"आता
तर हद्दंच झाली. कसा काय तुझ्याशी संसार करणार आहे, देवंच जाणे..." अजय रीमाला
म्हणाला आणि तणतणत बाहेर निघून गेला. तो इतका रागावला होता की मागून येणारे रीमाचे
हुंदकेही त्याला ऐकू आले नाहीत. चालत चालत अजय एका बागेजवळ आला. संध्याकाळचे पाच
वाजले होते त्यामुळे बाग ब-यापैकी गजबजली होती. अजय कोप-यातल्या एका सिंगल
बाकड्यावर जाऊन बसला...
समोरच्या बाकावर एक आजी स्वेटर विणत होत्या. त्यांच्या बाजूला एक कापडी पिशवी होती जी जवळ जवळ सर्व बाक आडवून होती. आजी मधेच खेळणा-या मुलांकडे बघायच्या आणि पुन्हा विणकामात बुडून जायच्या. काही वेळाने एक आजोबा तिथे आले. आजींच्या बाजूला बसण्याजोगी जागा आहे हे पाहून ते आजींजवळ आले. "माफ करा, मी इथे बसू का..??" ते आजींना म्हणाले. विणकामातून नजर वळवत आजींनी आजोबांना पाहिले आणि त्यांचा पसारा थोडा आवरता घेतला. आजोबा हसले आणि बाकावर बसले...
काही क्षण शांततेत गेल्यावर आजोबांना कंठ फुटला, "तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय..." आजोबांकडे एक कटाक्ष टाकत आजी म्हणाल्या, "काय हो... या वयातसुद्धा..." आजोबांनी आजींच्या म्हणण्यातला रोख ओळखला. म्हणाले, "अहो तसं नाही. खरंच तुम्हाला पाहिलंय कुठेतरी. तुम्ही पुण्याला होता का... गोखले कॉलेजला..." "अय्या, तुम्ही कसं हो ओळखलंत..." आजी, 'आजी म्या ब्रम्ह पाहिले' असे भाव चेहे-यावर आणत म्हणाल्या. "अगं कुसे मी दिन्या... ओळखलं नाहीस..." आजोबा उत्तर देत म्हणाले...
दोघांना एकमेकांची ओळख पटली आणि गप्पा सुरू झाल्या. आजी म्हणाल्या, "तो समोर एका मुलीशी खेळतोय ना तो माझा नातू, स्वप्नील. हुशार आहे हो. पहिल्या पाचात असतो". आजोबाही वदले, "आणि ज्या मुलीशी तुझा स्वप्नील खेळतोय ना ती माझी नात, स्वाती. तीही काही कमी हुशार नाही. तोडीसतोड आहे अगदी. वेळ जात राहिला आणि गप्पा रंगत गेल्या. उजेड कमी होत गेला तसेच स्वप्नील आणि स्वाती आजी-आजोबांजवळ आले आणि, "आजी, आजोबा चला ना घरी. आई-बाबा वाट बघत असतील पार्टीसाठी..." असं म्हणत दोघांना उठवू लागले...
आजोबा-आजी उठले. आजोबा एका दिशेने चालू लागले तर आजी म्हणाल्याच, "अहो, तिथे कुठे... पार्टी घरी नाही हॉलवर आहे म्हटलं..." आजोबा वळले. हे सर्व पाहणा-या अजयला काही कळेना... त्याने दोघांना विचारलं तर आजोबा म्हणाले, "मुला, आम्ही नवरा-बायको आहोत आणि ही आमचीच नातवंड आहेत. आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. आता हॉलवर छान पार्टी आहे. पण आम्ही विचार केला की आयुष्याच्या संध्याकाळी आजच्या या दिवसातले काही क्षण जुन्या आठवणीत घालवायचे". अजय हसला. स्वत:लाच म्हणाला, "जर हे दोघं पन्नास वर्ष एकमेकांना समजून घेत असतील तर मी का नाही..." पाठमो-या जाण-या त्या जोडप्याकडे पाहत अजय म्हणाला, "good evening आजी-आजोबा..."

@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment