ती...
आपल्या लहानग्या पावलांनी घरभर नाचून...
घरात आनंद भरणारी ती...
थोरल्या किंवा पाठच्या भावाशी खेळता...
त्याच्या खोड्या काढणारीही ती...
थोरल्या किंवा पाठच्या भावाशी खेळता...
त्याच्या खोड्या काढणारीही ती...
वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून...
शाळेला ओळख मिळवून देणारी ती...
पालकांना गुरूस्थानी मानत...
त्यांचा मान वाढवणारीही ती...
मैत्रीच्या विश्वात रमताना...
मैत्रीसाठी नेहमी हात देणारी ती...
एका गोड टप्प्यावर...
प्रेमाच्या कबूलीचा स्वीकार करणारीही ती...
संसाराची एक बाजू सांभाळून...
त्याला मोलाचा आधार देणारी ती...
नऊ महिने त्रास सहून...
एका जिवाला जन्म देणारीही ती...
आपलं दु:ख मनात ठेवून...
कोणालाही न सांगणारी सहनशील ती...
अन्यायविरुद्ध बंड पुकारत...
लढा देणारी वीरांगनाही ती...
सून, भावजय, वहिनी, ही नाती जपणारी ती...
ध्येयासाठी अवकाशात भरारी मारणारीही ती...
संथ वाहणारी शीतल सरिता आहे ती...
क्षणार्धात भस्म करणारी विद्युलताही ती...
अनेक रूपात समोर येणारी...
विधात्याची अनमोल भेट आहे ती...
संवेदनशील, प्रेमळ, कणखर अशी...
स्त्री आहे ती...
क्षणार्धात भस्म करणारी विद्युलताही ती...
अनेक रूपात समोर येणारी...
विधात्याची अनमोल भेट आहे ती...
संवेदनशील, प्रेमळ, कणखर अशी...
स्त्री आहे ती...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment