बसचा तो प्रवास...
बसचा तो प्रवास...
आहे एक सुंदर आठवण...
आजही मनाच्या एका कोपऱ्यात...
आजही मनाच्या एका कोपऱ्यात...
मी जपली आहे ती साठवण...
स्टॉपवर उभे सर्व चाकरमानी...
लक्ष ठेवायचे बसच्या वेळेवर...
माझी नजर मात्र रोखली असायची...
माझी नजर मात्र रोखली असायची...
तिच्या येण्याच्या दिशेवर...
ती येताना दिसताच...
आनंदून जायचो मी...
आमच्यामध्ये कधी बरेच प्रवासी...
आमच्यामध्ये कधी बरेच प्रवासी...
तर कधी आमच्यात नसायचंच कोणी...
सीट रिकामी झाली...
की तिलाच मी शोधायचो...
येताच ती जवळ...
लगेच मी जागा मोकळी करायचो...
गोड स्मित हास्य करून...
ती सीटवर बसायची...
स्टॉप येईपर्यंत मग...
स्टॉप येईपर्यंत मग...
खिडकीबाहेर पाहत रहायची...
स्टॉपमागून स्टॉप जायचे...
वेळ जायची उडून...
तिचं ते गोड हसू मात्र...
तिचं ते गोड हसू मात्र...
रहायचं मनात दडून...
अर्ध्या तासाच्या त्या प्रवासात...
आमच्यात संवाद व्हायचाच नाही...
हास्यांची देवाण-घेवाण फक्त...
हास्यांची देवाण-घेवाण फक्त...
शब्दांचा नंबरच लगायचा नाही...
हळूहळू ती माझ्या...
मनाचा वेध घेऊ लागली...
बसच्या धावत्या गर्दीपासून...
बसच्या धावत्या गर्दीपासून...
दूर मला नेऊ लागली...
तिच्या डोळ्यात पाहून मला...
द्यायची होती प्रेमाची ग्वाही...
पण शब्दच कसे हरवले माझे...
पण शब्दच कसे हरवले माझे...
हेच मला कळलं नाही...
दिवस गेले सरून...
वेळही गेली निघून...
मनातली ती भावना...
मनातली ती भावना...
मनीच राहिली अडकून...
आता वेगळ्या आहेत वाटा आमच्या...
वेगळे आहेत आमचे ध्यास...
पण आजही वाटतं पुन्हा सुरू व्हावा...
पण आजही वाटतं पुन्हा सुरू व्हावा...
आमच्यातला बसचा तो प्रवास...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment