Tuesday, July 11, 2017

प्रेम आणि मैत्री...

एका झाडावर होते दोन सुंदर पक्षी एकाचं नाव प्रेम तर दुसरी होती मैत्री... मैत्री म्हणाली प्रेमाला, का असा प्रकार केला? जे खुशीत असती मजजवळ तुझ्यासोबत मात्र त्यांचा डोळा असतो पाणावलेला... माझ्यासह असतं जिव्हाळ्याचं जग सारं पण प्रेमा रे प्रेमा तुझ्यात गुंतताच असतं कधी विरह गीत न्यारं... ऐकून हे बोल मैत्रीचे प्रेम फार हळहळले असे विचार का आले मनी हेच त्याला नाही कळले... प्रेम म्हणालं मैत्रीला अशी कशी तू वेडी अगं तुझ्यातूनच तर जमते माझी गोड जोडी... नाती जपण्याची कला माझ्याकडून येते पण नाती मनाची जोडण्या तुझीच तर मदत होते... पडताच कानी हे शब्द मैत्री गेली भारावून जोडले घट्ट नाते प्रेमाशी त्याला कवेत घेऊन... @ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment