉक्सवर
फोकस द्यायला सांगितलं आणि तो बॉक्स न्याहाळत ते म्हणाले, "प्रधानसाहेब,
तो
मधला सिलेंडर बॉम्ब आहे आणि बाजूच्या सिलेंडर्समध्ये तेच घातक केमिकल आहे.
बॉक्सच्या वायर्समधली एक हार्टच्या आत तर एक ब्रेनमध्ये लागलेल्या चिपकडे गेली
असावी. त्या वायर्सना हात लावू नका. कन्टेनर्समधले तीनही सिलेंडर्स तुम्हाला एकाच वेळी काढावे लागतील...
डेड लाईन एकोणपन्नास
मिनिटं...
प्रधान, आनंद
आणि सचिन पुढे सरसावलेच होते, की डॉ. गोखलेंनी त्यांना हटकलं,
"स्टॉप... प्रधानसाहेब, सगळं शांत डोक्याने आणि स्टेप बाय
स्टेप करा. आधी ते काचेचं लिड उघडा..." बॉक्सला बाहेरच्या बाजूला दोन खटके
होते. सचिनने ते खटके वर केले आणि "खट्" असा आवाज करत लिड वर आलं. आनंद
आणि सचिन, दोघांनी मिळून ते लिड वर केलं. एक खटका बसून ते लिड नव्वद अंश कोनात
लॉक झालं. तिघांनीही आत डोकावलं. आत ते तीन सिलेन्डर्स आणि मधल्या सिलेन्डरवरचा
मागे जाणारा टायमर दिसत होते. तिघं आत डोकावतच होते तेवढ्यात डॉ. गोखलेंचा आवाज
आला, "प्रधानसाहेब, हे तीनही सिलेन्डर्स वेगवेगळ्या खाचेत
बसवले गेलेत. पण एक चौकोनी पट्टी दोन सिलेन्डर्सच्या मध्ये दिसत आहे. दॅट मीन्स हे
तीनही सिलेन्डर्स एकमेकांना जोडून बसवले गेले आहेत. एक जरी सिलेन्डर हलला तर... हे
तीनही सिलेन्डर्स एकत्र, एकाच वेळी उचलायला हवेत..."
प्रधान, सचिन आणि आनंदने एकमेकांकडे पाहिलं. सचिन आणि आनंद पुढे वाकलेच होते,
की
मोठा आवाज झाला आणि भूकंप झाल्यासारखं सगळं हललं...
तिघंही
एकमेकांना सावरत होते पण कंपनं थांबत नव्हती. कानाला हात लावत प्रधान म्हणाले,
"हे काय होतंय... ही कंपनं कसली..." माईकवर हा आवाज येताच उमा,
डॉ.
विद्यानंद आणि डॉ. गोखलेंनी स्क्रीनवरून नजर हटवत इद्रीसकडे पाहिलं. इद्रीस हालचाल
करत होता. त्याचे हात हलत होते आणि डोकं धीम्या गतीने उजवीकडून डावीकडे वळलं.
इद्रीसजवळ जात डॉ. गोखले म्हणाले, "औषधाचा अमंळ कमी होतोय. हा शुद्धीवर
येईल आता. याच्या हालचाली थांबवायला हव्यात..." एका टेबलचा ड्रॉव्हर उघडून एक
छोटी बाटली आणि एक सिरिंज काढत डॉ. विद्यानंद म्हणाले, "थांबा,
मी
याला पुन्हा बेशुद्ध करतो..." त्यांना थांबवत डॉ. गोखले म्हणाले,
"डॉक्टर वेट. यामुळे हा इद्रीस बेशुद्ध होईल, पण त्याच्या
शरीरात असलेल्या आपल्या टीमचं काय... दुसरा उपाय करायला हवा आपल्याला..."
इद्रीसच्या हालचाली वाढू लागल्या. कुठल्याही क्षणी तो डोळे उघडेल असं वाटत असतानाच
उमा झटकन त्याच्या डोक्याजवळ गेली आणि त्याच्या मानेवर एक जोरदार फटका मारला.
इद्रीसच्या हालचाली बंद झाल्या. तो पुन्हा बेशुद्ध झाला. स्क्रीनकडे पाहत डॉ.
गोखले म्हणाले, "थँक्स टू उमा एँड हर टेक्निक्स. इद्रीसची शुद्ध पुन्हा हरपली आहे. कम
ऑन प्रधानसाहेब..."
डेडलाईन सदतीस
मिनिटं...
इद्रीस पुन्हा
बेशुद्ध झाला. सचिन, प्रधान आणि आनंदला जाणवणारी कंपनं थांबली. तिघांनी पुन्हा बॉम्बकडे
मोर्चा वळवला. तिघांनी एकमेकांना खुणा केल्या. आनंद आणि सचिनने आपापल्या दोन्ही
हातांनी त्या तीनही सिलेन्डर्सना पकडून अलगद वर उचललं. सिलेन्डर्स बॉक्सच्या थोडे
वर येताच डॉ. गोखलेंचा आवाज आला, "होल्ड युअर पोझिशन्स बोथ ऑफ
यू..." आवाज ऐकताच सचिन आणि आनंद एकदम स्तब्ध झाले. डॉ. गोखले म्हणाले,
"प्रधानसाहेब, मधल्या सिलेन्डरच्या खालच्या बाजूने एक
वायर बॉक्सच्या आत गेलेली दिसते. दॅट मीन कनेक्शन्स बॉक्सच्या आत आहेत. ते सर्किट
उघडून तुम्हाला सिलेन्डरमधून निघालेली वायर वेगळी करायची आहे. पण बाकी कशालाही
स्पर्श करू नका..." प्रधानांनी बॉक्सच्या खालच्या बाजूला हात लावला तर तळ
हललं. दोन बाजूंना दोन खाचे होते. प्रधानांनी ते दोन्ही खाचे धरून वर केले तसा तो
तळही वर उचलला गेला. खाली वायर्सचं जाळं होतं आणि लाल, पिवळे, हिरवे
दिवे लुकलुकत होते. प्रधानांनी बॉक्समध्येच झाकण बाजूला उभं करून ठेवलं. मग
त्यांनी खिशात हात घालून एक कटर बाहेर काढला आणि मधल्या सिलेन्डरच्या बाजूने
निघालेली वायर सर्किटच्या जवळ कापली. सिलेन्डरवरचा टायमर बंद झाला. तेवढ्यात डॉ.
गोखलेंचा आवाज आला, "प्रधानसाहेब, बॉम्बचा टायमर
बंद झाला आहे. पण इद्रीसच्या मेंदूत लागलेली चिप अजूनही बॉम्ब ऍक्टिव्हेट करू
शकते. या बॉक्सच्या बाहेर असलेल्या वायर्ससुद्धा कापा..." डॉ. गोखले बोलतच
होते की डिव्हाईस अलार्म देऊ लागलं...
डेड लाईन सव्वीस
मिनिटं...
डॉ. विद्यानंद
म्हणाले, "इं. प्रधान, बलूनिंग इफेक्ट कमी व्हायला सुरुवात
होईल. काही क्षणात डिव्हाईस परत जायला निघेल. लवकर करा..." क्षणाचाही वेळ न
दवडता प्रधानांनी बॉक्सच्या बाहेर असलेल्या वायर्स कापल्या. आनंद आणि सचिनने तीनही
सिलेन्डर्स सॉकेट्समध्ये परत ठेवले. तिघांनी मिळून काचेचं झाकण बंद केलं आणि
बॉक्सला उचलून डिव्हाईसच्या तोंडाशी आणलं. प्रधान आणि आनंदने आत जाऊन बॉक्सला
खेचून स्थिरस्थावर केलं. तेवढ्यात दुसरा अलार्म वाजला. तोंडावर लावलेला फुगा
आकुंचन पाऊ लागला. सचिन अजून डिव्हाईसच्या बाहेरच होता. कमी होत चाललेला फुगा
पाहून त्याने एक उडी घेतली आणि तो बॉक्सजवळ येऊन पडला. कॅपस्यूल मागे येत आपल्या
जागेवर बसली. तिघांनी आपापले सीट बेल्ट्स बांधले आणि बॉक्सला घट्ट पकडून बसले.
डिव्हाईस मागे सरकू लागलं. बाहेर उमा म्हणाली, "डॉ. विद्यानंद,
अजून
किती वेळ लागेल डिव्हाईस बाहेर यायला... हा इद्रीस उठला तर..." स्क्रीनकडे
पाहत डॉ. विद्यानंद म्हणाले, "आय नो उमा, पण मी स्पीड
वाढवू नाही शकत. ते सिलेन्डर्स अजून सेफ झोन मध्ये नाहीत. चिप्सना धक्का लागून
सिलेन्डर्स लीक झाले तर..."
डेड लाईन दोन
मिनिटं...
डिव्हाईस इंसीशनच्या
जवळ पोहोचलं होतं. डॉ. विद्यानंदांनी सर्किटचं बटण दाबलं आणि डिव्हाईस इइंसीशनच्या
तोंडाशी येऊन थांबलं. डॉ. विद्यानंदांनी ते डिव्हाईस हळूहळू खेचून बाहेर काढलं.
डॉ. गोखलेंनी जखमेवर उपचार करत जखम बंद केली. डॉ. विद्यानंदांनी डिव्हाईसला
चौकोनाच्या तोंडाशी आणून ठेवलं आणि सर्किटवरचं बटण दाबलं. काचेचं आवरण दूर होऊ
लागलं. उमा लगेच किंचाळली, "कम ऑन सर... डॉ. विद्यानंदांच्या लेझर गनचा
इफेक्ट संपायला दहा सेकंदच उरली आहेत..." तिघंही डिव्हाईसमधून बाहेर येऊन
चौकोनात उभे राहिले आणि बॉम्बचा बॉक्स त्यांनी पायाशी ठेवला. झटक्यासरशी डॉ.
विद्यानंद उठले आणि त्यांनी सर्किटवरचं बटण दाबलं. लेझर गन सुरू झाली आणि पाहता
पाहता प्रधान, आनंद आणि सचिन सर्वांना दिसू लागले. "ब्राव्हो ऑफिसर्स
ब्राव्हो... एक अशक्यप्राय मिशन तुम्ही सक्सेस करून दाखवलंत..." असं म्हणत
डॉ. गोखलेंनी तिघांशी हस्तांदोलन केलं. उमा आणि डॉ. विद्यानंद टाळ्या वाजवत असताना
प्रधान म्हणाले, "या मिशनचं श्रेय तुम्हालाही आहे डॉ. विद्यानंद. तुमच्याच प्रयोगामुळे
आम्ही बॉम्बपर्यंत पोहोचू शकलो. आता तुमच्यावर अजून एक जबाबदारी सोपवायची आहे...
हा बॉम्ब आणि ते घातक केमिकलची. या केमिकलची तपासणी करून रिपोर्ट त्वरित
कळवा..."
तेवढ्यात इद्रीस
हालचाल करू लागला. त्याला पाहून उमाने विचारलं, "सर, या
इद्रीसचं काय... हा आता शुद्धीवर येईल..." आनंद हसत म्हणाला, "हा...हा...
याचं काय... आला शुद्धीवर तर येऊ दे की..." आनंदला दुजोरा देत सचिन म्हणाला,
"हो ना... याचा उपयोग फक्त इन्फो पुरताच... त्यानंतर याची तीच गत
होणार आहे जी कसाबची झाली..." इद्रीसकडे पाहत प्रधान म्हणाले, "चांगली
टेक्नोलॉजी वापरलीस इद्रीस, पण वाईट कामांसाठी... याच टेक्नोलॉजीचा
सदउपयोग करता आला असता. पण असो... मुंबईची परेड उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन कसा फेल
झाला या संभ्रमात तुझा भाऊ गेला... आता तूही हाच प्रश्न उराशी बाळगत जगत रहा...
तुला फाशी होईपर्यंत...
समाप्त.
@ अनिकेत
परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment