क्लिप १ संपते...
स्क्रीनकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "क्लियरली या जेम्सच्या परिवाराला ओलीस ठेऊन बळजबरीने त्याच्याकडून हे काम करून घेतलं गेलं. पण बारा ड्रोन्स... इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोन्स का बनवून घेतले असावेत..." प्रधानांकडे पाहत डॉ. गोखले म्हणाले, "प्रधानसाहेब, पुढच्या क्लिपमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळू शकेल. बऱ्याच क्लिप्समध्ये ती माणसं खायला आणत आहेत, अधून-मधून डॉ. अन्सारी दिसत आहेत, असंच दिसतं. पण आता ज्या क्लिप्स आपण पाहू, त्यात आपल्याला काहीतरी वेगळं दिसेलही आणि कळेलही..."
क्लिप २३...
दार उघडतं. एक बुरखाधारी व्यक्ती आत येते. दुसरी बुरखाधारी व्यक्ती पहिलीच्या कानात काहीतरी सांगते. घड्याळाजवळ येत पहिली व्यक्ती म्हणते, "तो तुमने हमारा काम पूरा किया | बहुत खूब | वहाँ उस डॉ. अन्सारी ने भी ज़हर बना लिया है | अब पहले इनमें से किसी एक की टेस्टिंग होगी | अगर सब ठिक रहा, तो जेम्स, हम तुम्हें आज़ाद कर देंगे | यूसुफ मियाँ, आप कोई ऐसी जगह ढूँढ़ें जहाँ हम इस ड्रोन को टेस्ट कर सकें, लेकिन होशियारी से | ख़ुद को किसीपर ज़ाहिर ना होने दिजिए..." "आप फिक्र ना करें जनाब, मैं अभी जाता हूँ और टेस्टिंग के लिए जगह तलाश कर के आपको ख़बर करता हूँ..." हे म्हणून यूसुफ दाराबाहेर निघून जातो. घड्याळाजवळून पुन्हा आवाज येतो, "I gave you what you want, but you have not told me your intension..." बुरखाधारी म्हणतो, "फिर से इंग्लिश झाड़ने लगे तुम | कोई बात नहीं | अब तो तुम हमारे दोस्त बन चुके हो | तो तुम्हें हमारा मक़सद बता ही देते हैं... तुम्हारे इन ड्रोन्स से और अन्सारी की ज़हर भरी पिन्स से हम वह कारनामा करेंगे, कि हिन्दुस्तान मुल्क तबाह हो जाएगा और फिर, कश्मीर आपणे आप ही हमारा हो जाएगा... हा...हा...हा... नज़र रखो इन दोनों पर..." इतकं बोलून तो बुरखाधारी बाहेर निघून जातो...
क्लिप २३ संपते...
प्रधानांकडे पाहत उमा म्हणाली, "सर, काहीतरी मोठा कट शिजतोय..." उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, "आणि या कटाचा मुख्य सूत्रधार तो बुरखाधारी इसम..." आनंदचं वाक्य पुढे नेत सचिन म्हणाला, "पण कोण असावा हा बुरखेधारी..." "ते आपल्याला पुढच्या क्लिप्समध्ये समजेलच..." या वाक्याने सर्व चपापले. डॉ. स्क्रीनकडे बोट दाखवत बोलते झाले, "प्रधानसाहेब, या पुढच्या तीन क्लिप्स खूप महत्वाच्या आहेत. आपण लगेच त्या पाहू..."
क्लिप २७ सुरू होते...
बुरखेधारी इसम घड्याळाजवळ येत म्हणतो, "तुम्हारे ड्रोन को टेस्ट करने का वक़्त आ गया | यूसुफ मियाँ ने बड़ी सही जगह और सही शिकार ढूँढ़ा है | वह ख़ूद उस जगह यह सब देखेंगे और हम यहाँ से ड्रोन में लगे कॅमरे से देखेंगे..." तेवढ्यात दोन बंदूकधारी एका माणसाला घेऊन येतात. तो माणूस डॉ. अन्सारी असतो. त्याच्याकडे पाहत, "आइए डॉ. अन्सारी | आप ने बनाए ज़हर को भी परख लेते हैं..." इतकं बोलून तो बुरखेधारी टेबलवरची एक चौकोनी वस्तू उचलतो. काहीतरी खुडबूड करून एक बटण दाबतो. समोर ठेवलेल्या ड्रोन्सपैकी एक सुरू होतो आणि हवेत उडू लागतो. दुसरा एक बंदूकधारी दार उघडतो आणि ड्रोन त्यातून बाहेर पडतो. तो बुरखाधारी मागे वळत, "तुम भी देखो अपने बनाये हुवे ड्रोन का कमाल..." असं म्हणून ती चौकोनी वस्तू जेम्सच्या जवळ आणतो. जेम्सने हात वर केल्याने त्याच्या घड्याळातही ड्रोनच्या कॅमेऱ्याने टिपलेलं दृष्य दिसू लागतं...
तो बुरखेधारी त्या चौकोनी वस्तूवरची बटणं दाबत असतो. ड्रोन झाडीतून बाहेर पडतो. सगळीकडे अंधार असतो. एका बसक्या इमारतीत एक बँक आणि बाजूलाच एक ए.टी.एम. असतं. बँक ओलांडून मागच्या बाजूला जातो. तिथे एका झाडाआड ड्रोन हवेतच एका जागी स्थिर राहतो. थोड्याच वेळात एक माणूस ड्रोन समोर येतो. त्याने एक दार उघडलंच असतं, की तो बुरखेधारी इसम एक बटण दाबतो. तिकडे दारासमोरच्या व्यक्तीला झटका लागल्यासारखं होतं आणि तो उघड्या दारातच कोसळतो. "वाह, आपने बनाया हुआ यह ज़हर तो कमाल है डॉ. अन्सारी... इस डॉक्टर को उसके कमरे में ले जाओ..." ते दोन बंदुकधारी डॉ. अन्सारीला घेऊन जातात. तो बुरखेधारी पुन्हा त्या चौकोनी वस्तूवर खुडबूड करू लागतो. थोड्याच वेळात तो ड्रोन परत येतो आणि टोबलवर जाऊन स्थिरावतो. ती चौकोनी वस्तू बाजूला ठेवत तो बुरखेधारी म्हणतो, "जेम्स, तुम्हारा ड्रोन तो लाजवाब है | बस, अब यूसुफ मियाँ आ जाएँ, तो हम हमारे मक़सद के लिए निकल पड़ेंगे | और फिर तुम दोनों को आज़ाद भी तो करना है | दोनों पर नज़र रखना..." इतकं म्हणून तो बुरखेधारी आणि ते दोघं बंदूकधारी बाहेर निघून जातात आणि दार बंद होतं...
क्लिप २७ संपते...
स्क्रीनकडे पाहत उमा म्हणते, "त्या बिचाऱ्या यादवला मारताना यांना काहीच कसं वाटलं नाही..." उमाला दुजोरा देत सचिन म्हणाला, "कोरड्या काळजाचे आहेत हे गुन्हेगार. माणसं मारणं हा खेळ वाटतो त्यांना..." आनंद पुढे होत म्हणाला, "यादवला मारणं हे त्यांचं ध्येय नसावं. कारण टेस्टिंग करताना यादव मारला गेला..." आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, "राईट यू आर आनंद... ड्रोनची टेस्टिंग, यूसुफचं प्रेत, काहीतरी मोठं कारस्थान शिजतंय..." "प्रधानसाहेब, या सर्व शंकांचं निर्सन या पुढच्या क्लिपमध्ये होईल. बघा..." असं म्हणून डॉ. गोखलेंनी एक बटण दाबलं...
क्लिप ३१ सुरू होते...
दार बंद असतं. एक बंदुकधारी मुख्य दाराजवळ उभा असतो तर एक बाजूच्या दाराजवळ. तो बुरखाधारी खोलीत येरजारा घालत असतो, "अपने मक़सद की राह पर चलने का वक़्त आ गया है, और यह यूसुफ़ मियाँ पता नहीं कहाँ रह गये..." तेवढ्यात दार उघडतं आणि यूसुफ़ आत येतो. "माँफ़ करे भाईजान | आते वक़्त गाड़ी के असली मालिक ने गाड़ी को पहचान लिया | मैं वहाँ से तो निकल गया, लेकिन रास्ते में गाड़ी का रंग बदलने के लिए एक गराज में रुकना पड़ा | वहाँ सिग्रेट सुलगा ही रहा था, कि उस कमबख़्त मकैनिक ने मुझे देख लिया | उसे जहन्नुम पहुँचाकर उसकी लाश को गाड़ी की डिक्की में डालकर यहाँ आने में ज़रा देर हो गई..." तो बुरखाधारी वळतो. त्याच्या डोळ्यात क्रोधाची आग असते. तो पुन्हा वळतो आणि यूसुफच्या थोबाडीत मारतो. यूसुफ खाली पडतो. तो बुरखाधारी यूसुफची कॉलर पकडून त्याला उठवतो आणि म्हणतो, "आप जानते हैं मैं आपको थप्पड़ क्यौं मारा... आपसे सिर्फ देर नहीं हुई, बल्कि ग़लतियाँ भी हुई हैं...
जब गाड़ी के मालिक ने गाड़ी को पहचान लिया, तब आपको उस मालिक और गाड़ी, दोनों को खत्म करना चाहिए था | वह आपने किया नहीं | आपकी सिग्रेट पीने की तलब ने उस मकैनिक के सामने आपका चेहरा ज़ाहिर हो गया | देर तो मैं माँफ कर देता, पर ग़लतियाँ माँफ नहीं कर सकता..." इतकं म्हणून तो बुरखाधारी रिमोट उचलतो आणि म्हणतो, "यह ड्रोन कैसे काम करता है यह तो आपने देख लिया | अब, इसमें लगी पिन की चुभन का एहसास भी कर लिजिए..." बोलता बोलता तो बुरखाधारी रिमोटचं बटण दाबतो. ड्रोनचे पंखे फिरू लागतात आणि तो हवेत उडू लागतो. "नहीं भाईजान... नहीं... दोबारा ऐसा नहीं होगा भाईजान... नहीं..." असं म्हणत यूसुफ़ दाराबाहेर पळतो. ड्रोन त्याचा पाठलाग करत बाहेर जातो. थोडा वेळ रिमोटची बटणं दाबल्यावर तो बुरखाधारी म्हणतो, "ख़ुदा हाफिज़ यूसुफ़मियाँ | आप बड़े क़ाबिल थे, लेकिन आपकी ग़लतियाँ..." मग आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत म्हणतो, "हमारे मक़सद ग़लतियों की कोई गुंजाइश नहीं है..."
क्लिप ३१ संपते...
डॉ. गोखले म्हणाले, "या सगळ्या क्लिप्स मी पाहिल्या होत्या. ही शेवटची क्लिप पाहणार इतक्यात तुम्ही सगळे आलात. आता ही शेवटची क्लिप आपण सगळे पाहू...
क्लिप ३२ सुरू होते...
थोड्याच वेळात ड्रोन परत येऊन टेबलवर स्थिरावतो. तो बुरखाधारी रिमोट ड्रोनच्याच बाजूला ठेवतो आणि तिथे उभ्या बंदूकधाऱ्यांकडे पाहत म्हणतो, "सारा समान गाड़ी में भर लो | अब हम अपने मक़सद की ओर बढ़ेंगे | लेकिन सबसे पहले इन दोनों को आज़ाद कर देते हैं..." असं म्हणून तो बुरखाधारी आतल्या खोलीत जातो. तिथून आवाज येऊ लागतो, "तो डॉ. अनसारी, आपसे आख़री बार पूछता हूँ, हमारे साथ हाथ मिलाते हो... अभी भी नहीं... तो लो, में तुम्हें आज़ाद कर देता हूँ..." "ठिक ठिक ठिक..." असे तीन आवाज येतात आणि काहीतरी धपकन खाली पडतं. हातात पिस्तूल घेऊन तो बुरखाधारी बाहेर येतो. घड्याळापासून जरा लांब उभा राहत म्हणतो, "उस डॉक्टर को तो आज़ाद कर दिया मैंने | अब तुम्हारी बारी है जेम्स | तुम्हारी बिवी और बच्चा तुम्हारा ऊपर इंतज़ार कर रहे हैं | अरे हां... तुम्हें बताना भूल गया | वह दोनों सिर्फ़ तस्वीर खींचने तक ही ज़िंदा थे..." तेवढ्यात घड्याळाजवळून आवाज येतो, "You killed my family... I will... I will..." घड्याळाची हालचाल होते आणि एक काचेचा ग्लास त्या बुरखाधारी माणसाकडे भिरकावला जातो. बुरखाधारी एकाबाजूला होतो आणि ग्लास त्याच्या मागे असलेल्या टेबलवरच्या ड्रोनला जाऊन आपटतो. ग्लासचा चक्काचूर होतो आणि ड्रोन खाली पडून फुटतो. तेवढ्यात घड्याळावर काहीतरी आदळतं आणि व्हिडियो बंद होतो...
क्लिप ३२ संपते...
स्क्रीनकडे पाहत उमा म्हणाली, "अरे... व्हिडियो संपला..." उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, "हो ना. एकदम अचानकच संपला..." स्क्रीनकडे पाहत सचिन म्हणाला, "डॉक्टरसाहेब, यात अजून व्हिडियो नाहीत का..." चिप बाहेर काढत नकारार्थी मान हलवत डॉ. गोखले म्हणाले, "फक्त ३२ व्हिडियो होते. मला वाटलं या शेवटच्या क्लिप मध्ये आपल्याला काहीतरी महत्वाचं सापडेल. पण नो लक. निदान यांचा काय प्लॅन आहे ते समजलं असतं, तरी चाललं असतं. बहुतेक जेम्सने ग्लास फेकला तेव्हा कोणीतरी हातावर फटका मारला पण वार बसला घड्याळावर बसला आणि घड्याळ तुटलं..." सर्वांचं बोलणं सुरू असताना प्रधान स्क्रीनकडे पाहत हनवटी चोळत होते. मग सर्वांकडे पाहत ते म्हणाले, "No doc. I think we missed something. उमा, ही शेवटची क्लिप परत लाव आणि तोपर्यंत फॉर्वर्ड कर जिथे तो ग्लास भिरकावला गेला..." डॉ. गोखलेंकडून चिप घेऊन उमाने शेवटची फाईल सुरू केली. क्लिप पुन्हा सुरू झाली. उमाने फॉर्वर्डचं बटण दाबलं. ग्लास हवेत दिसला तेव्हा प्रधान लगेच म्हणाले, "Stop it and start it in slow motion..." उमाने तसं केलं. काही क्षणातच प्रधानांनी पुन्हा व्हिडियो थांबवायला सांगितला. सर्वजण स्क्रीनकडे पाहू लागले. स्क्रीनवर जमिनीकडे झुकलेला आणि स्क्रीनकडे वळलेला एक चेहेरा दिसत होता. तो चेहेरा पाहून सगळे अवाक झाले...
स्क्रीनकडे पाहत उमा म्हणाली, "सर, हा तर..." उमाचं म्हणणं पुढे नेत अनंद म्हणाला, "जमाल... अनेक देशांमध्ये वॉण्टेड असलेला दहशदवादी..." "पण हा जमाल इथे... भारतात... आणि ते ही मुंबईत..." डॉ. गोखलेंचं हे वाक्य ऐकत स्क्रीनकडे पाहत प्रधान म्हणाले, "जमाल आणि यूसुफचं मुंबईत असणं, राहिलेले अकरा ड्रोन, विषारी पिन... सचिन, मुंबईत होणाऱ्या मोठ्या फंग्शन्सची माहिती काढ लगेच..." सचिनने कॉम्प्यूटर तपासला आणि म्हणाला, "सर, मुंबईत दोन मोठे समारंभ आहेत. नेहरू सायन्स सेंटरवर जगभरातल्या सायंटिस्टची एक कॉन्फरन्स आहे. ग्लोबल वॉर्मिंग या विषयावरची ही कॉन्फरन्स उद्या संध्याकाळी सात वाजता आहे. दुसरा कार्यक्रम म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातली फ्रेण्डली क्रिकेट मॅच. ही मॅच उद्या दुपारी अडीच वाजता वानखेडेवर आहे. पण त्याआधी दुपारी बारा वाजता भर मैदानात सर्व पाकिस्तानी खेळाडूंचा सत्कार व नंतरच्या करमणूकीचे कार्यक्रम आहेत..."
हे ऐकताच प्रधानांचे डोळे मोठे झाले. त्यांनी थोडा विचार केला आणि वर पाहत म्हणाले, "James, you are genius..." मग जंगलातल्या घरातले सगळे फोटो टेबलवर मांडायला सांगितले. घाईघाईने सर्व फोटोंमधून हात फिरवत त्यांनी एक फोटो उचलला. तो फोटो सर्वांना दाखवत प्रधान म्हणाले, "या फोटोत जेम्सने मरण्याआधी स्वत:च्या रक्ताने ही अक्षरं लिहिली, POISAN... आपण शब्दाकडे आणि स्पेलिंगकडे पाहत होतो. पण हा फक्त एक शब्द नसून एक संदेश आहे... P... O... I... S... A... N... Pakistan On Indian Soil At Noon..." उद्या भर मैदानात त्या पाकिस्तानी खेळाडूंवर ड्रोन्सच्या मदतीने प्राणघातक हल्ला होणार आहे. जेम्स, मरतानाही तू देशभक्तीची भावना जपलीस. तुझं हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही... Team, we have a mission ahead. We know the place, we know the time... Lets do it..." असं म्हणत प्रधानांनी सर्वांकडे पाहिलं तर सर्वांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं...
प्रधान म्हणाले, "Ok... out with it..." त्यावर आनंद म्हणाला, "सर, वानखेडे मोठं स्टेडियम आहे. एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅक आणि बिल्डिंग्स. मग मैदानात ते ड्रोन्स येणार तरी कुठून..." यावर डॉ. गोखले म्हणाले, "तो तुटलेला ड्रोन आणि रिमोट मी तपासलेत. जवळ जवळ १५० ते २०० मीटर इतकी लांब रेंज आहे त्या ड्रोन्सची. त्यामुळे ते कुठूनही येऊ शकतात..." डॉ. गोखलेंचं बोलणं मध्येच तोडत सचिन म्हणाला, "ड्रोन्स स्वत:हून नाही येणार. अकरा ड्रोन्सचे अकरा रिमोट. आणि ते अकरा रिमोट वापरणारे अकरा अतिरेकी. ते अकरा अतिरेकी सापडले तर ते ड्रोन्स निकामी करता येऊ शकतील..." सचिनची पाठ थोपटत प्रधान म्हणाले, "बिंगो सचिन. स्पॉट ऑन... ते अकरा अतिरेकी स्टेडियमच्या आस-पास किंवा स्टेडियमच्या आत कुठेही असू शकतात..." डॉ. गोखले पुढे होत म्हणाले, "डोन्ट वरी प्रधानसाहेब. या डोन्सची फ्रीक्वेन्सी मी कॅच केली आहे. ती फ्रीक्वेन्सी मी या ट्रान्समीटर मध्ये सेट केली आहे. आत्ता सगळे ड्रोन्स बंद आहेत. जसे ते चालू होतील, तसे आपल्याला सिग्नल्स मिळतील. पण मला एक शंका आहे... जमालने बारा ड्रोन्स बनवून घेतले होते ज्यातला हा तुटलेला ड्रोन आपल्याकडे आहे. हा ड्रोन कोणासाठी होता..." सर्व बोलत होते तेव्हा उमा म्हणाली, "सर, एक महत्वाची बातमी मिळाली आहे, "मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे आणि आपले पंतप्रधानही उद्या खास चार्टर्ड प्लेनने येऊन थेट मैदानात उतरणार आहेत...
हे ऐकताच प्रधानांचे डोळे मोठे झाले. ते म्हणाले, "म्हणजे तो बारावा ड्रोन खुद्द पंतप्रधानांसाठी होता तर... माय गॉड. इतका मोठा कट..." तेव्हा उमा म्हणाली, "सर, मग तेरा ड्रोन असायला हवे होते. पण इथे बाराच आहेत. आणि हा बारावा ड्रोन तर निकामी झाला. मग आता जमाल काय करू शकतो..."
उमाकडे पाहत आनंद म्हणाला, "जमाल खूप शार्प आहे. त्याने बॅकप प्लॅन बनवलाच असणार. पण दोन्ही पंतप्रधान दुपारी बारा वाजता थेट मैदानात येणार, ही इतकी महत्वाची बातमी जमालपर्यंत पोहोचलीच कशी..." आनंदचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, "आतून लीक झाल्याशिवाय ही बातमी बाहेर जाणं शक्य नाही. There may be a rat in our system or in theirs..." सचिनची पाठ थोपटत प्रधान म्हणाले, "परफेक्ट थिंकिंग. आणि म्हणूनच आपण कोणावरही भरवसा ठेऊ शकत नाही..." यावर डॉ. गोखले म्हणाले, "ते सर्व ठिक आहे प्रधानसाहेब, पण मग आता पुढे काय... ड्रोन्स ऑन झाले की मी तुम्हाला दिलेल्या ट्रान्समीटर्समध्ये ड्रोन्स आणि रिमोटची फ्रीक्वेन्सी मॅच होईल आणि रिमोटच्या जागा आपल्याला समजतील. पण ते सर्व अकरा ड्रोन्स एकाच वेळी निकामी करावे लागतील. आणि तुम्ही तर फक्त चौघंच आहात..." प्रधानांनी थोडा विचार केला. मग फोन काढून एक नंबर लावला आणि स्पीकरवर ठेवत म्हणाले, "विकी, its Code Red. We need you, your boys and your eagles. Same place. हम तो तेरे आशिक़ हैं सदियों पुराने..." दुसऱ्याच क्षणी समोरून आवाज आला, "चाहे तू माने चाहे ना माने..."
रात्र वाढत चालली होती. एका जुन्या बंद पडलेल्या फॅक्टरीच्या आवारात एक माणूस मोबाईलवर, "हम तो तेरे आशिक़ हैं सदियों पुराने..." हे गाणं ऐकत चालला होता. गाणं ऐकता ऐकता तो चारी बाजूंना पाहत होता पण त्याच्याशिवाय तिथे कोणीच नव्हतं. गाणं बंद झालं आणि त्या माणसाने स्वत:च गायला सुरुवात केली, "हम तो तेरे आशिक़ हैं सदियों पुराने..." तो पुढची ओळ म्हणणार इतक्यात त्याला, "चाहे तू माने चाहे ना माने..." ही ओळ त्याच्या मागून ऐकू आली. तो माणूस थबकला. ओळ म्हणणारा माणूस म्हणाला, "Turn around slowly with hands on your head..." थबकलेला माणूस वळला तशी ओळ म्हणणारा माणूस पिस्तुलाचा हात खाली घेत म्हणाला, "प्रधान... तू..." गाणं ऐकणारी व्यक्ती स्वत: सीनियर इन्स्पेक्टर प्रधान होते आणि ओळ पूर्ण करणारे होते कर्नल विक्रम जोशी. प्रधान म्हणाले, "विकी, मला तुझी मदत हवी आहे..." कर्नल जोशी हसत म्हणाले, "Obviously... जितक्या बेफिकीरीने तू इथे हिंडतो आहेस..." कर्नल जोशी त्यांचं वाक्य पूर्ण करण्याआधीच त्यांच्या मागून आनंद, दोन्ही बाजूंनी सचिन आणि उमा समोर आले आणि कर्नल जोशींवर पिस्तुलं रोखून उभे राहिले...
त्यांच्याकडे पाहत कर्नल जोशी म्हणाले, "नाईस... पोलिसात अजून जबाबदार आणि हुशार ऑफिसर्स आहेत तर..." प्रधान हसून म्हणाले, "Offcourse... But Vicky, you are alone... I needed your boys also..." पिस्तुल खिशात ठेवत कर्नल जोशी म्हणाले, "Vicky is never alone officer..." इतकं म्हणून त्यांनी टाळी वाजवली. क्षणार्धात सात-आठ जणांनी प्रधानांसह बाकीच्यांना घेराव घातला. कर्नल जोशी म्हणाले, "These are my boys. Always with me..." सर्वांशी हस्तांदोलनं झाल्यावर कर्नल जोशी म्हणाले, "प्रधान... तू कोड रेड म्हणालास. सो आऊट विथ इट..." प्रधानांनी एकवार सभोवताली पाहिलं आणि यादवचा खून झाल्यापासून आत्तापर्यंतची सगळी हकीगत सांगितली. काही क्षण सगळे स्तब्ध झाले. कर्नल जोशी म्हणाले, "धिस इज शॉकिंग. वी हॅव टू टेक देम डाऊन..." कर्नल जोशींना दुजोरा देत प्रधान म्हणाले, "येस. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ड्रोन्सच्या रिमोटची लोकेशन्स आपल्याला समजतील. याची जबाबदारी उमा आणि डॉ. गोखले या दोघांवर आहे. आपण सगळे conference callने संपर्कात राहू. हे मिशन पार पडेपर्यंत दुसऱ्या कोणालाही आपण कॉन्टॅक्ट करायचा नाही..." "Right. Lets wait for the strike at noon tomorrow..." असं म्हणत कर्नल जोशींनी अंगठा दाखवला. प्रधानांसह इतरांनीही त्याचप्रमाणे अंगठे दाखवत होकार दर्शवला...
दिवस उजाडला. वानखेडे स्टेडियमच्या आस-पास रेलचेल आणि गर्दी दिसू लागली. क्रिकेटप्रेमींनी आत प्रवेश करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तिथे स्टेडियममध्ये अजून पुरती सकाळ झाली नव्हती तरी जवळ जवळ अर्ध्याहून अधिक स्टेडियम भरलं होतं. कधी एकदाचे बारा वाजतात आणि आपण आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहतोय असं सर्वांना झालं होतं. त्या गर्दीतही, सभोवताली करडी नजर ठेवत, अधून-मधून कानात बसवलेल्या इयर-प्लग्सना हात लावत काही माणसं फिरत होती. ती माणसं होती कर्नल विक्रम जोशी आणि त्यांचे दोन-तीन जवान. स्टेडियमच्या बाहेर टप्प्या-टप्प्यावर तशीच अजून काही माणसं फिरताना, पेपर वाचताना, हातातली बॅग सांभाळताना दिसत होती. ती माणसं होती सीनियर इंस्पेक्टर प्रधान, सब-इंस्पेक्टर सचिन, इंस्पेक्टर आनंद आणि कर्नल जोशींचे जवान. स्टेडियमच्या बाहेर एका व्हॅनमध्ये डॉ. गोखले आणि उमा सर्व माईक्सचं कंट्रोल सांभाळत होते. कानाला हात लावत प्रधान म्हणाले, "Everyone check your time. On the count of three, it will be 9:30 sharp. 3...2...1..." सर्वांनी घड्याळं सेट केली. डॉ. गोखले म्हणाले, "Keep all the sensors on. We need to catch the frequency and act fast..." हळू हळू एकेक आवाज ऐकू येऊ लागला, "कॉपी..."
वेळ जशी पुढे सरकत गेली तसं स्टेडियम भरू लागलं. स्टेडियमच्या बाहेरही गर्दी, गोंधळ, गदारोळ वाढू लागले. अकरा वाजून पन्नास मिनिटं झाली. स्टेडियममध्ये एकच जल्लोश झाला. हिरव्या गणवेषातले पाकिस्तानचे खेळाडू मैदानात आले आणि तिथे जमलेल्या प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानात चक्कर मारू लागले. स्टेडियमच्या बाहेर खास प्रॉजेक्टर्सद्वारे थेट प्रक्षेपण सुरू होतं. कानाला हात लावत प्रधान म्हणाले, "Everybody be alert... Just 5 mins left..." तेवढ्यात जल्लोष अजून वाढला. निळ्या जर्सीतले भारतीय खेळाडूसुद्धा मैदानात उतरले. दोन्हीही संघांच्या खेळाडूंनी मैदानाला एक फेरी मारली आणि मैदानाच्या मधोमध येऊन उभे राहिले. कर्नल जोशीं कानाला हात लावत म्हणाले, "Players from both teams are in the center. This was not in the agenda of the plan. Have we missed something..." हे ऐकताच सर्वांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. इतक्यात सगळ्यांच्या transmittersवर 'बिप बिप' असे आवाज येऊ लागले आणि स्क्रीनवर एक लाल टिंब दिसू लागलं. कर्नल जोशी म्हणाले, "The game is on boys... All the best..."
एकेक करून व्हॅनमध्ये असलेल्या स्क्रीन वर लाल टिंब दिसू लागली. डॉ. गोखले आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. उमा लगेच कानाला हात लावत म्हणाली, "Boys, keep the stadium at C... Arvind, 2'o clock from C... Sunny, 3'o clock from C... Raghav, 7'o clock from C..." असं करत करत उमाने सर्वांना रिमोटची ठिकाणं सांगितली. तेवढ्यात सर्वांच्या हेडफोन्समध्ये आवाज आला, "Uma, where is my rat..." तेव्हा स्क्रीनकडे पाहत डॉ. गोखले म्हणाले, "उमा, इथे तर दहाच रिमोट ऑन झाल्याचं दिसत आहे. मग तो अकरावा रिमोट..." उमा काही बोलणार इतक्यात सर्व लाल ठिपक्यांनी आपापली जागा सोडली. स्क्रीनकडे पाहत उमा म्हणाली, "The rats are moving..." स्टेडियममध्ये असलेले कर्नल जोशी म्हणाले, "Follow them, we will give cover..." सर्व ठिपके इतरत्र हलू लागले आणि ट्रान्समीटर्सकडे पाहत आनंद, सचिन व कर्नल जोशींची माणसं त्या ठिपक्यांच्या मागे जाऊ लागले. कर्नल जोशी आणि त्यांच्या माणसांनीही स्टेडियम सोडलं आणि आपल्या माणसांच्या मदतीसाठी गेले. हे सगळं ऐकत प्रधान आपल्या जागी दबा धरून होते. काहीतरी गोंधळ आहे हे जाणून त्यांनीही आपली जागा सोडली आणि कर्नल जोशींच्या दिशेने जाऊ लागले. काही पावलं चालून ते थबकले. मग थोडा विचार करून ते पुढे निघून गेले...
आनंद, सचिन आणि कर्नल जोशींचे जवान एकेका बाजूने एका घराजवळ पोहचले. सर्वांनी आपापले ट्रान्समीटर चेक केले. प्रत्येकाच्या ट्रान्समीटरमध्ये तो लाल ठिपका स्तब्ध होता. काही क्षण गेल्यावर सर्वांनी एकाच वेळी घरात प्रवेश केली. ते एक निर्मनुष्य घर होतं जे बऱ्याच काळापासून बंद होतं. मधोमध एका टेबलवर सगळे दहा रिमोट ठेवले होते. सचिनने एक रिमोट उचलला. त्यावर एकच बटण होतं. सचिनने ते बटण दाबलं. तिथे व्हॅनमध्ये एक ठिपका बंद झाला. डॉ. गोखलेंनी उमाकडे पाहिलं. उमा कानाला हात लावत म्हणाली, "Boys, one rat is down..." तिथे त्या निर्मनुष्य घरात सगळे गोंधळले. आनंद लगेच कानाला हात लावत म्हणाला, "काहीतरी गडबड आहे. आम्ही एका बंगल्यात आहोत. इथे दहा रिमोट ठेवले आहेत. पण ते काही कामाचे वाटत नाहीत. They are just to divert the attention..." "सही समझे अफसर..." आनंद बोलतच होता, की सर्वांना हा आवाज आला. आवाजापाठोपाठ चहू बाजूंनी बुरखा घातलेल्या बंदूकधारी माणसांनी सर्वांना घेराव घातला. सर्वांच्या हातातल्या गन्स हिसकावल्या गेल्या. एक बुरखाधारी पुढे येत म्हणाला, "मान गये तुम सब की अक्ल को | बहुत खूबी से पता लगा लिया, हम क्या करनेवाले हैं | पर हमारे भाईजान ने तुम्हारी बाज़ी तुमपर ही उलटा दी | जानते हो यह सब कैसे हुआ...
यह सब हमारे भाईजान का कमाल है | उन्हे मालूम था, कि पुलिस की आंखों से कुछ नही छूटता | इसलिए उन्होने दोहरा प्लॅन बनाया | पहला प्लॅन दिखावे का था | जेम्स और डॉ. अंसारी का किडनॅप होना, वह जहर, वह ड्रोन्स, मेकॅनिक का खून, गाडी का रंग बदलना, सब दिखावा था | जहर से हम किसी को भी मार सकते थे, लेकिन हमने इस जंगल से बाहर, शहर में बसे बैंक के सिक्युरिटी गार्ड को चुना | कयोंकि बैंक में कॅमेरे लगे होते हैं | हम सोच ही रहे थे, कि पुलिस तक यह दिखावे का प्लॅन कैसे पोहोचाया जाए जब हमें जेम्स की घड़ी के बारे में पता चला | बस, फिर क्या था, घड़ी में रेकॉर्डिंग होती रही | सच्चा वतन परस्त निकला तुम्हारा जेम्स | ऐसे वक़्त में भी हमारे ख़िलाफ सबूत इकठ्ठे कर रहा था | प्लॅन सच्चा है इस बात का आप लोगो को यकीन आ जाए, इसलिए हमारे यूसुफमियाँ ने अपनी जान गवाई | ख़ैर, जेम्स को मारने के बाद हमने उस घड़ी में वही क्लिप्स रखीं जो हमारे भाईजान चाहते थे | जेम्स रेकॉर्ड नहीं कर रहा था, बल्कि हमारे भाईजान उससे रेकॉर्डिंग करवा रहे थे | जो आप लोगों ने देखा, वह पूरी तस्वीर नहीं थी | ज़हर और ड्रोन्स का हमारे मक़सद से कोई ताल्लूक ही नहीं था | तुम लोग गुमराह हो गए और हमारा असली प्लॅन कामयाब हो गया | Plutonium का नाम सुना है... उसकी एक बूँद भी ख़तरनाक होती है | ज़रा सोचो, अगर बड़ी तादाद में plutonium bomb कहीं फट जाए, तो कितनी बड़ी तबाही होगी | जब बम फटेगा, तब हवा में मिलकर Plutonium सत्तर गुना बढ़ जाएगा | हवा लहराएगी, और Plutonium सात सौ गुना बढ़ जाएगा | तुम्हारी मुंबई के साथ रेडियेशन और फैलेगा और तुम्हारा हिन्दुस्तान... हा...हा...हा... यह है हमारा Mission POISAN... Plutonium Outburst In Stadium And End..." हमारे भाईजान का दिमाग़ सातवें आसमान से भी ऊपर है | जानते हो भाईजान कौन हैं... जमाल...
यह दस रिमोट भी तुम सब को गुमराह करने के लिए थे | जिस तरह तुम लोगों ने इन रिमोट्स की फ्रीक्वेन्सी पकड़ ली, उसी तरह हमने भी तुम्हारे ट्रान्समीटर्स की फ्रीक्वेन्सी पकड़ ली | इन्हीं का इस्तमाल कर के हमने तुम्हें यहाँ बुलाया | लो, तुम्हारे डॉक्टर और वह पुलिसवाली भी आ गए..." बुरखेधारीने दाखवलेल्या दिशेला सर्वांनी पाहिलं, तर काही बंदूकधाऱ्यांमध्ये डॉ. गोखले आणि उमा उभे होते. त्या दोघांनाही बाकी जमावासोबत आणलं गेलं. तो बुरखेधारी पुन्हा म्हणाला, "तुम लोग सोच रहे हो, ग्यारह रिमोट होने चाहिये थे, पर यहाँ तो दस हैं | हमारा ग्यारहवाँ रिमोट वहाँ है जहाँ उसे होना चाहिए..." तेवढ्यात सर्वांच्या ट्रान्समीटर्सवर 'बीप' आवाज ऐकू येऊ लागला आणि एक लाल ठिपका दिसू लागला. बोलत असलेल्या अतिरेक्याच्याही हातातला ट्रान्समीटर वाजू लागला. तो अतिरेकी म्हणाला, "आ गए पाकिस्तान के वज़ीर-ए-आज़म और साथ में तुम्हारे प्रधानमंत्री भी | उनके साथ हैं हमारे भाईजान जो इन दोनों को जन्नत की सैर पर ले जाएँगे | तुम लोग सिर्फ तमाशा देखो और सिसक सिसककर मर जाओ... हा...हा...हा... बाँध दो इन सबको और निकलो यहाँ से..." तिथे दोन वर्तुळं तयार झाली होती. आतल्या वर्तुळात आनंद, उमा, सचिन, डॉ. गोखले आणि कर्नल जोशींचे जवान होते, तर बाहेरच्या वर्तुळात या सर्वांना गराडा घालून उभे बंदुकधारी अतिरेकी होते. सगळे अतिरेकी जवळ जवळ येत होते तेवढ्यात एका जवानाच्या हातावर बांधलेलं घड्याळ व्हायब्रेट होऊ लागलं. सर्वांकडे पाहत दोन्ही हात पसरवत तो म्हणाला, "टायगर इज हियर... जय हिंद..."
सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांकडे पाहून सर्व "जय हिंद..." म्हणाले. सर्व एकमेकांजवळ आले आणि आतलं वर्तूळ अजून लहान झालं. ते अतिरेकी सर्वांना पकडणार इतक्यात बोलणाऱ्या अतिरेक्याच्या हातावर एक गोळी झाडली गेली. त्याच्या हातातली बंदूक जशी खाली पडली तसा एक मोठा आवाज आला, "नाऽऽऽऽव..." आवाजासह आतल्या वर्तुळातले सगळे खाली बसले आणि दुसऱ्याच क्षणाला सगळे एकसाथ एकाच वेळी उठून उभे राहिले. सर्व अतिरेक्यांना तडाखा बसला आणि एकाच वेळी सर्वच्या सर्व अतिरेकी हवेत उडून खाली पडले. आतल्या वर्तुळात्या प्रत्येकाने आपापलं पिस्तूल मिळवलं आणि सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. सर्व अतिरेकी मारले गेल्यावर खिडकीतून कर्नल जोशी आणि त्यांचे साथिदार आत आले. जखमी अतिरेक्यावर पिस्तूल रोखत कर्नल जोशी म्हणाले, "मैं सिर्फ एक बार पुछूँगा | अगर तू नहीं बोला, तो पिस्तौल की गोली से तेरे माथे पर शिवजी की तीसरी आँख बना दूँगा | कहाँ है ग्यारहवाँ रिमोट और Plutonium bomb..." तो अतिरेकी लगेच बोलता झाला, "पाकिस्तान के वज़ीर-ए-आज़म और हिन्दुस्तान के प्रधानमंत्री को लेकर जो हेलिकॉप्टर इस वक़्त मैदान की तरफ जा रहा है, हमारे भाईजान ही उसे चला रहे हैं | उसी हेलिकॉप्टर में बम है और रिमोट हमारे भाईजान के पास है...
वह हेलिकॉप्टर तेजी से मैदान की तरफ जा रहा है | अब कोई कुछ नहीं कर सकता | भाईजान और मैं तो हमारे मक़सद के लिए कुर्बान हो जाएँगे | तुम सब फटी आँख़ों से देखो, अपनी मौत को और अपने हिन्दुस्तान की तबाही को... हा...हा...हा..." तो अतिरेकी हसायला लागताच आनंद, सचिन, उमा आणि डॉ. गोखलेपण हसायला लागले. ते पाहून तो अतिरेकी एकदम हसायचा थांबला. सचिन म्हणाला, "कुर्बानी जैसे शब्द तुम लोगों के मुँह से अच्छे नहीं लगते..." कर्नल जोशीकडे हात दाखवत उमा म्हणाली, "हमारा शेर यहाँ है, पर हमारा बब्बर शेर..." कानाजवळ हात नेत आनंद म्हणाला, "सर कॉपी..." तिथे मैदानात जल्लोष सुरू होता. हेलिकॉप्टर जसं जवळ येऊ लागलं, तसा जमलेल्या गर्दीचा आवाज वाढला. तिथे हेलिकॉप्टरमध्ये पायलट त्याच्या जखमी खांद्याला धरून बसला होता. हेलिकॉप्टरवर कंट्रोल मिळवण्यासाठी जमालनेच त्याच्यावर गोळी झाडली होती आणि आता एका हातातली गन पायलटवर रोखून दुसऱ्या हाताने तो हेलिकॉप्टर चालवत होता. मागच्या सीटवर भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान बसले होते. आणि बाजूलाच दोन गार्डस मारून पडले होते. जमालने एकवार मागे पाहिलं आणि म्हणाला, "जनाब, बड़ी ख़्वाहिश थी आप दोनों से मिलने की | आज वह तमन्ना भी पूरी हो गई | इस चॉपर को मैदान में क्रॅश कराने जा रहा हूँ मैं | दिल थाम के बैठें जनाब | इस तबाही को अब ना ख़ुदा रोक सकेगा, ना भगवान... हा...हा...हा...हा..."
जमाल हसत गेला हसत गेला. तेवढ्यात त्याला दुसऱ्या एका हेलिकॉप्टरचा आवाज आला. हसणं थांबवून त्याने मागे वळून पाहिलं, तर एक हेलिकॉप्टर, बॉम्ब लावलेल्या हेलिकॉप्टरचा पाठलाग करत होतं. त्याच्या दारात सीनियर इंस्पेक्टर प्रधान उभे होते. प्रधानांना तसं पाहून जमाल अवाक झाला. क्षणार्धात ते हेलिकॉप्टर जवळ आलं. जमालने पायलटवर रोखलेली गन दुसऱ्या हेलिकॉप्टरकडे वळवली. तो ट्रिगर दाबणार इतक्यात प्रधानांनी गोळी चालवली. गोळी जमालच्या दोन भुवयांच्या मध्ये लागली आणि तो जागीच गतप्राण झाला. जखमी पायलटने जमालला बाजूला सारून लगेच हेलिकोप्टरची कमान सांभाळली. प्रधानांनी पायलटला हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवायला सांगितलं. तेव्हा पायलट ओरडून म्हणाला, "सर, या जमालने इंजिनमध्ये बिघाड केला आहे. चॉपर लँड नाही होऊ शकत..." एक क्षण प्रधानांनी विचार केला आणि लगेच बॉम्ब असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये उडी घेतली. मग दोन हेलिकॉप्टर्सच्या मध्ये एक प्लँक घातला. दोन्हीही पंतप्रधान आणि जखमी पायलट आणि वीरमरण आलेले गार्डस त्या प्लँकवरून दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये पोहोचल्यावर प्रधानांनी बॉम्ब असलेल्या हेलिकॉप्टरची धुरा आपल्या हाती घेतली. मग ते ओरडून म्हणाले, "कॅप्टन, चॉपर को हिफाजत से मैदान पर उतारना | उसके अंदर के लोग सब के लिए बहुत किमती हैं..." दोन्ही पंतप्रधानांनी आणि दोन्हीही पायलट्सने प्रधानांना सेल्यूट केलं. प्रधानांनी हसतमुखाने सेल्यूटला सेल्यूटने उत्तर दिलं आणि हेलिकॉप्टरची दिशा बदलली...
दोन्हीही पंतप्रधान असलेलं हेलिकॉप्टर अलगद मैदानात आलं आणि पॅव्हेलियनच्या जवळ जमिनीपासून फूटभर वर उभं राहिलं. दोन्हीही पंतप्रधान आणि जखमी पायलट लोखंडी जिनावजा शिडीला धरून खाली उतरल्यावर हेलिकॉप्टर पुन्हा हवेत उडालं आणि मैदानापासून दूर निघून गेलं. दोन्हीही पंतप्रधान जमिनीवर उभे राहिले आणि जाणाऱ्या दोन्ही हेलिकॉप्टर्सकडे पाहत दोघांनी सेल्यूट केलं. तिथे प्रधानांनी आपल्या कानाला हात लावला आणि म्हणाले, "Vicky, your eagle saved the national heroes. Team, mission POISAN is terminated but danger is still not over. I am taking the chopper to the waters. Over and out..." इतकं बोलून प्रधानांनी इयर प्लग काढून टाकला. हेलिकॉप्टर समुद्राच्या वरून जात होतं. किनाऱ्यावर प्रधानांची टीम, कर्नल जोशी आणि त्यांचे जवान उभे होते. त्यांच्या डोक्यावरून अजून एक हेलिकॉप्टर उडत गेलं. हे कर्नल जोशींचं ईगल होतं. हळूहळू दोन्हीही हेलिकॉप्टर्सचे छोटे ठिपके दिसू लागले. एक ठिपका पाण्यात पडला आणि एक मोठा स्फोट झाला. सर्वजण हे दृष्य पाहत होते. बेड्या अडकवलेला तो अतिरेकी हसू लागला व म्हणाला, "हा...हा...हा... भाईजान ने ना सही, तुम्हारे अपने अफसर ने हेलिकॉप्टर को क्रॅश करा दिया | अब Plutonium पानी में और तेजी से फैलेगा... हा...हा...हा..."
तो अतिरेकी हसत असताना त्याने सर्वांकडे पाहिलं आणि परत समुद्राकडे पाहू लागला. समुद्रकडे पाहून तो अतिरेकी हसणं विसरला. समुद्राच्या दिशेने एक हेलिकॉप्टर किनाऱ्याकडे येत होतं. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच त्यातून एक मेटलचा बॉक्स घेऊन प्रधान बाहेर पडले. आनंदकडे बॉक्स देत, कर्नल जोशींच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "विकी, तुझ्या ईगलने पुन्हा साथ दिली. हा बॉक्स पायलटच्या सीटखालीच ठेवला होता. मी विचारच करत होतो Plutonium explosion कसं थांबवू. तेवढ्यात तुझ्या ईगलने योग्य वेळी तिथे येऊन बॉम्बचा स्फोट होण्यापासून वाचवलं. जे हेलिकॉप्टर समुद्रात पडलं, त्यामध्ये फक्त जमालचं प्रेत होतं..." आनंदकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "डॉक, हा बॉक्स तुमच्या ताब्यात घ्या. पण सांभाळून. यात Plutonium bomb आहे..." मेटलचा बॉक्स पाहताच तो अतिरेकी त्या दिशेने झेपावला. कर्नल जोशींनी चपळाईने त्याला पायात पाय अडकवून पाडलं आणि आनंद व सचिनने त्याला धरलं. त्याच्याकडे पाहत प्रधान म्हणाले, "तुला जिवंत ठेवण्यात आम्हाला काही स्वरस्थ्य नाही. पण तुझ्याकडे असलेली माहिती अधिक महत्वाची आहे. घेऊन चला याला. लेट्स गो..."
समाप्त.
@ अनिकेत परशुराम आपटे.