Sunday, July 5, 2020

शोध - दुसरा भाग...


या आधीच्या भागात आपण वाचलं...

जंगलात जखमी झालेली उमा बरी होते आणि डॉ. संजय तिला दिस्चार्ज देतच असतात की जतीन त्याच्या आजोबांना, मि. पांडुरंग काळे यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. काही क्षणातच डॉ. संजय जाहीर करतात की आजोबा इथे पोहोचण्या आधीच मरण पावले होते. काही दिवसांनी चौकीवर पांडुरंग काळे यांची फाईल पाहत असताना उमाला, मि. पांडुरंग यांची प्रकृती आणि त्याचं निधन, यात तफावत असल्यासारखं वाटतं. तिची शंका प्रधान उचलून धरतात. जतीनच्या घरी जाऊन चौकशी करत असतानाही प्रधानांना शंका येते आणि ते उमाला बाजूला बोलावतात...

दोघं बोलत असताना सचिन आणि आनंदला काही कागद सापडतात. कागदांवरून हे स्पष्ट होतं की मि. पांडुरंग काळे याचं खरं नाव पांडुरंग शेलार आहे. कागदात आलिबाग आणि एका तारखेचा उल्लेख पाहून प्रधानांना आलिबागजवळ एकेकाळी घडलेल्या एका घटनेची आठवण होते. त्या घटनेचा आणि पांडुरंग काळे यांनी उच्चारलेल्या शब्दांचा पाठपुरावा करण्यासाठी सगळे अलिबागला पोहोचतात. सगळी तयारी करून सचिन व आनंद पाण्यात उतरतात. खोलवर त्यांना काहीतरी दिसू लागतं...

सर्वजण खाली जातात तेव्हा त्यांना बोटीचे भगनावशेष सापडतात. एका खोलीतलं एक कपाट ते वर आणतात. कपाटात बराच ओला कचरा आणि एक वही सापडते. वहीत, पेशव्यांच्या काळातल्या एका घटनेचा उल्लेख असतो आणि वहीसोबत एक कागदही असतो. त्या कागदावर मुंबईतल्या एका किल्ल्याचा नकाशा असतो. प्रधान, आनंद, उमा व सचिन त्या किल्ल्यावर पोहोचतात आणि नकाशाच्या वाटेने चालू लागतात...

आता पुढे...

हे ऐकताच आनंद म्हणाला, "हाऊ डू यू से दॅट..." सचिन हसत म्हणाला, "सरएक टूरिस्ट म्हणून मी इथे खूप वेळा आलो आहे. असं म्हणतातकी या चर्चच्या खाली एक भुयारी मार्ग आहे. इथे या चौकनाच्या खालच्या बाजूला हे बाण दिसत आहेत बघा. तोच तो भुयारी मार्ग असावा. आधीही मला जायचं होतं तिथेपण संधीच नाही मिळाली कधी. आज हा चान्स मिळाला मला..." सचिनच्या पाठीवर थाप मारत प्रधान म्हणाले, "गुड वन सचिन... चलाआता चर्चचा परिसर शोधूकुठे  चोर दरवाजा सापडतो का..." उमा त्यांना थांबवत म्हणाली, "बाहेर नाही सरआपल्याला चर्चच्या आत जायला हवं..." उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, "शी इज राईट सरहा बाण चर्चच्या बाहेर नाहीतर आत दिसतो आहे..."

"नाईस ऑबझर्वेशन यू टू... लेट्स गो इन..." प्रधानांचे हे शब्द ऐकून आनंद व उमा हसले आणि चौघंही आत गेले. "आत तर आलोपुढे कसं जायचं..." सचिनच्या या प्रश्नावर सर्व विचार करू लागले. प्रधानांचा इशारा मिळतात सर्वांनी तिथल्या भागाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. एका ठिकाणी आनंदला तलवारीचं चिन्ह दिसलं. त्याने लगेच सर्वांना बोलावलं. प्रधानांनी ते चिन्ह पाहिलं. नकाशातल्या छोट्या चौकोनात असलेल्या तलवारीच्या चिन्हाशी हे चिन्ह जुळत होतं. प्रधानांच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. सर्वजण तो भाग नीट न्याहाळू लागले. उमाने सहज ते तलवारीचं चिन्ह दाबलं. त्यासरशी एक आवाज आला आणि चिन्हाच्या बाजूची जमीन सरकून तिथे एक भगदाड दिसू लागलं...

सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि भगदाडातून आत गेले. डाव्या बाजूच्या भिंतीवर अजून एक तसंच तलवारीचं चित्र होतं. भिंतीतून बटणासारखं बाहेर आलेलं ते चिन्हं प्रधानांनी दाबलं तर ते आत गेलं आणि वरची जमीन पुन्हा सरकून भगदाड बंद झालं. कुट्ट अंधार झाला. सर्वांनी आपापल्या हातातल्या टॉर्च चालू केल्या. आनंद म्हणाला, "म्हणजे हा खजिन्याकडे जाण्याचा व इथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो आहे. बाहेर कोणालाही कळू नये ही अशी रचना केली असावी..." "सरटू वे स्विचची सोय त्या काळापासून आहे तर..." सचिनने केलेल्या या कोटीवर सर्वांना त्याही परिस्थितीत हसू आलं. प्रधानांनी पुन्हा नकाशा काढला. तलवारीच्या चिन्हाच्या खालच्या बाजूला दोन दिशेने जाणारे दोन बाण होते. एका बाणाच्या वर १०० लिहिलं होतं आणि एका बाणापुढे फुली मारली होती...

"काय अर्थ असावा याचा..."प्रधानांच्या या प्रश्नावर विचार करत असताना उमा म्हणाली, "सर१०० म्हणजे शंभर पावलं तर नसतील. म्हणजे या बाणाची दिशा पकडून शंभर पावलं जायचं आणि मग हा क्रॉस. तिथे अजून काहीतरी असू शकतं..." उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "आय थिंक यू आर राईट उमादुसऱ्या बाणापुढे काहीच लिहिलं नाहीम्हणजे इथून गेलं तर डेड एंड असावा. या क्रॉसच्या दिशेने जायला हवं आपल्याला. कम ऑन..." सर्वजण निघणार इतक्यात आनंदच्या डोळ्यावर काहीतरी चमकल्यासारखं झालं. आनंदने टॉर्च तिथे मारला तर समोरच्या भिंतीवर आरसा लावलेला दिसत होता. आरशाजवळ जात, "इथे हा आरसा का लावला असावा.." हाच विचार चौघंही करू लागले...

सचिनला काहीतरी सुचलं. त्याने प्रधानांजवळचा नकाशा मागून घेतला व आरशासमोर धरला आणि म्हणाला, "सरनकाशात दाखवलेल्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जायचं आहे आपल्याला. हे बघाआरशातलं नकाशाचं प्रतिबिंब आणि इथे कोण कशाला आरसा लावेल..." म्हणत असतानाच सचिनने नकाशाच्या दिशेला पाऊल ठेवलं. पाऊल पडताच जमीन सरकली आणि खोल दरी दिसू लागली. सचिन सावध असल्याने लगेच मागे सरकला. तिघांनीही सचिनचं कौतुक करत विरुद्ध दिशेला वाटचाल सुरू केली. इतक्यात मोठा आवाज करत सरकलेली जमीन पुन्हा पूर्ववत झाली. काही क्षण आवाजाच्या दिशेने पाहत प्रधान म्हणाले, "खजिन्याच्या लालसेपोटी कितींनी इथे आपला जीव गमावला असेल... असोकीप मूव्हिंग..." सर्वजण सावधपणेआजू-बाजूचं निरीक्षण करत पुढे जाऊ लागले. आनंदला एका खाचेत काहीतरी दिसलं. त्याने ती वस्तू बाहेर काढली तर तो एक छोटा सुरा होता...

सिंहाच्या मुठीचा तो सुरा सर्वांनी पाहिला. काही क्षण विचार करून सर्व पुढे चालत गेले. आनंदला जसा सुरा सापडला तसंच भिंतीवरच्या एका खाचेत प्रधानांना घोड्याच्या मुठीचाआणि सचिनला हत्तीच्या मुठीचा सुरा सापडला. तीन छोटे सुरे पाहून चौघांनाही अचंभा वाटला खरा पण तिथे असं काहीच नव्हतं ज्यामुळे याचं स्पष्टीकरण मिळेल. तीनही सुरे जवळ ठेवत चौघं पुढे जाऊ लागले. शंभर पावलं चालल्यावर नकाशात दाखवल्याप्रमाणे एका भिंतीवर जळमटं भरलेल्या तीन खाचा होत्या. तीनही खाचांच्या खाली काहीतरी होतं. आनंद व सचिनने जळमटं व धूळ साफ केली तर तिथे चौकोनी आकारात काढलेले घोडासिंह आणि हत्ती दिसू लागले. तीनही प्राण्यांच्या खाली एका दिशेला वाळलेले बाण दिसत होते आणि चौकोनाच्या मधोमध काहीतरी लिहिलं होतं, "अश्ववनराजआणि गजंकरती रक्षण खजिन्याचे... जाल या वनातून पुढेठरवा मनासी परत न येण्याचे..."

प्रधानांनी थोडा विचार केला आणि जवळ असलेले तीनही सुरे एकेका खाचेत टाकले. तीनही सुरे त्या त्या खाचांमध्ये जाताच एक आवाज झाला आणि भिंत हलल्यासारखी झाली. काही क्षण सर्वजण तिथेच थांबले पण काहीच घडलं नाही. प्रधानांनी त्या लिहिलेल्या ओळींकडे पाहिलं आणि काही विचार करून प्रत्येक सुऱ्याच्या मुठीला बाणाच्या दिशेने फिरवलं. चावीसारखे तीनही सुरे फिरल्यावर पुन्हा मोठा आवाज झाला आणि भिंतीचा तो तुकडाच मागे सरकला. एक माणूस जाईल इतकी फट तिथे दिसू लागली. चौघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि फटीतून आत गेले. सर्वजण भिंतीच्या पलिकडे पोहोचताच भिंत पुन्हा सरकून पूर्ववत झाली. टॉर्चच्या प्रकाशात प्रधानांनी भिंत तपासलीपण तिथे एखादी खाच किंवा बटण असू शकेल असं काहीच नव्हतं. प्रधान म्हणाले, "सो वी आर ट्रॅप्ड हियर..."

चौघांनीही आपापले टॉर्च भिंतीच्या विरुद्ध दिशेला केल्या. तिथे तीन रस्ते दिसत होते. प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला एकेक प्राण्याचं चिन्हं दिसत होतं. प्रधान म्हणाले, "बहुतेक आपण खजिन्याच्या जवळ जात आहोत. इथून परत जाता येणार नाही. बाहेर दगडावरची ती ओळही हेच सांगत होती. एव्हरी वन बी अलर्ट... या तीन रस्त्यांपैकी एक बरोबर असावा..." पहिल्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या घोड्याच्या चिन्हाकडे बोट दाखवत सचिन म्हणाला, "धिस शुड बी द वन. बाहेर कोरलेला पहिला प्राणी घोडाच होता..." सगळे तिथे पाहत असताना आनंद म्हणाला, "हम्म... पण हे इतकं सोपं असेल का..." बोलता बोलता आनंदने खाली पडलेला एक मोठा दगड उचलून घोड्याच्या चिन्हाच्या रस्त्यावर टाकला. त्याबरोब्बर अचानक दोन्ही बाजूंनी सपासप बाण आले. हे पाहून सर्वजण चकित झाले...

सर्व विचार करत असताना प्रधान म्हणाले, "मागे त्या कोरलेल्या चिन्हांवरचे बाण चिन्हाच्या डाव्या दिशेकडे वळत होते. म्हणजे पहिला नाही तर तिसरा मार्ग आपला आहेकारण तोच या घोड्याच्या डाव्या दिशेला येतो..." सर्वांना प्रधानांचं म्हणणं पटलं आणि सगळे तिसऱ्या मार्गावर चालू लागले. हळूहळू मार्गक्रमण करत सर्व रस्त्याच्या शेवटी पोहोचले. तिथे भिंतीवरच्या एका खोबणीत एक वस्तू सर्वांना दिसली. आनंदने आजू-बाजूची धूळ साफ केली आणि पांढऱ्या रंगाचा तो छोटा त्रिकोण बाहेर काढला. त्रिकोण काढताच मोठा आवाज झाला आणि दगड खाली कोसळू लागले. रस्ता ओलांडून सर्वांनी पलिकडे जाऊन मागे पाहिलं. ज्या मार्गावरून सर्व आले होते तो सगळा दगडांनी भरून बंद झाला होता. सचिन म्हणाला, "असं तर नाहीकी आपण सापळ्यात अडकलो आहोत आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेत..."

हे ऐकून सर्वजण शांत उभे राहिले. उमा म्हणाली, "याचा दुसराही अर्थ होऊ शकतो. म्हणजे आता आपण खजिन्याच्या आणखी जवळ जात आहोत. म्हणूनही कदाचित हे सापळे लावले असतील..." उमाकडे पाहत प्रधानांनी अंगठा वर केला व म्हणाले, "उमायू में बी राईट ऑर में नॉट बी... सचिनतू ही बरोबर असू शकतोस. पण आता मागे जाण्याचे मार्ग बंद झालेत. सो लेट्स मूव्ह अहेड..." सर्वांनी होकारार्थी मान हलवली आणि समोर टॉर्च मारले. आता समोर दोन रस्ते दिसत होते. एकावर सिंहाचं चित्र होतंतर दुसऱ्यावर हत्तीचं. यावेळी दोन्ही चिन्हांखाली बाण कोरलेले होते. पण दोन्ही बाण चिन्हांच्या उजव्या दिशेकडे वळत होते. आनंद म्हणला, "सरआय गॉट धिस. या हत्तीचं चिन्हं असलेल्या रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे..."

सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत पाहिल्यावर आनंद म्हणाला, "बाहेरच्या चिन्हांवरचे बाण डाव्या दिशेला वळत होते. पण हे बाण उजव्या दिशेला वळलेले दिसतात. दॅट मीन्स इट इज अ ट्रॅप..." बोलता बोलता आनंदने सिंहाच्या चिन्हाच्या रस्त्यावर पाय ठेवला. त्याबरोब्बर एक भला मोठा दगड खाली कोसळला. आनंदने वेळीच उडी मारली आणि तो बचावला. हे दृष्य पाहून सर्वांनी डोळे मोठे केले. हत्तीचं चिन्हं असलेल्या रस्त्याकडे बोट दाखवत प्रधानांनी सर्वांना इशारा केला. रस्ता कापत शेवटापर्यंत पोहोचताच तिथे एका भिंतीत सर्वांना तसाच पांढरा त्रिकोण दिसला. खोबणीतून तो त्रिकोण काढताच मागचा रस्ता बुजून मार्ग पुन्हा बंद झाला. आता समोर एकच मार्ग दिसत होता आणि त्याच्या बाजूला हत्तीचं चिन्ह दिसत होतं. सर्वजण त्या मार्गावर जाणार इतक्यात सचिन ओरडलाच, "नो... वेट..."

सर्वजण सचिनकडे वळल्यावर तो म्हणाला, "आत्तापर्यंत सापळ्यांनी भरलेले तीन रस्ते आपण पार केले. चिन्हं असलेल्या विरुद्ध दिशेला जात आपण इथवर आलो. मग हा मार्ग इतका सोपा असेल का..." सर्वजण विचारात पडलेले पाहून सचिनने आनंदच्या मदतीने एक मोठा दगड उचलून त्या मार्गावर टाकला. त्यासरशी मार्गाच्या दोन्हीही बाजूंनी टोकदार भाले वेगाने समोरच्या भिंतींवर आदळले. हे दृष्य पाहून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. उमा म्हणाली, "नाऊ व्हॉट... धिस सीम्स टू बी डेड एंड..." आनंद म्हणाला, "कदाचित खजीना इथेच होता. इथून हलवला गेला तो. पण कसा काय..." हे ऐकून सचिन म्हणाला, "नक्कीच दुसरा कुठलातरी मार्ग असणार. इथवर येण्याचा मार्ग जर आहे तर बाहेर पडण्याचाही असणार..." हे सर्व ऐकत प्रधान हत्तीच्या चिन्हाकडे एकटक पाहत होते. त्यांचे डोळे मोठे झाले आणि ते म्हणाले, "टीम... आय हॅव गॉट धिस..."

मागच्या दोन्ही रस्त्यांवर मिळालेले दोन पांढरे चौकोन काढत प्रधानांनी हत्तीच्या दातांच्या जागी असलेल्या खाचेत बसवले. दोन्हीही चौकोन नीट बसताच मोठा आवाज करत भिंत हलली आणि मागे सरकली. पुन्हा माणूस इतकी फट दिसू लागली. सर्वजण फटीतून आत जाताच भिंत पुन्हा सरकून फट बंद झाली. सर्वत्र अंधार पसरला होता. टॉर्चच्या प्रकाशात भिंतीवर टांगलेली एक मशाल सर्वांना दिसली. सचिनने मशाल काढली पण ती पेटवायला साधनं कोणाकडेच नव्हती. आनंदने खाली पडलेल्यांपैकी दोन दगड उचलून एकमेकांवर घासून ठिणगी निर्माण करत मशाल पेटवली. मशाल पेटताच डोळे मोठे करत उमा म्हणाली, "सरलूक..." सर्वांनी त्या दिशेला पाहिलं तर नाण्यांनी व दागिन्यांनी भरलेले बॉक्स सर्वांच्या नजरेस पडले. बॉक्सेसपर्यंत पोहोचत असताना सर्वांना बंदुकीच्या दारूचा वास येत होता. प्रधानांनी नीट पाहिलं आणि सचिनच्या हातातली मशाल घेऊन दोन्ही बाजूच्या भिंतींना लावली...

दोन्हीही भिंतींच्या खोबणीत ठेवलेल्या बंदुकीच्या दारूने पेट घेतला आणि दुतर्फा असा आगीचा रस्ता तयार होत गेला. त्या आगीने संपूर्ण जागा प्रकाशमान झाली आणि समोर अमाप संपत्ती दिसू लागली. सोन्याचे दागिनेनाणीमाणकं पाहून सर्वांचे डोळे दिपले. "चांगलाच हुशार होता वाटतं तो सरदार... खजिना लपवण्यासाठी सापळे तयार करताना त्याने खजिना बाहेर काढण्याचा दुसरा मार्गही तयार केला..." असं म्हणत प्रधानांनी एका ठिकाणी बोट दाखवलं. तिथे पायऱ्या दिसत होत्या. एकावेळी दोन माणसं जातील अशा त्या पायऱ्या चढत सर्वजण एका भिंतीसमोर पोहोचले. त्या भिंतीवरही बालेकिल्ल्यातल्या जमिनीवर होतं तसं तलवारीचं चिन्हं कोरलेलं होतं. प्रधानांनी ते चिन्हं दाबलं आणि भिंतीचा तो भाग दार उघडावं तसा उघडला. सर्वांनी बाहेर वाकून पाहिलंतर तोच रस्ता सर्वांना दिसला जिथे आरसा लावला होता आणि जो दुभंगला होता...

प्रधानांनी सावधपणे पुढे टाकलं. पण काहीच घडलं नाही. हळूहळू सर्वजण बाहेर येऊन पोहोचले. तरीही मागची भिंत बंद झाली नाही. चालत चालत सगळे पुन्हा तलवारीच्या चिन्हाजवळ पोहोचले. सचिनने परत मागे जाऊन पाहिलं पण यावेळी जमीन तशीच्या तशी राहिली. प्रधान म्हणाले, "सो धिस इज इट... प्रेशर अलार्म टाईप सापळ्यांचा त्याही काळात वापर होता तर. हा संपूर्ण मार्ग सापळ्यांनी भरलेला वन वे होता आणि तो एकदाच पार करता येणार होता तर. खजीना बाहेर काढला की सगळे रस्तेकोडी आपोआप मातीमोल होणार अशा तर्हेची सगळी व्यवस्था होती तर. आनंदसचिनतुम्ही इथेच थांबा. आम्ही बाहेर जाऊन वाढीव कुमक घेऊन येतो. हा खजीना सरकार दरबारी जमा करायला हवा आपल्याला. त्यामुळेच मि. शेलारांच्या मेहनतीचं आणि त्यांच्या मुलाला झालेल्या मानसिक यातनेचं सार्थक होईल..." आनंद व सचिनने मान हलवल्यावर प्रधान व उमा तलवारीचं चिन्हं दाबून जिना चढून वर आले...

बाहेर पडताना उमा म्हणाली, "आपल्या नाकाखाली इतकी वर्ष हा खजीना दडलेला होताआय जस्ट डोंट बिलीव्ह..." उमाकडे वळत प्रधान म्हणाले, "उमामुंबईतच काय पण संपूर्ण भारतात इंग्रजमहाराज किंवा पेशव्यांच्या काळातली अनेक रहस्य कुठे कुठे दडली असतील. त्यातलं एक आज आपण शोधून काढलं. आय ऍम प्राऊड ऑफ माय टीम... खाली कुठलीच रेंज नव्हती. आता सर्वात आधी कंट्रोल रूमशी संपर्क साधून वाढीव कुमक बोलावून घेतो. हे सर्व धन सरकारी तिजोरीत जमा व्हायला हवं..." "होल्ड इट देयर... सीनियर इंस्पेक्टर प्रधान तुम्ही आणि तो खजीना कुठेही जाणार नाही..." प्रधान बोलत असतानाच आलेल्या या आवाजाने प्रधान व उमा दचकले. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर हातात पिस्तूल घेऊन डॉ. संजय समोर उभा होता...

प्रधानांचा व उमाचा हात लगेच त्यांच्या पिस्तुलांकडे गेला. हे बघताच आपल्या पिस्तुलाचा रोख प्रधानांकडे करत डॉ. संजय म्हणाला, "नो प्रधान... डोन्ट बी स्मार्ट. तुला काय वाटलंमी एकटाच आलो आहे... जरा अवती भोवती नजर फिरवा..." प्रधान व उमाने सभोवताली पाहिलं तर बरीच बंदुकधारी माणसं त्यांना घेरून उभी होती. डॉ. संजय म्हणाला, "पाहिलंस प्रधान... आता मागे राहिलेल्या तुझ्या दोन माणसांना सगळं धन वर आणायला सांग लगेचनाहीतर माझी ही माणसं तुम्हा दोघांना संपवून टाकतील..." प्रधानांनी आधी उमाकडे मग त्यांच्या घड्याळाकडे पाहिलं. घड्याळावरून उमाकडे नजर वळवत त्यांनी स्मित केलं. उमाला इशारा समजला. डॉ. संजयकडे वळत प्रधान म्हणाले, "डॉ. संजयतुम्हीच का नाही सांगत त्यांना... उमा डक..." प्रधान इतकं म्हणाले आणि उमा व प्रधान खाली बसले...

दुसऱ्याच क्षणी गोळ्या सुटू लागल्या आणि डॉ. संजयसोबत आलेला प्रत्येक माणूस गतप्राण होऊ लागला. काही समजण्याआधीच सर्व गुंड गतप्राण होऊन डॉ. संजय एकटा पडला. त्याने पडलेल्या माणसांच्या विरुद्ध दिशेला पाहिलं तर आनंद आणि सचिन हातात बंदुका घेऊन उभे होते. चिडलेल्या डॉ. संजयने प्रधानांवर गोळी झाडली. गोळी प्रधानांच्या हाताला चाटून गेली आणि उमाने लगेचंच डॉ. संजयच्या हातावर लाथ मारली. डॉ. संजयच्या हातून पिस्तूल वेगळं होताच आनंद व सचिनने त्याला पकडून हातात बेड्या अडकवून त्याला गुडघ्यांवर बसवलं. प्रधान पुढे येत म्हणाले, "डॉ. संजयआता बाजी आमच्या हातात आहे. तेव्हा आता पोपटपंची करानाहीतर या आनंद व सचिनचे हात खरोखर जगन्नाथ आहेत..." आधीच हादरलेल्या डॉ. संजयने दोघांकडे पाहिलं आणि म्हणाले, "नको नको. मला मारू नका. मी सांगतो सगळं...

त्या दिवशी मिस्टर जतीन त्यांच्या आजोबांना घेऊन आले तेव्हा ते आजोबा जिवंत होते. आय.सी.यू.मध्ये त्यांना इंजेक्शन देताच ते शुद्धीत आले व म्हणाले, "मला सगळं आठवत आहे. रामदास बोट बुडाली तेव्हा मी बोटीवरच होतो. माझ्याजवळ एक डायरी होती. तीही बोटीसोबत बुडाली. माझ्या वडिलांनी त्यात वसईच्या किल्ल्यातल्या खजिन्याबद्दल लिहिलं होतं. बोट हादरायला लागली तेव्हा मी तीच डायरी वाचत होतो पण एकच गोंधळ माजला आणि मी डायरी तिथेच पिशवीत गुंडाळून कपाटात ठेवली. डॉक्टरमला लवकर बरं करा. तो खजीना खरंच तिथे असेल तर तो शोधून काढायला हवा..." ते म्हातार्डं कोणाला काही बोलू नये म्हणून मी नर्स व वॉर्डबॉयला बाहेर पाठवलं आणि त्याच्या तंगड्या पकडून त्याला उलटं केलं. मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि मेला तो म्हातारा...

नंतर वसईच्या किल्ल्यात जाऊन मी शोधण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. जतीनकडून काही माहिती मिळेल म्हणून जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तुम्हाला तिथे पाहिलं. मला खात्री पटलीकी तुम्हीही खजिन्याच्या निमित्तानेच आला आहात. मी सावलीसारखा तुमच्या मागावर राहिलो. तुम्ही अलिबागला निघण्याआधी डिस्चार्ज पेपर्स साईन करण्याच्या निमित्ताने मी उमाला हॉस्पिटलला बोलावलं आणि एक ट्रांस्मीटर बग तिच्यावर बसवला. उमा मॅडमतुमच्या कॉलरच्या खाली ती छोटी काळी वस्तू पहा..." उमाने कॉलरखालून तो बग बाहेर काढला. डॉ. संजय पुढे म्हणाला, "काही वेळा पुरता जेव्हा संपर्क तुटलातेव्हा असं वाटलंकी तुम्ही सगळे आतच मरण पावले असाल. काही वेळ तिथे थांबून मी परत फिरणार होतो पण तेवढ्यात मला प्रधानांचा आवाज आला. पुढचं सगळं तर तुम्हाला माहितच आहे..."

डॉ. संजय गप्प झाला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "डॉ. संजयहावरटपणा खूप वाईट असतो. पैशाच्या हव्यासापाई तुम्ही खूनही केलात. पांडुरंग काळे यांच्या वडिलांचा हेतू चांगला होता आणि तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून आम्ही ही शोध मोहीम हाती घेतली. पण तुम्हीतुमचा हेतू वाईट होता आणि म्हणूनच तुम्हाला यश मिळू शकलं नाही. हे धन सरकारी खजिन्यातच जमा होणार आहे डॉ. संजयआणि पांडुरंग काळे यांच्या खुनाबद्दल यू आर अंडर अरेस्ट..."

समाप्त.

अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment