शब्द म्हणजे तरी काय हो...
तो असतो फक्त अक्षरांचा मेळ...
अक्षरे जुळून आली की...
सुरू होतो शब्दांचा खेळ...
लहानांचे ते शब्द गोडुले...
इतके असतात निरागस...
की नकारालाही मग प्रश्न पडतो...
नाही म्हणावं का खरंच...
शब्द असती लाडिक हळुवार...
शिंपडत जाती प्रीतीचा सडा...
काही कठोर शब्दांनी मात्र...
पाणावती आपल्या डोळ्यांच्या कडा...
काही शब्द धारदार...
जखमा रुजवतात खोलवर...
काही शब्द असतात औषध...
घालतात जखमांवर फुंकर...
शब्दांची ही दुनिया...
पहा असते मोठी न्यारी...
पसारा असतो अक्षरांचा...
पण अर्थांमध्येच गम्मत सारी...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment